सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचा वावर…..

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी रमाईनगर परिसरात काल काळ्या Black Panther वाघाचे दर्शन घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल येथील ग्रामस्थ गुरू परब आपल्या शेतात जात असताना त्यांना हा दुर्मिळ जातीचा काळा वाघ दिसला.

गेल्या वर्षी कुडाळ तालुक्यातील गोवारी ह्या गावात काळ्या वाघाचा सव्वा वर्षाचा बछडा एका विहिरीत सापडला होता. सावंतवाडी तालुक्यात या आधी पण ब्लॅक पँथर दिसून आल्याने ह्या जातीच्या वाघाचे अस्तित्त्व परिसरात निश्चित झाले आहे.

कुडाळ येथील गोवारी गावात सापडलेला काळ्या वाघाचा बछडा

Loading

Facebook Comments Box

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली…निलेश राणे यांचे त्याच भाषेत प्रत्युत्तर..

 

मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यास प्रत्युत्तर म्हणुन माजी खासदार नीलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा त्याच भाषेत समाचार घेतला. संजय राऊत जिथे भेटतील तिथे त्यांना फटके देवू अशी धमकी ही त्यांनी दिली आहे.

 

 

 

Loading

Facebook Comments Box

कुणकेरी येथे आजपासून दशावतार नाट्यस्पर्धा

सिंधुदुर्ग : कुणकेरी येथे कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळाच्या वतीने आज दिनांक १५ जानेवारीपासून जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ७ दिवस चालणार असून त्याची सांगता शनिवार दिनांक २१ जानेवारीला होणार आहे.
ह्या स्पर्धेत संध्याकाळी ७ ते १० ह्या वेळेत खालील दशावतार नाटक कंपन्या आपले प्रयोग सादर करतील.
दिनांक  नाटक कंपनी  नाट्यप्रयोग
१५/०१/२०२२ हेळेकर दशावतार नाट्यमंडळ(कारिवडे)  भीमकी हरण
१६/०१/२०२२ अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ.(म्हापण)  कुर्मदासाची वाडी
१७/०१/२०२२ खानोलकर दशावतार नाट्यमंडळ(खानोली)  अखेरचा कौरव
१८/०१/२०२२ माउली दशावतार नाट्यमंडळ(डिंगणे)  कृती विकृती
१९/०१/२०२२ भावई दशावतार नाट्यमंडळ (कुणकेरी)  देवी करनाई महिमा
२०/०१/२०२२ चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ(चेंदवण)  महारथी कर्ण
२१/०१/२०२२ वाव्हळेश्वर दशावतार नाट्यमंडळ(तेंडोली)  वृक्षविरहित फळ

(Also Read > गोठवून टाकणार्‍या थंडीचा परीणाम कोकणरेल्वेवर..पेण नजीक रेल्वे रुळाला तडे..)

कोकणातील सण आणि उत्सवांच्या नियमित अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सएप्प ग्रुप मध्ये सामील व्हा 👇🏻

Loading

Facebook Comments Box

गोठवून टाकणार्‍या थंडीचा परीणाम कोकणरेल्वेवर..पेण नजीक रेल्वे रुळाला तडे..

Konkan Railway News :  राज्यातील वाढणार्‍या थंडीचा परिमाण आता कोकण रेल्वे वर होऊ लागला आहे. कोकण रेल्वेमार्गावर मडगाव पेण नजीक काल सकाळी रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग थंडीमुळे तुटल्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परीणाम झाला होता. रेल्वे कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात टळला.

(Also Read >हातिवली(राजापूर) येथील ग्रामस्थांना दिलासा….१२ किमी अंतरावरील वाहनांना टोलमाफी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेणवरून पनवेलला जाणार्‍या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना सदर प्रकार सकाळी 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान आढळला. याबाबत रेल्वे कर्मचार्‍यानी रेल्वेच्या अधिकार्‍यांना तातडीने सूचित केले.

रेल्वे अधिकार्‍यांनी तातडीने सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटणारी रोहा-दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानकानजीक थांबविले. यानंतर मडगाव-नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी 6.45 ला सुटणारी पेण-दिवा मेमु रेल्वे व मँगलोर-मुंबई रेल्वे या चार गाड्यांना रोखण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. सकाळी 7.30 वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. 10 ते 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या. थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रकार घडत असतात, अशी माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आली.

(Also Read >सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार

Loading

Facebook Comments Box

हातिवली(राजापूर) येथील ग्रामस्थांना दिलासा….१२ किमी अंतरावरील वाहनांना टोलमाफी

Mumbai Goa Highway News:जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हातिवली येथील टोलनाक्यावर टोलवसुली केली जाऊ नये असे निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित एजन्सीला दिले आहेत. तसेच ह्या टोल नाक्यापासूनच्या १२ किलोमीटर अंतरावरील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल असे पण त्यांनी जाहीर केले आहे.
मागे ह्या टोलनाक्यावर टोलवसुली चालू झाली होती. ह्या वसुलीस स्थानिक ग्रामस्थानकडून मोठा विरोध झाला होता,  स्थानिक ग्रामस्थांनी आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मिळून ह्याविरोधातआंदोलन केले होते, त्यामुळे हि टोलवसुली थांबवली होती. आता पुन्हा ही टोलवसुली चालू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप करून जोपर्यंत या  महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत

Loading

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार

सिंधुदुर्ग:केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बीएसएनलचे ११० मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश 
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना नोव्हेंबर महिन्यात पत्र दिले होते. त्या पत्रात त्यांनी जिल्ह्यासाठी १०३ टॉवरची मागणी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता मोबाईल टॉवरची असलेली गरज लक्षात आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी मागणी केलेल्या १०३ टॉवरला मंजुरी मिळालेली आहे.
हे टॉवर खालील गावात उभारले जातील 
कणकवली तालुका 
नाटळ,कासवण तळवडे, शिरवळ,नागवे ओसरगाव, आशिया, सातरल कासरल, कळसुली,शिवडाव, भरणी, आयनल,साकेडी,तरंदळे, शिवडाव, पियाळी, वरवडे, कासार्डे दाबाचीवाडी, शिडवणे, लोरे ,करंजे
वेंगुर्ले तालुका 
पाल,रेडी,परुळे,कर्ली, रेवस,दाभोली,भोगवे, चिपी, वांयगणी, मोचेमांड,सागरतीर्थ, आरवली, सोनसुरे ,आसोली, अनसुर, खानोली, कोचरा, शिरोडा,केरवाडा,वजराट, मठ कानकेवाडी, आडेली,म्हापण, वेतोरे, वेंगुर्ले शहर.
वैभववाडी तालुका 
कुंभवडे, नावळे,गडमट, हेत, वेंगसर
सावंतवाडी तालुका 
तळवणे , कुंभारगाव, निरवडे, असनिये, दानोली, निगुडे, आरोस,आंबोली, न्हावेली,
देवगड तालुका 
कोर्ले, देवगड रामेश्वर, मालेगाव, ओंबळओं तोरसोले, दहिबाव, रेंबावली,
कुडाळ तालुका 
पोखरण, अनाव घोटगे, आवळेगाव, जांभवडे पावशी, बिबवणे.
मालवण तालुका 
देवली,कुमामे, कट्टा, कुणकवळे, नांदुरुख, पेंडुर-मोगरणे, आंबेरी-सडा,श्रावण,गोठणे – सावंतवाडी, पेंडूर, चाफेखोल, असगणी, वराड, हिर्लेवाडी, कातवड, कोळंब, न्हिवे, नांदोस, पळसम -डींगेडीं गेवाडी, हेदुळ, कसाल, देवबाग, तळगाव-पडवे, मठ बुद्रुक,देवली.
दोडामार्ग तालुका 
घोटगे, साटेली भेडशी, पिकुळे, परमे, पंतुरली,वाझरे-गिरोडे,
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पत्र 👇🏻

Loading

Facebook Comments Box

पगार रखडले.. एसटी कर्मचारी आक्रमक

 

MSRTC Employees News :महिन्याची 12 तारीख उलटली तरी पगार झाला नसल्याने एसटी कामगार चिडले आहेत. मागे एसटी कामगारांनी संप केला होता, त्यावेळी हायकोर्टाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे कोर्टात मान्य केले होते. पण महामंडळ आपला शब्द पाळत नसून कोर्टाचा अवमान करत असल्याचे दिसत आहे.

(Also Read >मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर)

काल 12 तारखेपर्यंतही वेतन न झाल्याने हा कोर्टाचा केलेला अवमान आहे. शिंदे-फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. यासंदर्भात एसटी संघटनेनं महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे असे ते पुढे म्हणाले.

 

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वेमार्गावरील एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन या गाडीला अतिरिक्‍त डबे

संग्रहित फोटो
Konkan Railway News | 12/01/2023:  कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एर्नाकुलम – निजामुद्दीन-एर्नाकुलम (२२६५५ / २२६५६) या गाडीला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.  हि गाडी थ्री टायर एसी श्रेणीच्या दोन अतिरिक्त कोच सहित चालविण्यात येणार आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे या गाडीच्या एकूण डब्यांची संख्या एकूण २२ झाली आहे.
खालील तारखेपासून हा बदल करण्यात येणार आहे.
२२६५५  – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक  : १८/०१/२०२३ बुधवारपासून
२२६५६  – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक  : २०/०१/२०२३ शुक्रवारपासून
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील (महाराष्ट्र) थांबे
रत्नागिरी,पनवेल,वसई रोड आणि डहाणू रोड

Loading

Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर

आधीच मुंबई गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत असताना त्यात कंत्राटदार कंपनीच्या चुकीमुळे होणार्‍या अपघातांची भर पडताना दिसत आहे.

Mumbai Goa Highway News :आज मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने डोंगर कापत असताना निसटलेला एक भला मोठा दगड चक्क रस्त्यावर आला. सुदैवाने त्यावेळी कोणतेच वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. ह्या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी ह्या प्रकारामुळे धास्तावले आहेत.

(हेही वाचा >सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार)

मागेच अशा दुर्लक्षामुळे येथे असे दोन प्रकार घडले आहेत. एक असाच मोठा दगड निसटून पायथ्याशी वसलेल्या बौद्धवाडीतील एका घराची भिंत फोडून घुसला. सुदैवाने घरी कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये घर मालकांस नुकसान भरपाई कंत्राटदार कंपनीकडून दिली गेली. त्यानंतर घाटात संरक्षक भिंती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भिंती उभारलेल्या असतानाच गेल्या शनिवारी डोंगर कापत असतानाच निसटलेला दगड एका घराजवळ येवून पडला. यात तेथील साहित्याची मोडतोड होवून नुकसान झाले असले तरी मोठी दुर्घटना मात्र टळली.

(Also Read>सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दुसरी रिक्षाचालक होण्याचा मान वेंगुर्ल्याच्या हेमलता हिला..

ह्या सर्व प्रकारांवरून ह्या कामादरम्यान होणारी सुरक्षेच्या उपयोजनांकडे होणारे दुर्लक्ष समोर आले आहे. कंपनी सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.

 

 

Loading

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दुसरी रिक्षाचालक होण्याचा मान वेंगुर्ल्याच्या हेमलता हिला..

पूर्वी आपल्या देशाच्या पुरुषप्रधान संस्कृतीत काही व्यावसाय असे होते की तो व्यवसाय एक महिला करणार आहे असे म्हंटले तर असे बोलणार्‍याची गणती मूर्खात होत असे. त्यातला एक व्यवसाय म्हणजे रिक्षा चालवणे. आता विचार बदललेत, पुरुषांनी व्यापित या व्यवसायात महिलांनी प्रवेश केला आहे. अशी क्रांती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण पाहावयास मिळाली आहे. 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका गावातील तरुणी उपजीविकेचे साधन म्हणून रिक्षा चालवत आहे . वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील राऊळवाडी येथील कुमारी हेमलता रवींद्र राऊळ असे त्या तरुणीचे नाव आहे. रिक्षा चालवणारी ती जिल्ह्यातील दुसरी महिला ठरली आहे तर वेंगुर्ले तालुक्यातील पहिली महिला ठरली आहे. ह्या आधी कुडाळ तालुक्यातील मनीषा दामले यांनी १९९० ह्या वर्षी जिल्ह्यातील पहिली रिक्षाचालक होण्याचा मान मिळवला होता.

2 वर्षापुर्वी बारावीचे शिक्षण पूर्ण केलेली हेमलता आता आपल्या भागात रिक्षा चालवत आहे. तिला ही रिक्षा ‘अनाम प्रेम’ ह्या संस्थेच्या वतीने एका योजनेतून देण्यात आली आहे. त्यासाठी माऊली महिला मंडळ,शिरोडा या संस्थेकडून वाहतुक परमिट आणि परवाना मिळवण्यासाठी मदत करण्यात आली आहे. खास करून गायकवाड मॅडम कडून आपणास ह्यासाठी खूप मदत मिळाली असे हेमलता आवर्जून सांगते.हेमलताच्या आईवडिलांनी हेमलताला रिक्षा चालण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

(Also Read >विविध शासकीय योजनांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर… नावे पाहण्यासाठी ही बातमी वाचा..)

मला पोलीस किंवा सैन्य दलात जायची इच्छा आहे, त्यादृष्टीने माझे प्रयत्न चालू होते, त्याचबरोबर रिकामे राहण्यापेक्षा काहितरी करावे हा विचार करून मी नोकरीच्या पर्यायांपेक्षा रिक्षा चालवणे हा पर्याय निवडला. माझा आदर्श घेऊन जिल्हय़ातील ईतर मुलींनी पण ह्या व्यवसायात उतरावे अशी माझी इच्छा आहे असे हेमलताचे म्हणणे आहे.

(Also Read>सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search