Author Archives: Kokanai Digital

२३ जुलै दिनविशेष – 23 July in History

जागतिक दिवस:

✳️ वनसंवर्धन दिन

महत्त्वाच्या घटना:
✳️१८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
✳️१९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.
✳️१९२७: मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे ’आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.
✳️१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारने परकीय शब्दांच्या वापरावर बंदी घातली.
✳️१९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.
✳️१९८२: ’इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
✳️१९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला. जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार. १,००,००० नागरिकांनी भारत, युरोप आणि कॅनडात पलायन केले. येथून श्रीलंकेच्या नागरी युद्धाला सुरुवात झाली.
✳️१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले. (या घटनेची चित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
✳️१९८६: जैव‍अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.
✳️१९९५: दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.
✳️१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
✳️२००१: इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी मेघावती सुकर्णोपुत्री (Megawati Sukarnoputri) यांची नियुक्ती करण्यत आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
✳️१८५६: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
✳️१८६४: अपोलिनारियो माबिनी, फिलिपाईन्सचा पहिला पंतप्रधान.
✳️१८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)
✳️१८८६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९७६)
✳️१८९८: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बंगाली भाषिक कादंबरीकार व लेखक ताराशंकर बंद्योपाध्याय यांचा जन्मदिन.
✳️१८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.
✳️१९०६: चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)
✳️१९१७: लक्ष्मीबाई यशवंत तथा ’ माई’ भिडे – नाट्य-चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ? ? ???
✳️१९२५: बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)
✳️१९२७: धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका
✳️१९४७: डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ
✳️१९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.
✳️१९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.
✳️१९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.
✳️१९७५: तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.
✳️१९७६: ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
✳️१८८५: युलिसिस ग्रांट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ एप्रिल १८२२)
✳️१९९३: छत्तीसगड राज्यातील भारतीय स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मण प्रसाद दुबे यांचे निधन.
✳️१९९७: वसुंधरा पंडित – गायिका (जन्म: ? ? ????)
✳️१९९९: दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)
✳️२००४: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
✳️२०१२: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (जन्म: २४ आक्टोबर १९१४)
✳️२०१६: पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एस. एच. रजा यांचा यांचे निधन.

Loading

खुशखबर! पश्चिम रेल्वेची गणपती विशेष गाड्यांची यादी तयार; कोकण,मध्य आणि दक्षिण रेल्वेकडून प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

   Follow us on        

Proposal for Special Trains:कोकणातील गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेकडून एक खुशखबर आहे. मध्यरेल्वेने गणपती विशेष गाड्यांची  यादी जाहीर केल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही आपली गणपती विशेष गाड्यांची यादी तयार केली असून ती कोकण रेल्वे, मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वेला मंजुरीसाठी पाठवली आहे. या यादीला या विभागांकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याआधी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघे काही मिनिटातच फुल झाल्याने तिकिटे न मिळालेल्या प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळवण्याची अजून एक संधी भेटणार आहे.

जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांची यादी 
महत्वाची सूचना:ही यादी अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे विभागांकडून आलेल्या बदलाप्रमाणे त्यात बदल केला जाऊ शकतो  
१) ०९००१/०९००२ मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९००१ विशेष मुंबई सेंट्रल येथून मंगळवार दिनांक ०३,१० आणि १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता ठोकूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९००२ विशेष ठोकूर येथून बुधवार दिनांक ०४,११ आणि १८ सप्टेंबर रोजी सकाळी  १०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०५ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – १७.४०)
या गाडीचे मडगावपर्यंतचे थांबे: बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,  राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि मडगाव
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
२) ०९००९/०९०१० मुंबई सेंट्रल-सावंतवाडी-मुंबई सेंट्रल (आठवड्याचे ६ दिवस) विशेष (एकूण २६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९००९ विशेष मुंबई सेंट्रल येथून दिनांक ०२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत मंगळवार वगळता दररोज दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०२:३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१० विशेष सावंतवाडी  येथून दिनांक ०३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत बुधवार वगळता दररोज पहाटे ०५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता मुंबई सेन्ट्रल येथे पोहोचेल.
थांबे: बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
 ३) ०९०१५ /०९०१६  वांद्रे (T) – कुडाळ – वांद्रे (T) साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९०१५ विशेष  वांद्रे टर्मिनस Bandra येथून गुरुवार दिनांक ०५ ,१२ आणि १९ सप्टेंबर रोजी दुपारी १४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.४० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१६ विशेष कुडाळ येथून शुक्रवार दिनांक ०६,१३  आणि २० सप्टेंबर रोजी सकाळी ०६.४५  वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.३० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: बोरिवली, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना: सेकंड सीटिंग – २०, एसएलआर – ०१  ब्रेकव्हॅन – ०१  असे मिळून एकूण २२ LHB कोच
४) ०९०१८/०९०१७ उधना – मडगाव – उधना (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९०१८ विशेष उधना येथून शुक्रवार दिनांक ०६,१३  आणि २० सप्टेंबर रोजी दुपारी १५,२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०९.३० वाजता मडगाव  येथे पोहोचेल.  (पनवेल स्थानकावरील वेळ – २०.२०)
गाडी क्रमांक ०९०१७ विशेष मडगाव येथून शनिवारदिनांक ०७,१४, २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता उधना येथे पोहोचेल.
थांबे: नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
५) ०९०२०/ ०९०१९ उधना – मडगाव – उधना द्विसाप्ताहिक विशेष भाड्यावर विशेष ट्रेन(एकूण १० फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९०२० विशेष उधना येथून शनिवार आणि बुधवार दिनांक ०४,०७,११,१४,१८ सप्टेंबर रोजी दुपारी १५.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता मडगाव  येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – २०.२०)
गाडी क्रमांक ०९०१९ विशेष मडगाव येथून रविवार आणि शुक्रवार दिनांक ०५,०८,१२,१५,१९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता उधना येथे पोहोचेल.
थांबे: नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी, करमाळी.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
६) ०९४१२/०९४११ अहमदाबाद – कुडाळ – अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७.२०)
गाडी क्रमांक ०९४११ विशेष कुडाळ येथून बुधवार दिनांक ०४,११,१८ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
थांबे: अहमदाबाद, गेरातपुर, वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
७) ०९१५०/०९१४९ विश्वामित्री – कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९१५० विशेष विश्वामित्री येथून सोमवार दिनांक ०२,०९,१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.१० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७:५०)
गाडी क्रमांक ०९१४९ विशेष कुडाळ येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  रात्री १ वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल.
थांबे: भारूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे
८) ०९४२४/०९४२३ अहमदाबाद – मंगुळुरु -अहमदाबाद साप्ताहिक टीओडी विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९४२४ विशेष अहमदाबाद येथून शुक्रवार दिनांक ०६,१३,२० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १६.००  वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९.४० वाजता मंगुळुरु येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – ००:४५)
गाडी क्रमांक ०९४२३ विशेष मंगुळुरु येथून शनिवार दिनांक ०७,१४,२१ सप्टेंबर रोजी रात्री २१.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०१:१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – पहाटे ०६.००)
थांबे: गेरातपुर,नाडियाद, आनंद, वडोदरा, भारूच, सुरत, वापी, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा,रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि दक्षिणेकडील राज्यातील थांबे.
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५, सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २४ डबे

