Author Archives: Kokanai Digital

Video | धक्कादायक! धावत्या एसटी बसचे पुढील चाक निखळले; मोठा अनर्थ होता होता टळला

ST Bus Accident: एसटीच्या ताफ्यातील  बऱ्याच गाड्या जुन्या झाल्या आहेत. या गाड्यांची योग्य रित्या देखरेख केली जात नसल्याची तक्रार आजकाल ऐकायला मिळत आहे. यामुळे अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या असून एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी  खेळत आहे. बसेसच्या देखरेखीत कुसूर केल्याने आज एका घटनेत एका बसचा मोठा अपघात होता होता वाचला.
वज्रेश्वरी – वसई या चालत्या एसटी बसचे पुढचे चाक अचानक निखळले आणि बाजूला जाऊन पडले. सुदैवाने चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवल्याने कोणताही मोठा अपघात झाला नाही. मात्र या घटनेने एसटी प्रवाशांच्या  सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. ती  बस जर अजून वेगात असती तर ती पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली असती. दुसरे म्हणजे चाक निखळले तेव्हा रस्त्यावर कोणी नव्हते, नाहीतर एखादी  दुर्दैवी घटना घडली असती.
या घटनेचा विडिओ खाली पहा

 

[edsanimate_start entry_animation_type= "fadeIn" entry_delay= "0" entry_duration= "1" entry_timing= "linear" exit_animation_type= "" exit_delay= "" exit_duration= "" exit_timing= "" animation_repeat= "infinite" keep= "yes" animate_on= "load" scroll_offset= "" custom_css_class= ""][edsanimate_end]

कोल्हापुरात गोवा बनावटीची ५ लाख किमतीची दारू जप्त; सावंतवाडीतील युवकाला अटक

कोल्हापूरः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठ जप्त केला आहे. चारचाकीत लपवून मद्याची तस्करीचा प्रयत्न उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. याप्रकरणी सावंतवाडी येथील २१ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. हॉकी मैदान ते सायबर चौक रोडवर शनिवारी (०१ फेब्रुवारी) पहाटे ५.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

सदर युकारचे वय २१ असून तो आजगाव, शिरोडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील राहणारा आहे. . त्याच्या कारमधून विविध बँडच्या ७५० मिलीचे ४० बॉक्स, १८० मिलीचे ३५ बॉक्स आणि बलेनो कार असा एकूण १० लाख ०६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापैकी केवळ मद्याची किंमत ०५ लाख ०६ हजार ४०० रुपये एवढी आहे.

ST Bus Fare Hike: मुंबई-पुण्यातून कोकणात एसटीने जाण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार?

   Follow us on        

ST Fare Hike:हकिम  समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ केल्यामुळे एसटी प्रवास आता महागला आहे. भाडेवाढ दिनांक २५ जानेवारीपासून एसटीच्या  गाडयांना लागू करण्या आली आहे. ही भाडेवाढ खालीलप्रमाणे आहे. 

अशी आहे भाडेवाढ

  • सेवेचा प्रकार :  साधी बस – सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,
  • जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.
  • रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.
  • निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.
  • विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.
  • विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.
  • शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.
  • जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
  • शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
  • शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये.
  • शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,
  • ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,
  • ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

मुंबई पुण्यातून कोकणात जाण्यासाठी उपलब्ध असेलल्या काही सेवांचे सुधारित भाडे

प्रवास साधी सेवा सेमी लक्झरी शिवशाही सामान्य स्लीपर
पुणे ते सावंतवाडी ६५३ ९४८ ९६७
पुणे ते कणकवली ६०९ ८२५ ९०३ ८९१
पुणे ते रत्नागिरी ५३९ ७९९
पुणे ते चिपळूण ४२८ ६३६ ५७९
कोल्हापूर ते सावंतवाडी २५१ ४०२
कोल्हापूर ते कणकवली २०७ २७९
कोल्हापूर ते रत्नागिरी २३७
कोल्हापूर ते चिपळूण २८७
मुंबई ते खेड ३९८ ५३८
मुंबई ते चिपळूण ४५८ ६२० ६२०
मुंबई ते दापोली ३९८ ५३८
बोरिवली ते रत्नागिरी ६३९
मुंबई ते कणकवली ७५० ११५६
मुंबई ते मालवण १२६०
बोरिवली ते महाड ५०२

