Author Archives: Kokanai Digital

२० जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 10:01:42 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 20:31:00 पर्यंत
  • करण-वणिज – 10:01:42 पर्यंत, विष्टि – 23:21:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सुकर्मा – 26:51:31 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-रशि-कन्या
  • चंद्रोदय- 23:57:59
  • चंद्रास्त- 11:15:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
  • १८४१: ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.
  • १९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.
  • १९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न झाला. याआधी १९३४, १९४४ व १९४४ मध्ये त्यांची हत्या करण्याचे प्रयत्‍न झाले होते.
  • १९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
  • १९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
  • १९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
  • १९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर
  • १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
  • २००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७५: आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० जून १८३६)
  • १८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
  • १८७१: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
  • १८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.
  • १८९८: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (मृत्यू: २० आक्टोबर १९७४)
  • १९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
  • १९६०: आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९१: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
  • १९३६: जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ३ जून १८६५)
  • १९५१: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
  • १९८०: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
  • १९८८: खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’ (जन्म: ३ जून १८९०)
  • १९९३: ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ मे १९२९)
  • २००२: रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते. (जन्म: १० मे १९१८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता होणार मुख्य शासकीय समारंभ; जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

मुंबई, दि. १९: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

  • ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे,
  • पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार,
  •  नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे,
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील,
  • वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ,
  • सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील,
  • नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन,
  • पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक,
  • जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील,
  • यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
  • मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा,
  • मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार,
  • रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत,
  • धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल,
  • जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे,
  • नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे,
  • चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके,
  • सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई,
  • बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे,
  • रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे,
  • लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले,
  • नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे,
  • सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे,
  • हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ,
  • भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे,
  • छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट,
  • धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक,
  • बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील),
  • सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे,
  • अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर,
  • गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील,
  • कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर,
  • गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल,
  • वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर,
  • परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे – बोर्डीकर
  • अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक.

राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.

राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर १०९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९८/ ध्वजसंहिता/३०, दिनांक ११ मार्च १०९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई- वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

धक्कादायक! कोकण रेल्वेतून होत आहे ‘गोवा दारू’ ची तस्करी

   Follow us on        
मडगावः इतर राज्यातील तुलनेत गोवा राज्यात मद्य स्वस्त आहे. त्यामुळे गोव्यातून आजूबाजूच्या राज्यात तस्करी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येतात. मात्र आता तर गोव्यातून मद्याची तस्करी करताना रेल्वेचा वापर करत असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यात मद्याची तस्करी केली जात असतानाच आता गुजरातमध्ये कोकण रेल्वेमार्गे दारू नेली जात असल्याचे उघड झाले आहे. रेल्वे पोलीस दारू पकडतात. मात्र त्याचे प्रमाण नगण्य असते. मद्यमाफिया व पोलीस यंत्रणा यांचे साटेलोटे असल्याने हा धंदा बिनधास्त सुरू आहे.
अन्य राज्याच्या तुलनेत गोव्यात मद्य स्वस्त आहे. गुजरातमध्ये तर दारूबंदी आहे. गोव्यातून दुसऱ्या राज्यात अनेक वर्षांपासून मद्य चोरट्यामार्गे नेले जात आहे. हल्लीच गुजरात राज्यातील अबकारी अधिकारी मडगावात चौकशीसाठी आले होते. सुरत येथे मद्यसाठा पकडला होत. तो मडगावातून नेण्यात आला होता, असे तपासात उघड झाले होते.
पकडण्यात आलेल्या संशयितांनी मडगावातील एका दारू होलसेलवाल्याचे नाव सांगितल्याने पुढील तपासासाठी अधिकारी मडगावात आले होते. नंतर त्यांनी याबाबत फातोर्डा पोलिसांना त्याबाबत कल्पना दिली होती. दरम्यान, मागच्या वर्षी कोकण रेल्वे पोलिसांनी दारूची एकूण ७ प्रकरणे नोंद करून दहाजणांना पकडले होते.
एका पोलिस अधिकाऱ्याने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर बोलताना सांगितले, या मद्य तस्करीत बडी धेंडे गुंतलेली असतात. त्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे अनेकदा माहिती असूनही कारवाई करता येत नाही.