Loading

२१ जुलै दिनविशेष – 21 July in History

जागतिक दिवस:
  • Invite An Alien To Live With You Day
  • Lowest Recorded Temperature Day
  • Take A Monkey To Lunch Day
महत्त्वाच्या घटना:
  • ३५६: ३५६ इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
  • १८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
  • १८७९: क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली
  • १८८३: कोलकाता येथे पहिल्या नाट्यगृहाची स्थापना
  • १८८४: लॉर्डस मैदानात पहिले क्रिकेट टेस्ट मॅच: सेंट जॉन्सवूड यांनी लंडनमध्ये लॉर्डस मैदानाचा शोध लावला. त्यामुळेच या मैदानाचे नाव लॉर्डस ठेवण्यात आले. या लॉर्डस मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला.
  • १८८८: स्कॉटिश शोधकर्ता आणि पशुवैद्यकीय सर्जन जॉन बॉयड डनलॉप(John Boyd Dunlop) यांनी रबराचे टायर आणि ट्यूब तयार करून परिवहन करण्यास गती निर्माण करून दिली.
  • १९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.
  • १९५४: पहिले इंडोचिनी युद्ध – जिनिव्हा परिषदेने व्हिओतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले. 21 जुलै 1954 रोजी जिनिव्हा येथे झालेल्या एका परिषदेत इंडोचीनची फाळणी करण्याचे ठरले.
  • १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
  • १९६२: भारत चीन सीमावाद – भारत-चीन युद्ध
  • १९६३: कशी विद्यापीठाला विश्वविद्यालयाचा दर्जा मिळाला.
  • १९७६: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या
  • १९८३: अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
  • २००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्‍या ’वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
  • २००७: प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या: 21 जुलै 2007 रोजी प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
  • २०१८: भारतामधील सॅनिटरी उत्पादनावरील टॅक्स सरकारने होत असलेल्या विरोधानंतर मागे घेतला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१६: ब्रिटीश वर्तमानपत्र समूह राईटर चे संस्थापक ज्युलियस राईटर (Julius Writer)यांचा जन्मदिन.
  • १८५३: शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
  • १८९९: अर्नेस्ट हेमिंग्वे – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक (मृत्यू: २ जुलै १९६१)
  • १९१०: वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १६ मार्च १९९०)
  • १९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
  • १९२०: आनंद बक्षी – गीतकार (मृत्यू: ३० मार्च २००२)
  • १९३०: डॉ. रा. चिं. ढेरे – भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक
  • १९३४: चंदू बोर्डे – भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष – पद्म भूषण, पद्मश्री, अर्जुना पुरस्कार
  • १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.
  • १९४७: चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य
  • १९५१: अमेरिकन हास्य अभिनेते रॉबिन विलियम्स (Robin Williams) यांचा जन्मदिन.
  • १९६०: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८८)
  • १९६८: आदित्य श्रीवास्तव – भारतीय अभिनेते
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०६: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रथम अध्यक्ष व राजकारणी उमेशचंद्र बनर्जी यांचे निधन.
  • १९७२: जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (जन्म: २ मे १९२९)
  • १९९४: डॉ. र. वि. हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्‌मय समीक्षक, मराठी बखर वाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • १९९५: सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७ – सीतामहू, मंदसौर, मध्य प्रदेश)
  • १९९७: राजा राजवाडे – साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६). राजा राजवाडे यांनी अनेक कांदबऱ्या, कथासंग्रह, कविता संग्रह, ललित गद्य लिहिले आहेत. तसेच त्यांनी सलग 35 वर्षे 18 नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं आहे.
  • १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.
  • २००१: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ आक्टोबर १९२८)
  • २००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.
  • २००९: गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ५ मार्च १९१३)
  • २०१३: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१)

Loading

कोकण रेल्वेत चित्रित झालेला ‘नवरा माझा नवसाचा-२’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

   Follow us on        
Navra Maza Navsacha-2 Release Date:  सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा-२ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटरसिकांना एक खुशखबर आहे. या चित्रपटाची रिलीझ होण्याची तारीख जाहीर झाली आहे. येत्या २० सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सचिन पिळगावकर यांनी दिली आहे.
१९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला तुफान यश मिळाले होते. या चित्रपटाचे ९०% चित्रीकरण एसटी बस मध्येच झाले होते. मात्र नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचे छायाचित्रण कोकण रेल्वे मध्ये झाले आहे. या चित्रपटात अजून एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नाही तर तो  आता टीसी झाला आहे. अशोक सराफ यांचा नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील पहिला लूक समोर आला असून यामध्ये ते कंडक्टर ऐवजी तिकीट चेकरच्या भूमिकेत दिसत आहेत.
कोकण रेल्वे आणि कोकणकर यांचे एक अनोखे नाते असल्याने हा चित्रपट कोकणकरांच्या पसंदीस उतरणार हे नक्की.

 

Loading

बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सुमन विद्यालय टेरव येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

चिपळूण: जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक १९ जुलै २०२४ रोजी बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना एकूण ७०८ वह्यांचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, सरस्वती फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सुधाकरराव कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर यांनी श्री. सुधाकरराव कदम यांचा विशेष सन्मान केला. त्याचप्रमाणे बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री.नंदकुमार राणे साहेब आणि न्यासाचे चिटणीस व काडवली गावचे सुपुत्र श्री.नारायण चव्हाण साहेब यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी आणि सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गवार वह्यांचे वितरण करण्यात आले. सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजितराव कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकरराव कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर मोफत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे सर यांनी केले.

 

Loading

Mumbai Local | मध्य उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकात ऑगस्टपासून बदल

   Follow us on        
मुंबई: मध्य उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय लोकलच्या नव्या वेळापत्रकाची आखणी केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यानुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या १० लोकल दादर स्थानकातून सुटणार असून परळ स्थानकातून अतिरिक्त २४ लोकल फेऱ्या सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
दादर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सोयीसाठी काही महिन्यांपूर्वीच प्लॅटफॉर्म क्रमांक आठ रुंद करण्यात आला. फलाट क्रमांक दहाचे दुतर्फीकरण झाल्याने जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने चढ-उतार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला, तसेच फलाट क्रमांक नऊ आणि दहादरम्यान असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल हटविले; मात्र तरीही दादर स्थानकांतून लोकल पकडताना प्रवाशांची गैरसोय होत होती. त्याबाबत अनेक तक्रारी मध्य रेल्वेकडे केल्या होत्या. याची दाखल घेऊन मध्य रेल्वेने दादर आणि परळ स्थानकातून आणखी लोकल सोडण्याचे नियोजन केले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून लोकलच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मध्य रेल्वेला सध्या नव्याने लोकल चालवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकलचा समावेश करण्यात आलेला नाही. सध्या धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या अप आणि डाऊनच्या प्रत्येकी पाच अशा एकूण १० फेऱ्या दादर स्थानकातून, तर २४ धीम्या लोकल फेऱ्या परळ स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. सध्या परळ स्थानकातून २२ फेऱ्या सूटत असल्याने परळहून सुटणाऱ्या फेऱ्यांची एकूण संख्या ४६ पर्यंत पोहोचणार आहे.