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपात वाढ

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ प्रीमियम गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून प्रत्येकी दोन डब्यांची वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक २२४१४/२२४१३ हजरत निजामुद्दीन -मडगाव – हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेस या गाडयांना फर्स्ट एसीचा एक आणि थ्री टायर एसी चा एक असे दोन डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक १२४३२ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल  त्रि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला दिनांक  ०४ फेब्रुवारी २०२५ च्या  फेरीपासून तर  गाडी क्रमांक १२४३१ तिरुवनंतपुरम सेंट्रल- हजरत निजामुद्दीन  त्रि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला दिनांक ०६ फेरबुवारी २०२५ च्या फेरीपासून हे डबे जोडले जाणार आहेत.
२२४१४ हजरत निजामुद्दीन -मडगाव द्वि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ च्या फेरीपासून तर २२४१३ मडगाव – हजरत निजामुद्दीन  द्वि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ च्या फेरीपासून फेरीपासून हे डबे जोडले जाणार आहेत.
या वाढीव डब्यांमुळे या गाडीचे एकूण डबे २० वरून २२ होणार आहेत. दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सुधारित रचना फर्स्ट एसी – ०२ डबे,  टू टायर एसी – ०५ कोच, थ्री टायर एसी – १२ कोचेस, पेन्ट्री कार -०१ आणि जनरेटर कार -०२ अशी असणार आहे.
सावंतवाडीतील थांबा अजूनही प्रतिक्षेत 
गाडी क्रमांक १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी स्थानकावर पूर्वी थांबा होता. मात्र ‘Zero Based Timetable’ च्या नावाखाली कोविड काळात हा थांबा काढून घेण्यात आला. या तत्त्वावर काढून घेतलेले ईतर स्थानकावरील थांबे पूर्ववत करण्यात येत असताना या गाडीचा थांबा येथे अजूनही पूर्ववत करण्यात आलेला नाही. हा थांबा परत मिळावा तसेच ईतर महत्वाच्या गाड्यांना सावंतवाडी टर्मिनस येथे थांबे मिळावेत यासाठी येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) प्रयत्नशील आहे.

२ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 09:16:39 पर्यंत, पंचमी – 30:54:55 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 24:53:00 पर्यंत
  • करण-विष्टि – 09:16:39 पर्यंत, भाव – 20:05:13 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शिव – 09:13:56 पर्यंत, सिद्ध – 30:05:33 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय-07:14
  • सूर्यास्त- 18:30
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 09:54:00
  • चंद्रास्त- 22:25:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • World Wetland Day
महत्त्वाच्या घटना:
  • १६२६: आजच्या दिवशी पहिला चार्ल्स इंग्लंड चा राजा बनला.
  • १८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
  • १८६३: आजच्या दिवशी शंभू नाथ पंडित हे कोलकत्ता उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश बनले.
  • १९०१: आजच्या दिवशी राणी विक्टोरिया चा अंतिम संस्कार करण्यात आला.
  • १९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात
  • १९५२: आजच्या दिवशी भारताला पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळाला.
  • १९५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
  • १९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो यांची युति
  • १९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
  • १९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर ’जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
  • २००६: महात्मा गांधी नरेगा कायदा आजच्या दिवसापासून २०० जिल्ह्यांमध्ये लागू केल्या गेले.
  • २०१३: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेत राहत असेलेल्या एका विदेशी शास्त्रज्ञाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८५६: स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
  • १८८४: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)
  • १८८७: प्रसिद्ध राजनीतितज्ञ तसेच समाजसेविका अम्रित कौर यांचा जन्म.
  • १९०५: अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (मृत्यू: ६ मार्च १९८२)
  • १९१५: प्रसिद्ध भारतीय लेखक खुशवंत सिंह यांचा जन्म.
  • १९१६: त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री दसरथ देब यांचा जन्म.
  • १९२३: ललित नारायण मिश्रा – केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)
  • १९७०: संसद च्या सदस्य प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा जन्म.
  • १९७९: शमिता शेट्टी – अभिनेत्री
  • १९८९: भारतीय अभिनेत्री संदीप धार यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०७: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)
  • १९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)
  • १९३०: वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व शकार. त्यांनी लहान मुलांसाठी ’आनंद’ हे मासिक सुरू केले होते. (जन्म: १२ एप्रिल १८७१)
  • १९४१: हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यकार तसेच निबंधकार आचार्य रामचंद्र शुक्ला यांचे निधन.
  • १९६०: हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक आचार्य चतुरसेन शास्त्री यांचे निधन.
  • १९७०: बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (१८ मे १८७२)
  • १९८२: ला राजस्थान चे माजी मुख्यमंत्री मोहन लाल सुखाडीया यांचे निधन.
  • १९८७: अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म: २१ एप्रिल १९२२)
  • २००७: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (जन्म: २७ डिसेंबर १९४४)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सिंधुदुर्ग: राणे कुटुंब – ०३, ईतर – ०१.. ईथेही राणे कुटुंबीयांचे वर्चस्व

   Follow us on        

सिंधुदुर्ग: घरात एक खासदारकी, दोन आमदारक्या, एक मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद असलेल्या राणे कुटुंबीयांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनात आणि राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शासनाच्या नियोजन विभागाकडील दि.२८ जानेवारी रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या दि.३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फक्त पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे असतील अशी शक्यता आहे. त्यामुळे राणे कुटुंबीयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक दि. ३ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर “नामनिर्देशित सदस्य” व “विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या तसेच राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर “नामनिर्देशीत सदस्य” तसेच “विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर २ नामनिर्देशित सदस्य व ९ विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांकरिता ३ व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनादेखील रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी दिली आहे. त्यामुळे आता या समित्यांवर राणे कुटुंबीयांचे वर्चस्व असणार आहे.

१ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 11:40:35 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 26:33:43 पर्यंत
  • करण-गर – 11:40:35 पर्यंत, वणिज – 22:28:38 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-परिघ – 12:24:08 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय-07:15
  • सूर्यास्त-18:31
  • चन्द्र राशि-कुंभ – 20:59:12 पर्यंत
  • चंद्रोदय-09:16
  • चंद्रास्त-21:06:00
  • ऋतु-शिशिर

जागतिक दिवस:
  • भारतीय तटरक्षक दल दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
  • १७९०: न्यूयोर्क मध्ये पहिल्यांदा “सुप्रीम कोर्ट ऑफ़ द यूनाइटेड स्टेट्स’ चे आयोजन केल्या गेले.
  • १८२७: कोलकता येथे बंगाल क्लब ची स्थापना झाली.
  • १८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत
  • १८८४: ’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
  • १८८४: देशात पोस्टल विमा योजना सुरु करण्यात आली.
  • १८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
  • १९४१: डॉ. के. बी. लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
  • १९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
  • १९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९६४: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९६४: आजच्या दिवशी युनिटी ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली.
  • १९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
  • १९७७: ‘इंडियन कोस्ट गार्ड चे स्थापना करण्यात आली.
  • १९७७: आजच्या दिवशी देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची दिल्ली येथे स्थापना करण्यात आली.
  • १९७९: १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
  • १९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.
  • १९८२: पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा जन्म.
  • १९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.
  • १९९२: आजच्या दिवशी केंद्राशाशित प्रदेश दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून दर्जा मिळाला.
  • १९९८: पीटर कोरडा यांनी मार्सिलो रियोस यांना हरवून ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली
  • २००२: अमेरिकेचे प्रसिद्ध पत्रकार डेनियल पर्ल यांचे अपहरण करून त्यांची आजच्या दिवशी हत्या करण्यात आली.
  • २००४: मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
  • २०१३: जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
  • १८८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)
  • १९०१: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)
  • १९१२: राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)
  • १९१४: भारतीय प्रसिद्ध चित्रपट कलाकार अवतार किशन हंगल यांचा जन्म.
  • १९१५: हैज या विषाणूवर संशोधन करणारे भारतीय शास्त्रज्ञ शंभूनाथ दे यांचा जन्म.
  • १९१७: ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)
  • १९२७: मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ – सांगली)
  • १९२९: जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
  • १९३१: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू: २३ एप्रिल २००७)
  • १९५५: प्रसिद्ध कुश्ती पैलवान सतपाल सिंह चा जन्म.
  • १९५६: दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार ब्रम्हानंद यांचा जन्म.
  • १९५७: बॉलीवूड चे प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ यांचा जन्म.
  • १९६०: जॅकी श्रॉफ – अभिनेता
  • १९७१: अजय जडेजा – क्रिकेटपटू
  • १९८१: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १८८२: ब्रिटीशांसाठी हिमालयाला एकस्फ्लोर करणारे भारतीय नैन सिंह रावत यांचे निधन.
  • १९७६: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
  • १९९५: मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १० एप्रिल १९०७)
  • २००३: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १ जुलै १९६१)
  • २०१२: अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

खेड | क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यंदा खेडमधील जामगे गावात ….

