रायगड: अलिबाग – पनवेल एसटी बस उलटली; ४ प्रवासी जखमी

 

   Follow us on        

रायगड दि. १५ जुलै : अलिबागहून पनवेलला जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस उलटली. बसमध्ये 45 ते 50 प्रवासी होते. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पोयनाड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, लोकांना बाहेर काढण्यात आले.

पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत कार्लेखिंड येथे अलिबाग ते पनवेल जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. एसटी बसचा एस्केल तुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.

Facebook Comments Box

१५ जुलै दिनविशेष – 15 July in History

आज दिनांक – १५ जुलै २०२४

महत्त्वाच्या घटना:

  • १६६२: इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना
  • १६७४: मुघल सरदार बहादुरशाह कोकलताश याच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटिची लूट रायगडावर जमा झाली.
  • १९१६: जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंग ची स्थापना करण्यात आली.
  • १९२६: मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.
  • १९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
  • १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
  • १९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्‍या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ
  • १९७९: भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • १९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
  • १९९७: पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड
  • २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
  • २०११: भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्हीद्वारे आधुनिक संप्रेषण उपग्रह जीसॅट-१२ अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.
  • २०१४: जागतिक युवा कौशल्य दिन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

  • १६०६: रेंब्राँ – डच चित्रकार (मृत्यू: ४ आक्टोबर १६६९)
  • १६११: मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
  • १७८३: पर्शियन भारतीय व्यापारी व दानवीर जमशेदजी जीजाभाई यांचा जन्मदिन.
  • १८४०: स्कॉटिश इतिहासकार, सांखिकीतज्ञ, संकलक आणि भारतीय नागरी सेवेचा सदस्य विलियम विलसन हन्टर (William Wilson Hunter) यांचा जन्मदिन.
  • १९०३: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५)
  • १९०४: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
  • १९०५: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
  • १९०९: भारतीय स्वतंत्रता सेनानी, मुत्सदी, वकील व आंध्रप्रदेश राज्याच्या पहिल्या महिला राजनेता दुर्गाबाई देशमुख यांचा जन्मदिन.
  • १९१७: नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)
  • १९२७: प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१०)
  • १९२२: नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ लिओन एम. लेडर मैन (Leon M. Lederman) यांचा जन्मदिन.
  • १९३२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
  • १९३३: भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.
  • १९३६: भारतीय हिंदी पत्रकारिता, लेखक आणि राजकीय विश्लेषक प्रभास जोशी यांचा जन्मदिन.
  • १९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९
  • १९४९: माधव कोंडविलकर – दलित साहित्यिक

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १२९१: रुडॉल्फ (पहिला) – जर्मनीचा राजा (जन्म: १ मे १२१८)
  • १५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)
  • १९०४: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (जन्म: २९ जानेवारी १८६०)
  • १९१९: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२)
  • १९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८८२)
  • १९६७: नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ – गायक व नट (जन्म: २६ जून १८८८)
  • १९७९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.
  • १९९१: जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: ? ? १९२०)
  • १९९८: ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)
  • १९९९: इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
  • १९९९: जगदीश गोडबोले – पर्यावरणवादी लेखक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
  • २००४: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
Facebook Comments Box

KR Updates: अजून काही गाड्या रद्द, रेल्वे मार्ग चालू होण्यास अजून किमान ३ तास; मुंबईच्या दिशेने बसेसची व्यवस्था- कोकण रेल्वची माहिती

   Follow us on        

रत्नागिरी दि. १५ जुलै, 11:30AM:   

कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर झालेल्या भुरस्सलनामुळे बंद झालेली वाहतूक अजून पर्यन्त पूर्वपदावर आली नसून. अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द, पुनर्नियोजित आणि पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे. या मार्गातील अडथळा संपूर्णपणे दूर करण्यासाठी अजून किमान ३ तास लागतील असे कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईच्या दिशेने राज्य परिवहनच्या मदतीने सावंतवाडी, चिपळूण, रत्नागिरी आदी स्थानकावरून बसेस सोडल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “वंदे भारत” एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२६१९ लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

 

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या 

खालील गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार असून रत्नागिरी ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
  • दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT “जनशताब्दी” एक्सप्रेस
  • दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्रमांक 22120 मडगाव जं. – मुंबई CSMT “तेजस” एक्स्प्रेस
  • दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस
  • दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्रमांक 11004 सावंतवाडी रोड – दादर “तुतारी” एक्सप्रेस
  • दिनांक  १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास खेड स्थानकाकडे संपविण्यात आला असून तो खेड – दिवा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आला.
  • दिनांक  १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जं. – मुंबई CSMT “मांडवी” एक्सप्रेसचा प्रवास चिपळूण स्थानकावर संपविण्यात आला असून तो  चिपळूण – मुंबई CSMT दरम्यान अंशतः रद्द करण्यात आला आहे.
उशिरा प्रस्थान करणाऱ्या गाड्या 