Loading

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची उद्या परळ येथे एल्गार सभा

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा : श्री.यशवंत जडयार*

   Follow us on        

मुंबई दि. २० जुलै:अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची एल्गार सभा रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वा. सोशल सरव्हिसलिग हायस्कूल दामोदर हॉलच्या बाजूला परळ मुंबई येथे समिती अध्यक्ष श्री.शेखर बागवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

समितीच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांपासून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे, रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणे व त्याला प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देणे,नियोजित वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस व दिवा चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे अशा महत्वाच्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्या मिळत नसल्याने यापुर्वीही परळ येथील प्रा.मधू दंडवते जन्मशताब्दी उत्सव व सावंतवाडी रोड स्टेशन येथील टर्मिनससाठी केलेले उपोषणातून समितीने मोठे शक्ती प्रदर्शन केलेले आहे,यासाठी ही एल्गार सभा खूप महत्वाची आहे.

गणेशउत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण,याला मुंबईतून लाखो चाकरमनी कोकणातील आपल्या गावी जातात, त्यासाठी त्यांना पुरेशा कोकण रेल्वेच्या रेल्वे मिळवून देण्यासाठी ही सभा समस्त कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाची असल्याचे अध्यक्ष श्री.शेखर बागवे यांनी सांगितले.

कित्येकदा कोकण रेल्वेमार्गावरून गणेशउत्सवासाठी सोडलेल्या जादा गणपती स्पेशल एक्सप्रेसचे तिकीट बुकींग पहिल्या तीन मिनीटामध्येच फुल होते,याच्याने खरा लाभार्थी असलेला कोकणी माणूस तिकीटापासून वंचितच राहतो,चाकरमन्यांचा रेल्वे प्रशासनाला प्रश्न आहे की,रेल्वेच्या दलालांचे बुकींग कसे होते?मग सर्वसामान्य कोकणी माणसाला गणपतीचे तिकीट का मिळत नाही?

लोकसभेची निवडणूक समोर ठेवून कोकणातील अनेक नेत्यांनी समितीला आश्वासने दिली होती त्याचे पुढे काय झाले? यासाठी ही एल्गार सभा निर्णायक ठरणार आहे,अन्यथा विधानसभेची निवडणूक फक्त पुढील तीनच महिन्यांवर आलेली आहे.

समितीच्या ह्या एल्गार सभेला मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,मिरा भाईदर,वसई विरार,बोईसर पालघर,भांडूप,ठाणे दिवा,कल्याण डोंबीवली,बदलापूर परिसरातील कोकण वासियांनी मोठया संस्थेने सहभागी व्हावे असे आवाहन सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी केले आहे.