रेल रोको च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची पालकमंत्री श्री नितेश राणे आणि आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट

   Follow us on        

सिंधुदुर्ग: २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री ना. श्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनस च्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण टर्मिनस उभारण्यासाठी आपण राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध करावा, या ठिकाणी कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या गाडी क्र. १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा. नव्याने १२१३३/३४ मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला सावंतवाडी थांबा मिळावा, आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे या विषयावर पालकमंत्री श्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आपण योग्य कार्यवाही करून येत्या काही महिन्यात ही कामे मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांचा संघटनेतर्फे शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे विलीनीकरण या संदर्भात निवेदन देण्यात आले. आणि सावंतवाडी टर्मिनस का गरजेचे आहे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पटवून दिले. त्यावर आमदार श्रीमती गायकवाड मॅडम यांनी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा कानावर हा विषय घालते असे संघटनेला आश्र्वासित केले.

यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, प्रकाश येडगे, प्रशांत परब आदी संघटनेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग

   Follow us on        

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. शिवशाही बसमध्ये १२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. किंवा कोणीही जखमी झालेलं नाही.

या घटनेमुळे काही वेळ मुंबईकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ येऊन आग विझवली आहे. मुंबईच्या दिशेने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढतच आहेत.

Goa News: पॅराग्लायडिंग करताना दोरी तुटल्यामुळे अपघात होऊन पुण्यातील युवतीसह पायलटचा मृत्यू

गोवा वार्ता: केरी समुद्रकिनारी डोंगर भागातून पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटल्यामुळे पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि त्याच पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाले. ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
पुणे येथील काही पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी केरी डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेले होते. त्यावेळी पायलट सुमन नेपाळी आणि पुणे येथील पर्यटक शिवानी दाभळे हे दोघे पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी मांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
spacer height=”20px”]
शिवानी ही मित्रासोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आली होती. पर्यटनाचा एक भाग म्हणून पॅराग्लायडिंग करावे, या हेतूने ती डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेली. त्या ठिकाणी पॅराग्लायडिंग करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने पॅराग्लायडरची एक दोरी मध्येच तुटल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेचा पंचनामा मांद्रे पोलिसांनी केला.
spacer height=”20px”]
 बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय
हा पॅराग्लायडर शेखर रायजादा नामक व्यक्तीचा होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हरमल तसेच केरी भागात बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय केला जात असल्याचे सांगण्यात आले. येथील काही नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पॅराग्लायडिंगला आमचा विरोध असून तशा प्रकारचा ठराव मंजूर करूनही सरकारने अशा पॅराग्लायडिंग व्यवसायिकांना परवाने का दिले? कुणाला परवाने दिले? याची सविस्तर माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
spacer height=”20px”]

Sawantwadi: आंदोलनकर्त्यांना रेल रोको आंदोलनापासून परावृत्त करावे; प्रांताधिकाऱ्यांचे कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र

सावंतवाडी: सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, येथे महत्वाच्या गाडयांना थांबे देण्यात  यावेत तसेच इतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने येत्या  २६ जानेवारी रोजी ‘रेल रोको’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना आणि सूचना संबंधित कार्यलये आणि अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेली आहेत.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून दिलेल्या इशाऱ्यानंतर सावंतवाडी विभाग प्रांताधिकारी यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्रव्यवहार करत आंदोलनकर्ते यांना या आंदोलनापासून परावृत्त
करण्यात यावे, असे सांगितले आहे.
प्रांताधिकारी यांनी कोकण रेल्वे महामंडळ व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांचा आंदोलन अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. सदर अर्जात सावंतवाडी रोड स्थानकावरील टर्मिनसचे भूमिपूजन झालेले असून रखडलेले रेल्वे टर्मिनमचे काम जलद गतीने करण्यात यावे. सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करण्यास पुन्हा एकदा आवश्यक पाठपुरावा करणे, सावंतवाडी स्थानकचे नामकरण प्रा. मधु दंडवते असे करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात यावा. कोरोना काळात ZBTT नुसार काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे. तसेच सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशा विविध मागण्याबाबत दि. २६ जानेवारी रोजी सावंतवाडी स्थानकात आंदोलन करणार या कार्यालयास कळविलेले आहे. सदरचा अर्ज पुढील उचित कार्यवाहीसाठी पाठविणेत आपलेकडे आहे. येत सदर अर्जाच्या अनुषंगाने आपले स्तरावरुन नियमाधीन कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत आंदोलनकर्ते यांना कळवून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात यावे असे प्रांताधिकारी यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी! ‘जात प्रवर्ग’ चा उल्लेख हटवून १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट मिळणार

