चिपळूण: श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, कोकणचे लाडके सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते नुकताच दिमाखात संपन्न झाला. गेली १५ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनदर्शिकेला वाढती मागणी आहे. टेरव गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्तव्यास असलेल्या टेरव वासियांना सदर दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Revas Reddy Coastal Highway: कुणकेश्वर व काळबादेवी पुलांसाठी 'विजय एम मिस्त्री' ही सर्वात कमी बोली ल...
रत्नागिरी
Ratnagiri ST Bus Accident: "काळ आला होता पण...'' प्रवाशांनी भरलेली एसटी बस धरणात पडता पडता वाचली
अपघात
सावधान: रत्नागिरी जिल्हय़ात बनावट नोटा चलनात; फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्याल?
कोकण