NABARD RECRUITMENT : NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT नाबार्डने Development Assistant विकास सहाय्य्क/विकास सहाय्य्क(हिंदी) ह्या पदांसाठी पूर्ण देशांतून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४ ओक्टोम्बर २०२२ आहे. इच्छुक उमेदवारांना www.nabard.org ह्या बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरता येईल.
महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त जागा.
विकास सहाय्य्क ह्या पदासाठी सर्व वर्गातून एकूण १७३ जागेपैकी ७५ तर विकास सहाय्य्क(हिंदी) ४ जागांपैकी १ अशा मिळून एकूण ७६ जागा महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
पात्रता
कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि नाबार्डने ह्या पदासाठी पात्र ठरवण्यासाठी ठेवलेल्या अटी
वेतन
विकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) (Development Assistant/ Development Assistant Hindi) ह्या दोन्ही पदांसाठी – 13,150/- – 34,990/- रुपये प्रतिमहिना ह्या दरम्यान वेतन निश्चित केले जाईल
भरती तीन टप्प्यात होईल.
पहिला टप्पा – दिनांक १५ सप्टेंबर ते १० ओक्टोम्बर – ऑनलाईन अर्ज,परीक्षा फी भरणे
दुसरा टप्पा – दिनांक ६ नोव्हेंबर – ऑनलाईन पूर्वपरीक्षा
तिसरा टप्पा – मुख्य परीक्षा (ह्या परीक्षेची तारीख बँकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल)
निर्धारित केलेल्या तारखा, स्वरूप बदलण्याचा अधिकार पूर्णपणे नाबार्ड ने राखून ठेवण्यात आलेला आहे. हे बदल नाबार्ड च्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येतील.
देवगड – मालवण – वेंगुर्ला रेल्वेमार्ग लवकरात लवकर अस्तित्वात यावा ह्यासाठी केंदीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ह्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
127 किलोमीटर च्या ह्या रेल्वे मार्गासाठी नारायण यांनी पुढाकार घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे किनारे ह्या मार्गा मुळे जोडले जाणार आहेत. कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड मालवण वेंगुर्ला असा हा रेल्वे मार्ग असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनार पट्टीत सध्या रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी हा रेल्वे मार्ग महत्वाचा वाटा उचलेल हे नक्की. ह्या मार्गावर टुरिस्ट ट्रेन किंवा माथेरान, सिमला येथे चालविण्यात येणाऱ्या ट्रेन सारख्या गाड्या चालू करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे. त्यासंदर्भात त्यांनी केंदीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना 2021 साली एक पत्र लिहिले होते. ह्या प्रस्तावित ‘टॉय ट्रेन’ च्या मार्गाचा एक प्राथमिक सर्वे पण करण्यात आला होता.
मुंबई – आता जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई च्या ताडदेवच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) विभागाने आपली विशेष टीम सक्रिय केली आहे. ही विशेष टीम ह्या झोनच्या महत्त्वाच्या भागांत गस्त घालणार आहे. तसेच एक नियंत्रण विभाग बनविण्यात आला आहे. ह्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी एक हॉटलाइन नंबर जारी करण्यात आला आहे, तसेच whatsapp चाटद्वारे आणि ईमेलद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कशी कराल तक्रार?
एखादा टॅक्सी ड्रायवर जवळचे भाडे नाकारत असेल तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत
9076201010 ह्या नंबर वर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता. ह्या वेळा व्यतिरिक्त जर तक्रार करायची असेल तर whatsapp चाट, टेक्स्ट मेसेज द्वारे किंवा ईमेल द्वारे आपली तक्रार नोंदविता येईल. त्यासाठी [email protected] हा ईमेल आयडी देण्यात आला आहे. अशा तक्रारी इंस्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याकडून हाताळल्या जातील.
ताडदेवच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी या उपक्रमामुळे नक्किच टॅक्सी चालकांच्या मनमानीवर आळा बसेल. जवळचे भाडे नाकारण्याचे प्रकार मुंबईत सर्रास घडत आहेत. अगदी अर्जंट जायचे आहे अशी गयावया करूनही टॅक्सी चालक तयार होत नव्हते.
या प्रकारचा उपक्रम मुंबईच्या इतर विभागात राबविण्यात यावा अशी अपेक्षा आहे.
आज दिनांक 15.09.2022 पासून मुंबई ते करमाळी दरम्यान चालविण्यात येणारी तेजस एक्सप्रेस एका विस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोच सोबत धावणारी कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी गाडी ठरली आहे. ह्या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान रोज चालविण्यात येणारी जनशताब्दी एक्स्प्रेस या कोच सह चालविण्यात येत होती. विस्टाडोम कोच साठी प्रवाशांच्या प्रतिसादामुळे हा डबा तेजस एक्सप्रेसला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या गाडीतील विस्टाडोममध्ये एका डब्यात 40 प्रवासी असणार आहेत.
गाडीचा मडगाव जंक्शन पर्यंत विस्तार
तसेच ही गाडी मडगाव जंक्शन पर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून करमाळी ऐवजी मडगाव पर्यंत धावणार आहे. तर ही ट्रेन दर मंगळावार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. मडगावहून मुंबईला देखील ही ट्रेन याच दिवशी परत येणार आहे.
कसा असतो विस्टाडोम कोच?
विस्टाडोम हा प्रशस्त आणि खास डब्बा असतो. वातानुकुलित असणार्या या डब्यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. काचेच्या प्रशस्त खिडक्या आणि छत आहे ज्यामुळे डोंगरदर्यांचे विहंगम दृश्य टिपता येते.
