अलिबाग: कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार्या रेवस रेडी सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामात गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या महामार्गामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होवू शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रिनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुसर्या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील 12 बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत.
या 12 विकसीत होणार्या बंदरांमध्ये पालघरचे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसीत होईल. हे बंदर जेएनपीटीच्या बरोबरीचे विकसीत होणारे बंदर ठरेल. यामुळे जलवाहतूकीला मोठा वाव मिळणार आहे. याशिवाय पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील 48 छोटी बंदरे विकसीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदरांजवळील 12 शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारचे औद्योगिक प्रकल्प, महामार्ग प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र यांच्याशी सागरमालातील विविध प्रकल्पांचा समन्वय साधला जाणार असल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल.
Facebook Comments Box
Related posts:
खुशखबर! जनरल तिकिटासोबत स्लीपर डब्यांतून प्रवास करा; चाकरमान्यांसाठी उद्यासाठी रेल्वेची अजून एक विशे...
कोकण रेल्वे
Konkan Railway: प्रवाशांसाठी धोकादायक बनलेली ही गाडी आता एलएचबी स्वरूपात धावणार; स्लीपर डब्यांमध्येह...
कोकण
Konkan Railway: कोकण रेल्वेचा प्रवास भारतीय रेल्वेच्या ईतर विभागांपेक्षा महाग; कारण काय?
कोकण
Vision Abroad