आजचे पंचांग
- तिथि-द्वितीया – 26:26:25 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 23:46:54 पर्यंत
- करण-बालव – 14:57:55 पर्यंत, कौलव – 26:26:25 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-व्याघात – 17:06:01 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 07:11:46
- सूर्यास्त- 18:12:09
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 08:26:00
- चंद्रास्त- 19:37:00
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- नववर्ष दिन
- जागतिक शांतता दिन
- जागतिक कौटुंबिक दिवस
महत्त्वाच्या घटना:
- १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.
- १७८५: डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.
- १८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
- १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
- १८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
- १८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
- १८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
- १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
- १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
- १८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
- १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
- १९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
- १९१२: याच दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.
- १९१५: ला महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.
- १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
- १९२०: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
- १९२३: ला चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.
- १९३२: डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
- १९६४: मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.
- १९७२: वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.
- १९७३: मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.
- १९९५: WTO ची स्थापना झाली.
- २०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
- २००१: कलकत्ता ला अधिकृत रित्या कोलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
- २००४: चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती /वाढदिवस:
- १६६२: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
- १८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७०)
- १८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
- १८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
- १९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
- १९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
- १९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
- १९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
- १९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)
- १९३५: ला भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.
- १९३६: राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७)
- १९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार
- १९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
- १९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
- १९५१: नाना पाटेकर – अभिनेता
- १९५३: ला भारताचे माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांचा जन्म.
- १९६१: ला मणिपूर चे माजी मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचा जन्म.
- १९७१: संसद चे माजी सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म.
- १९७५: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.
- १९७९: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री विद्या बालन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १५१५: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १४६२)
- १७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७)
- १८९४: हेन्रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
- १९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९)
- १९५५: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
- १९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. (जन्म: ८ आक्टोबर १८९१)
- १९८३: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन.
- १९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
- २००८: ला भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन.
- २००९: रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.