Vande Bharat Express : मुंबई ते गोवा दुसर्‍या फेरीचे आरक्षणही जवळपास फुल्ल

मुंबई : बहुचर्चित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरवातीच्या फेर्‍यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या गाडीच्या सुरवातीच्या फेरीची म्हणजे दिनांक 28 जूनची मुंबई ते गोवा या फेरीची सर्व तिकीटे विकली गेली होती. तसाच प्रतिसाद उद्याच्या दुसर्‍या फेरीला फेरीला मिळाला आहे.

उद्याच्या फेरीचे 94% आरक्षण आतापर्यंत झाले आहे. 530 पैकी 499 सीट्स आरक्षित झाल्या आहेत. या आरक्षणातून 6.75 लाख रुपये जमा झाले आहेत. रात्रीपर्यंत पूर्ण म्हणजे 100% आरक्षण होण्याची अपेक्षा आहे.

परतीच्या प्रवासासाठी पण प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक 01 जुलै च्या मडगाव ते मुंबई फेरीची फक्त 58 तिकिटे बूक होण्याची बाकी आहेत. उद्याचा दिवसात ती पण आरक्षित होतील अशी अपेक्षा आहे. 

Loading

Facebook Comments Box

आषाढीला राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी…

Rain updates : राज्यात उद्या आषाढी एकादशीला काही जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

पुणे हवामान विभागप्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटर दिलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक 29 जून रोजी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

 

अलर्ट आणि त्यांचे अर्थ 

ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert 

यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert

ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert

रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway : गणपती स्पेशल गाड्यांच्या आरक्षणात घोळ; चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा निराशा

संग्रहित फोटो

Konkan Railway : गणेशोत्सवासाठी नियमित गाड्यांची तिकिटे न मिळाल्याने विशेष गाड्यांची तिकिटे तरी मिळतील अशी आस धरून बसलेल्या बर्‍याच चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. IRCTC या संकेतस्थळावर आरक्षण सुरू झालेल्या सर्व गाड्यांच्या समोर सुरुवातीची १५ मिनिटे ट्रेन ‘Train Cancelled’ असे स्टेटस दाखवत होते. त्यानंतर अचानक आरक्षण चालू झाले आणि त्वरित  फुल्ल झाले. या प्रकारामुळे या आरक्षणात गैरप्रकार झाला आहे असा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 27 जून रोजी कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार होते. आरक्षित तिकीटे मिळविण्यासाठी अनेक चाकरमानी आरक्षण सुरू होण्यापूर्वी लॅपटॉप मोबाईल वर लॉग इन करुन बसले होते. मात्र 8 वाजता जेव्हा आरक्षण चालू झाले तेव्हा आरक्षण सुरू झालेल्या सर्व गाड्यांच्या समोर ‘Train Cancelled’ असे स्टेटस दाखवत होते. काही तांत्रिक अडचणींमुळे रेल्वेने या गाड्यांचे आरक्षण पुढे ढकलले असेल आणि आरक्षणाची नवीन तारीख रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर होईल असा विचार करून अनेकांनी प्रयत्न सोडले आणि लॉग आउट झालेत. मात्र 15 मिनिटानंतर अचानक बूकिंग चालू झाली आणि नेहमीप्रमाणे 1/2 मिनिटांत आरक्षण फुल्ल झाले. या कारणाने अनेकांना आरक्षित तिकिटे भेटली नाहीत. 

या प्रकारामुळे आरक्षणात गैरप्रकार झाला असल्याचे आरोप समाजमाध्यमांतून होत आहेत. 

एकतर रेल्वेच्या आरक्षणाचे सर्व्हर हॅक करण्यात आले असेल किंवा रेल्वेचे काही अधिकारी आणि दलाल यांनी मिळून काही गैरप्रकार केला असल्याचा आरोप होत आहे. 

रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत या प्रकाराबद्दल काही स्पष्टीकरण दिले नाही आहे, त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. 

पहिला प्रश्न म्हणजे या गाड्यांचे स्टेटस ‘Train Cancelled’ असे का दाखवले गेले? तांत्रिक अडचणी असल्यास ‘System/Server Error’ किंवा दुसरा स्पष्ट मेसेज का दाखविण्यात आला नाही? 

दुसरे म्हणजे आरक्षण 15 मिनिटे उशिराने चालू करण्याचे पूर्वनियोजन असल्यास त्यासंबंधी आधीच जाहीर करण्यात का आले नाही? 

