Author Archives: Kokanai Digital

धक्कादायक! तारकर्ली समुद्र किनार्‍यावर पुण्याचे ३ युवक बुडाले; दोघांचा मृत्यू, एक अत्यवस्थ

   Follow us on        
सिंधुदुर्ग : तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर गंभीर असलेल्या एका युवकावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी ११.२० वाजण्याच्या दरम्यान तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रात घडली.
याबाबतची माहिती अशी हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय- २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), आँकार अशोक भोसले (वय- २६), रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) शुभम सुनील सोनवणे (वय २२) सर्व रा. उरुळी देवाची पोलीस चौकीच्या मागे हडपसर ता. हवेली, जि. पुणे हे युवक तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळ लगतच्या समुद्रात हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. पर्यटक बुडत असल्याचे निदर्शनास येताच किनाऱ्यावरील स्थानिक आणि तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तत्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध घेण्यात आला. अखेर स्थानिकांकडून समुद्रात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तत्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून अधिक उपचार करण्यासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्यात समीर गोवेकर वैभव सावंत दत्तराज चव्हाण महेंद्र चव्हाण राजेश्वर वॉटर स्पोर्ट्स चे कर्मचारी सहभागी झाले होते या घटनेची माहिती येथील पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

शिरसोली येथे २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन

सन २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने शिरसोली येथील नदीच्या किनारी असलेल्या स्वयंभू शंभो महादेवाच्या मंदिर क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. 

   Follow us on        

दापोली: दापोली तालुक्यातील शिरसोली या गावी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सव सोहळा बुधवार दिनांक. २६.२.२०२५ रोजी संप्पन्न होत असून भाविकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून स्वयंभू शंभू महादेवांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणातील निसर्गरम्य परीसरात शिरसोली येथे नदीच्या किनारी हे स्वयंभू शंभो महादेवांचे मंदिर आहे. येथे १९७४ मध्ये सतत ३ वर्ष महादेवांच्या दर्शनासाठी गंगामाता अवतरली होती. त्या वेळी दूर दूर वरून भाविक या पवित्र स्थानाला भेट देत असत.

गेली २४ वर्ष अविरत शिवपार्वती दिंडी मंडळामार्फत अनेक शिवभक्त मुंबई ते शिरसोली पायीवारी करतात. यावर्षी दिनांक २२-०२-२५ पासून शिवपार्वती दिंडी मंडळाने मुंबई ते शिरसोली पायी वारीचे आयोजन केले आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी शंभूच्या दर्शनासाठी भाविकांचा सकाळपासूनच ओघ सुरू असतो. मुंबईवरून निघालेल्या दिंडीवारीचे सकाळी १०.३० वाजता स्वागत करून देऊळवाडी येथील ग्रामदेवतेची गादी असलेल्या घरातून देवाच्या वारीची सुरुवात केली जाते. ही देववारी आणि मुंबईतून आलेली वारी एकत्रीतरित्या मोठ्या भक्तीभावाने ग्राम दैवत आसलेल्या भैरी भवानीच्या मंदिरात जाते व तिथून गावच्या मध्यभागातून भक्तीमय वातावरणात शिवशंभूच्या मंदिरात पोहोचते. शिवमंदिरात पोहचताच *हर हर महादेव* या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. दिंडी सोबत आलेल्या भाविकांसह सर्व भाविक शिवशंभुचे दर्शन घेतात. शिवशंभूचा आशीर्वाद मिळाल्याने प्रसन्न मुद्रेने सर्व भाविक आनंदाने मंदिराबाहेर पडतात .

मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळच शिवशंभूचा तीर्थप्रसाद सर्वांना दिला जातो. तसेच आलेल्या सर्व भाविकांना मंडळामार्फत फराळी चिवडा व कोकम सरबत दिले जाते.

दिनांक २६/२/२५ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी स्वयंभू शंभू महादेवांच्या मूर्तीवर सकाळच्या नित्य पूजेनंतर मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात येतो.

महादेवाचा अभिषेक संपन्न झाल्यानंतर साधारणता १२.३० च्या दरम्यान मंदिरासमोरील टेकडीवर गोसावी मठामध्ये गोसावी देवांचे पूजन केले जाते तेथेही सर्व भाविक गोसावी देवांचे दर्शन घेतात.

