Author Archives: Kokanai Digital

नागपूर-मडगाव एक्सप्रेसच्या नियमित सेवेचा आरंभ; नवीन क्रमांक आणि वेळापत्रक जाहीर

   Follow us on        ​

नागपूर: नागपूर आणि कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. नागपूर-मडगाव (NGP-MAO) दरम्यान चालवली जाणारी विशेष ट्रेन आता नियमित (Regularize) करण्यात आली आहे. या गाडीला आता नवीन क्रमांक देण्यात आला असून ती द्वि-साप्ताहिक (Bi-weekly) स्वरूपात धावणार आहे.

​नवीन गाडी क्रमांक आणि वेळापत्रक

​मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जुनी विशेष ट्रेन (०११३९/०११४०) आता ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्सप्रेस या नवीन क्रमांकाने ओळखली जाईल.

​गाडी क्र. ११२०३ (नागपूर ते मडगाव):

​ही गाडी नागपूरवरून दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १५:०५ वाजता सुटेल.

​ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी १७:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

​या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी १६ मे २०२६ पासून होईल.

​गाडी क्र. ११२०४ (मडगाव ते नागपूर):

​ही गाडी मडगाववरून दर शुक्रवारी आणि सोमवारी रात्री २०:०० वाजता सुटेल.

​नागपूरला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री २१:२५ वाजता पोहोचेल.

​या गाडीची नियमित सेवा मडगाववरून १७ मे २०२६ पासून सुरू होईल.

​ही एक्सप्रेस ट्रेन प्रवासादरम्यान खालील  स्थानकांवर थांबेल:

नागपूर जंक्शन, वर्धा जंक्शन, पुलगाव जंक्शन, धामणगाव, बडनेरा जंक्शन, अकोला जंक्शन, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी आणि मडगाव जंक्शन.

​प्रवासाचा तपशील

​एकूण अंतर: १३४२ किलोमीटर.

​सरासरी वेग: ५० ते ५२ किमी प्रति तास.

​प्रवासाचा वेळ: साधारण २६ तास ४० मिनिटे (नागपूर-मडगाव).

​ही ट्रेन नियमित झाल्यामुळे विदर्भ आणि खानदेशातील प्रवाशांना थेट गोव्याला जाण्यासाठी कायमस्वरूपी सोय उपलब्ध झाली आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या काळात आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

Konkan Railway: मंगला एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        

कणकवली:कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम जंक्शन – ह. निजामुद्दीन ‘मंगला लक्षद्वीप’ एक्सप्रेसच्या मान्सूनपूर्व (Non-Monsoon) वेळापत्रकात अंशतः बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, कणकवली स्थानकावरील या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून सुधारित वेळापत्रक १४ मे २०२६ पासून लागू होणार आहे.

​कणकवली स्थानकावर ही गाडी सध्या पहाटे ०४:४२ वाजता येऊन ०४:४४ वाजता सुटते. मात्र, नवीन बदलानुसार ही गाडी आता पहाटे ०५:२० वाजता कणकवलीत पोहोचेल आणि ०५:२२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. प्रवाशांनी या बदललेल्या वेळेची नोंद घेऊन आपला प्रवास सुकर करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच अधिक माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ ॲपचा वापर करावा, असेही कळवण्यात आले आहे.

दिल्लीतील जनजातीय सांस्कृतिक संमेलनासाठी कोकण रेल्वे मार्गावरून विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

मडगाव: दिल्ली येथे दि. २४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जन जातीय सांस्कृतिक संमेलना’साठी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन आणि शकूर बस्ती (दिल्ली) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११०८ मडगाव जंक्शन – शकूर बस्ती स्पेशल ही रेल्वे शुक्रवार, दि. २२ मे २०२६ रोजी पहाटे ०२:३० वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:१५ वाजता शकूर बस्ती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०११०७ शकूर बस्ती – मडगाव जंक्शन स्पेशल ही रेल्वे सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी मध्यरात्री ०१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

​या विशेष ट्रेनला प्रवासादरम्यान करमळी, थिवी, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कामण रोड, वसई रोड, उधना जंक्शन, सुरत, वडोदरा जंक्शन, गोधरा जंक्शन, दाहोद, रतलाम जंक्शन, नागदा जंक्शन, कोटा जंक्शन, मथुरा जंक्शन आणि पलवल या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीची रचना एकूण २२ डब्यांची असून, त्यामध्ये १८ शयनयान (Sleeper), २ जनरल आणि २ एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल. प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी: ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत मोफत बोधगया यात्रेचे आयोजन

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बोधगया (बिहार) येथे मोफत दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून, मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

​ही तीर्थयात्रा ३ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाची सोय, राहण्याची व्यवस्था आणि भोजन असा सर्व खर्च महाराष्ट्र शासनामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही आर्थिक शुल्काशिवाय बोधगया येथील पवित्र स्थळांचे दर्शन घेता येणार आहे.

​या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही अटी निश्चित केल्या आहेत. त्यानुसार, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी ही उत्पन्नाची मर्यादा ठरवण्यात आली असून, अधिकृत कागदपत्रांच्या आधारे याची पडताळणी केली जाणार आहे.