Loading

२० जुलै दिनविशेष – 20 July in History

महत्त्वाच्या घटना:
  • १२९६: खिलजी घराण्याचे शासक अल्लाउद्दीन खिलजी यांनी स्वत:ला दिल्ली चा राजा म्हणून घोषित केलं.
  • १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
  • १७६१: माधवराव पेशवे यांनी स्वत:ला मराठा साम्राज्याचे पेशवा म्हणून घोषित केलं.
  • १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
  • १८२८: ’मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
  • १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
  • १९०३: फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
  • १९०५: ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे वाइसराय लॉर्ड कर्झन (Viceroy Lord Curzon) यांच्या द्वारा करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीस भारताच्या सचिवाने देखील मंजुरी दिली.
  • १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.
  • १९२४: बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.
  • १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.
  • १९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
  • १९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.
  • १९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.
  • १९६९: अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.
  • १९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
  • १९७६: मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
  • १९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
  • २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर
  • २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ख्रिस्त पूर्व ३५६: अलेक्झांडर द ग्रेट – मॅसेडोनियाचा राजा (मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)
  • १८२२: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)
  • १८३६: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
  • १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)
  • १९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.
  • १९१९: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
  • १९२१: पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा, तबला – डग्ग्याच्या नादातील समतोल, बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार आणि या सर्वांना व्यापून टाकणारी प्रासादिकता ही त्यांची वैशिष्ट्ये होती. (मृत्यू: ३१ मे १९९४)
  • १९२९: राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै १९९९)
  • १९५०: नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक
  • १९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८६६: प्रख्यात जर्मन गणितज्ञ बर्नार्ड रीमैन(Bernhard Riemann) यांचे निधन.
  • १९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.
  • १९३७: गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४)
  • १९४३: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२)
  • १९५१: अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा (जन्म: ? फेब्रुवारी १८८२)
  • १९६५: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)
  • १९७२: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)
  • १९७३: ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)
  • १९९५: शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५)
  • २०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९)
  • २०२०: भारतीय राजकारणी व सुप्रसिद्ध सामाजिक न्याय नेते राम अवधेशसिंग यादव यांचे निधन. (जन्म: १ जून १९३७)
  • २०२०: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ओडिया चित्रपट अभिनेते विजय मोहंती यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९५०)
  • २०२०: भारतीय मुस्लिम विद्वान व सहारनपुरमधील मजहीर उलूमचे कुलगुरू सलमान मझिरी यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९४६).kokanai.in

Loading

१९ जुलै दिनविशेष – 19 July in History

महत्त्वाच्या घटना:
  • १६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.
  • १८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
  • १९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली
  • १९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
  • १९०५: लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
  • १९३५: जगात ’पार्किंग मीटर’चा वापर प्रथमच अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील वाहनतळावर सुरू झाला.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई
  • १९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान व त्यांच्या ६ मंत्री आणि २ सहकार्‍यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
  • १९५२: फिनलंडमधील हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • १९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
  • १९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
  • १९८०: सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९९२: ऊर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर
  • १९९३: ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
  • १९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • २००५: भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अमेरिकेच्या कॉंग्रेसला संबोधित केलं.
  • २००८: प्रशांत महासागरात आपल लक्ष्य निर्धारित करून अमेरिकेने लांब पल्ल्या मारण्यास सक्षम असलेल्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.
  • १८२७: मंगल पांडे – क्रांतिकारक (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)
  • १८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.
  • १८९६: ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)
  • १८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)
  • १९०२: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)
  • १९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)
  • १९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)
  • १९२७: थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांचा जन्मदिन.
  • १९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.
  • १९४६: इलि नास्तासे – रोमानियन टेनिसपटू १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.
  • १९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • ९३१: उडा – जपानचा सम्राट (जन्म: ५ मे ८६७)
  • १३०९: संत विसोबा खेचर (संत नामदेव यांचे गुरू) समाधिस्थ झाले (जन्म: ? ? ????)
  • १८८२: फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)
  • १९६५: सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ मार्च १८७५)
  • १९६८: प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (जन्म: २९ जून १९०८)
  • १९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.
  • २००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.

Loading

गणेशभक्तांना खुशखबर: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांची घोषणा; यादी येथे वाचा

   Follow us on        

Special Train for Ganesh Chaturthi: कोकणात गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना मध्यरेल्वेने एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई- रत्नागिरी, मुंबई-कुडाळ, मुंबई – सावंतवाडी तसेच दिवा – चिपळूण या विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण दिनांक २१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता रेल्वे च्या आरक्षण खिडक्यांवर तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर सुरू होणार आहे.

१) मुंबई सीएसएमटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-

०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी  येथे पोहोचेल.

०११५२  स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) दररोज १५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

 

२) मुंबई सीएसएमटी -रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)

०११५३ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३:३०  वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

 

३) एलटीटी -कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-

०११६७ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी  ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

 

४) एलटीटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-

०११७१ स्पेशल एलटीटी  मुंबई येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी  येथे पोहोचेल.

०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २२:२०  वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी  सकाळी १०:४० वाजता एलटीटी  मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

 

5) दिवा- चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)

०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून ०१.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०७:१५  वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी

रचना: १२ मेमू डबे

 

6) एलटीटी -कुडाळ  स्पेशल (१६सेवा)-

०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०२.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

०११८६ स्पेशल कुडाळवरून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४  (१८ फेऱ्या ) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग

रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

७) एलटीटी -कुडाळ स्पेशल (६सेवा)-

०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०३.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

०११६६ स्पेशल कुडाळवरून ०३.०९.२०२४  ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग

डब्यांची रचना: १२ थ्री टायर एसी , ०५ टू टायर एसी, १ फर्स्ट एसी, १ पॅन्ट्रीकार, २ ब्रेक वॅन असे मिळून एकूण २० डबे

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search