गोसावी मठातून पूजन करून आल्यानंतर साधारण १.३०च्या दरम्यान शंभो महादेवांची महाआरती करण्यात येते. त्यानंतर दिवसभर मंदिराच्या सभामंडपात स्थानिक भजन मंडळ देवाचे नामस्मरण करत असतात. दिवसभर महादेवांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ सुरूच असतो.

रात्रौ ८ नंतर मंदिरात रात्रभर वारकरी संप्रदायाच्या नामांकित दिंड्या येऊन हरिनाम करत महाशिवरात्रीचा जागर सुरू होतो. कोकणातील विशेष वाद्य आसलेल्या खालु बाज्याने प्रत्येक दिंडीचे स्वागत करुन हरिनामाला सुरुवात केली जाते.

या उत्सवाच्या दिवशी मंदिराच्या परिसरात एक दिवसाची बाजारपेठ स्थापून विविध दुकानदार आपल्या मालाची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करीत उत्सवाची शोभा वाढवतात.

दिनांक २७/२/२५ रोजीच्या पहाटे होणाऱ्या काकड आरती मध्ये सर्व महिला पुरुष, वारकरी बेभान होऊन वारकरी ठेक्यावर तल्लीन होतात.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २७/२/२५ सकाळी येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिराच्या सभामंडपात महाप्रसाद वाढून या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता होते.

दापोली तालुक्यातीलच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यांतील हजारो भाविक या उत्सवास येतात. तालुक्यातील एक मोठा शिस्तबद्ध, नियोजित उत्सव म्हणून या महाशिवरात्र उत्सवाकडे पहिले जाते. हा उत्सव जास्तीतजास्त कसा उत्तम होईल यासाठी शिवशंभोचे भक्त, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, भक्त गण हे सर्व जवळ जवळ 2 महिन्यापासून तयारीत असतात. अतिशय उत्साहात, जल्लोषात, भक्तिमय वातावरणात महाशिवरात्र उत्सव साजरा होतो. हजारो भक्तगण या उत्सवाला प्रचंड गर्दी करताना दिसून येतात. सर्व भक्तांच उत्तम सहकार्य व महाप्रसादासाठी अर्थिक मदत या उत्सवाला मिळते, सर्व भक्तगणांनी यावर्षीही महाशिवरात्र उत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती महाशिवरात्र उत्सव मंडळ शिरसोली (मुंबई/स्थानिक) यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

 

Konkan Railway | होळी विशेष गाड्यांचे चुकीचे नियोजन; प्रवासी संघटनांकडून नाराजीचे सूर

   Follow us on        

Konkan Railway:होळीला होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मात्र या गाड्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे होळीला कोकणात गावाला जाणार्‍या कोकणकरांसाठी या गाड्यांचा खूप कमी फायदा होणार असल्याने प्रवासी संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

 

या विशेष गाड्या पैकी गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव ही गाडी दिनांक ६ आणि १३ (मध्यरात्री) आणि गाडी क्रमांक ०११२९ एलटीटी – मडगाव ही गाडी दिनांक १३ आणि २० या तारखांना रात्री सोडण्यात येणार आहे. १३ मार्च या दिवशी होळी असताना त्याच दिवशी रात्री सोडण्यात येणार्‍या गाड्यांचा उपयोग काय? ६ ते २५ मार्च सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असताना ह्या आठवडी विशेष गाड्या त्याही रात्रीचा प्रवास असणाऱ्या, गोव्यात जाणाऱ्या गाड्यांचा महाराष्ट्राला काय लाभ असा प्रश्न अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने विचारला आहे. तसेच होळी दरम्यान मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी दिवसा आणि मुंबई सावंतवाडी रात्री अशा किमान तीन दैनिक गाड्यांची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या गाड्यांना सेकंड स्लीपर या श्रेणीच्या डब्यांपेक्षा एसी श्रेणीचे डबे जोडले आहेत. गाडी क्रमांक ०११५१ /०११५२ मुंबई सीएसएमटी – मडगाव या गाडीला तब्बल १० थ्री टायर एसी श्रेणीचे आणि मात्र ४ स्लीपर श्रेणीचे डबे जोडले आहेत. त्यामुळे या गाड्या कोकणातील प्रवाशांसाठी न चालविता गोव्यासाठी चालविण्यात आल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.

