- १५६७: स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.
- १७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला, जो आजपर्यंत सोडलेला नाही.
- १८२३: चिलीमधे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
- १८७०: अमेरिकेमध्ये देशांतर्गत रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.
- १९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.
- १९३२: रामकृष्ण मिशन मठाची स्थापना करण्यात आली.
- १९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले. हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.
- १९६९: सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
- १९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
- १९९०: इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.
- १९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा? अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
- १९९७: ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
- १९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान
- १९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय
- २०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.
- २००१: जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.
- २००४: इटली देशाने भारतीय पर्यटकांसाठी सात नवीन वीजा कॉल सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.
- २००५: लान्स आर्मस्ट्राँगने ’टूर-डी-फ्रान्स’ ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.
- १७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म.
- १८०२: फ्रेंच लेखक अलेक्झांड्रे ड्युमास(Alexandre Dumas) यांचा जन्मदिन.
- १८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.
- १९११: गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी (मृत्यू: ? ? ????)
- १९११: अमल ज्योती तथा ’पन्नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार (मृत्यू: २० एप्रिल १९६०)
- १९२४: प्रसिद्ध भारतीय गजल गायक व उर्दू शायर(कवी) नाज़िश प्रतापगढ़ी यांचा जन्मदिन.
- १९२८: केशुभाई पटेल – गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य
- १९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म.
- १९४५: अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन
- १९४७: जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज
- १९६९: जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका
- १९८५: पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न, पुरस्कार विजेता उत्कृष्ट भारतीय बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी यांचा जन्मदिन.
- ११२९: शिराकावा – जपानी सम्राट (जन्म: ७ जुलै १०५३)
- १९७०: भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९७)
- १९७४: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० आक्टोबर १८९१)
- १९८०: अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (जन्म: ३ सप्टेंबर १९२७)
- १९८०: पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)
- २०१२: सीटी स्कॅन चे शोधक रॉबर्ट लिडले यांचे निधन. (जन्म: २८ जुन १९२६)
- २०१८: माजी ब्रिटीश अष्टपैलू क्रिकेटपटू जॉन मुरै (John Murray) यांचे निधन.
2) गाडी क्रमांक. २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
सुधारित रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०७, स्लीपर – ०८, जनरल – ०४, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे. दिनांक १६ नोव्हेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल
वरील फोटो कोलाड येथे मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा आहे. या खड्ड्यात पाणी साचून अक्षरशः तळे बनले आहे. त्यामुळे रस्त्यात गाडी घेऊन उतरायचे कि होडी असा प्रश्न कोकणकरांना पडला आहे.
Follow us onMumbai Goa Highway: कोकणातील लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत शरमेची गोष्ट बनलेल्या, गेल्या १७ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डयांमुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. काही ठिकणी परिस्थिती इतकी खराब झाली आहे कि या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग बोलणेच हास्यास्पद ठरेल. वरील फोटो कोलाड येथील असून अजून बर्याच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. गणेश चतुर्थीला आता फक्त एकच महिना बाकी आहे. मग काय लोकांच्या समाधानासाठी तात्पुरती डागडुगी होईल आणि पुढील वर्षी पुन्हा तेच. महामार्गबाबत लोकप्रतिनिधी उदासीन असून कोकणकर देखील कमालीचे शांत आहेत, या महामार्गाची गरज चाकरमान्यांना फक्त गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मध्येच भासते उर्वरित वेळेस कोकणात माणसच राहत नाहीत का असा प्रश्न पडतो.
सरकार गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मध्ये डागडुजी करतात आणि कोकणकर आनंद मानतात पण आपण कधी विचार केलाय का? हा महामार्ग गणेशोत्सव आणि शिमगोत्सव पुरता मर्यादित नसून विकासाचा महामार्ग आहे. दळणवळण सुविधा नसल्याने कोकणात रोजगार नाही परिणामी गावच्या-गाव ओसाड पडून कोकणकरांनी पुणे -मुंबईची वाट पकडली. पण ही वाट पकडावीच का लागली कारण आपण कोकणकर आपल्या मागण्यांसाठी एकत्र झालोच नाही आणि याचाच फायदा लोकप्रतिनिधीनी घेतला. गणेशोत्सव करीता एसटी बुकिंग साठी, रेल्वे तिकीट साठी धडपड सुरु झालेय पण एसटी ने आपल्या गावी जाण्यासाठी रस्ता सुरक्षित आहे का? रेल्वे तिकीट मिळतोय का? तर याचा उत्तर आपल्याकडे नाही असच असेल. मग आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी, आपल्या महामार्गासाठी आपण पाठी का राहतोय? असा सवाल मुंबई गोवा महामार्गासाठी झटणाऱ्या जनआक्रोश समितीने केला आहे.
जनआक्रोश समिती तर्फे होमहवन
संकटे टाळण्यासाठी, सुखशांती आणण्यासाठी आपण आपल्या घरी होमहवन करतो. तसेच होमहवन आता या रखडलेल्या महामार्गाची आपल्याला करावयाचे आहे. त्यासाठी स्थळ आहे आता मागे न राहता २८ जुलै २०२४ रोजी माणगाव ST डेपोजवळ सकाळी ११:०० वाजता होमहवनकरीता एकत्रित येऊया आणि कोकणकरांची एकी दाखवूया असे आवाहन जनआक्रोश समितीचे सचिव रुपेश दर्गे यांनी केले आहे.
जागतिक दिवस:
✳️ वनसंवर्धन दिन
महत्त्वाच्या घटना:
✳️१८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
✳️१९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.
✳️१९२७: मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे ’आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.
✳️१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारने परकीय शब्दांच्या वापरावर बंदी घातली.
✳️१९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.
✳️१९८२: ’इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
✳️१९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला. जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार. १,००,००० नागरिकांनी भारत, युरोप आणि कॅनडात पलायन केले. येथून श्रीलंकेच्या नागरी युद्धाला सुरुवात झाली.
✳️१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले. (या घटनेची चित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
✳️१९८६: जैवअभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.
✳️१९९५: दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.
✳️१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
✳️२००१: इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी मेघावती सुकर्णोपुत्री (Megawati Sukarnoputri) यांची नियुक्ती करण्यत आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
✳️१८५६: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे भाष्यकार (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
✳️१८६४: अपोलिनारियो माबिनी, फिलिपाईन्सचा पहिला पंतप्रधान.
✳️१८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)
✳️१८८६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९७६)
✳️१८९८: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बंगाली भाषिक कादंबरीकार व लेखक ताराशंकर बंद्योपाध्याय यांचा जन्मदिन.
✳️१८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.
✳️१९०६: चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)
✳️१९१७: लक्ष्मीबाई यशवंत तथा ’ माई’ भिडे – नाट्य-चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ? ? ???
✳️१९२५: बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)
✳️१९२७: धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका
✳️१९४७: डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ
✳️१९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.
✳️१९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.
✳️१९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.
✳️१९७५: तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.
✳️१९७६: ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
✳️१८८५: युलिसिस ग्रांट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ एप्रिल १८२२)
✳️१९९३: छत्तीसगड राज्यातील भारतीय स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मण प्रसाद दुबे यांचे निधन.
✳️१९९७: वसुंधरा पंडित – गायिका (जन्म: ? ? ????)
✳️१९९९: दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)
✳️२००४: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
✳️२०१२: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (जन्म: २४ आक्टोबर १९१४)
✳️२०१६: पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एस. एच. रजा यांचा यांचे निधन.
Proposal for Special Trains:कोकणातील गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेकडून एक खुशखबर आहे. मध्यरेल्वेने गणपती विशेष गाड्यांची यादी जाहीर केल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही आपली गणपती विशेष गाड्यांची यादी तयार केली असून ती कोकण रेल्वे, मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वेला मंजुरीसाठी पाठवली आहे. या यादीला या विभागांकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याआधी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघे काही मिनिटातच फुल झाल्याने तिकिटे न मिळालेल्या प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळवण्याची अजून एक संधी भेटणार आहे.
