Author Archives: Kokanai Digital

१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 26:26:25 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 23:46:54 पर्यंत
  • करण-बालव – 14:57:55 पर्यंत, कौलव – 26:26:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 17:06:01 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:11:46
  • सूर्यास्त- 18:12:09
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 08:26:00
  • चंद्रास्त- 19:37:00
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • नववर्ष दिन
  • जागतिक शांतता दिन
  • जागतिक कौटुंबिक दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.
  • १७८५: डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.
  • १८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
  • १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
  • १८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
  • १८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
  • १८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
  • १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
  • १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
  • १८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
  • १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
  • १९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
  • १९१२: याच दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.
  • १९१५: ला महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.
  • १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
  • १९२०: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
  • १९२३: ला चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.
  • १९३२: डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
  • १९६४: मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.
  • १९७२: वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.
  • १९७३: मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.
  • १९९५: WTO ची स्थापना झाली.
  • २०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
  • २००१: कलकत्ता ला अधिकृत रित्या कोलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
  • २००४: चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती /वाढदिवस:
  • १६६२: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
  • १८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७०)
  • १८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
  • १८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
  • १९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
  • १९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
  • १९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
  • १९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
  • १९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)
  • १९३५: ला भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.
  • १९३६: राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७)
  • १९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार
  • १९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
  • १९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
  • १९५१: नाना पाटेकर – अभिनेता
  • १९५३: ला भारताचे माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांचा जन्म.
  • १९६१: ला मणिपूर चे माजी मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचा जन्म.
  • १९७१: संसद चे माजी सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म.
  • १९७५: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.
  • १९७९: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री विद्या बालन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५१५: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १४६२)
  • १७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७)
  • १८९४: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
  • १९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९)
  • १९५५: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
  • १९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. (जन्म: ८ आक्टोबर १८९१)
  • १९८३: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन.
  • १९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
  • २००८: ला भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन.
  • २००९: रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

३१ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 27:24:15 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 24:04:19 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 15:44:43 पर्यंत, भाव – 27:24:15 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 18:58:44 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:14
  • सूर्यास्त- 18:10
  • चन्द्र-राशि-धनु – 30:01:57 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:33:59
  • चंद्रास्त- 18:34:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
  • १७८१: अमेरिकेमध्ये अमेरिकेची पहिली बँक ऑफ उत्तर अमेरिका उघडली.
  • १८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
  • १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • १९२९: महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज साठी आंदोलनाला सुरुवात केली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
  • १९९७: मोहम्मद रफ़ीक तरार पाकिस्तान चे नववे राष्ट्रपती बनले.
  • १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
  • १९८४: राजीव गांधी हे भारताचे सातवे प्रधान मंत्री बनले.
  • १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • १९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
  • २००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.
  • २००८: ईश्वरदास रोहिणी यांना दुसऱ्यांना मध्य प्रदेश च्या विधानसभेचे अध्यक्ष बनविण्याची घोषणा करण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७१: गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४)
  • १९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)
  • १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)
  • १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.
  • १९३७: अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेता
  • १९४७: सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश स्वातंत्र कुमार यांचा जन्म.
  • १९४८: डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२)
  • १९५१: लोकसभेचे सदस्य अरविंद सावंत यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.
  • १८९८: बिहार चे माजी मुख्यमंत्री कृष्णा बल्लभ सहाय यांचा जन्म.
  • ????: शाहीर पिराजीराव सरनाईक (जन्म: ? ? ????)
  • १९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)
  • १९५६: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री यांचे निधन
  • १९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
  • १९८६: राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: ? ? १९१७)
  • १९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)
  • १९९७: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (जन्म: १० मार्च १९१८)
  • २००१: भारतीय लेखक टी. एम. चिदंबरा रघुनाथन यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

३० डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 27:58:36 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 23:58:04 पर्यंत
  • करण-चतुष्पाद – 16:05:10 पर्यंत, नागा – 27:58:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वृद्वि – 20:31:30 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:13
  • सूर्यास्त- 18:09
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 17:34:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • ०: रोमन सम्राट टायटस यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
  • १८०३: ला ब्रिटन च्या इस्ट इंडिया कंपनी ने दिल्ली,आग्रा आणि भरूच वर आपले नियंत्रण सुरु केले.
  • १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
  • १९२४: एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
  • १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
  • १९७९: ला पश्चिम आफ्रिकेतील एका देशाने संविधानाला स्विकार केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ३९: टायटस – रोमन सम्राट (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
  • १८६५: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)
  • १८७९: वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)
  • १८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)
  • १९०२: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३)
  • १९२३: भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७७)
  • १९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)
  • १९३५: प्रथम भारतीय चेस मास्टर मॅन्युअल आरोन यांचा जन्म.
  • १९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.
  • १९५०: भारतीय समज सेवक डॉ. हनुमाप्पा सुदर्शन यांचा जन्म.
  • १९८३: इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म.
  • १९८९: भारतीय क्रिकेटपटू सौरभ तिवारी चा जन्म.
  • १९९२: भारताच्या युवा बॅडमिंटन खेळाडू सौरभ वर्मा यांचा जन्म.
  • १९९४: भारताच्या आर्चर आणि अर्जुन पुरस्कार विजेता रजत चौहान चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६९१: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २५ जानेवारी १६२७)
  • १९४४: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म: २९ जानेवारी १८६६)
  • १९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
  • १९७४: आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
  • १९८२: दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट) (जन्म: २ डिसेंबर १९१३ – कोल्हापूर)
  • १९८७: दत्ता नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ – संगीतकार (जन्म: ? ? ????)
  • १९९०: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १९२९)
  • २००६: इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म: २८ एप्रिल १९३७)
  • २०१५: भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९२९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

३१ डिसेंबरला ‘पेग लिमिट’ चा नियम; जास्तीत जास्त किती पेग घेता येणार?

   Follow us on        
मुंबई: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत, मात्र आतापासूनच अनेकांनी नववर्षाच्या स्वागताचं नियोजन करण्यास सुरुवात केले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी  मात्र मस्त हॉटेलमध्ये जाऊन दारूचे ग्लास रिचवत नवं वर्षाचं सेलिब्रेशन करण्याच्या बेतात असलेल्या एक महत्वाची बातमी  आहे. नव्या नियमांनुसार नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे हॉटेल किंवा बारमध्ये 31 डिसेंबरला जाणार आहेत, अशा मद्यपींना केवळ चार पेग एवढीच दारू मिळणार आहे.
चार पेगपेक्षा अधिक दारू यावेळी कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही. याबाबत हॉटेल असोसिएशनकडून माहिती देण्यात आली आहे. नव्या वर्षाचं सेलीब्रेशन करण्यासाठी अनेक जण हॉटेलमध्ये येतात. ते प्रमाणाबाहेर दारू पितात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो. प्रमाणाबाहेर दारू पिल्यास अपघाताचा धोका असतो. जेव्हा लोक दारू पिऊन आपल्या गाडीनं घरी जातात तेव्हा अनेक अपघात होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर्षी नव वर्षाच्या स्वागताला हा नियम बनवण्यात आल्याचं हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.
चालकाची व्यवस्था करणार
सरकारकडून नव वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व हॉटेल आणि बारसाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. कोणत्याही ग्राहकाला दारू देण्यापूर्वी त्याच्या वयाबाबत खात्री करून घ्यावी. त्याच्या वयाचा पुरावा त्याच्याकडे मागावा. अल्पवयीन असेल तर दारू देऊ नये. तसेच दारू पिल्यामुळे जर त्याला घरी जाण्यास समस्या असेल तर अशा व्यक्तींसाठी चालकाची सोय करावी. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल आणि बार सुरू राहणार आहेत, तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना दारूच्या लिमीटचं बंधन देखील घालण्यात आलं आहे.

रत्नागिरीकरांसाठी २१ दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन

   Follow us on        
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार योग शिबिर 
नवीन वर्ष सुरू होतंय..प्रत्येकजण मनाशी एक नवीन निश्चय करत असतो. तर मग विचार कसला करताय रत्नागिरीकरांनो ..कारण नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी करण्याची एक नामी संधी उपलब्ध होणार आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात खास रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे शिबिर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात संपन्न होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण २१ दिवसांचा असून हे शिबिर १ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२५ दरम्यान दररोज सायं ०५ वाजता होणार आहे.मोफत शिबिर असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरी करांना प्राप्त होणार आहे. तरी इच्छुक नागरिकांनी  दिलेल्या लिंक वर https://forms.gle/asQ7baBQMbUtju9t9
 क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करावी तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; ७ प्रवासी जखमी

   Follow us on        

Mumbai Goa Highway Accident: गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेतएर्टिगा आणि बॅगनर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा (34) मूळ राहणार फरिदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता, तर वॅगनरचालक ओंकार शंकर घाडगे (23), राहणार पाटण (आंबळे) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वॅगनरला समोरासमोर जोरदार धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून या एर्टिगाचालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा (58) अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा (24) राहणार अंधेरी) यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागलावॅगनरमधील ओंकार घाडगे (23), अभिजित अशोक खरात (24) राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने (20) राहणार सोलापूर यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले

Revas-Reddi Coastal Highway: रेवस रेडी सागरी महामार्ग तीन वर्षात पूर्ण होणार – खासदार सुनील तटकरे

