मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठीतील ज्येष्ठ कलाकार प्रदीप पटवर्धन यांचे आज त्य्नाच्या राहत्या घरी गिरगाव मुंबई येथे आज सकाळी निधन झाले.  त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने  झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मराठीतील हास्य कलाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांचे वय ६५ वर्षे होते. 
त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.  ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात राहील. या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवलं.
एक फुल चार हाफ (१९९१), चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध,पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी अखेरच्या क्षणी मात्र चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

Loading

Facebook Comments Box

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नमू डायनॅमिक आर्टचा व्यसनमुक्तीसाठी उपक्रम

देशात व्यसनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्याच्या आणि राष्ट्राच्या युवा शक्तीचा ऱ्हास होत आहे. यामुळे सदर व्यसनाला आळा घालणे हे राज्याचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच नशायुक्त औषधे व अन्य नशायुक्त पदार्थ सेवना पासून समाज दूर राहावा याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नमू डायनॅमिक आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै ते ३० जुलै २०२२ ह्या कालावधीत नमु डायनॅमिक आर्ट संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आंगणे आणि त्यांचे सहकारी आर्यन देसाई, संदीप सावंत रवी लोहार राजू मोरे अनंत अंकुश रामदास तांबे सुनील देवळेकर संजय चाचे व दिलीप परळकर आणि मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील पथनाट्य सादर करणारे चाळीस कलावंत मिळून कोकण विभागातील मुंबई शहर,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हा मधील एकावन्न तालुक्यामध्ये मध्ये व्यसनमुक्ती अभियान राबविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

 

Loading

Facebook Comments Box

उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार. जाणून घ्या कोणाला भेटणार कोणते खाते.

प्रलंबित राहिलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या करण्याचे निश्चित झाले असून त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याचे समजते.

मुख्यमंत्र्याच्या ”नंदनवन” ह्या निवासस्थानी ह्या बाबत सुमारे 1 तास 45 मिनिटे ही बैठक संपन्न पडली आहे. विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राजभवनातील दरबार हे सभागृह उद्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

उद्या पाहिल्या टप्प्यात सुमारे 17 ते 18 आमदारांचा शपथविधी होणार आहे. ह्या टप्प्यात महत्त्वाच्या खात्याचे वाटप होणार असून शिवसेनेच्या 6 ते 7 शिवसेनेचे मंत्री आणि 10 ते 11 भाजपचे मंत्री शपथ घेतील अशी चर्चा आहे.

ह्या बैठकीत ह्या नावांवर शिक्कामोर्तब झाली असून नक्की कोणा कोणाची वर्णी लागणार हे अधिकृत रीत्या जाहीर करण्यात आलेले नाही आहे. तरीपण शिंदे गटातील आधीच्या सरकारातील मंत्री असलेले आमदारांना उद्या मंत्री पदे भेटतील असे सांगण्यात येत आहे. भाजपने मंत्री वाटप करताना प्रादेशिक समतोल साधेल ह्याची दक्षता घेतली आहे असे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि रविन्द्र चव्हाण यांची नावे नक्की केली गेली आहेत.

खात्यांबाबत बोलायचे म्हंटले तर महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ आणि गृह खाते भाजपकडे जाणार आहे. महसूल खात्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांच्या गटाला ते भेटले की नाही हे आजून समजले नाही आहे. उच्चशिक्षण, जलसंपदा ही खाती पण भाजपा कडे तर पाणीपुरवठा आणि कृषी ही खाती एकनाथ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कडे ठेवतील आणि अर्थमंत्री पदासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे असे सांगितले जात आहे.

आज रात्री उशिरापर्यंत ही सर्व नाही जाहीर करण्यात येतील अशी शक्यता आहे.

Loading

Facebook Comments Box

शिवसेना खासदार राऊतांचा मुक्काम ईडी कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात हलविला.

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत याना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांचा  मुक्काम ईडी कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात हलविण्यात आला आहे. 
पत्राचाळ राऊत यांची ३१ जुलै ला चौकशी करण्यात आली होती आणि सबळ पुराव्याच्या आधारावर त्यांना ईडी ने ताब्यात घेतले होते. आता त्यांना न्यायालयाने २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठवण्याचे आदेश दिले गेले आहेत. 
तब्येतीच्या कारणामुळे त्यांना न्यायालयाने  घरच्या जेवणासाठी मुभा दिली आहे. पण त्यांनी केलेल्या बेडची  विनंती अमान्य करण्यात आली आहे.