   Follow us on        

खेड: महाराष्ट्रातील प्राचीन कदम घराण्याचे सातवे भव्य राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील जामगे ( खेड ) येथे शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ८ फेब्रुवारी व रविवार ९ फेब्रुवारी यादिवशी आयोजित करण्यात आले आहे.

प्राचीन सत्ताधीश कदंब राजवंशाचा इतिहास लाभलेल्या कदम कुटुंबीयांना स्वतःचे कुलाचार, परंपरा , वारसा याबद्दल माहिती व्हावी, नोकरी व्यवसायात एकमेकांना सहकार्य मिळावे तसेच घराण्यातील नामवंतांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून क्षत्रिय मराठा कदम परिवार संस्थेने आजतागायत तुळजापूर, गिरवी ( फलटण ), गढीताम्हाणे ( सिंधुदुर्ग) , गलांडवाडी ( दौंड) , धामदरी ( नांदेड) , आणि आंबेचिंचोली( पंढरपूर) याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहेत. या वर्षाचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन कोकणातील खेडजवळच्या जामगे या गावामध्ये ८ व ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कुलसंमेलनासाठी विद्यमान गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांचे मूळगावामध्ये महाराष्ट्रासह गोवा , मध्यप्रदेश, कर्नाटक , बडोदा या राज्यातूनही कदम बांधव उपस्थित राहणार आहेत.

नोकरी, व्यवसाया निमित्त अनेक गावात, शहरात वास्तव्यास असलेले कदम भाऊबंद कुलसंमेलना निमित्त एकत्र येणार असून, घराण्याचा जाज्वल्य वारसा जपण्याचा मानस मेळाव्यातून केला जाणार आहे. कुलसंमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता कुलदेवता श्रीतुळजाभवानीच्या जागर गोंधळाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.तसेच मागील कुलसंमेलनाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो दाखवला जाणार आहे.

कुलसंमेलनाच्या मुख्य दिवशी सकाळी जामगे गावचे ग्रामदैवत श्रीकोटेश्वरी मानाई देवीचे दर्शन आणि पूजन झाल्यानंतर कदंब राजवंशाचे ध्वजारोहण गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे हस्ते होणार आहे.त्यानंतर बदलापूर येथील सुप्रसिद्ध शस्त्रसंग्राहक सुनील कदम यांच्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कदम कुलसंमेलनाचे उदघाटन शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते झाल्यानंतर प्रा. डाॅ. सतीश कदम, उद्योजक मनोज कदम आणि चिपळूण येथील पराग कदम(अडरे) यांची कदम घराण्याचा इतिहास आणि सद्यस्थितीतील तरूणांना मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. मागील वर्षभरात ज्या ज्या कदम बंधू किंवा भगिनींनी उल्लेखनीय कार्य केले आहे अशा कर्तृत्ववान कदमांचा सन्मान सोहळा सुध्दा संपन्न होणार आहे. या कुलसंमेलनास सांगली लोकसभा खासदार विशाल पाटील (कदम), गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर (कदम) , पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम, घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे आमदार राम कदम, नांदेडचे हदगाव विधानसभा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कुलसंमेलनाचे निमंत्रक खेड पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गंगाराम कदम असून, या राज्यस्तरीय कुलसंमेलनास सर्व कदम बंधूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमरराजे कदम, सचिव रामजी कदम, सल्लागार माऊलीशेठ कदम पाटील, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर कदम तसेच जामगे कदम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करावी या मागणीसाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समितीचा पत्रव्यवहार

   Follow us on        
Konkan Railway Merger:कोकण रेल्वेचे विलीनीकरण, रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करणे आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यासाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समिती तर्फे प्रयत्न केले जात असून या मागणीचा/निवेदनाचा  एक ई-मेल समितीच्या वतीने समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य आणि केंद्र सरकार मधील संबंधित लोकप्रतिनिधींना केला आहे.

