वसई-विरार आणि पाश्चिम रेल्वे क्षेत्रातील कोकणवासियांसाठी खुशखबर; कोकणात जाण्यासाठी सोयीच्या रेल्वेमार्गाला रेल्वेबोर्डाकडून मंजुरी

मुंबई:वसई-विरार, मिरा- भायंदर तसेच बोरिवली आणि पश्चिम रेल्वे कक्षेत राहणाऱ्या कोकण वासियांसाठी एक खुशखबर आहे. कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा आणि जवळचा रेल्वेमार्ग लवकरच उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून पनवेलसाठी सोयीचा असलेल्या नायगाव आणि जूचंद्र दरम्यानच्या नवीन दुहेरी रेल्वे लाईनचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला रेल्वेबोर्डकडून मान्यता मिळाली आहे.
पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली येथून कोकण रेल्वेवर जाणाऱ्या नियमित गाड्या सुरु करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नायगाव – जूचंद्र कॉर्ड लाईन (जोड मार्गिका) चा प्रस्ताव रेल्वे कडे पाठविण्यात आला होता. रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारात या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती मागवली  होती. या महितीनुसार या प्रस्तावाला रेल्वे बोर्डने दिनांक २७ जुलै २०२३ रोजी मान्यता दिली असून या प्रकल्पाची अंदाजित रक्कम १७५.९९ कोटी इतकी ठरविण्यात आली आहे. जमिनी अधिग्रहण केल्यापासून ३ वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.
सध्या उपरोक्त परिसरातील नागरिकांना कोकणाकडे जाण्याकरिता दादर किंवा कुर्ला स्थानकात जाऊन पुढची रेल्वे पकडावी लागते. गर्दीमुळे ते त्रासचे ठरते. म्हणून नायगाव आणि जूचंद्रदरम्यान नवीन दुहेरी रेल्वे लाईन टाकण्याची मागणी केली गेली होती, त्या मागणीला यश आले आहे. आता प्रतीक्षा आहे ती लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून करण्याची.  त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. हा नवीन मार्ग झाल्यास पश्चिम रेल्वे कक्षेत येणाऱ्या मुंबईतील नागरिकांना कोकणात जाण्याचा जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कोकणात जाणाऱ्या काही गाड्या या मार्गावरून वळविण्यात येणे शक्य होणार आहे. 

Loading

Facebook Comments Box

‘सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणुन घोषित

मुंबई :’सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सातपाटीमधील मच्छीमार सहकारी संस्थांनी याबाबत सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्याबद्दल मागणी केली होती ती आता पूर्ण झाली आहे. पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केल्यास या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

 

 

Loading

Facebook Comments Box

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो-रो सेवा स्थगित ठेवा

रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
मुंबई: गणेशचतुर्थीला कोकणात रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी दिनांक १५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो रो सेवा स्थगित ठेवावी असे साकडे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांशिवाय अजूनपर्यंत ३१२ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे स्थगित ठेवल्यास अजून गाड्या चालविण्यात येऊ शकतात. असे त्यांनी या निवेदनात म्हंटले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर ताण येणार आहे. या कालावधीत मालवाहतूक आणि रो रो सेवा चालविल्यास रेल्वेमार्गावर गाड्यांचा खोळंबा होणार आहे. अनेक गाड्या सिंग्नल साठी थांबवाव्या लागणार असून त्याचा त्रास प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. 
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/Fw-गणेशोत्सव-काळात-१५-ते-२७-सप्टेंबर-२०२३-पर्यंत-कोकण-रेल्वे-मार्गावरील-मालवाह.pdf” title=”Fw गणेशोत्सव काळात १५ ते २७ सप्टेंबर, २०२३ पर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील मालवाह”]

Loading

Facebook Comments Box

Rain Alert : कोकणसह राज्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रिय होणार

Rain Alert : राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील बहुतेक जिल्हय़ात पुढच्या ४/५ दिवसात पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत कोकण गोव्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस , तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिनांक ०४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात तर दिनांक ०५ ते ०७ सप्टेंबर पर्यंत कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

दिनांक ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता आहे.

