
Express Missed to Passengers : तुमच्या कडे एका गाडीचे आरक्षित तिकीट आहे. गाडी पकडण्यासाठी अर्धा किंवा एक तास आधी तुम्ही स्थानकावर पोहोचता आणि तुम्हाला समजते की तुमची गाडी दीड तास अगोदर निघून गेली. किती मनस्ताप होईल तुमचा? असाच मनस्ताप गुरुवारी मनमाड स्थानकावर 45 प्रवाशांना सहन करावा लागला. कारण त्यांची गाडी त्यांना न घेता दीड तास अगोदरच स्थानकावरून रवाना झाली होती.
वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) वास्को येथून हुबळी, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे ती दिल्लीसाठी मार्गस्थ होते. दरम्यान या गाडीची मनमाड रेल्वे स्थानकात येण्याची वेळ सकाळी 10.30 ही आहे. मात्र, गुरुवारी ही रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकात सकाळी 9.30 वाजता आली व पाच मिनीटे थांबून पूढे मार्गस्थ झाली.
रेल्वे गाडी नियोजीत वेळेच्या दीड तास आधीच मार्गस्थ झाल्याने या गाडीच्या प्रवासाचे आरक्षण करणारे 45 पेक्षा अधिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
झालेला प्रकार लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गितांजली एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात विशेष थांबा देवून गोवा एक्सप्रेसचे आरक्षण केलेल्या 45 हून अधिक प्रवाशांना गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. यावेळी गोवा एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आले होते. गीतांजली एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांना गोवा एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले.
दरडी कोसळत असल्याने मार्गात बदल
सतत पडणाऱ्या पावसामुळे कर्नाटकातील हुबळी भागातीलल रेल्वे मार्गावर दरडी कोसळत आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या नियमीत मार्गाने न जाता रत्नागिरी-रोहा-पनवेल-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत. मार्ग बदलण्यात आल्यामुळे गोवा एक्सप्रेस दीड तास आधीच मनमाड रेल्वे स्थानकात पोहचली.
“गोवा एक्सप्रेस नियोजित वेळेआधीच पोचल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. मार्ग बदलण्यात आल्याने वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकात दीड तास आधीच पोचली. ही रेल्वेच्या संबंधित विभागाची चूक असल्याचे लक्षात आले असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल” अशी माहिती शिवराज मानसपुरे एका वृत्तवाहिनीला दिली.
चिपळूण | मुंबई गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर येत आहे. महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रूंदावल्या आहेत. विशेष म्हणजे हे काँक्रीट नुकतेच घातले होते. यावरून या महामार्गावरील काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समोर आले आहे
परशूराम घाट वाहतुकीसाठी खूपच धोकादायक बनत चालला आहे. रस्त्यांना पडलेल्या भेगा वाढताना दिसत आहेत. घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत.एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू असून, वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मुंबई | गणेश नवघरे : मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची फक्त आश्वासने भेटत असून त्याची पूर्तता केली जात नसल्याने जनआक्रोश समितीने सरकारला धारेवर धरण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
खरडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. दररोज किमान 1 किलोमीटर रस्त्याचे काम अपेक्षित असताना गेल्या 4 महिन्यात 14 किलोमीटर रस्त्याचे काम सुद्धा झालेले नाही आहे. गणेशचतुर्थी दीड महिन्यावर आली आहे पण रस्ता वाहतुकीसाठी योग्य झाला नाही आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही या कारणाने हे धरणे आंदोलन करण्यात येणार असून जास्तीत जास्त कोकणवासीयांनी यात प्रत्यक्ष हजर राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जनआक्रोश समिती तर्फे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आहे.
Konkan Railway News – प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोईमतुर-हिसार एक्सप्रेसला गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्यात आले आहेत .
कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार हरियाणा राज्यातील हिसार जंक्शन ते तामिळनाडूमधील कोयमतुर दरम्यान धावणाऱ्या 22475/ 22476 या गाडीला सप्टेंबर पहिल्या महिन्याभरासाठी वातानुकलीत टू टायर श्रेणीचे दोन अतिरिक्त कोच जोडले जाणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 21 होणार आहे.
या संदर्भात रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हिसार जंक्शन ते कोईमतुर या मार्गावर धावताना गाडी क्रमांक 22475 ला 02 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 तर कोईमतुर ते हिसार जंक्शन या मार्गावर धावताना गाडी क्रमांक 22476 ला 5 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2023 या कालावधीत गाडीला वाढीव दोन डबे जोडले जातील
रत्नागिरी:हवामान विभागाने उद्या दिनांक 28 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत) विद्यालयांना उद्या शुक्रवार दि. 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज दिला आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात उद्या शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 28 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गाची वाहतुक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, निवळी येथे दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ही दरड हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, दरड कोसळल्याने हा मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील चार नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट असून प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Content Protected! Please Share it instead.