या निवेदनात समिती म्हणते  

”मुंबई आणि मंगळुरु ही दोन बंदरे जोडण्याच्या दृष्टीने रोहा ते मंगळुरु दरम्यान नवीन ब्रॉडगेज मार्ग बांधण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्य शासनांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. १५ वर्षांनंतर किंवा सर्व देणी देऊन झाल्यावर यांपैकी जे आधी होईल तेव्हा हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन होणे अपेक्षित होते. त्यानुसार वर्ष २००८-०९ मध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता असताना केंद्र शासनाने सर्व देणी देऊन झाल्यावरही हे महामंडळ स्वतंत्रच राहील असे प्रथम आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात ठरवले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. ०७.०१.२००९ चे पत्र क्र. 2007/PL/50/7). त्यानंतर सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोकण रेल्वे महामंडळ Sick Company म्हणून गणले जाऊ नये याकरिता द्वितीय आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात कोकण रेल्वेतील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे ४०७९.५१ कोटींचे Non-Cumulative Redeemable Preference Shares (RPS) चे रूपांतर Compulsorily Convertible Non-Cumulative Preference Shares (CCPS) मध्ये करण्यात आले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. २६.१२.२०१७ चे पत्र क्र. 2015/PL/50/9).

रोहा – वीर दुहेरीकरणानंतर दि. १६.०८.२०१६ ला रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वेच्या १४७.६८ किमीच्या मार्गाच्या टप्पा दुहेरीकरणाच्या आणि २१ नवीन स्थानके बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन यासाठी लागणारा ४४६० कोटींचा निधी ५०% समभाग (Equity) आणि ५०% कर्जाच्या रूपात उभा करण्याचे ठरवले. दि. २६.०६.२०१८ ला रेल्वेच्या विस्तारित बोर्डाने (Expanded Board for Railways) या प्रकल्पाची किंमत ४९८० कोटी रुपयांपर्यंत वाढवली. नंतर हा प्रस्ताव कॅबिनेट समितीकडे व त्यांच्याकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. दि. १८.०६.२०१९ ला त्याविभागाने प्रस्तावाला मान्यता दिली व संबंधित राज्य शासनांकडून (महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ) निधी देण्याबद्दल लेखी हमीची मागणी केली. त्यात महाराष्ट्र ४९६.४६९ कोटी, गोवा १३५.४०१ कोटी, कर्नाटक ३३८.५०२ कोटी आणि केरळ १३५.४०१ कोटी असा आर्थिक सहभाग अपेक्षित होता.

कोकण रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून आर्थिक सहभागाची हमी देण्याबाबत विनंती केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. ३० ऑगस्ट, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion). राज्यांकडून निधी मिळण्यास उशीर झाल्यास एकूणच प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम एकूणच प्रगतीवर होऊ नये याकरिता राज्यांनी तो निधी प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच एकरकमी देण्यासंदर्भात लेखी हमी मागितली. पूर्वीच्या पत्राला उत्तर न आल्यामुळे व केंद्रीय कॅबिनेटच्या नवीन सूचनांनुसार महाराष्ट्राकडून अपेक्षित असलेला ४९६.४६९६ कोटींचा निधी एकरकमी देणेबाबत कोकण रेल्वेने महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना सूचित केले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १३ सप्टेंबर, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion).

त्यानंतर रेल्वे बोर्डाने या प्रस्तावात काहीसा बदल करून १४७.६८ ऐवजी १४१ किलोमीटर टप्पा दुहेरीकरण व २१ ऐवजी १८ नवीन स्थानकांचा ४५१३ कोटींचा सुधारित प्रस्ताव केला. राज्यांवर एकरकमी निधी देण्याचा ताण येऊ नये याकरिता राज्य शासनांनी पहिल्या वर्षी २०%, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी ४०% अशा तीन हप्त्यांमध्ये निधी द्यावा परंतु त्याबद्दल लेखी हमी देण्याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सूचित केले. त्यामुळे कोकण रेल्वेने पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून निधीबाबत विचारणा केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १६ एप्रिल, २०२१ चे पत्र क्र. CO/S/Bonds/State Correspondence).