चौकट

मुंबई – सावंतवाडी,मुंबई -रत्नागिरी,मुंबई -चिपळूण ह्या गाड्या होळी दरम्यान चालवणे सोयीचे आहे.त्यामुळे कोकण रेल्वेला विनंती आहे की कोकणवासियांचा सोयीनुसार गाड्या सोडण्यात याव्यात,किंवा गणेशोत्सवादरम्यान वापरण्यात येणारा फॉर्म्युला होळी दरम्यान चालवावा ही विनंती. – कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी 

होळी १३ तारखेला…. आणि गाड्या सोडल्या आहेत ६ आणि १३ तारखेला होळीदिवशीच….९,१०,११,१२ तारखेला होळीसाठी गाड्यांना वेटींग आहे तेव्हा एकही स्पेशल गाडी नाही सोडली…रेल्वेचे अजब लाॅजीकश्री गणेश चामणकर

 होळी स्पेशल आणखी काही रेल्वे गाड्यांची प्रवासी संघटनांची मागणी आहे. कोकण रेल्वे मार्गावर मार्च ते जून दरम्यान वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता ह्या जादा रेल्वेना १० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी.वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना 

पश्चिम रेल्वेवरून कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या जास्त आहे त्यासाठी ०९०५७/५८ ही उधना मेंगलोर एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी. – श्री यशवंत जडयार,

 

२२ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 13:22:14 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 17:41:05 पर्यंत
  • करण-गर – 13:22:14 पर्यंत, वणिज – 25:46:32 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-हर्शण – 11:55:02 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय- 07:05
  • सूर्यास्त- 18:40
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 17:41:05 पर्यंत
  • चंद्रोदय- 27:06:00
  • चंद्रास्त- 13:07:00
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • 1499 : बासेल करारावर स्वाक्षरी झाली आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.
  • 1660 : शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार पन्हाळगड सिद्दी जोहरच्या हवाली करण्यात आला.
  • 1888 : नॅशनल जिओग्राफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1931 : नेपाळचे राजकुमार हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
  • 1965 : दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धविराम आदेशानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरे काश्मीर युद्ध थांबविण्यात आले.
  • 1980 : इराकने इराणचा पाडाव केला.
  • 1982 : जयवंत दळवी लिखित आणि रघुवीर तळशीलकर दिग्दर्शित कलावैभव निर्मित पुरुष या नाटकाचा दादरच्या शिवाजी मंदिरात प्रीमियर झाला.
  • 1995 : नागरिकांना घरावर किंवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • 1995 : श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथील शाळेवर बॉम्बहल्ला केला तेव्हा किमान 34 लोक ठार झाले.
  • 1998 : सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1791 : ‘मायकेल फॅरेडे’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 1867)
  • 1829 : व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म.
  • 1869 : ‘व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री’ – कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 1946)
  • 1876 : ‘आंद्रे तार्द्यू’ – फ्रांसचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1878 : ‘योशिदा शिगेरू’ – जपानचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1885 : ‘बेन चीफली’ – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1887 : ‘डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील’ – थोर शिक्षणतज्ज्ञ यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू : 9 मे 1959)
  • 1909 : ‘विडंबनकार दत्तू बांदेकर’ – विनोदी लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑक्टोबर 1959)
  • 1915 : ‘अनंत माने’ – मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 9 मे 1995)
  • 1922 : ‘चेन निंग यांग’ – नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1923 : ‘रामकृष्ण बजाज’ – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1520 : ‘सलीम (पहिला)’ – ऑट्टोमन सम्राट यांचे निधन.
  • 1539 : ‘गुरू नानक देव’ – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू यांचे निधन. (जन्म : 15 एप्रिल 1469)
  • 1828 : ‘शक’ – झुलु सम्राट यांचे निधन.
  • 1952 : ‘कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग’ – फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 28 जानेवारी 1865)
  • 1956 : ‘फ्रेडरिक सॉडी’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज यांचे निधन. (जन्म : 2 सप्टेंबर 1877)
  • 1991 : ‘दुर्गा खोटे’ – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 14 जानेवारी 1905)
  • 1969 : ‘ऍडोल्फो लोपे मटियोस’ – मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1970 : ‘शरदेंन्दू बंदोपाध्याय’ – बंगाली लेखक यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1899)
  • 1994 : ‘जी. एन. जोशी’ – भावगीतगायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 6 एप्रिल 1909)
  • 2007 : ‘बोडिन्हो’ – ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू यांचे निधन.
  • 2011 : ‘मन्सूर अली खान पतौडी’ – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब यांचे निधन. (जन्म : 5 जानेवारी 1941)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

”चुकीचा इतिहास दाखवला” | राजेशिर्के घराण्याचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

   Follow us on        

पुणे: छावा सिनेमा पुन्हा एका वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चुकीचा इतिहास दाखवून आपल्या घराण्याची बदनामी केल्याचा आरोप राजेशिर्के घराण्याने या सिनेमाच्या दिग्दर्शकावर केला आहे.

छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कान्होजी आणि गणोजी राजेशिर्के यांना खलनायक केलं. त्यामुळे राजेशिर्के घराण्याची बदनामी झाली. ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या चित्रपटातील हा मजकूर काढून टाकवा आणि पुन्हा प्रदर्शित करावा अन्यथा आम्ही सगळ्या शहरातून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करूअसा इशारा राजेशिर्के घराण्याने दिला आहे.

पुण्यात शिर्केंच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली आहे. चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. याबाबत आमचं मत विचारायला हवं होतं. पण, त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

छावा सिनेमात संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्के औंरगजेबाला देतात. त्यानंतर संभाजी महाराजांना मोजक्या सैन्यसह मुघलांचं सैन्य संगमेश्वर येथे गाठतं. त्यानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात येतं आणि 40 दिवस अन्ववित अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात येते. दरम्यान, संभाजी महाराज मुघलांना सापडतात, याचा संपूर्ण कट गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून रचण्यात आला, असं छावा सिनेमात दाखवण्यात आलं आहे. याच प्रसंगावर राजेशिर्के घराण्याने आक्षेप नोंदवले असून त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कोकणात ११ पर्यटन स्थळी रोप-वे उभारण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

   Follow us on        
मुंबई : राज्यातील अनेक पर्यटन ठिकाणांना दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आबालवृद्धांना भेट देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून राज्यसरकारने या ठिकाणांवर केंद्र सरकारच्या साथीने राज्यात ४५ रोप-वे उभारण्यास मान्यता दिली आहे. या रोपवे मधील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे उभारण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. यांच्याबरोबरीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेअंतर्गत एकूण ४५ रोप-वेची कामे हाती घेण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली. राज्य सरकारकडून १६, तर ‘एनएचएलएमएल’कडून २९ रोप-वेची उभारणी करण्यात येणार आहे. यातील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे असतील.
रोप-वेची उभारणी करताना विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार असून, त्यात ‘एनएचएलएमएल’ला राज्य सरकारने जागा उपलब्ध करून देणे, ‘एनएचएलएमएल’ला जागा उपलब्ध करून त्यात समभाग घेऊन महसूल मिळवणे, राज्य सरकारकडून खासगी-सार्वजनिक प्रकल्पाच्या आधारावर उभारणी करणे आणि बांधा-वापरा-हस्तांतरित करा या मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे.

प्रगतीपथावरील प्रकल्प

■ हाजीमलंग, कल्याण फनिक्युलर ट्रॉली सार्वजनिक बांधकाम विभाग (पीपीपी)
■ रेणुकामाता मंदिर, माहुरगड, नांदेड सा. बां. विभाग (सीआरआयएफ) प्रगतिपथावर
■ सिंहगड रोप-वे खासगी विकासक
■ जेजुरी रोप-वे – खासगी विकासक

प्रस्तावित प्रकल्प कोकण विभाग

■ रायगड किल्ला सा. बां. विभाग –
■ माथेरान एमएमआरडीए
■ कणकेश्वर, अलिबाग जिल्हा परिषद, रायगड
■ बाणकोट किल्ला, मंडणगड एनएचएलएमएल
■केशवराज (विष्णू) मंदिर, दापोली एनएचएलएमएल
■ महादेवगड पॉइंट, सावंतवाडी एनएचएलएमएल
■ माहुली गड, शहापूर- एनएचएलएमएल
■ सनसेट पॉइंट, जव्हार – एनएचएलएमएल
■ गोवा किल्ला, दापोली – एनएचएलएमएल
■ अलिबाग चौपाटी ते किल्ला नगर परिषद,
■ अलिबाग घारापुरी, एलिफंटा लेणी जिल्हा परिषद रायगड

लोकलमधून उतरता न आल्याने चाकूहल्ला; ३ प्रवासी जखमी

   Follow us on        

Mumbai Local: गर्दीमुळे लोकलमधून डोंबिवली स्थानकात उतरता न आल्याने संतापलेल्या एका प्रवाशाने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. इतर प्रवाशांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

