Author Archives: Kokanai Digital



- तिथि- एकादशी – पूर्ण रात्र पर्यंत
- नक्षत्र- माघ – 12:24:42 पर्यंत
- करण- भाव – 18:37:32 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग- ब्रह्म – पूर्ण रात्र पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:36:58
- सूर्यास्त- 18:07:27
- चन्द्र राशि- सिंह
- चंद्रोदय- 27:07:59
- चंद्रास्त- 15:13:59
- World Day for Audiovisual Heritage (International)
- ३१२ ई.पूर्व: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.
- १९०४: न्यूयॉर्क शहरात मेट्रो रेल्वेची सुरुवात झाली होती.
- १९४७: जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले.
- १९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
- १९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
- १९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
- १९८२: चीन देशाने आपल्या देशातील जनसंख्या एक अरब पेक्षा जास्त असल्याची घोषणा केली.
- १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
- १९९१: तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.
- १८११: शिवन कामाच्या मशीनचे पेटेंट घेणारे महान अमेरिकन शोधक, अभिनेता आणि व्यावसायिक आयझॅक मेरिट सिंगर यांचा जन्मदिन.
- १८५८: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)
- १८७३: महाराष्ट्रीयन मराठी कवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्मदिन.
- १८७४: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)
- १९०४: जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)
- १९२०: के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)
- १९२३: अरविंद मफतलाल – उद्योगपती (मृत्यू: ३० आक्टोबर २०११)
- १९४७: महान महराष्ट्रीयन समाजसेवक तसचं, महाराष्ट्रातील थोर कुष्ठरोगी समाजसेवक बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन.
- १९४७: डॉ. विकास आमटे – समाजसेवक
- १९५४: अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका
- १९६४: मार्क टेलर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
- १९६६: अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय माजी बुद्धीबळपटू दिबेंदू बारू यांचा जन्मदिन.
- १९७६: भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.
- १९७७: कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
- १९८४: इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू
- १६०५: अकबर – तिसरा मुघल सम्राट (जन्म: १४ आक्टोबर १५४२)
- १७९५: सवाई माधवराव पेशवा (जन्म: १८ एप्रिल १७७४)
- १९०७: भारतीय स्वतंत्रता सेनानी, ब्रह्मज्ञानी, व पत्रकार तसचं, स्वामी विवेकानंद यांचे वर्गमित्र आणि रवींद्रनाथ टागोर यांचे सहकारी ब्रह्मबांधव उपाध्याय यांचे निधन.
- १९३७: ’संगीतरत्न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)
- १९६४: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १८९१)
- १९७४: चक्रवर्ती रामानुजम – गणिती (जन्म: ९ जानेवारी १९३८)
- १९८७: विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (जन्म: १२ आक्टोबर १९११)
- १९९९: हिंदी भाषेचे प्रमुख आलोचक व साहित्यकार डॉ. नगेंद्र यांचे निधन.
- २००१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ’फास्टर फेणे’ आणि ’बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक (जन्म: ३१ मे १९१०)
- २००१: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (जन्म: ४ जानेवारी १९२५)
- २००७: सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९३१ – पतियाळा, पंजाब)
- २०१५: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)
अलिबाग : गोल्ड फ्लेक कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट बनवून वेगवेगळ्या राज्यात वितरण करणाऱ्या कंपनीवर रायगड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंपनी चालवणाऱ्या १५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून जिल्हय़ात शोध पथके कार्यन्वित करण्यात आली होती. या शोध पथकांना कर्जत येथील सागंवी गावात एका निर्जन ठिकाणी असलेल्या आलिशान फार्महाऊस परिसरात सुरु असलेल्या संशयास्पद हालचालीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागली. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या परवानगीने या फार्म हाऊसवर धाड टाकली. तेव्हा या बनावट सिगरेट कंपनीचा उलगडा झाला. मध्ये ही कंपनी बेकायदेशीरपणे थाटण्यात आली होती. पंधरा कर्मचारी तिथे काम करत होते. सिगरेट बनवण्यासाठी लागणारे साहीत्य आणि तीन मशिन्स या ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. गोल्ड फ्लेक कंपनीच्या नावाने दररोज १५ लाख रुपयांची सिगरेट्स या ठिकाणी बनवल्या जात होत्या. बॉक्स पॅकींगसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आढळून आले होते. कंपनीत काम करणाऱ्या १५ कामगारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हे कामगार आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील आहेत. कंपनीचा सुरु करणार मुळ सुत्रधार दक्षिण भारतातील असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरु आहे. ज्या फार्म हाऊस मध्ये ही कंपनी सुरु होती. त्या मुंबईतील फार्म हाऊस मालकाची शोध पोलीसांनी सुरू केला आहे.
- तिथि-दशमी – 29:26:43 पर्यंत
- नक्षत्र-आश्लेषा – 09:46:38 पर्यंत
- करण-वणिज – 16:22:21 पर्यंत, विष्टि – 29:26:43 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-शुक्ल – 29:56:16 पर्यंत
- वार-शनिवार
- सूर्योदय-06:36:21
- सूर्यास्त-18:07:36
- १७७४: फिलाडेल्फिया येथे अमेरिकेतील पहिली महाद्विपीय कॉंग्रेस स्थगित झाली होती.
- १८५८: एच. इ. स्मिथ यांनी वाशिंग मशीन चा पेटेंट घेतलं.
- १८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
- १९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
- १९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
- १९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
- १९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
- १९६२: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
- १९७६: त्रिनिदाद व टोबॅगो देशांना लंडन कडून स्वातंत्र्य मिळालं.
- १९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
- १९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर
- २००६: महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.
- १२७०: संत नामदेव (मृत्यू: ३ जुलै १३५०)
- १८८१: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक, कायदेपंडित व राजकीय नेते बीरेंद्रनाथ ससमल यांचा जन्मदिन.
- १८८६: ओडिसा राज्यातील उल्लेखनीय समाजवादी व कवी पंडित गोदाबरीश मिश्रा यांचा जन्मदिन.
- १८८८: प्रसिद्ध बंगाली लेखक व साहित्यक समीक्षक मोहितलाल मजुमदार यांचा जन्मदिन.
- १८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)
- १८९१: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ आक्टोबर १९६४)
- १९००: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३)
- १९१६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)
- १९१९: मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८०)
- १९२४: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्ता व गांधीवादी शोभना रानडे यांचा जन्मदिन.
- १९३७: हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक
- १९४७: हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री
- १९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
- १९७४: रवीना टंडन – अभिनेत्री
- १९०९: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१)
- १९३०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६०)
- १९४७: ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय यांचे निधन.
- १९५५: हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांचे निधन.
- १९७९: चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली. (जन्म: ? ? ????)
- १९८१: भारतीय पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कन्नड भाषिक कवी दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे निधन.
- १९९१: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)
- २०००: भारतीय स्वतंत्रता संग्रामातील प्रमुख क्रांतिकारक व सिद्धहस्त लेखक तसचं, हिंदी, इंग्रजी व बांग्ला बाषिक आत्मकथाकारसाहित्यिक मन्मथनाथ गुप्ता यांचे निधन.




