Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ प्रीमियम गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून प्रत्येकी दोन डब्यांची वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक २२४१४/२२४१३ हजरत निजामुद्दीन -मडगाव – हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेस या गाडयांना फर्स्ट एसीचा एक आणि थ्री टायर एसी चा एक असे दोन डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक १२४३२ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल त्रि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ च्या फेरीपासून तर गाडी क्रमांक १२४३१ तिरुवनंतपुरम सेंट्रल- हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला दिनांक ०६ फेरबुवारी २०२५ च्या फेरीपासून हे डबे जोडले जाणार आहेत.
२२४१४ हजरत निजामुद्दीन -मडगाव द्वि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ च्या फेरीपासून तर २२४१३ मडगाव – हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ च्या फेरीपासून फेरीपासून हे डबे जोडले जाणार आहेत.
या वाढीव डब्यांमुळे या गाडीचे एकूण डबे २० वरून २२ होणार आहेत. दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सुधारित रचना फर्स्ट एसी – ०२ डबे, टू टायर एसी – ०५ कोच, थ्री टायर एसी – १२ कोचेस, पेन्ट्री कार -०१ आणि जनरेटर कार -०२ अशी असणार आहे.
सावंतवाडीतील थांबा अजूनही प्रतिक्षेत
गाडी क्रमांक १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी स्थानकावर पूर्वी थांबा होता. मात्र ‘Zero Based Timetable’ च्या नावाखाली कोविड काळात हा थांबा काढून घेण्यात आला. या तत्त्वावर काढून घेतलेले ईतर स्थानकावरील थांबे पूर्ववत करण्यात येत असताना या गाडीचा थांबा येथे अजूनही पूर्ववत करण्यात आलेला नाही. हा थांबा परत मिळावा तसेच ईतर महत्वाच्या गाड्यांना सावंतवाडी टर्मिनस येथे थांबे मिळावेत यासाठी येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) प्रयत्नशील आहे.
Facebook Comments Box