वरीलपैकी एकही पत्राला महाराष्ट्र शासनाने किंवा परिवहन सचिवांनी उत्तर न दिल्यामुळे कोकण रेल्वेने महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री. मनू कुमार श्रीवास्तव (भा.प्र.से.) यांना महाराष्ट्राच्या ५७२.४४ कोटींच्या आर्थिक सहभागाबद्दल सहमती किंवा असहमती विचारण्याकरता पत्र पाठवले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. २ डिसेंबर , २०२२ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Rights Issue). त्याच्या प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राच्या तत्कालीन गृह (परिवहन) विभागाचे सह सचिव श्री. सिद्धार्थ खरात यांनी महाराष्ट्राच्या कोकण रेल्वेमध्ये असलेल्या आतापर्यंतच्या भागभांडवलावर किती लाभांश (Dividend) मिळाला व तो जर रु. ५७२.४४ कोटी किंवा त्याहून अधिक असेल आणि पुढील उपयोगाकरिता राखून ठेवला असेल तर तो सदर क्षमतावृद्धीच्या खर्चासाठी वापरण्यात येऊ शकेल का याबाबत विचारणा केली (संदर्भ: दि. १८ जानेवारी, २०२३ चे पत्र क्र. आरएलवाय-०४२२/प्र.क्र.११२/परि-५).

या सर्व प्रक्रियेत बराच कालावधी लोटल्यामुळे प्रकल्पाची किंमत ४३१९ कोटींवरून ५२०४ कोटींपर्यंत वाढली व यातून अपेक्षित परतावा १२.४३% वरून २.९५% पर्यंत कमी झाला. राज्य शासनांपैकी कर्नाटक राज्याने निधी देण्यास नकार दिला व इतर राज्यांनी वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही उत्तर न दिल्यामुळे संचालक (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) यांनी कोकण रेल्वेचा हा १४१ किलोमीटर टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव रद्द केल्याचे कळवले (संदर्भ: दि. २७.०२.२०२३ चे पत्र क्र. 2022/P/50/10). याकाळात महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ महायुती, २०१९ ते २०२२ महाविकास आघाडी व २०२२ ते २०२४ महायुतीचे शासन होते.

राज्य शासनांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे किंवा वेळेत उत्तर न दिल्यामुळे रेल्वेचा दुहेरीकरण प्रकल्प रद्द झाल्याचे देशातील हे एकमेव उदाहरण असावे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून भारतीय रेल्वेत आधुनिकीकरण व क्रांती सुरु असताना कोकण मात्र त्यापासून वंचित आहे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेचा भाग नसून स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे हे घडते. केंद्रीय अर्थसंकल्पातून कोकण रेल्वेला निधी मिळत नाही. त्यांना पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी लागणाऱ्या निधीकरिता राज्य शासन व बाहेरील कर्जांवर अवलंबून राहावे लागते.

संपूर्ण देशात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अर्थसंकल्पातून रेल्वे विकास प्रकल्प सुरु असताना केवळ स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे कोकणाला त्याचा लाभ न देणे अन्यायकारक आहे. ६ ऑगस्ट, २०२३ ला आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील (म्हणजेच महाराष्ट्रातील) एकाही स्थानकाचा समावेश नाही.

महाराष्ट्रातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या सावंतवाडी टर्मिनसचे कामही तत्कालीन रेल्वे मंत्री श्री. सुरेश प्रभू व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये भूमिपूजन करूनही अपूर्णच आहे. यालाही कोकण रेल्वेचे स्वतंत्र अस्तित्वच कारणीभूत आहे. २००८ मध्ये होणारे विलीनीकरण आज २०२४ पर्यंतही न झाल्यामुळे रेल्वे सुधारणांच्या बाबतीत कोकण आधीच १५ वर्षे मागे पडला असून आणखी उशीर झाल्यास आणखी बऱ्याच संधी हुकतील.

देशातील व्यस्त व जास्त प्रवासी घनता असलेल्या मार्गांचे High Density Network (HDN) किंवा Highly Utilized Network (HUN) असे वर्गीकरण केले जाते. या मार्गांच्या क्षमतावृद्धीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न केले जातात. यात दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण, गाड्यांचा वेग वाढवण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधांचे काम व इतर अनेक कामे केली जातात. परंतु, केवळ स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे १६८% वापर असूनही कोकण रेल्वे मार्गाचा यात समावेश झालेला नाही.