सिंधुदुर्ग : चिपी-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ तारखेपासून बंद होणार आहे.
ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र, आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.
दरम्यान, चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- तिथि-नवमी – 27:25:52 पर्यंत
- नक्षत्र-पुष्य – 07:40:55 पर्यंत
- करण-तैतुल – 14:38:31 पर्यंत, गर – 27:25:52 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-शुभ – 29:25:32 पर्यंत
- वार-शुक्रवार
- सूर्योदय-06:28:32
- सूर्यास्त-17:41:23
- तिथि-अष्टमी – 26:01:26 पर्यंत
- नक्षत्र-पुष्य – पूर्ण रात्र पर्यंत
- करण-बालव – 13:35:33 पर्यंत, कौलव – 26:01:26 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-साघ्य – 29:21:37 पर्यंत
- वार-गुरूवार
- सूर्योदय-06:27:51
- सूर्यास्त-17:42:15




Shivsena UBT list:विधानसभा निवडणुकी साठी शिवसेना उबाठा पक्षाने आपली यादी जाहीर केली असून या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.
कुडाळ तालुक्यातून विद्यमान आमदार वैभव नाईक तर सावंतवाडी तालुक्यातून नुकतेच पक्षात आलेल्या राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दापोलीतून संजय कदम, रत्नागिरीतून सुरेंद्रनाथ (बाळ) माने आणि राजापूर मतदारसंघात राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
चाळीसगाव- उन्मेश पाटील
पाचोरा -वैशाली सुर्यवंशी
मेहकर (अजा) -सिध्दार्थ खरात
बाळापूर- नितीन देशमुख
अकोला पूर्व -गोपाल दातकर
वाशिम (अजा)- डॉ. सिध्दार्थ देवळे
बडनेरा -सुनील खराटे
रामटेक -विशाल बरबटे
वणी- संजय देरकर
लोहा-एकनाथ पवार
कळमनुरी- डॉ. संतोष टारफे
परभणी- डॉ. राहुल पाटील
गंगाखेड -विशाल कदम
सिल्लोड- सुरेश बनकर
कन्नड- उदयसिंह राजपुत
संभाजीनगर मध्य -किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा)- राजु शिंदे
वैजापूर- दिनेश परदेशी
नांदगांव -गणेश धात्रक
मालेगांव बाह्य- अद्वय हिरे
नाशिक मध्य -वसंत गीते
नाशिक पश्चिम -सुधाकर बडगुजर
पालघर (अज)- जयेंद्र दुबळा
बोईसर (अज) -डॉ. विश्वास वळवी
निफाड -अनिल कदम
भिवंडी ग्रामीण (अज)- महादेव घाटळ
अंबरनाथ (अजा)- राजेश वानखेडे
डोंबिवली- दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण-सुभाष भोईर
ओवळा माजिवडा -नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी- केदार दिघे
ठाणे- राजन विचारे
ऐरोली -एम.के. मढवी
मागाठाणे- उदेश पाटेकर
विक्रोळी -सुनील राऊत
भांडुप पश्चिम- रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
दिंडोशी- सुनील प्रभू
गोरेगांव- समीर देसाई
अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके
चेंबूर- प्रकाश फातर्पेकर
कुर्ला (अजा)- प्रविणा मोरजकर
कलीना -संजय पोतनीस
वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई
माहिम- महेश सावंत
वरळी- आदित्य ठाकरे
कर्जत- नितीन सावंत
उरण- मनोहर भोईर
महाड- स्नेहल जगताप
नेवासा- शंकरराव गडाख
गेवराई- बदामराव पंडीत
धाराशिव- कैलास पाटील
परांडा -राहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शी- दिलीप सोपल
सोलापूर- दक्षिण अमर रतिकांत पाटील
सांगोले -दिपक आबा साळुंखे
पाटण- हर्षद कदम
दापोली- संजय कदम
गुहागर -भास्कर जाधव
रत्नागिरी -सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर- राजन साळवी
कुडाळ- वैभव नाईक
सावंतवाडी- राजन तेली
राधानगरी- के. पी. पाटील
शाहूवाडी- सत्यजीत आबा पाटील
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024