 

  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२४१३ मडगाव जं. – H. निजामुद्दीन “राजधानी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत सकाळी ८ वाजता न सुटता संध्याकाळी १६:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १११०० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेत सकाळी ११:३० वाजता न सुटता संध्याकाळी १८:३० मडगाव स्थानकावरून
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT “जनशताब्दी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत दुपारी  १२:०० वाजता न सुटता संध्याकाळी ०८:०० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या”  एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १८:०० वाजता न सुटता रात्री २३:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या”  एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १८:०० वाजता न सुटता रात्री २३:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर “तुतारी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १७:५५ वाजता न सुटता रात्री २२:३० वाजता सावंतवाडी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या 
  • दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 00847 हटिया – मडगाव “भारत गौरव” FTR विशेष प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
  • दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
  • दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 20909 कोचुवेली – पोरबंदर एक्सप्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
  • दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
  • दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. १२९७७ एर्नाकुलम जं. – अजमेर जं.  प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.

रत्नागिरी दि. १५ जुलै, 08:00AM: कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर आलेल्या मातीच्या भल्या मोठ्या भरावामुळे कोकण रेल्वेचे ठप्प झालेली वाहतूक अजूनही पूर्वपदावर आली नाही आहे. रेल्वे मार्गावरील अडथळा हटवण्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसून मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या रद्द, पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १२ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३३५ गांधीधाम- नगरकोइल जं. एक्स्प्रेसआता विन्हेरे येथून मागे फिरवण्यात आली असून ती कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन मार्गे वळवली जाईल.

दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२२८४ – एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस

दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२७४२ – वास्को-दा-गामा सुपरफास्ट एक्सप्रेस

दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र.१६३४५ – नेत्रावती एक्स्प्रेस

दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र २२१५० – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस

दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र २२१५० – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस

दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र ०९०५७ – मंगळुरु. विशेष भाडे उन्हाळी विशेष ट्रेन

दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२४३२ – तिरुवनंतपुरम सेंट्रल राजधानी एक्स्प्रेस

दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२६१८ – मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस

रद्द करण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जं.

दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. ११००३ दादर – सावंतवाडी रोड “तुतारी” एक्स्प्रेस

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी” एक्सप्रेस

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेस

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड – मडगाव जं.

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड – मडगाव जं.

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी मांडवी
एक्सप्रेस

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई CSMT एक्सप्रेस

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेस

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. ५०१०८ मडगाव – सावंतवाडी रोड

दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस

Facebook Comments Box

Landslide on Railway Track: कोकणकन्या उशिराने, दिवा रत्नागिरी पॅसेंजर रद्द, मत्स्यगंधा व अन्य गाड्या मागे फिरवून पर्यायी मार्गाने वळविल्या; प्रवाशांचे हाल

   Follow us on        
Landslide on Railway Track:कोकण रेल्वेच्या वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गावर आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भूस्खलन झाल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मार्ग बंद झाल्याने काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार
आज दिनांक १४ जुलै २०२४ ला सुटणारी गाडी क्रमांक २०१११ कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार सहा तास उशिराने म्हणजे पहाटे ५ वाजता सोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक २२१५० पुणे – एर्नाकुलम एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी खडकी स्थानकावरून पुणे- लोणावळा- मिरज मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस रोहा स्थानकावरून मागे फिरवून पुणे- लोणावळा- मिरज मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १२७४२ वास्को-दा-गामा सुपरफास्ट एक्सप्रेस जाते स्थानकावरून मागे फिरवून पुणे- लोणावळा- मिरज मार्गे वळविण्यात आली आहे.
आज सुटणारी 50103 – दिवा – रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या मागे फिरवून त्या पर्यायी मार्गाने वाळविल्याने या गाडीतून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्र्रातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Latest and Important Updates :  मध्य रेल्वे प्रशासनाने आताच केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक २२१५० पुणे – एर्नाकुलम, १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक १२७४२ वास्को-दा-गामा सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचे डायव्हर्जन रद्द करण्यात आले आहे. या गाड्या पर्यायी मार्गाने न चालविता आपल्या नियमित मार्गाप्रमाणे चालविण्यात येणार आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. 
Facebook Comments Box

Breaking: कोकणरेल्वे पुन्हा थांबली: वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकांदरम्यान दरड कोसळली

रत्नागिरी, १४ जुलै, १८:३० | कोकण रेल्वेच्या वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गावर आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भूस्खलन झाल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसपंर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे.  या व्यत्ययामुळे  गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेस रोहा स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस दिवाणखवटी येथे अडकली आहे. मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबविण्यात आली आहे.