याचकरिता महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील सर्व समाजघटक कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांपैकी माजी खासदार श्री. विनायक राऊत, माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी, खासदार श्री. सुनील तटकरे, खासदार व माजी केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे, खासदार श्री. रविंद्र वायकर, खासदार श्री. धैर्यशील पाटील तर कर्नाटकातील खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार कॅप्टन ब्रिजेश चोवटा यांनी व इतर बऱ्याच लोकप्रतिनिधींनीही ही मागणी लावून धरली आहे.

कोकण रेल्वेत सुरुवातीला केंद्र शासन ५१%, महाराष्ट्र २२%, कर्नाटक १५% तर गोवा व केरळ प्रत्येकी ६% आर्थिक भागीदार होते. आताच्या बदलांनुसार हे समभाग केंद्र शासन ६५.९७%, महाराष्ट्र १५.५७%, गोवा ३.५९%, कर्नाटक १०.६२% आणि केरळ ४.२५% या प्रमाणात आहेत. परंतु, सर्वात कमी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या दोन राज्यांनाच कोकण रेल्वेकडून सर्वाधिक गाड्या व सुविधा मिळाल्या आहेत. सर्वाधिक गुंतवणूक करून महाराष्ट्र व त्याखालोखाल कर्नाटक अजूनही पुरेशा रेल्वे सुविधांकरिता अजूनही संघर्ष करत आहेत.

कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याआधी ही कंपनी १००% मालकी हक्कांसहित केंद्र शासनाच्या अखत्यारित येणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित राज्य शासनांनी त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन केले पाहिजेत असे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी व खासदार श्री. धैर्यशील पाटील यांनी संसदेत विचारलेल्या प्रशांत उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

म्हणून, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राकडून मान्यता मिळण्याकरिता आपण प्रयत्न करावेत. त्यासाठी गरज पडल्यास महाराष्ट्राच्या ताब्यात आता असलेले ३९६.५४२५ कोटी रुपयांचे समभाग कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला सुपूर्द करावेत. ते केल्यानंतर कोकण रेल्वे केंद्र शासनाच्या ताब्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम न राहता ताबडतोब भारतीय रेल्वेत विलीन केले जाईल याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून लेखी हमी घ्यावी.

दोन शासकीय विभागांतील समन्वय कठीण असून दोन रेल्वे विभागांसंबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी रेल्वे बोर्डाची मध्यस्थी आवश्यक ठरते. तर एकच विभाग असल्यास संबंधित महाव्यवस्थापक (General Manager) आपल्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेऊ शकतात. कोणत्याही विभागातील नागरिकांना आपल्या राज्याच्या राजधानीकडेच जास्त प्रवास करावा लागतो. त्यानुसार कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग (रोहा ते मडुरे मार्ग) मध्य रेल्वेत व कारवार विभाग (पेडणे ते ठोकूर मार्ग) नैऋत्य (दक्षिण पश्चिम) रेल्वे विभागात विलीन झाल्यासच स्थानिकांच्या मागण्या व्यवस्थित पूर्ण होऊ शकतील.

मुंबई, पुणे, भुसावळ व सोलापूर विभागांच्या माध्यमातून ७०% महाराष्ट्र मध्य रेल्वेच्या अखत्यारित असल्यामुळे कोकणही त्याच विभागाकडे असावा हेच प्रवासी हिताचे आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे एकाच विभागा अंतर्गत येतील व राज्यांतर्गत वाहतूक सुरळीत होईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात सक्षम रेल्वे सुविधा पुरवणे मध्य रेल्वेला शक्य होईल. नांदेड विभाग मध्य रेल्वेकडे नसून दक्षिण मध्य रेल्वेकडे असल्यामुळे तेथून मुंबईला येणाऱ्या गाड्यांपेक्षा तेलंगणातील हैदराबादला जाण्यासाठी जास्त गाड्या आहेत.

कोकण रेल्वे स्वतंत्र झोन झाल्यास त्याचे मुख्यालय महाराष्ट्रातून बाहेर जाईल. हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा तोटा असेल. तसेच, स्वतंत्र झोनसाठी महाव्यवस्थापक आणि इतर प्रशासकीय पद निर्मिती तसेच नवीन मुख्यालयासाठी भूसंपादन व मुख्यालयाचे बांधकाम ही अत्यंत खर्चिक कामे आल्यामुळे विलीनीकरणास आणखी उशीर होईल. तसेच मुख्यालय महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे कोकण रेल्वेत आपला कोकण व महाराष्ट्र क्वचितच दिसेल. इतर सर्व रेल्वे झोन २००० ते ५००० किलोमीटर मार्गाचे असताना केवळ ७४१ किलोमीटरचा स्वतंत्र कोकण झोन तयार करणे व्यवहार्य नाही.

वरील सर्व बाबींचा व प्रवाशांच्या हिताचा विचार करता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेला व कारवार विभाग नैऋत्य रेल्वेला जोडण्यासाठी आपण आपल्या अधिकारात प्रयत्न करावेत, ही नम्र विनंती.

सध्याच्या विधानसभेच्या २०२४ ते २०२९ या कार्यकाळातच हा ऐतिहासिक निर्णय व्हावा अशी कोकणवासीयांची इच्छा आहे. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या स्थापनेकरिता आदरणीय श्री. मधू दंडवते, श्री. जॉर्ज फर्नांडिस व सर्व मुख्यमंत्र्यांची आजही आठवण काढली जाते त्याचप्रमाणे ज्यांच्या कार्यकाळात हे विलीनीकरण होईल त्यांचे नावही इतिहासात अजरामर होईल. आपण ही संधी गमावू नये, ही नम्र विनंती.” 

 

 

३१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 14:01:31 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 28:15:09 पर्यंत
  • करण-कौलव – 14:01:31 पर्यंत, तैतिल – 24:51:48 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वरियान – 15:32:08 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:13:13
  • सूर्यास्त- 18:30:50
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 08:35:59
  • चंद्रास्त- 20:26:59
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:

  • १८९३: आजच्या दिवशी कोका कोला चे ट्रेडमार्क कंपनीने पेटंट स्वतःच्या नावावर केले.
  • १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
  • १९१५: जर्मनी ने सर्वात आधी रशिया च्या विरुद्ध घातक वायू चा प्रयोग केला होता.
  • १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकावी सुरूवात
  • १९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
  • १९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात युद्धातुन पळून गेलेल्या एकूण ४९ सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र फक्त स्लोव्हिकच्याच शिक्षेची अंमलबजावणी झाली.
  • १९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
  • १९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
  • १९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
  • १९९२: राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
  • २०००: हवाला केस मधील सर्व आरोपींची सुटका करण्यात आली.
  • २००५: आजच्या दिवशी जोगिंदर जसवंत सिंह यांची सेनाप्रमुख म्हणून निवड झाली.
  • २०१०: ला हॉलीवूड चित्रपट अवतार ने २ बिलियन डॉलर रुपयांची कमाई करून सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९६: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी, पद्मश्री (१९६८), त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २१ आक्टोबर १९८१)
  • १९२३: परमवीर चक्र मिळणारे प्रथम भारतीय सैनिक सोमनाथ शर्मा यांचा जन्म.
  • १९३१: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)
  • १९३२: पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक विजय कुमार चोप्रा यांचा जन्म.
  • १९४९: ला भारतीय चित्रपट अभिनेता राजेश विवेक यांचा जन्म.
  • १९७५: प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका
  • १९७७: मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी यांचा जन्म.
  • १९८६: भारतीय अभिनेत्री मनीषा केळकर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १९५४: ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक (जन्म: १८ डिसेंबर १८९०)
  • १९६१: बिहार चे माजी मुख्यमंत्री श्री कृष्ण सिन्हा यांचे निधन.
  • १९६९: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ – पुणे, महाराष्ट्र)
  • १९७२: महेन्द्र – नेपाळचे राजे (जन्म: ? ? ????)
  • १९८६: विश्वनथ मोरे – संगीतकार (जन्म: ? ? ????)
  • १९९४: वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • १९९५: सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष, पद्मभूषण (जन्म: ? ? ????)
  • २०००: कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८ – डेहराडून, उत्तराखंड)
  • २०००: वसंत कानेटकर – नाटककार (जन्म: २० मार्च १९२०)
  • २००४: सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९)
  • २००४: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search