या संबंधी स्पष्टीकरणाची मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ सोहळा संपन्न; एक्सप्रेस मुंबईसाठी रवाना..

Mumbai Goa Vande Bharat Express :मुंबई-गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 जून) हिरवा झेंडा दाखवला. भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी अकरा वाजता मोदींनी मुंबई-गोवासह इतर चार वंदे भारत एक्सप्रेसला गाड्यांचा शुभारंभ केला.

गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सकाळी अकरा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. उद्घाटन होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ट्रेनचे स्वागत करण्यात आले. मडगाव स्थानकावर यावेळी उत्साही वातावरण होते.

यावेळी मडगाव रेल्वे स्थानकावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (गोवा राज्य), मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(गोवा राज्य), केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (गोवा राज्य), पर्यटनमंत्री रोहन खंवटे(गोवा राज्य), महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, गोवा राज्याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, अधिकारी उपस्थित होते.

Loading

Facebook Comments Box

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण आजपासून सुरू

Mumbai Goa Vande Bharat Express :कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण आज दिनांक 26 जून पासून सुरू होणार आहे. 

आज सकाळी 8 वाजल्यापासून रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवर तसेच ऑनलाईन संकेतस्थळांवर या गाडीचे आरक्षण करता येईल. आगामी 4 महिन्यांचे बूकिंग चालू होत असल्याने गणेशोत्सवासाठी सुद्धा बूकिंग करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

उद्या दिनांक 27 जून रोजी या गाडीचे उद्घाटन होणार असून नियमित सेवा बुधवार दि. 28 जून पासून सुरू होणार आहे. 

 

Loading

Facebook Comments Box

Parshuram Ghat : एक लेन वाहतुकीसाठी खुली मात्र अपघाताचा धोका कायम

Mumbai Goa Highway News :परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, मात्र या पावसातही हा घाट धोकादायक ठरण्याची चिन्ह पहिल्याच पावसात दिसू लागली आहेत.

रत्नागिरी जिल्हय़ात काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला होता. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात किरकोळ स्वरूपाचे दगड महामार्गावर काल शनिवारी २४ जून रोजी खाली कोसळले होते. सुदैवाने एक गाडी याच्यातून बचावल्याची माहिती परशुराम घाट येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून गाडी चालवताना वाहकांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

या धोक्याबरोबरच या परिसरातील ६० ते ७० घरांना दरडीचा धोका कायम आहे. दरम्यान, या ठिकाणी चिपळूण पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शनिवारी घटनास्थळी परिसराला भेट दिली. यावेळी, घाटात सुरक्षेचा उपाय म्हणून सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सूचना सबंधित कंपनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Loading

Facebook Comments Box

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे मान्सून वेळापत्रक जाहीर; फेर्‍यांमध्ये कपात होणार…

Mumbai Goa Vande Bharat Express : सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे पावसाळी वेळापत्रक रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. पावसाळ्यात ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवसच धावणार आहे. 

 

मान्सूनमुळे ट्रेनचे नियमीत वेळापत्रक बदलले आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेस पावसाळ्यात मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून पहाटे ५.३२ वाजता सुटणार असून पुढच्या १० तासांनंतर दुपारी ३. ३० वाजता मडगावला पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मडगावहून दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे. त्यानंतर रात्री १०. २५ पर्यंत ही एक्सप्रेस सीएसएमटीला पोहोचेल. मडगावहून परतीच्या प्रवासासाठी एक्सप्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे.

Loading

Facebook Comments Box

गणेशभक्तांसाठी खुशखबर! कोकणरेल्वे मार्गावर गणेशोत्सवात धावणार १५६ विशेष गाड्या; आरक्षण ‘या’ तारखेपासून खुले.

Ganesha Festival Special Trains:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी भाविकांसाठी मध्यरेल्वेने एक खुशखबर दिली आहे. नियमित गाड्यांच्या आरक्षणाचा प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्यरेल्वेने या मार्गावर एक दोन नाही तर तब्बल १५६ अतिरिक्त फेऱ्या विशेष शुल्कासह चालवणार आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण दिनांक २७ जून रोजी खुले होणार आहे अशी माहित रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

या गाड्याची माहिती खालीलप्रमाणे

१) मुंबई-सावंतवाडी रोड डेली स्पेशल (४० सेवा)-

01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

रचना: 18 स्लीपर क्लास, एक गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

 