Loading

Facebook Comments Box

उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला असल्याने उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचा मुख्य सचिवांकडे केली आहे. याबाबत माहिती त्यांनी समाज माध्यमातून जनतेला दिली आहे. 

काय म्हणालेत विजय वडेट्टीवार? 

राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे.

उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी.

Loading

Facebook Comments Box

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर शिक्षकदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा युवा सेनेचा इशारा

सावंतवाडी | जिल्ह्यातील शाळेत अजूनही शिक्षक न दिल्याने तसेच डी.एड., बी.एड. बेरोजगारांचे प्रश्न न सोडवल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे शिक्षकदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा कुडाळ युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे.
५ सप्टेंबरला सकाळी १०. ३० वाजता युवा सेनेचे कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री योगेश धुरी यांनी केले आहे गेले काही महिने जिल्ह्यात शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे डी.एड, बी.एड झालेल्या शिक्षकांना अद्याप पर्यंत नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यामुळे त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे याच निषेधार्थ शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे असे योगेश धुरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. 

Loading

Facebook Comments Box

सनातन धर्माची मच्छरांशी तुलना करणार्‍या उदयनिधीं विरोधात मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात प्रतिक्रिया

मुंबई :तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्मा विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध स्तरावरून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनिधीचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.

हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.

आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी.

नेमके काय बोलले उदयनिधी? 

तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या विधानावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे आरोप फेटाळून लावले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे” या आपल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे म्हणाले. मात्र अमित मालवीय यांनी नरसंहाराचा दिलेला संदर्भ चुकीचा असून आपण नरसंहाराबाबत काही बोललो नाही, असे ते म्हणाले.

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.

Loading

Facebook Comments Box

मराठा आंदोलन – ताज्या घडामोडी | जालना लाठीमारप्रकरणी अधीक्षकांवर कारवाई

०३/०९/२०२३ | १८:०० जालना लाठीमारप्रकरणी पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. उच्चस्तरीय चौकशीनंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. या प्रकरणी प्रसंगी न्यायिक चौकशीही करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री 

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. अपर पोलीस अधिक्षक व उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत  करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल.

मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल. 


 

Loading

Facebook Comments Box

जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ऐन सणासुदीच्या काळात मनाईचे आदेश; ‘या’ गोष्टी केल्यास होऊ शकते अटक

सिंधुदुर्ग: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून वातावरण गंभीर झाले आहे. सदर घटनेचा निषेध राज्यातील इतर जिल्यात करण्यात येणार असल्याची शक्यता असून वातावरण अजून गंभीर होण्याची  शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ०२ सप्टेंबर दुपारी २ वाजल्यापासून  ते १६ सप्टेंबर पर्यंत रात्री १२ वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि कलम कलम 37(3) अंतर्गत जिल्ह्यात मनाईचे आदेश लागू केले आहेत.

या कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई असणार आहे.

कलम 37 (1)

  • शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
  • अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.
  •  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.
  •  व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)
  • सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.
  • सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3)

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.
  • हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

दिनांक ०७ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव आहे. या मनाईचे सावट या सणांवर पडणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: १ तासाचा प्रवास १० मिनिटांत; कशेडी टनेल गणेशोत्सवापूर्वी सुरु होणार – मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई : गणेशोत्सवास मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची एक खुशखबर आहे  मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा (Kashedi Tunnel) वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट हा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात नागमोडी वळणाच्या या घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या घाटामध्ये काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित झालेले आहेत. हा घाट पूर्ण करण्यासाठी जवळपास ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो यासाठी नागमोडी वळणाच्या या मार्गाला पर्यायी म्हणून या घाटाचा सर्वे  करण्यात आला होता. सर्वे केल्यानंतर पर्यायी घाटमाथावरच्या सध्या स्थितीत असलेल्या चालू रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.  

 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search