- Invite An Alien To Live With You Day
- Lowest Recorded Temperature Day
- Take A Monkey To Lunch Day
- ३५६: ३५६ इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
- १८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
- १८७९: क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली
- १८८३: कोलकाता येथे पहिल्या नाट्यगृहाची स्थापना
- १८८४: लॉर्डस मैदानात पहिले क्रिकेट टेस्ट मॅच: सेंट जॉन्सवूड यांनी लंडनमध्ये लॉर्डस मैदानाचा शोध लावला. त्यामुळेच या मैदानाचे नाव लॉर्डस ठेवण्यात आले. या लॉर्डस मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला.
- १८८८: स्कॉटिश शोधकर्ता आणि पशुवैद्यकीय सर्जन जॉन बॉयड डनलॉप(John Boyd Dunlop) यांनी रबराचे टायर आणि ट्यूब तयार करून परिवहन करण्यास गती निर्माण करून दिली.
- १९४४: २० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.
- १९५४: पहिले इंडोचिनी युद्ध – जिनिव्हा परिषदेने व्हिओतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले. 21 जुलै 1954 रोजी जिनिव्हा येथे झालेल्या एका परिषदेत इंडोचीनची फाळणी करण्याचे ठरले.
- १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
- १९६२: भारत चीन सीमावाद – भारत-चीन युद्ध
- १९६३: कशी विद्यापीठाला विश्वविद्यालयाचा दर्जा मिळाला.
- १९७६: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या
- १९८३: अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
- २००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्या ’वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
- २००७: प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या: 21 जुलै 2007 रोजी प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
- २०१८: भारतामधील सॅनिटरी उत्पादनावरील टॅक्स सरकारने होत असलेल्या विरोधानंतर मागे घेतला.
- १८१६: ब्रिटीश वर्तमानपत्र समूह राईटर चे संस्थापक ज्युलियस राईटर (Julius Writer)यांचा जन्मदिन.
- १८५३: शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
- १८९९: अर्नेस्ट हेमिंग्वे – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक (मृत्यू: २ जुलै १९६१)
- १९१०: वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १६ मार्च १९९०)
- १९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
- १९२०: आनंद बक्षी – गीतकार (मृत्यू: ३० मार्च २००२)
- १९३०: डॉ. रा. चिं. ढेरे – भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक
- १९३४: चंदू बोर्डे – भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष – पद्म भूषण, पद्मश्री, अर्जुना पुरस्कार
- १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.
- १९४७: चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य
- १९५१: अमेरिकन हास्य अभिनेते रॉबिन विलियम्स (Robin Williams) यांचा जन्मदिन.
- १९६०: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८८)
- १९६८: आदित्य श्रीवास्तव – भारतीय अभिनेते
- १९०६: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रथम अध्यक्ष व राजकारणी उमेशचंद्र बनर्जी यांचे निधन.
- १९७२: जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (जन्म: २ मे १९२९)
- १९९४: डॉ. र. वि. हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्मय समीक्षक, मराठी बखर वाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ? ? ????)
- १९९५: सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७ – सीतामहू, मंदसौर, मध्य प्रदेश)
- १९९७: राजा राजवाडे – साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६). राजा राजवाडे यांनी अनेक कांदबऱ्या, कथासंग्रह, कविता संग्रह, ललित गद्य लिहिले आहेत. तसेच त्यांनी सलग 35 वर्षे 18 नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं आहे.
- १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.
- २००१: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ आक्टोबर १९२८)
- २००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.
- २००९: गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ५ मार्च १९१३)
- २०१३: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१)
View this post on Instagram
चिपळूण: जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक १९ जुलै २०२४ रोजी बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना एकूण ७०८ वह्यांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, सरस्वती फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सुधाकरराव कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर यांनी श्री. सुधाकरराव कदम यांचा विशेष सन्मान केला. त्याचप्रमाणे बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री.नंदकुमार राणे साहेब आणि न्यासाचे चिटणीस व काडवली गावचे सुपुत्र श्री.नारायण चव्हाण साहेब यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी आणि सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गवार वह्यांचे वितरण करण्यात आले. सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजितराव कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकरराव कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर मोफत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे सर यांनी केले.