बुधवारी सकाळी कल्याणकडून दादरकडे जाणाऱ्या जलद लोकलमधून शेख जिया हुसेन (१९) प्रवास करीत होता. डोंबिवली स्थानकात पोहोचण्यापूर्वी आपण जलद लोकलमध्ये असल्याने ती मुंब्रा स्थानकात थांबणार नसल्याचे त्याच्यालक्षात आले. त्यामुळे तो डोंबिवली स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, एका प्रवाशाला धक्का लागून वाद सुरू झाला. त्यातच धक्काबुक्की होऊन हुसेनला काही प्रवाशांनी मारहाण केली. त्यावर संतापलेल्या हुसेनने खिशातील चाकू काढत प्रवाशांवर हल्ला केला. यामध्ये अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी जखमी झाले. यानंतर काही प्रवाशांनी हुसेनला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

२१ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 12:00:33 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 15:54:34 पर्यंत
  • करण-कौलव – 12:00:33 पर्यंत, तैतुल – 24:46:38 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-व्याघात – 11:58:00 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:05
  • सूर्यास्त- 18:39
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 26:08:59
  • चंद्रास्त- 12:16:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1804: पहिले सेल्फ-प्रोपेलिंग स्टीम लोकोमोटिव्ह – पहिले वाफेवर चालणारे इंजिन सुरु झाले.
  • 1842: जॉन ग्रिनो यांना शिलाई मशीनसाठी पहिले अमेरिकन पेटंट देण्यात आले.
  • 1878: कनेक्टिकटमधील न्यू हेवन येथे पहिली टेलिफोन डायरेक्टरी जारी करण्यात आली.
  • 1925: द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1972: सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना 20 हे चंद्रावर उतरले.
  • 1999: हा दिवस अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जाहीर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1788: ‘फ्रान्सिस रोनाल्ड्स’ – ब्रिटीश शास्त्रज्ञ, पहिले कार्यरत इलेक्ट्रिक टेलीग्राफ बनवणारे अभियंते यांचा जन्म. (मृत्यू : 8 ऑगस्ट 1873)
  • 1894: ‘डॉ. शांतिस्वरुप भटनागर’ – वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1955)
  • 1899: ‘सूर्यकांत त्रिपाठी निराला’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑक्टोबर 1961)
  • 1911: ‘भबतोष दत्ता’ – अर्थतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1997)
  • 1942: ‘जयश्री गडकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑगस्ट 2008)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1829: ‘चन्नम्मा’ – कित्तूरची राणी यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1778)
  • 1975: ‘गजानन हरी नेने’ – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 18 सप्टेंबर 1912)
  • 1977: ‘रा. श्री. जोग’ – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 15 मे 1903)
  • 1991: ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 4 जून 1936)
  • 1998: ‘ओमप्रकाश बक्षी’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1919)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर पर्यंत नेण्यासाठी दिवा – दादर मार्गाची पाहणी करणार – मध्य रेल्वेकडून आश्वासन

   Follow us on        

मुंबई : दादर – रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी तसेच दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या या मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (उबाठा) , रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर वरून पुन्हा सुरू करण्यासाठी दादर दिवा मार्गाचे तीन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.

यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने संपूर्ण नकारघंटा वाजवलेली होती. परंतु आजच्या बैठकीमध्ये रेल्वे कामगार सेनेचे श्री. संजय जोशी, श्री बाबी देव यांनी दादर वरून गाडी कशी सोडता येईल आणि या गाडीमुळे इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे अभ्यासाअंती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.मीना व उपस्थित सर्व अधिकारी यांच्यासमोर मांडले. शेवटी श्री. मीना यांनी श्री. संजय जोशी आणि श्री. बाबी देव यांनी सुचविलेल्या पर्यायाबाबत त्यांच्याबरोबर दादर ते दिवा पर्यंतच्या मार्गाची पाहणी येत्या तीन दिवसात करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

शिष्टमंडळामध्ये खासदार – शिवसेना नेते श्री अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी खासदार श्री. विनायक राऊत, श्री अरुणभाई दुधवडकर, आमदार श्री महेश सावंत, श्री.संतोष शिंदे, श्री. बाबी देव, श्री.संजय जोशी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोठी बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता उद्यापासून येणार;अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

   Follow us on        

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, ती साधारणपणे 4 लाख असेल अशी माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. या कपातीमुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search