Konkan Railway Updates: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन करमळी पर्यंत धावणाऱ्या ०११५१/५२ विशेष गाडीला वीर, वैभववाडी आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात थांबे देण्यात आले आहेत. यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अक्षय महापदी यांनी इमेलद्वारे निवेदन दिले होते. या निवेदनात महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी तालुक्यांतील स्थानकांत थांबा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, (सावंतवाडी) ने या गाडीला मिळालेल्या अपुऱ्या थांब्यांबाबत ‘एक्स’ माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. हिवाळी विशेष गाड्यांना वीर, विलवडे किंवा आडवली, राजापूर आणि सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशा विनंतीचे निवेदन या संघटनेतर्फे कोकणरेल्वेच्या बेलापूर कार्यालयाला पाठविण्यात आले होते. याचबरोबर कोकण रेल्वेचे क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांच्याशी संपर्क साधून हे थांबे देण्याची विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
कोकण रेल्वे प्रशासनाने या निवेदनांची दखल घेऊन हे अतिरिक्त थांबे दिल्याबद्दल संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल या गाडीची वीर या स्थानकावर आगमनाची वेळ 0४.१४, वैभववाडी स्थानकावर सकाळी ९.०० तर सावंतवाडी स्थानकावर १०.३६ अशी असणार आहे.
तर परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११५२ करमाळी – मुंबई सीएसएमटी स्पेशल या गाडीची सावंतवाडी या स्थानकावर आगमनाची वेळ १५.४०, वैभववाडी स्थानकावर सकाळी १७.०८ तर वीर स्थानकावर २३.०० अशी असणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad