आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 22:12:30 पर्यंत
- नक्षत्र-कृत्तिका – 15:17:54 पर्यंत
- करण-गर – 11:48:58 पर्यंत, वणिज – 22:12:30 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-धृति – 13:17:03 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 06:02:06
- सूर्यास्त- 19:18:55
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 28:29:00
- चंद्रास्त- 17:18:00
- ऋतु- वर्षा
- जागतिक ऑलिंपिक दिन
- संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस
- आंतरराष्ट्रीय विधवा दिन
- 1757 : प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या 3000 सैन्याने सिराज उददौलाच्या 50000 सैन्याचा पराभव केला.
- 1868 : क्रिस्टोफर लॅथम शोल्स यांना टाइपरायटरच्या शोधासाठी पेटंट देण्यात आले.
- 1894 : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पॅरिसमध्ये स्थापना झाली.
- 1969 : आय.बी.एम. ने जानेवारी 1997 मध्ये सॉफ्टवेअर आणि इतर सेवांच्या किंमती वाढतील अशी घोषणा करण्यात आली, त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरू झाला.
- 1979 : इंग्लंडला 92 धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
- 1985 : एअर इंडियाच्या कनिष्क बोईंग 747 विमानाचा दहशतवादी बॉम्बमुळे स्फोट झाला, 329 ठार.
- 1996 : ‘शेख हसीना वाजेद’ बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या.
- 1998 : दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
- 2016 : युनायटेड किंग्डम ने 52% ते 48% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.
- 1763 : ‘जोसेफिन’ – फ्रान्सची सम्राज्ञी यांचा जन्म.
- 1877 : ‘नॉर्मन प्रिचर्ड’ – भारतीय-इंग्लिश अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1929)
- 1901 : ‘राजेन्द्र नाथ लाहिरी’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1927)
- 1906 : ‘वीर विक्रम शाह त्रिभुवन’ – नेपाळचे राजे यांचा जन्म. (मृत्यू: 13 मार्च 1955)
- 1912 : ‘अॅलन ट्युरिंग’ – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 7 जून 1954)
- 1916 : ‘सर लिओनार्ड हटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 6 सप्टेंबर 1990)
- 1934 : ‘वीरभद्र सिंह’ – भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1935 : ‘राम कोलारकर’ – मराठी लेखक यांचा जन्म.
- 1936 : ‘कॉस्टास सिमिटिस’ – ग्रीक पंतप्रधान यांचा जन्म.
- 1942 : ‘जब्बार पटेल’ – दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1948 : ‘नबरुण भट्टाचार्य’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 31 जुलै 2014)
- 1952 : ‘राज बब्बर’ – भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते यांचा जन्म.
- 1972 : ‘झिनेदिन झिदान’ – फ्रेंच फुटबॉलपटू यांचा जन्म.
- 1980 : ‘रामनरेश सरवण’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- 79 : 79ई.पुर्व : ‘व्हेस्पासियन’ – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 0009)
- 1761 : ‘बाळाजी बाजीराव पेशवे’ – यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1721)
- 1836 : ‘जेम्स मिल’ – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 6 एप्रिल 1773)
- 1891 : ’ विल्यम एडवर्ड वेबर’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1914 : ‘भक्तिविनोद ठाकूर’ – भारतीय गुरु आणि तत्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 2 सप्टेंबर 1838)
- 1939 : ‘गिजुभाई बधेका’ – आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1885)
- 1953 : ‘श्यामप्रसाद मुखर्जी’ – भारतीय जनसंघाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1901)
- 1975 : ‘प्राणनाथ थापर’ – भारतीय भूसेना प्रमुख जनरल यांचे निधन.
- 1980 : ‘व्ही. व्ही. गिरी’ – भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1894)
- 1980 : ‘संजय गांधी’ – इंदिरा गांधी यांचा मुलगा यांचे विमान अपघातात निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1946)
- 1982 : ‘हरिभाऊ देशपांडे’ – नामवंत कलाकार यांचे निधन.
- 1990 : ‘हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय’ – चरित्र अभिनेते यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1898)
- 1994 : ‘वसंतशांताराम देसाई’ – नाटककार, साहित्यिक यांचे निधन.
- 1995 : ‘डॉ. जोनस साॅक’ पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1996 : ‘रे लिंडवॉल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1921)
- 2005 : ‘डॉ. हे. वि. इनामदार’ – साहित्यिक यांचे निधन.
- 2015 : ‘निर्मला जोशी’ – भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक यांचे निधन. (जन्म : 23 जुलै 1934)
- 2020 : ‘निलंबर देव शर्मा’ – पद्मश्री, डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक यांचे निधन.
Malvan: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंतआजपासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे.
मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. ‘मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का?’, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
तसंच, ‘शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्षे टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.’ अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
राजकोट किल्ला बंद करण्यात आल्यामुळे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किल्ल्याच्या बाहेर येऊन पर्यटकांना परत जावे लागत आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे.
आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 25:24:48 पर्यंत
- नक्षत्र-भरणी – 17:39:30 पर्यंत
- करण-कौलव – 14:58:56 पर्यंत, तैतुल – 25:24:48 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सुकर्मा – 16:57:03 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:01:51
- सूर्यास्त- 19:18:44
- चन्द्र-राशि-मेष – 23:04:42 पर्यंत
- चंद्रोदय- 27:32:00
- चंद्रास्त- 16:11:00
- ऋतु- वर्षा
- जागतिक पर्जन्यवन दिन
- 1633 : गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले, सूर्य नव्हे.
- 1757 : प्लासीची लढाई सुरू झाली.
- 1897 : दामोदर हरी चाफेकर यांनी पुणे शहरात प्लेगच्या साथीच्या वेळी झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून चार्ल्स रँड या नागरी अधिकारीची गोळ्या घालून हत्या केली.
- 1908 : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा प्रवेश.
- 1940 : दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीला शरणागती पत्करली.
- 1940 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
- 1976 : कॅनडाने फाशीच्या शिक्षेवर बंदी घातली.
- 1978 : खगोलशास्त्रज्ञ जेम्स क्रिस्टीने ऍरिझोनामधील वेधशाळेतून प्लूटोचा चंद्र शेरॉन शोधला.
- 1984 : व्हर्जिन अटलांटिक एअरवेजचे पहिले उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून उड्डाण केले.
- 1994 : महाराष्ट्र सरकारचे महिला धोरण जाहीर झाले. त्याद्वारे महिलांना सरकारी आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण.
- 2007 : अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.
- 2016 : भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जागतिक विश्वविक्रम रचत आपल्या देशाच्या उपग्रहासह विदेशातील एकूण 20 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रचला.
- 1805 : ‘जोसेफ मॅझिनी’ – इटालियन स्वातंत्र्यवीर यांचा जन्म. (मृत्यू: 10 मार्च 1872)
- 1887 : ‘ज्यूलियन हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 फेब्रुवारी 1975)
- 1896 : ‘बाबुराव पेंढारकर’ – नटश्रेष्ठ यांचा जन्म.
- 1899 : ‘रिचर्ड गिर्ली ड्र्यू’ – मास्किंग टेप चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 डिसेंबर 1980)
- 1908 : ‘डॉ. विष्णू भिकाजी कोलते’ – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू: 9 एप्रिल 1998)
- 1927 : ‘एन्थोनी लो’ – भारतीय-इंग्लिश इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2015)
- 1932 : ‘अमरीश पुरी’ – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार यांचा जन्म. (मृत्यू 12 जानेवारी 2005)
- 1974 : ‘विजय चंद्रशेखर’ – तमिळ चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- 1955 : ‘सदाशिव शिंदे’ – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1923)
- 1993 : ‘विष्णूपंत जोग’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन.
- 1994 : ‘अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1908)
- 2014 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1949)
आजचे पंचांग
- तिथि-दशमी – 07:21:31 पर्यंत, एकादशी – 28:30:21 पर्यंत
- नक्षत्र-अश्विनी – 19:51:16 पर्यंत
- करण-विष्टि – 07:21:31 पर्यंत, भाव – 17:58:09 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-अतिगंड – 20:28:41 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:01:38
- सूर्यास्त- 19:18:31
- चन्द्र-राशि-मेष
- चंद्रोदय- 26:41:59
- चंद्रास्त- 15:05:59
- ऋतु- ग्रीष्म
- उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,
- दक्षिण गोलार्धातील वर्षातला सर्वात छोटा दिवस.
- आंतरराष्ट्रीय योग दिवस
- जागतिक जिराफ दिन
देवगड: देवगड तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा समावेश आहे. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण आचरा येथील रिक्षा व्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते.
हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंग्रे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघातातील मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृत व्यक्तींचे नातेवाईकही मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह आचरा येथील रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचे पंचांग
- तिथि-नवमी – 09:52:15 पर्यंत
- नक्षत्र-रेवती – 21:45:51 पर्यंत
- करण-गर – 09:52:15 पर्यंत, वणिज – 20:39:44 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शोभन – 23:46:15 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 06:01:27
- सूर्यास्त- 19:18:17
- चन्द्र-राशि-मीन – 21:45:51 पर्यंत
- चंद्रोदय- 25:57:59
- चंद्रास्त- 14:03:59
- ऋतु- ग्रीष्म
- जागतिक निर्वासित दिन
- जागतिक उत्पादकता दिवस
- 1837 : इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया विराजमान झाल्या.
- 1840 : सॅम्युअल मोर्स यांना टेलीग्राफचे पेटंट मिळाले.
- 1863 : वेस्ट व्हर्जिनिया हे अमेरिकेचे 35 वे राज्य बनले.
- 1877 : अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडात जगातील पहिली व्यावसायिक टेलिफोन सेवा सुरू केली.
- 1887 : व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव C.S.T.), मुंबई येथील देशातील सर्वात व्यस्त स्थानक उघडले.
- 1899 : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांना केंब्रिज युनिव्हर्सिटी ट्रायपॉसच्या गणित विषयात प्रथम श्रेणीत प्रथम येऊन वरिष्ठ रँग्लर ही पदवी प्रदान करण्यात आली.
- 1921 : भारतातील चेन्नई शहरातील ‘बकिंगहॅम’ आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
- 1921 : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना.
- 1960 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
- 1990 : इराणमध्ये 7.4 मेगावॅट क्षमतेच्या भूकंपात 50,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 150,000 लोक जखमी झाले.
- 1997 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्याजवळ राज्यातील मुलींसाठी पहिली सैनिकी शाळा सुरू केली.
- 2001 : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
- 2014 : प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
- 1869 : ‘लक्ष्मणराव किर्लोस्कर’ – किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1956)
- 1915 : ‘टेरेन्स यंग’ – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 सप्टेंबर 1994)
- 1920 : ‘मनमोहन अधिकारी’ – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते यांचा जन्म. (मृत्यू: 26 एप्रिल 1999)
- 1939 : ‘रमाकांत देसाई’ – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 एप्रिल 1998)
- 1946 : ‘जनाना गुस्माव’ – पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
- 1948 : ‘लुडविग स्कॉटी’ – नौरूचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
- 1952 : ‘विक्रम सेठ’ – भारतीय लेखक आणि कवी यांचा जन्म.
- 1954 : ‘अॅलन लॅम्ब’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1958 : ‘द्रौपदी मुर्मू’ – भारताच्या राष्ट्रपती यांचा जन्म.
- 1972 : ‘पारस म्हांब्रे’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1976 : ‘देविका पळशीकर’ – प्रसिद्ध भारतीय महिला कसोटी व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यांचा जन्मदिन.
- 1668 : ‘हेन्रिच रॉथ’ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1620)
- 1837 : ‘विल्यम (चौथा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1765)
- 1917 : ‘जेम्समेसन क्राफ्ट्स’ – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1997 : ‘भाऊसाहेब पाटणकर’ उर्फ ‘जिंदादिल’ – मराठीतले शायर यांचे निधन.
- 1997 : ‘बासू भट्टाचार्य’ – राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन.
- 2008 : ‘चंद्रकांत गोखले’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1921)
- 2013 : ‘डिकी रुतनागुर’ – भारतीय पत्रकार यांचे निधन. (जन्म: 26 फेब्रुवारी 1931)
- 1987 : ‘डॉ. सलीम अली’ – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1896)
Konkan Railway: पावसाळा सुरू होताच कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध सुरू होतात. यासाठी चाकरमानी गणेशोत्सवास गावी जाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. यामध्ये महत्वाचे नियोजन असते ते गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी बसचे आरक्षण करणे. यासाठी रेल्वे प्रशासन दोन महिने आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करते.
गणेशोत्सवाला चाकरमानी किमान आठ दिवस अगोदर गावी जातात. या वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट रोजी आहे. यावर्षी गणपतीसाठी गावी जाणारे चाकरमानी 19 ऑगस्ट पासून सुरूवात करतील. म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनी दोन महिने अगोदर म्हणजेच 20 जून रोजी आपल्या इच्छीत गाडीचे आरक्षण घेणे आवश्यक आहे.
खरेतर गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासन नियमीत गाड्यांबरोबरच शेकडो विशेष गाडया कोकण रेल्वे मार्गावर सोडते. मात्र, या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या एक-दोन मिनिटातचं संपूर्ण गाडीचे आरक्षण फूल्ल होते. कधीकधी तर तिकीट खिडकीवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रवाशालाही संबधित गाडीचे कर्फम तिकीट मिळत नाही. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनची ही समस्या आहे.दुसरीकडे खासगी तिकीट एजंटकडे याच गाड्यांची तिकीटे सहज उपलब्ध होतात. मात्र, त्यासाठी मूळ तिकीटाच्या दामदुप्पट दर आकारला जातो. तासनतास् रांगेत राहूनही जे तिकीट प्रवाश्याला मिळत नाही ते एजंटला सहज कसे मिळते? यामागचे गौडबंगाल काय? प्रवाशांची खुलेआम लूट करणारा हा गोरख धंदा कुणाचा? रेल्वे प्रशासनाचे यावर काहीच नियंत्रण नाही कसे? अवघ्या एका मिनिटात संपूर्ण रेल्वेची हजारो तिकीट कशी आरक्षित होतात? लोकप्रतिनिधी याबाबत आवाज का उठवत नाहीत? याबाबत रेल्वे प्रशासन कधी खुलासा का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न कोकणवासींय रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहेत. मात्र याचे योग्य उत्तर कुणीच देत नसल्याने कोकणवासींय प्रवाशांच्या नशिबी गुराढोरा प्रमाणे रेल्वे डब्यात कोंबून घेत प्रवास करण्याची परवड कायम आहे.

Shakteepith Expressway: राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंबधी काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. आजरा ते बांदा हे अंतर जलद गतीने पार करण्यासाठी या महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली २ बोगदे मोठे बोगदे बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर हा कदाचित देशातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.
आंबोली घाटातून आजरा ते बांदा प्रवास करण्यासाठी सुमारे १.५ तास लागतात. डीपीआरनुसार, आजरा ते बांदा या पॅकेजच्या संपूर्ण ३९ किलोमीटर लांबीचा प्रवास करण्यासाठी लागणारा प्रवास वेळ फक्त २० मिनिटे असणार आहे. तर या टप्प्यात वेगमर्यादा १२० किमी प्रतितास असणार आहे.
नागपूर आणि गोवा यांना जोडणारा हा नवीन द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळेल. या मोठ्या प्रकल्पाची अंदाजीत किंमत ८६,००० कोटी रुपये आहे. हा द्रुतगती मार्ग १२ जिल्ह्यांना जोडून प्रादेशिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ पत्रादेवी येथे संपेल. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.
𝐍𝐚𝐠𝐩𝐮𝐫-𝐆𝐨𝐚 𝐒𝐡𝐚𝐤𝐭𝐢𝐩𝐞𝐞𝐭𝐡 𝐄𝐱𝐩𝐫𝐞𝐬𝐬𝐰𝐚𝐲 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚.
The package 4 of the Nagpur-Goa Shaktipeeth Expressway will have 2 tunnels under the western ghats near Amboli with a total length of 21.9 kilometres!
Not just… pic.twitter.com/0qyG75ZehS
— Infra News India (INI) (@TheINIofficial) June 17, 2025