Loading

Facebook Comments Box

टॅटू काढताना एकाच सुईचा वापर केल्याने १२ जणांना HIV चा संसर्ग

टॅटू  काढण्याच फॅड आजकाल खूपच वाढले आहे. तरुणाई तर टॅटू  काढण्यासाठी अक्षरशः वेडी झाली आहे. हेच वेड उत्तरप्रदेश मध्ये एका नाही तर तब्ब्ल १२ जणांच्या जीवावर बेतले आहे. टॅटू काढताना एकाच सुईचा वापर केल्याने १२ जणांना HIV चा संसर्ग झाला आहे. 
उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे हि धक्कादायक प्रकार घडला आहे. इथे काही जण अचानक आजारी पडले त्यांना खूप ताप आला होता, मात्र तपासणीतून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर या सर्वांची HIV टेस्ट करण्यात आली. आणि त्यांची रिपोर्ट्स HIV पॉझिटिव्ह आली. विशेष म्हणजे त्यापैकी कोणीही असुरक्षित संबध ठेवण्यात आले नाही होते. तसेच त्यांना कोणा बाधितांचे रक्तहि चढविण्यात आलेले नाही होते.  
अधिक चौकशीअंती खरे कारण बाहेर आले. सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे ह्या सर्वानी अलीकडेच शरीरावर टॅटू काढून घेतला होता. टॅटू काढून देणारा एकच व्यावसायिक होता. त्याने पैसे वाचवण्यासाठी एकच सुईचा वापर केला होता. 
आपण टॅटू काढताना काही गोष्टीची दक्षता घेणे गरजेचं आहे. सुई नवीन वापरली कि नाही ते पाहणे अत्त्यंत महत्वाचे आहे. जागेच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले पाहिजे. टॅटू काढणाऱ्या व्यक्तीने हँडग्लोव्हस वापरणे गरजेचे आहे.      

Loading

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी संरक्षण कार्यालयातील रिक्त पदांसाठी भरती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी संरक्षण कार्यालयातील खालील पदांकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 
पद – लिपिक टंकलेखक 
एकूण पदे – २
पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर ,
           MS CIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
           मराठी आणि इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
           वय – १८ ते ४३
वेतन –  १५००० रुपये महिना 
पद  – चौकीदार/शिपाई 
एकूण पदे – १
पात्रता – उमेदवार १० वि उत्तीर्ण असावा.
           चार चाकी वाहनाचा परवाना असल्यास प्राधान्य 
           मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
           वेतन – १०,००० रुपये महिना 
सदर पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२.०८.२०२२ आहे. अधिक माहिती आणि अर्जासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
        

Loading

Facebook Comments Box

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ईडी कोठडीतून विरोधी पक्ष नेत्यांना आभाराचे पत्र

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ईडी कोठडीतून विरोधी पक्ष नेत्यांना आभाराचे पत्र लिहिले आहे.

राजकीय सूडभावनेनं होत असलेल्या कारवाईत पाठीशी उभे राहिल्याबद्दल आभार त्यांनी ह्या पत्रात मानले आहे.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षाच्या नेत्यांना असं पत्र लिहिल्याचा शिवसेना नेत्यांनी कडून दावा करण्यात आला आहे.

Loading

Facebook Comments Box

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ईडी कोठडीतून विरोधी पक्ष नेत्यांना आभाराचे पत्र

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ईडी कोठडीतून विरोधी पक्ष नेत्यांना आभाराचे पत्र लिहिले आहे.

राजकीय सूडभावनेनं होत असलेल्या कारवाईत पाठीशी उभे राहिल्याबद्दल आभार त्यांनी ह्या पत्रात मानले आहे.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षाच्या नेत्यांना असं पत्र लिहिल्याचा शिवसेना नेत्यांनी कडून दावा करण्यात आला आहे.

Loading

Facebook Comments Box

अंबरनाथच्या पुराणकाळातील शिवमंदिराचा इतिहास.

 

अंबरनाथ : अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.

 

देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. हे एक भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत.या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्‍याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे.अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते.

अंबरनाथ शिवालय’ पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे.

1868 मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि ‘Bombay branch of the Royal Asiatic Society’च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला.

त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे 1060मध्ये “…हे आम्रनाथाचे देऊळ पूर्ण झाले”, असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव ‘आम्रनाथ’ असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेलं आहे.

पर्यटकांसाठी पर्वणी
केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही, तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र, कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र, याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.

तिथून एक रिक्षा केली की सुमारे अडीच किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येतं. आणि अवघ्या दीड-दोन तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.

 

Loading

Facebook Comments Box

मेट्रो-३ प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पाहिले ४ डबे मुंबईत दाखल. उर्वरित ४ डबे लवकरच येणार.

मुंबई : २ ऑगस्ट, २०२२ 
मुंबईकरांसाठी खुशखबर! कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत आज पहाटे ४ वाजता दाखल झाले. हे डबे चार ट्रेलर्सवर आंध्र प्रदेशातील श्रीसिटी पासून १४०० किमी अंतर १३ दिवसांत ओलांडून मुंबई शहरात पोचलेले आहेत. आणखी ४ डबे मुंबईत लवकरच पोचतील.
४२ टन वजनाचा एक डबा खास प्रकारच्या ट्रेलरवरून आणण्यात आला. या ८-एक्सेल ट्रेलर्सना ६४ चाक असतात. आता या डब्यांची जुळवणी करून सारीपुत नगरातील तात्पुरत्या सुविधेमध्ये एक ट्रेन थाटली जाईल. येथेच चाचणी ट्रॅकसुद्धा उपलब्ध आहे. तात्पुरत्या सुविधेपासून मरोळ नका मेट्रो स्थानकापर्यंतच्या ३ किमी लांबीच्या ट्रॅकवर चाचण्या घेण्यात येतील.
   

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search