फॅाक्सकॅान-वेदांताच्या सेमिकंडकटर बनवण्याचा प्रकल्पाच्या जागा निवडीसाठी कंपनीने बनवलेला अहवाल समोर आला आहे. ह्या अहवालात गुजरात मधील ढोलेरा आणि पुण्यातील तळेगाव ह्या दोन्ही जागांची तुलना
गुजरातमधील ढोलेरापेक्षा तळेगाव हे योग्य ठिकाण होतं असे या अहवालानुसार दिसत आहे. ह्या अहवालात नमूद केलेल्या 6 मुद्द्यांपैकी 4 मुद्दे गुजरात राज्याला ह्या प्रकल्पासाठी प्रतिकूल दाखवतात तर तळेगाव साठी सर्व मुद्दे अनुकूल दाखवत आहेत.
ह्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन सरकारने 39 हजार कोटी रुपयांची सुट दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटी रुपयांची सुट दिली आहे.
मविआ सरकारच्या सूत्रांनुसार ह्या प्रकल्पाला खालील सुट दिली जाणार होती.
तळेगाव येथील सुमारे 400 एकर जागा सरकारतर्फे मोफत दिली जाणार होती.
700 एकर जागा 75% दराने दिली जाणार होती.
1200 मेगावॅट चा अखंडित वीज पुरवठा 20 वर्षासाठी 3 रुपये प्रति युनिट दराने देण्यात येणार होता.
विजेच्या दरात दहा वर्षासाठी 7.5% सुट देण्यात येणार होती.
5% स्टॅम्प डय़ुटी मध्ये सवलत दिली जाणार होती.
पाणीपट्टी मध्ये 337 कोटी रुपयांची सुट दिली जाणार होती.
घनकचरा प्रक्रियेसाठी 812 कोटी रुपयांची सुट दिली जाणार होती
ही सर्व परिस्थिती पाहता कंपनीने हा प्रकल्प गुजरात का नेला ह्याबाबत एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथ : मध्य रेल्वेच्या अंबरनाथ-बदलापुर स्टेशन वरुन CSMT च्या दिशेने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी दोन लोकल्समधील अर्ध्या तासाचा ‘गॅप’ जीवघेणा ठरत आहे.
कर्जत वरुन सुटणारी आणि अंबरनाथ स्टेशन येथे सकाळी 9:06 ला येणाऱ्या CSMT जलद लोकल नंतर सुमारे अर्ध्या तासाने 9:37 वाजता CSMT ला जाणारी दुसरी लोकल आहे. पुढे अर्धा तास लोकल नसल्याने साहजिक 9:06 च्या लोकलला जीवघेणी गर्दी असते. अंबरनाथ वरुन पकडणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः दरवाज्यावर लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
सकाळच्या 10/10.30 ड्युटी टाइम असलेल्या प्रवाशांसाठी हा गॅप खूपच गैरसोयीचा आहे. ह्या दोन लोकल्सच्या मध्ये एक जलद लोकल चालविण्यात यावी अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.
पुणे : ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यासाठी करण्यात येणार्या हालचालींवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी खालील शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे
महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना भेटून केली.
वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे.महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे.यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल.
हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सामंजस्य करार (एमओयू) करणार आहेत, असं कळतंय. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे.
गरबा दांडिया उत्सवास रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी विनंती मुंबई मागठाणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे. त्यांनी त्या आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
इतर राज्यात म्हणजे गुजरात, राजस्थान मध्ये दांडिया साठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात अशी परवानगी मिळावी असे त्यांचे म्हणणे आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यावर दहीहंडी आणि गणेशोत्सवांवर असलेले अनेक निर्बंध हटविल्यामुळे कोरोना मारामारीच्या दोन वर्षानंतर अतिशय उत्साहात हे सण साजरे केले गेले. त्यामुळे आताचे सरकार गरबा उत्सवास रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देवून भाविकांचा उत्साह वाढवतील अशी त्यांनी आशा केली आहे.
कोल्हापूर येथे बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. पंचगंगेत विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे इराणी खाणीत प्रशासनातर्फे बाप्पांच्या विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. एका सरकत्या रॅम्पच्या मार्फत इथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सोय केली गेली आहे.
विसर्जनाच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी आणि विसर्जनासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात आले आहे असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. ह्या आधुनिक पद्धतीचा भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर अनेक भाविकांनी आपला विरोध पण दर्शविला आहे.
ह्या रॅम्पवरून गणेश विसर्जन करून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे असे बोलले जात आहे. रॅम्प च्या टोकावरून मूर्ती पाण्यात टाकली जात आहे. गणेश मुर्त्यांची संख्या वाढली असल्याने काही कर्मचारी अक्षरशः गणेशमूर्ती पाण्यात फेकून देत असल्याचे दिसून येत आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी ह्या पद्धतीवर आपला आक्षेप दर्शविला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी
”याला विसर्जन म्हणताच नाही !!! कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला???” ह्या शब्दात आपला विरोध दर्शविला आहे.
याला विसर्जन म्हणताच नाही !!! कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला??? pic.twitter.com/V5aYBmx95A
पोलादपूर:मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे आज सकाळी शिवशाही बस आणि कार चा भीषण अपघात होऊन २ जण ठार झालेत तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल केले आहे.
जयवंत सावंत;६० वर्ष; अंबरनाथ, किरण धागे;२८ वर्ष; घाटकोपर हे या अपघातात मरण पावले आहेत तर अमित दिगले;30 वर्ष; बदलापूर, जयश्री सावंत, ५६ वर्ष; अंबरनाथ, गिरीश सावंत; ३४ वर्ष; अंबरनाथ हे तिघे ह्या अपघातात जखमी झाले आहेत.