परमवीरांचा सन्मान! अंदमान – निकोबार येथील बेटांना ‘या’ परमवीरचक्र विजेत्यांची नावे

देशातील बातम्या | आजच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६वी जयंतीनिमित्त  दक्षिण अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यादरम्यान, अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे नामकरण करण्यात आले. या बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवण्यात आली.

(Also Read>कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!)

सदर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हे बेटे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील. अंदमानच्या या भूमीवर पहिल्यांदाच मुक्त तिरंगा फडकवला गेला. त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीमधून अपार वेदनांसह ऐकू येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाहीच्या स्तंभासमोरील ‘कर्तव्य पथ’येथील नेताजींचे स्मारक आपणांस आपल्या कर्तव्यांची आठवण करुन देतो. तसेच, वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांनी अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगला. आज २१ बेटांना नावे देण्यात आली, त्यातून अनेक संदेश मिळणार आहेत. हा संदेश ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा असून, आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याचा आहे.”

 

खालील बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत. 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!

मुंबई : येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पहिले जात आहे.
‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.
राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे.  चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत  किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.
कोकणच्या मातीचा गंध
ह्या चित्रपटाला कोकणच्या मातीचा गंध आहे. कारण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील निवती आणि कोकणातील इतर भागात झाले आहे. कोकणात मूळ असेलेले आणि आपल्या मातीविषयी अतुल प्रेम असलेले अभिजीत वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या आधीचे चित्रपट देखील कोकणात चित्रित झाले होते. त्यातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिकासो’ या अमेझॉन प्राईम  ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ श्रेणीत गौरव प्राप्त केला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण तळकोकणातील कुडाळ ह्या गावात झाले होते. कोकणातील पारंपरिक कला दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित होता.  कोकणात मूळ असल्याने इथे मला चित्रपट सुचतात आणि मी करतो असे त्यांचे म्हणणे आहे. एका आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण पण ते कोकणात करणार आहेत असे म्हणाले आहेत.

Loading

Facebook Comments Box

सावंतवाडी येथील मोतीतलावात पुन्हा पाणमांजराचे दर्शन

फोटो – संग्रहित
सिंधुदुर्ग। प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात अचानकपणे पुन्हा पाणमांजरे दाखल झाली आहेत. शनिवारी रात्री ही पाणमांजरे निदर्शनास आली. चार ते पाच पाणमांजरे काही नागरीकांना दिसून आली आहेत. मोती तलावाच्या कठड्याच्या बांधकामांमुळे तलावाचे पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामूळे माशांच्या शोधात ही मांजरे कमी पाण्यात फिरत असावीत असे प्राणी तज्ञांचे मत आहे.
सावंतवाडीतील तलावात पाणमांजरे असावीत कि नसावीत ह्यावर दोन विरुद्ध मतप्रवाह येथील नागरिकांमध्ये आहेत.  पाणमांजर ही प्रजाती पाणी आणि जमिनीवर राहते, ती लाजाळू असून मासे, खेकडे यावर आपली गुजराण करते. त्यामुळे अनेकांनी तलावात सोडण्यात येणारे मत्स्यबीज, मासे खाऊन फस्त करतील अशी भीती व्यक्त केली होती. त्यावर प्राणिमित्रांनीही ही निसर्ग साखळी असल्याने ती तोडू नये असंही मत व्यक्त केलं. काही प्राणी मित्रांनी अतिशय चांगले मत नोंदवताना, “शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने पोषक असेल त्यासाठी पाणमांजरांचे संवर्धन करावे, जेणेकरून नामशेष होत चाललेली ही प्रजाती सावंतवाडीतील तलावात दिसत असल्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावात स्थिरावलेली पाणमांजरे हा कुतूहलाचा विषय असेल, आणि त्यांना पाहण्या साठी, त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोक येथे थांबतील” असेही सांगितले. तर एका प्राणिमित्राने भारतीय उपखंडातील नष्ट होत चाललेल्या पाणमांजरांचे अस्तित्व सावंतवाडी च्या सुप्रसिद्ध मोती तलावात असणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. पाणमांजरे ही पर्यावरण पूरक पर्यटनाची संधी असल्याचंही मत प्राणिमित्रांनी व्यक्त केलं आहे

Loading

Facebook Comments Box

पत्रकाराने वाचवलेत आजीचे प्राण!

नवी मुंबई | प्रतिनिधी :  खारघर स्टेशन,सकाळचे ११ वाजले होते. स्टेशनवर ठाण्याला जाणारी लोकल आली आणि काही सेकंदात प्लॅटफाॅर्मवरून ती लोकल निघाली, तेवढ्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. समोर एक ६५-७० वर्षांची प्रवासी लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्यामध्ये अडकून घासत जात होती. तिचा एक पाय लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला होता आणि एक पाय लोकलमध्ये होता. लोकल वेगाने पुढे जात होती.
प्लॅटफॉर्मवरील प्रवासी आजीला वाचावण्यासाठी धावले. त्यात सर्वात पुढे होता विलास बडे नावाचा एक तरुण. त्याने धावत जाऊन आजीला पकडले. सुदैवाने त्या आजीने हॅंडलचा हात सोडला आणि ते दोघे  प्लॅटफाॅर्मवर कोसळले. जेमतेम पाच सेकंदात हे सगळं घडलं. घडलेल्या प्रसंगाने आज्जी प्रचंड भेदरली होती पण सुखरूप आहे.
विलास बडे IBN लोकमत मध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या धाडसामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. घडलेल्या प्रसंगाने आजी प्रचंड भेदरल्या होत्या पण सुखरूप आहे.
Watch This Video 

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गे आणखी चार एक्सप्रेस विजेवर धावणार!

रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिन जोडून चालवण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या दूरपल्ल्याच्या आहेत.या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार पुढील गाड्या विद्युत इंजिन जोडून चालविण्यात येणार आहेत.
16338 /16337  –  एर्नाकुलम – ओखा – एर्नाकुलम  एक्सप्रेस हि गाडी एर्नाकुलम ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान दिनांक 20/01/2023  पासून 
16333/16334 – तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्सप्रेस- वेरावल – तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्सप्रेस हि गाडी तिरुवनंतपुरम सेन्ट्रल ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान दिनांक 23/01/2023  पासून 
16336/16335  –  नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस हि गाडी 24/01/2023 पासून नागरकोइल ते अहमदाबाद स्थानकादरम्यान.
22655/22656  – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीला 25/01/2023 पासून संपूर्ण मार्गावर 
विद्युत इंजिनावर चालविण्यात येणार आहेत.
कोंकण रेल्वेमार्गावरील आता जवळपास सर्वच रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनावर येत आहेत. कोकण रेल्वेवरील सर्व गाड्या विद्युत इंजिनावर धावू लागल्यानंतर डिझेलपोटी येणाऱ्या वार्षिक १५० कोटी रुपये खर्चाची बचत होईल, असे कोकण रेल्वेने म्हटले आहे.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वेमार्गावर पुढील आठवडय़ात धावणार विशेष गाडी.. आरक्षण उद्यापासून…

Konkan Railway News : प्रजासत्ताक दिन आणि माघी गणेशोत्सवासाठी कोकणात  गावी जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी कोंकण रेल्वेने  या मार्गावर एक विशेष गाडी गाडी सोडायचा निर्णय घेतला आहे.

खालील गाडी पाश्चिम रेल्वेच्या सहकार्याने विशेष शुल्कासह यामार्गावर चालविण्यात येणार आहे.

Train no. 09470/ 09469 Ahmedabad Jn. – Karmali – Ahmedabad Jn. (Weekly) Special on Special Fare. 

ह्या गाडी अहमदाबाद ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.

Train no. 09470 Ahmedabad Jn. – Karmali 

ही गाडी दिनांक  24/01/2023 रोजी मंगळवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी 04.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.

Train no. 09469 Karmali – Ahmedabad Jn

ही गाडी दिनांक 25/01/2023 रोजी बुधवारी ही गाडी करमाळी स्थानकावरुन सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी 07.00 वाजता अहमदाबाद स्थानकावर पोहोचेल.

या गाडीचे थांबे

वडोदरा, सूरत, वापी, पालघर, वसई रोड ,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड , नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम.

डब्यांची संरचना

एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 06 + टू टायर एसी 02 असे मिळून एकूण 22 डबे

आरक्षण

09469 या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 21/01/2023 रोजी रेल्वेच्या सर्व अधिकृत तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.

वेळापत्रक

Loading

Facebook Comments Box

राज्यातील ‘होम स्टे’ व्यावसायिकांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात  हॉटेल व्यावसायिक आणि ‘होम स्टे’ धारक यांची संख्या लक्षणीय आहे. सरकारच्या पर्यटन विभागामार्फत या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि ‘होम स्टे’ला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगाला ला महावितरण मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो. परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना – हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरकमोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. तसेच हा विषय महावितरणकडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली.

 

Loading

Facebook Comments Box

राजापूरवासियांचे कोकणरेल्वे प्रशासनाला निवेदन… ‘या’ मागण्यांचा समावेश

रत्नागिरी : कोकण रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे लोटली तरी राजापूरवासीयांच्या स्थानकावरील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. राजापूर रोड रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आलेले कोकण रेल्वे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांची पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यांच्याशी रेल्वेस्थानकावरील सुविधा आणि समस्यांबाबत संदर्भात चर्चा करून एक निवेदन सादर केले.

त्यांना दिलेल्या निवेदनात राजापूर रेल्वेस्थानकासाठी खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

  • स्थानकात लिफ्ट सुरू करणे
  • जनशताब्दी तसेच गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस किंवा इतर एक्स्प्रेस गाड्यांना राजापूरचा थांबा देणे फलाट क्रमांक २ चे काम करून सुसज्ज करावे,
  • कोविड काळात बंद करण्यात आलेला तिकिटांचा कोटा पूर्ववत सुरू करून त्यात वाढ करण्यात यावी
  • पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम सुरू करणे
  • राजापूर शहरात पोस्ट कार्यालयात तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी
  • प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन ते राजापूर शहर बस सेवा कायम सुरू ठेवावी,
  • स्टेशनबाहेर रिक्षा स्टँड सुरू करावा
  • या समस्यांबाबत यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन देण्यात आले होते






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box

कणकवली येथे मुंबई गोवा महामार्गावर खाजगी बस चा भीषण अपघात… अपघातात २ जणांचा मृत्यू; २३ गंभीर

सिंधुदुर्गः  मुंबई गोवा महामार्गावर आजची पहाट प्रवाशांसाठी काळरात्र ठरली आहे. माणगाव येथे भीषण कार आणि ट्रक च्या धडकेने ९  जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास . कणकवली येथे खासगी बस उलटून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

{Also Read >मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे भीषण अपघात.. अपघातात ९ जणांचा मृत्यू.)

कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला अपघात झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading

Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे भीषण अपघात.. अपघातात ९ जणांचा मृत्यू.

Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहेया अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे,

(Also Read >मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे भीषण अपघात.. अपघातात ९ जणांचा मृत्यू.)

ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत असताना कार जोरदार धडकला. यात कारमधील लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला पाच पुरूषांचा समावेश आहे. माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

गोरेगाव पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झालेत. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरु केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या मुलाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search