​इच्छुक आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांनी आपले अर्ज २० मे २०२६ पर्यंत मुंबई शहरातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या योजनेबाबत अधिक माहिती किंवा प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.

कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूस आंब्याची भव्य आरास

   Follow us on        

​सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘दक्षिण कोकणची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे यंदा देवगड हापूस आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली. या उपक्रमामुळे मंदिरात भक्ती, श्रद्धा आणि पर्यटन यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, या वर्षी या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने ‘आंबा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते.

​या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यटकांना अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देणे आणि हापूसच्या नावाने होणारी फसवणूक थांबवणे हा आहे. यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे शेतकऱ्यांसाठी १० स्टॉल्स विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते. २०१७ मध्ये शैलेश बोंडाळे यांनी मांडलेल्या या संकल्पनेला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया गतिमान; जमिनी व्यतिरिक्त घर, विहीर, फळझाडांचे स्वतंत्र मूल्यमापन

   Follow us on        

पुणे:छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर या महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर तालुका आणि पुणे जिल्ह्यात रोजगाराच्या व उद्योगाच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने ९ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार सात गावांमधील (वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी) एकूण १२१६.७५ हेक्टर क्षेत्राच्या संपादनास मान्यता दिली आहे.

​जमीन व फळझाडांचा मोबदला:

उच्चाधिकार समितीने जमिनीच्या मोबदल्याचे दर निश्चित केले असून, प्रती हेक्टरी एकूण देय रक्कम १,६१,०१,९२५ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. जमिनीव्यतिरिक्त, त्यावर असलेल्या घर, विहीर, फळझाडे आणि इतर मालमत्तांचे स्वतंत्र मूल्यमापन करण्यात आले असून, या निगडीत घटकांसाठी बाजारमूल्याच्या दुप्पट रक्कम (१००% दिलासा रकमेसह) संबंधित खातेदारांना दिली जाणार आहे. कृषी विभागाने केलेल्या मूल्यमापनानुसार आंब्यासाठी ५० ते ६० हजार रुपये, तर नारळासाठी ४ ते ६ हजार रुपये प्रति झाड याप्रमाणे दर निश्चित केले आहेत. याशिवाय विहिरींसाठी ३ ते १७ लाख रुपये आणि बोअरवेलसाठी ४० ते ६० हजार रुपयांपर्यंत मोबदला मिळू शकणार आहे.

​पुनर्वसन आणि संमती निवाडा:

MIDC च्या २०१९ च्या धोरणानुसार, जे शेतकरी संमती करारनामा करतील, त्यांना जमिनीच्या मोबदल्याव्यतिरिक्त १०% विकसित भूखंड परतावा घेण्याचा पर्याय असेल. संमती देणाऱ्या भूमिहीन खातेदारांना ७५० दिवसांची मजुरी, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५०० दिवसांची मजुरी दिली जाईल. तसेच घर स्थलांतरासाठी ४०,००० रुपये आणि गोठ्यासाठी २०,००० रुपये देण्यात येतील. हा सर्व मोबदला आयकर मुक्त असेल आणि आर.टी.जी.एस. (RTGS) द्वारे थेट बँक खात्यात जमा केला जाईल.

​कागदपत्रे आणि मुदत:

संबंधित खातेदारांनी आपली संमतीपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे आवश्यक कागदपत्रांसह (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, ७/१२ उतारा, बँक तपशील) ६ मे २०२६ ते १० जून २०२६ या कालावधीत पुरंदर उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करणे आवश्यक आहे. मुदतीत संमती न दिल्यास सक्तीने भूसंपादन केले जाईल, ज्यामुळे भूखंड परतावा व इतर अतिरिक्त लाभांना मुकावे लागू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, ३ मे २०२६ पर्यंत एकूण २४४ खातेदारांनी १७४.६४ हेक्टर (सुमारे ४३६ एकर) क्षेत्रासाठी आपली संमती दर्शवली आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात; रिक्षाचालकांचा दुर्दैवी मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

   Follow us on        

संगमेश्वर: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, सोमवारी सायंकाळी नाणीज येथील जुन्या मठाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रकाश शांताराम कांबळे (वय ४५, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास दाभोळे परिसरातून रत्नागिरीच्या दिशेने रिक्ष (एमएच-०८ एक्यू ८८६६) जात होती. याच वेळी समोरून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने चालकाने अचानक ब्रेक लावले. मागून भरधाव वेगाने येणारी रिक्षा या ट्रॅक्टरवर थेट जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षेचा चक्काचूर झाला आणि चालक प्रकाश कांबळे यांचा जागीच प्राण गेला.