हा अडथळा दूर करून लवकरच वाहतूक चालू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. मार्गावरील दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ अपेक्षित आहेत.
अधिक माहिती प्रतिक्षीत आहे………..
Facebook Comments Box

Breaking: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,अनेकांचे सुरक्षित जागी स्थलांतर

   Follow us on        
रत्नागिरी: चिपळूण खेड दापोली भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड येथील जगबुडी नदीला पूर आला आहे. खेड बाजारपेठेत पाणी शिरले आहे. यंत्रणा अलर्ट झाली असून अनेकजणांना सुरक्षितेसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू असून अनेक सखल भागात पाणी भरण्याचे प्रकार घडले आहेत. सुरक्षिततेसाठी काही जणांना स्थलांतरित करण्यात येत आहे. खेड शहरातील नदीकाठच्या काही लोकांना स्थलांतरित करण्यात आला आहे. चिपळूण शहरालाही पुराची भीती असून वशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठली आहे. या सगळ्या वरती चिपळूण व खेड नगरपरिषद प्रशासन लक्ष देऊन असून अलर्ट मोडवर आहे. तर तिकडे गुहागर तालुक्यात खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली आहे, सुदैवाने आतील चार ते पाच खलाशी हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी सडा येथे मार्गावरील येथे डोंगर खचण्याचा प्रकार घडला असून माती रस्त्यावरती आली आहे. त्यामुळे येथील बौद्धवाडी येथील काय कुटुंबांना त्यामुळे स्थलांतर करण्यात आल आहे. गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पाचेरी सडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अशातच रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुराच पाणी च पाणी चिपळूण व खेड बाजारपेठेत भरण्याची भीती व्यक्त होत आहे. खेडच्या जगबुडीने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरम्यान धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली रस्ता पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Facebook Comments Box

परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनससाठी राबवलेल्या “हर घर टर्मिनस” मोहिमेला कोकणवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद

आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले– फेसबुक वरील रील मोठ्याप्रमाणात व्हायरल –व्हाट्सअँप ग्रुप एका दिवसात फुल्ल
   Follow us on        
सावंतवाडी:दि. १४ जुलै: कोकण रेल्वे येण्यासाठी कोणताही विरोध न करता आपल्या जमिनी या प्रकल्पाला देणाऱ्या कोकणकरांच्या हाती दोन ते तीन गाड्या सोडल्या तर काही लागले नाही. अनेकवर्षे प्रवासी संघटनेने केलेल्या वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, बोरिवली/सावंतवाडी या मार्गावर गाड्यांच्या केलेल्या मागण्या अपूर्ण आहेत. या गाड्या चालविण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण होणे महत्वाचे आहे. होळी- गणेशचतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र सावंतवाडी टर्मिनस च्या अपूर्ण कामामुळे त्या गाड्या दक्षिणेकडील राज्यात पाठवल्या जातात आणि ज्यांच्यासाठी या गाड्या सोडल्या त्यांनाच रेल्वे आरक्षणापासून वंचित राहावे लागते. चार दिवसांपूर्वी पेडणे येथील बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे कोकणरेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनेने मागील ९ वर्षे विनाकारण रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची गरज पुन्हा एकदा जाणवली आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी या संघटनेद्वारे कोकणकर पुन्हा एकदा या प्रश्नावरून आक्रमक झाला. सावंतवाडी टर्मिनस च्या रखडल्या कामाविरोधात  आणि अन्य प्रश्नांसाठी संघटनेने  “हर घर टर्मिनस” ही मोहीम राबवली असून मागील दोन दिवसांत समस्त कोकणकरांचा या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
हर घर टर्मिनस मेल मोहिम
संघटनेने “हर घर टर्मिनस मेल मोहिम ” राबवली असून समस्त कोकणवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी संवैधानिक हक्कासाठी,  भुमीपुत्रांच्या विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत तत्काळ विलीनीकरण व्हावे, सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे, फक्त व फक्त कोकणासाठी नवीन गाड्या किंवा वाढीव थांबे मिळावे या आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासन, केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवायचे आहेत.  सोबत मेलचा मायना दिला आहे तो आपल्या ईमेल ने सन्माननीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभाग व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत हजारोंच्या संख्येने ईमेल सर्व बांधव, भगिनी, कोकणवासी, सार्वजनिक मंडळ, कोकण विकास समित्या, समाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या घराघरातून सर्वानी वैयक्तिक पाठवायचे आहेत. फक्त एका टिचकीवर किंवा वरील QR Code द्वारे हे निवेदन आपल्या जिमेल मध्ये उघडेल तेथून फक्त आपल्याला सेंड बटन दाबून पाठवायचे आहे असे आवाहन संघटनेद्वारे करण्यात आले आहे.
या मोहिमेत आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले असून या मोहिमेस खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची संघटनेतर्फे श्री. सागर तळवडेकर यांनी दिली आहे.
‘ती’ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल 

सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभणीकरणादरम्यान प्रवशेद्वारावर लावण्यात आलेल्या “सावंतवाडी रोड” फलकाच्या निषेधार्थ फलकाच्या समोरच संघटनेतर्फे नाराजीचे फलक लावण्यात आले आहेत. या संबंधित पोस्ट केलेली एक रील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्स Views आले तर हजारो कोकणकरांनी तिला लाईक केले आहे. संघटनेतर्फे बनविण्यात आलेल्या व्हाट्सअँपग्रुपला पण खूप मोठा प्रतिसाद लाभत असून फक्त एक दिवसात ग्रुप फुल्ल झाला आहे. तर अन्य ग्रुप ची लिंक या बातमीत खाली दिली आहे.
Facebook Comments Box

प्रभादेवी-दादर दरम्यान झाड पडल्याने पाश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत

मुंबई, दि. १४ जुलै: पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान झाड पडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास झाड पडल्याने धिम्या मार्गावरील लोकल जवळपास तासभर खोळंबली होती. रविवारी सकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास प्रभादेवी-दादर दरम्यान डाऊन दिशेकडील धीम्या मार्गावर झाड पडले.

रेल्वे रुळांवर झाड पडल्याने, बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी दाखल होऊन झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले. जवळपास तासाभराच्या रखडपट्टी सकाळी ८.२० वाजता झाड बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर बोरिवलीच्या दिशेने धीम्या मार्गावरील लोकल सुरू झाल्या.

तर, सकाळच्या सुमारास बोरिवली रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दुरुस्तीची कामे करून सकाळी ९.०५ वाजता बिघाड दूर करून बोरिवली येथील ठप्प झालेल्या तीन मार्गिका सुरू केल्या. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Facebook Comments Box

१४ जुलै दिनविशेष – 14 July in History

आज दिनांक – १४ जुलै २०२४
महत्त्वाच्या घटना:
  • १७८९: पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.
  • १८५३: न्युझीलंड मध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
  • १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी ’डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
  • १९०१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार रती राम देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन.
  • १९०२: उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांचा जन्मदिन.
  • १९२०: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिन.
  • १९५८: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
  • १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.
  • १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
  • १९७६: कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
  • २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
  • २०१३: डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८५६: गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (मृत्यू: १७ जून १८९५)
  • १८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.
  • १८८४: यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)
  • १८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)
  • १९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.
  • १९१७: रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)
  • १९२०: शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)
  • १९४७: नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान
  • १९६७: हशन तिलकरत्‍ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी
  • १९७१: भारतातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू ज्यांनी केवळ क्रिकेट आणि टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर फिल्ड हॉकी, सॉकर, टेबल टेनिस, बुद्धीबळ आणि पोलो खेळांमध्ये देखील पारंगत असणारे सय्यद मोहम्मद हाडी यांचे निधन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन.
  • १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)
  • १९६३: स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)
  • १९७५: मदनमोहन – संगीतकार (जन्म: २५ जून १९२४)
  • १९७९: अमेरिकेने अणुचाचणी केली.
  • १९९३: श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार (जन्म: ? ? ????)
  • १९९८: मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)
  • २००३: लीला चिटणीस – हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
  • २००३: प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)
  • २००४: स्वामी कल्याणदेव, पद्म भूषण पुरस्कार विजेते धर्मगुरू, विचारवंत , समाजसुधारक
  • २००८: यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)
Facebook Comments Box

संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा

   Follow us on        
सिंधुदुर्ग, दि.१३ जुलै: आंबोली घाटातून जाणारा संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता वेगाने होणार आहे. या मार्गाची आंबोली ते सावंतवाडी व तेथून इन्सुली ते बांदा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरिता ४२ कोटी रकमेची निविदाही काढण्यात आली आहे.
आंबोली घटवून येणार हा महामार्ग दुपदरी असून सिमेंट – काँक्रीटचा असणार आहे. तो आंबोली घाटातून पुढे सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. अधिकृत माहितीसाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,आताच या महामार्गाची  हस्तांतरण प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे अधिकृत माहिती देवू शकत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्राकडून जाहीर करण्यात आलेला संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की दाणोली, बावळाट येथून जाणार हा गेले अनेक दिवस प्रश्न होता. परंतु या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे.
हा महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली माडखोल ते सावंतवाडी गवळीतिठा आणि तेथून इन्सुली ते बांदा असा जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ४२ कोटीची निविदा काढण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणाला वर्कऑर्डर देण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत संकेश्वर पासून आजरा फाटा येथे पर्यंत हे काम सुरू आहे. आंबोली ते सावंतवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला भाग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भातले पत्र संबंधित विभागाला लवकरच देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search