मुंबई: दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर आता महामंडळाने ही प्रवेशपत्रे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे.
दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. त्यानंतर विविध घटकांतून महामंडळावर टीका करण्यात आली होती. हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याचं सांगत बोर्डाकडून त्याच समर्थन करण्यात आलं होतं. मात्र जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्यात आल्याचं राज्य शिक्षण मंडळाने म्हटलं आहे.
बारावीसाठी नव्याने प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी 23 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा प्रवेश पत्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तर दहावीसाठी 20 जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
बोर्डाचे म्हणणे काय होते? 
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्याना समाजकल्याण तसंच, अन्य विभागांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी माहिती द्यावी लागले. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, पालकांचे नाव, जन्मतारिख, जात याबाबत शाळेच्या रजिस्टरमध्ये बदल करता येत नसल्याने मंडळाने प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख केला असल्याचे मंडळाने म्हटलं होतं.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे दिलेल्या वेळापत्रकावर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्राचे नाव यासह प्रथमच जात प्रवर्ग नमूद केला होता. दहावी, बारावीच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख ही अयोग्य बाबा असल्याचे मन अनेकांनी नोंदवलं होतं. समाजमाध्यमांवरुनही अनेकांनी टीका केली होती.

१९ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 07:33:56 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 17:31:13 पर्यंत
  • करण-तैतुल – 07:33:56 पर्यंत, गर – 20:45:12 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-अतिगंड – 25:56:51 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:22
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 23:10:00
  • चंद्रास्त- 10:43:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.
  • १९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.
  • १९४९: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.
  • १९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन ’पुणे महानगरपालिका’ स्थापन झाली.
  • १९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन
  • १९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम
  • १९६६: भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.
  • १९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
  • १९८६: (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
  • १९९५: च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड
  • १९९६: प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची
  • १९९६: उस्ताद अल्लारखा खाँ यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड
  • २००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
  • २००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७३६: जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता (मृत्यू: २५ ऑगस्ट १८१९)
  • १८०९: एडगर अ‍ॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (मृत्यू: ७ आक्टोबर १८४९)
  • १८८६: रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य, पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना ‘सवाई गंधर्व’ ही पदवी दिली. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)
  • १८९२: चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (२१ नोव्हेंबर १९६३)
  • १८९८: विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक,
  • १९०६: विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९४७)
  • १९२०: झेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस
  • १९३६: झिया उर रहमान – बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष्य (मृत्यू: ३० मे १९८१)
  • १९४१: मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९६८), साहित्य अकादमी फेलोशिप विजेते (१९७०), त्यांनी ’कुमार’ या टोपणनावाने कविता लेखन तर ’आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे. त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. (मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९६०: रामचंद्र गोपाळ ऊर्फ ’दादासाहेब तोरणे – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक (जन्म: १३ एप्रिल १८९०)
  • १९९०: भगवान श्री रजनीश – आध्यात्मिक गुरू (जन्म: ११ डिसेंबर १९३१)
  • २०००: मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५), चेन्नईतील ’चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे. (जन्म: १२ आक्टोबर १९१८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

धक्कादायक | कुडाळ-पिंगुळी येथे नायब तहसीलदार व तलाठीच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी नियुक्त केले आहे. वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवणचे ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे नीलेश गौतम कांबळे, माणकादेवीचेच्या स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या कर्मचार्‍यांचा या पथकात समावेश आहे.

दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. यासाठी नेमलेले अधिकार्‍यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.

या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.

उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले.

तर पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search