   Follow us on        
अलिबाग: कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार्‍या रेवस रेडी सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामात  गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या महामार्गामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होवू शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रिनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुसर्‍या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील 12 बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत.
या 12 विकसीत होणार्‍या बंदरांमध्ये पालघरचे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसीत होईल. हे बंदर जेएनपीटीच्या बरोबरीचे विकसीत होणारे बंदर ठरेल. यामुळे जलवाहतूकीला मोठा वाव मिळणार आहे. याशिवाय पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील 48 छोटी बंदरे विकसीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदरांजवळील 12 शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारचे औद्योगिक प्रकल्प, महामार्ग प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र यांच्याशी सागरमालातील विविध प्रकल्पांचा समन्वय साधला जाणार असल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल.

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते श्री क्षेत्र टेरव देवस्थान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

   Follow us on        
चिपळूण: श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, कोकणचे लाडके सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते नुकताच दिमाखात संपन्न झाला. गेली १५ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण  दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही  दिनदर्शिकेला  वाढती  मागणी आहे.  टेरव गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्तव्यास असलेल्या  टेरव वासियांना सदर दिनदर्शिकेचे  वितरण करण्यात येणार आहे.
देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

२९ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 28:03:47 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 23:22:41 पर्यंत
  • करण-विष्टि – 15:53:51 पर्यंत, शकुन – 28:03:47 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 21:40:25 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:08
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 23:22:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 30:37:00
  • चंद्रास्त- 16:38:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८४५: टेक्सास हे अमेरिकेचे २८ वे राज्य बनले.
  • १९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.
  • १९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
  • १९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
  • १९७२: कोलकता मध्ये मेट्रो रेल्वे च्या कामाला आजच्या दिवशी सुरुवात.
  • १९८३: भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध २३६ रन बनविले, तेव्हा हा स्कोर कसोटी सामन्यामधील सर्वात जास्त होता.
  • २००६: चीन ने राष्ट्रीय सुरक्षेसाठी श्वेत पत्र जारी केले.
  • २०१२: पाकिस्तान मध्ये पेशावर जवळ आतंकवादी हल्यात २१ सुरक्षाकर्मी मरण पावले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८००: चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (मृत्यू: १ जुलै १८६०)
  • १८०८: अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ३१ जुलै १८७५)
  • १८०९: ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म.
  • १८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.
  • १९००: मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)
  • १९०४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)
  • १९१७: रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)
  • १९२१: फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१४)
  • १९४२: राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य (मृत्यू: १८ जुलै २०१२)
  • १९७४: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.
  • १९६०: ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९६७: पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: २४ जून १८९७)
  • १९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.
  • १९८०: भारतीय चित्रपट निर्माते नंदुभाई वकील यांचे निधन.
  • १९८६: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)
  • २००८: प्रसिद्ध चित्रकार मंजीत बावा यांचे निधन.
  • २०१२: टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म: ६ आक्टोबर १९४६)
  • २०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
  • २०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९२२)
  • २०१५: पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सावंतवाडीकरांना रेल्वेकडून नववर्षाची भेट; नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी येथे थांबा मंजूर

   Follow us on        
Konkan Railway:सावंतवाडी पंचक्रोशी प्रवाशांना रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे प्रशासनाने नागपूर  ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणाऱ्या नागपूर -मडगाव-नागपूर या द्विसाप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देताना सावंतवाडी स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.
गाडी क्रमांक ०११३९/०११४० नागपूर-मडगाव-नागपूर विशेष गाडीची मुदत या महिन्याच्या अखेरीस समाप्त होणार होती. मात्र तिला आता पुढील सूचना येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर- मडगाव या गाडीला दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून तर गाडी क्रमांक ०११४० मडगाव नागपूर या गाडीला दिनांक ०२ जानेवारी २०२५ पासून मुदतवाढ देण्यात आली आहे.
सावंतवाडी येथे थांबा मंजूर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश. 
सुरवातीला या गाडीला सावंतवाडी सावंतवाडी येथे थांबा देण्यात आला होता. मात्र चांगल्या प्रमाणात प्रवासी संख्या असतानाही या गाडीचा सावंतवाडी येथील थांबा रद्द करण्यात आला होता. त्यावेळेपासून हा थांबा पूर्ववत करण्यात यावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने अनेकदा निवेदने दिली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. संघटने तर्फे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, मिहिर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी रेल्वे प्रशासनाचे,  कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट, आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत
या गाडीचे सावंतवाडी स्थानकावरील वेळापत्रक
नागपूर येथून मडगावला जाताना ही गाडी (गाडी क्र. ०११३९) दुपारी १२.५६ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल, तर मडगाव वरून नागपूर येथे जाताना (गाडी क्र. ०११४०) रात्री २१.४८ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search