2) LTT-कुडाळ- LTT विशेष (24 सेवा)

01167 स्पेशल एलटीटी 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 सप्टेंबर रोजी 22.15 वाजता सुटेल आणि ऑक्टोबरमध्ये 1.10 आणि 2.10.2023 रोजी (12 ट्रिप) आणि कुडाळला पुढील 09 वाजता पोहोचेल. दिवस

01168 स्पेशल कुडाळ येथून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 आणि ऑक्टोबर 2 आणि 3 मध्ये रात्री 10.30 वाजता सुटेल. (12 ट्रिप) त्याच दिवशी 21.55 वाजता एलटीटीला पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा. माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

रचना: एक AC-2 टियर, दोन AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 7 सामान्य द्वितीय श्रेणी.

 

3) पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष (6 सेवा)

01169 विशेष गाडी 15.09.2023, 22.09.2023 आणि 29.09.2023 रोजी पुण्याहून 18.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता कुडाळला पोहोचेल.

01170 स्पेशल कुडाळहून 17.09.2023, 24.092023 आणि 01.10.2023 रोजी 16.05 वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी 05.50 वाजता पोहोचेल.

थांबे: लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

रचना: एक एसी 2 टियर, 4 एसी 3 टियर, 11 स्लीपर क्लास, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 6 जनरल सेकंड क्लास.

 

4) करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक)- 6 सेवा

01187 स्पेशल 16.09.2023, 23.09.2023 आणि 30.09.2023 (3 ट्रिप) रोजी करमाळी येथून 14.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.45 वाजता पनवेलला पोहोचेल.

01188 स्पेशल पनवेलहून 17.09.2023, 24.09.2023 आणि 1.10.2023 (3 ट्रिप) रोजी 05.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.00 वाजता कुडाळला पोहोचेल.

थांबे: थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव.

रचना: एक AC-2 टियर, 4 AC-3 टियर, 11 स्लीपर क्लास, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

 

५) दिवा -रत्नागिरी मेमू स्पेशल (दैनिक) (४० सेवा)

01153 स्पेशल दिवा येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 07.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

01154 विशेष गाडी 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 15.40 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी 22.40 वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

रचना: 12 कार मेमू रेक

 

६) मुंबई- मडगाव विशेष (दैनिक) ४० सेवा

01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 11.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 02.10 वाजता मडगावला पोहोचेल.

01152 स्पेशल मडगावहून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

रचना: 18 स्लीपर क्लास, एक गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

Loading

Facebook Comments Box

Talathi Bharti | एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली

Talathi Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेद्वार किमान पदवीधारक आसावा. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

वेतन –  वेतनमान रु. ५२०० ते रु. २०२०० + ग्रेड पे रु. २४०० राहील.

 

 

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २६ जून २०२३ ते दिनांक १७ जुलै २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात वाचा

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/06/तलाठी-पदभरती-2023.pdf” title=”तलाठी पदभरती -2023″] 

Loading

Facebook Comments Box

गणेशोत्सवासाठी झालेल्या रेल्वे आरक्षणातील काळाबाजार उघड; बनावट खात्यावरून तिकिटांचे आरक्षण

मुंबई : गणेशोत्सवासाठी झालेल्या रेल्वे आरक्षणात काळाबाजार होत असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. याविरोधात संघटनांनी, राजकीय नेत्यांनी तसेच सोशल मीडियावर कोकणवासीयांनी उठवलेल्या आवाजामुळे रेल्वे प्रशासनास याबाबत कारवाई करणे भाग पडले आहे. दिनांक १५ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या आरक्षणाबाबत मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले. या खात्यांद्वारे १८१ तिकिटे काढण्यात आली होती.

गणेशोत्सवानिमित्त कोकणातील गावी जाण्यासाठी मुंबईस्थित कोकणवासीयांची रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी लगबग सुरू असते. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, यानिमित्ताने आधीच्या १२० दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. १८ मे रोजी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांकडून व्यक्त केला जात होता. मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करून १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड केले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर या खात्यावरून काढण्यात आलेली तिकिटे बाद करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

प्रवाशांकडून या कारवाईचे कौतुक होत असून इतर गाड्यांच्या आरक्षणातील अशा अवैध आरक्षणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तसेच भविष्यात अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून बनावट खात्याद्वारे होणारे आरक्षण ते होण्यापूर्वीच रोखले जावे अशी मागणी होत आहे. 

 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search