​या भीषण अपघातात रिक्षेतील दोन महिला प्रवासी देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवेमार्फत तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महामार्गाच्या कामामुळे आणि वाहनांच्या वेगामुळे झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mumbai Rail Connectivity: महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशाला झुकते माप; गाड्यांच्या संख्येत विरोधाभास

   Follow us on        

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातून विविध राज्यांत जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आकडेवारीवरून एक रंजक आणि तितकाच विरोधाभासी निष्कर्ष समोर आला आहे. रेल्वे अभ्यासक एन.एस. आदित्य यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या मुख्य स्थानकांवरून (पनवेल वगळून) इतर राज्यांशी थेट जोडणाऱ्या एकूण २१३ जोडी गाड्या धावतात. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, ज्या राज्यात मुंबई वसलेली आहे त्या महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशासाठी सर्वाधिक रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. उत्तर प्रदेशासाठी ३२ जोडी गाड्या धावत असून, त्याखालोखाल महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी ३१ जोडी गाड्यांची सोय आहे. ही तफावत मुंबईच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमधील एक मोठा विरोधाभास अधोरेखित करते.

उत्तर प्रदेशपाठोपाठ गुजरातसाठी २८, राजस्थानसाठी १९ आणि बिहारसाठी १५ जोडी गाड्यांची सेवा उपलब्ध आहे. याउलट, दक्षिण भारताशी मुंबईची थेट जोडणी उत्तर भारताच्या तुलनेत बरीच कमी असल्याचे दिसते. तामिळनाडूसाठी १०, कर्नाटकासाठी ७ तर केरळसाठी अवघ्या ५ जोडी गाड्या धावत आहेत. दिल्ली आणि पश्चिम बंगालसाठी प्रत्येकी ९, गोव्यासाठी ८ आणि उत्तराखंडसाठी ५ जोडी गाड्यांची कनेक्टिव्हिटी आहे. इतर राज्यांचा विचार करता तेलंगणा, पंजाब, ओडिशा आणि झारखंडसाठी प्रत्येकी ४, आंध्र प्रदेश आणि आसामसाठी ३, तर हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसाठी प्रत्येकी २ जोडी गाड्या उपलब्ध आहेत. त्रिपुरा आणि चंदीगढ या भागांसाठी केवळ १ जोडी थेट गाडी धावते.

​मुंबईच्या रेल्वे जाळ्यावर प्रकाश टाकणाऱ्या या विशेष मालिकेतील हा तिसरा भाग असून, यातून रेल्वे प्रशासनाचे प्राधान्यक्रम स्पष्टपणे दिसून येत आहेत. मुंबईतून होणाऱ्या स्थलांतराचा ओघ आणि प्रवाशांची मागणी पाहता उत्तर भारतीय राज्यांसाठी सर्वाधिक गाड्या सोडल्या जातात, मात्र महाराष्ट्रांतर्गत कनेक्टिव्हिटी उत्तर प्रदेशच्या तुलनेत मागे पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे..

मुंबईच्या मुख्य स्थानकांवरून (पनवेल वगळून) विविध राज्यांशी थेट रेल्वे जोड्या (Train Pairs):

उत्तर प्रदेश → ३२

महाराष्ट्र → ३१

गुजरात → २८

राजस्थान → १९

बिहार → १५

तामिळनाडू → १०

दिल्ली → ९

पश्चिम बंगाल → ९

गोवा → ८

कर्नाटक → ७

मध्य प्रदेश → ५

केरळ → ५

उत्तराखंड → ५

तेलंगणा → ४

पंजाब → ४

ओडिशा → ४

झारखंड → ४

आंध्र प्रदेश → ३

आसाम → ३

हरियाणा → २

जम्मू आणि काश्मीर → २

पुदुच्चेरी → २

त्रिपुरा → १

चंदीगढ → १

एकूण: २१३ जोड्या

 

 

 

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या; नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​अनेक वर्षांपूर्वी जमिनी देऊनही अद्याप अनेक प्रकल्पग्रस्त रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत, ही बाब नितेश राणे यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वे प्रशासनाने तातडीने अशा नागरिकांची एक स्वतंत्र यादी तयार करावी आणि त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या. केवळ थेट नोकरीच नव्हे, तर रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सचे वाटप आणि अनुकंपा तत्त्वावरील भरतीमध्येही प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना प्राधान्याने संधी मिळावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

​या महत्त्वपूर्ण बैठकीला कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली असून, यामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वैभववाडी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि रस्ते काँक्रिटीकरण कधी होणार?


   Follow us on        

वैभववाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात रेल्वे स्टेशन सुशोभीकरण आणि मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक ओंकार लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कार्यालय आणि कोकण रेल्वे प्रशासनाला टॅग करत सोशल मीडियावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत वैभववाडी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था स्पष्ट दिसत आहे. खड्डे, गाळ, खडी आणि पाण्याचे डबके यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

“आम्ही आयुष्यभर हाच त्रास सहन करायचा का? अशा रस्त्यावरून प्रवास म्हणजे तालुक्यातील लोकांचा अपमान आहे,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

सद्यस्थितीत कोकणातील आंबा महोत्सव आणि शेतकऱ्यांच्या विकासावर चर्चा सुरू असताना, स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधांबाबतची ही तक्रार वैभववाडीतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उभे करते. नागरिक आता प्रशासनाकडून लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा करत आहेत.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search