प्रलंबित राहिलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या करण्याचे निश्चित झाले असून त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याचे समजते.
मुख्यमंत्र्याच्या ”नंदनवन” ह्या निवासस्थानी ह्या बाबत सुमारे 1 तास 45 मिनिटे ही बैठक संपन्न पडली आहे. विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राजभवनातील दरबार हे सभागृह उद्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
उद्या पाहिल्या टप्प्यात सुमारे 17 ते 18 आमदारांचा शपथविधी होणार आहे. ह्या टप्प्यात महत्त्वाच्या खात्याचे वाटप होणार असून शिवसेनेच्या 6 ते 7 शिवसेनेचे मंत्री आणि 10 ते 11 भाजपचे मंत्री शपथ घेतील अशी चर्चा आहे.
ह्या बैठकीत ह्या नावांवर शिक्कामोर्तब झाली असून नक्की कोणा कोणाची वर्णी लागणार हे अधिकृत रीत्या जाहीर करण्यात आलेले नाही आहे. तरीपण शिंदे गटातील आधीच्या सरकारातील मंत्री असलेले आमदारांना उद्या मंत्री पदे भेटतील असे सांगण्यात येत आहे. भाजपने मंत्री वाटप करताना प्रादेशिक समतोल साधेल ह्याची दक्षता घेतली आहे असे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि रविन्द्र चव्हाण यांची नावे नक्की केली गेली आहेत.
खात्यांबाबत बोलायचे म्हंटले तर महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ आणि गृह खाते भाजपकडे जाणार आहे. महसूल खात्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांच्या गटाला ते भेटले की नाही हे आजून समजले नाही आहे. उच्चशिक्षण, जलसंपदा ही खाती पण भाजपा कडे तर पाणीपुरवठा आणि कृषी ही खाती एकनाथ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कडे ठेवतील आणि अर्थमंत्री पदासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे असे सांगितले जात आहे.
आज रात्री उशिरापर्यंत ही सर्व नाही जाहीर करण्यात येतील अशी शक्यता आहे.
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत याना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांचा मुक्काम ईडी कोर्टातून आर्थर रोड तुरुंगात हलविण्यात आला आहे.
पत्राचाळ राऊत यांची ३१ जुलै ला चौकशी करण्यात आली होती आणि सबळ पुराव्याच्या आधारावर त्यांना ईडी ने ताब्यात घेतले होते. आता त्यांना न्यायालयाने २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठवण्याचे आदेश दिले गेले आहेत.
तब्येतीच्या कारणामुळे त्यांना न्यायालयाने घरच्या जेवणासाठी मुभा दिली आहे. पण त्यांनी केलेल्या बेडची विनंती अमान्य करण्यात आली आहे.
टॅटू काढण्याच फॅड आजकाल खूपच वाढले आहे. तरुणाई तर टॅटू काढण्यासाठी अक्षरशः वेडी झाली आहे. हेच वेड उत्तरप्रदेश मध्ये एका नाही तर तब्ब्ल १२ जणांच्या जीवावर बेतले आहे. टॅटू काढताना एकाच सुईचा वापर केल्याने १२ जणांना HIV चा संसर्ग झाला आहे.
उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे हि धक्कादायक प्रकार घडला आहे. इथे काही जण अचानक आजारी पडले त्यांना खूप ताप आला होता, मात्र तपासणीतून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर या सर्वांची HIV टेस्ट करण्यात आली. आणि त्यांची रिपोर्ट्स HIV पॉझिटिव्ह आली. विशेष म्हणजे त्यापैकी कोणीही असुरक्षित संबध ठेवण्यात आले नाही होते. तसेच त्यांना कोणा बाधितांचे रक्तहि चढविण्यात आलेले नाही होते.
अधिक चौकशीअंती खरे कारण बाहेर आले. सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे ह्या सर्वानी अलीकडेच शरीरावर टॅटू काढून घेतला होता. टॅटू काढून देणारा एकच व्यावसायिक होता. त्याने पैसे वाचवण्यासाठी एकच सुईचा वापर केला होता.
आपण टॅटू काढताना काही गोष्टीची दक्षता घेणे गरजेचं आहे. सुई नवीन वापरली कि नाही ते पाहणे अत्त्यंत महत्वाचे आहे. जागेच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले पाहिजे. टॅटू काढणाऱ्या व्यक्तीने हँडग्लोव्हस वापरणे गरजेचे आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. हे एक भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत.या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे.अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते.
अंबरनाथ शिवालय’ पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे.
1868 मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि ‘Bombay branch of the Royal Asiatic Society’च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला.
त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे 1060मध्ये “…हे आम्रनाथाचे देऊळ पूर्ण झाले”, असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव ‘आम्रनाथ’ असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेलं आहे.
पर्यटकांसाठी पर्वणी केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही, तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र, कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र, याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.
तिथून एक रिक्षा केली की सुमारे अडीच किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येतं. आणि अवघ्या दीड-दोन तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.
मुंबईकरांसाठी खुशखबर! कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत आज पहाटे ४ वाजता दाखल झाले. हे डबे चार ट्रेलर्सवर आंध्र प्रदेशातील श्रीसिटी पासून १४०० किमी अंतर १३ दिवसांत ओलांडून मुंबई शहरात पोचलेले आहेत. आणखी ४ डबे मुंबईत लवकरच पोचतील.
४२ टन वजनाचा एक डबा खास प्रकारच्या ट्रेलरवरून आणण्यात आला. या ८-एक्सेल ट्रेलर्सना ६४ चाक असतात. आता या डब्यांची जुळवणी करून सारीपुत नगरातील तात्पुरत्या सुविधेमध्ये एक ट्रेन थाटली जाईल. येथेच चाचणी ट्रॅकसुद्धा उपलब्ध आहे. तात्पुरत्या सुविधेपासून मरोळ नका मेट्रो स्थानकापर्यंतच्या ३ किमी लांबीच्या ट्रॅकवर चाचण्या घेण्यात येतील.
अंमलबजावणी संचालनालय Enforcement Directorate (ईडी) हे एक आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी एजन्सी आणि भारतातील आर्थिक गुन्हेगारीविरुद्ध लढा देण्यासाठी जबाबदार असणारी आर्थिक गुप्तचर संस्था आहे. हा महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकारचा एक भाग आहे. हे भारतीय महसूल सेवा, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तसेच त्यांच्या स्वतःच्या संवर्गातील पदोन्नती अधिकारी बनलेले आहे. त्यापैकी सुमारे 2000 अधिकारी इतर संस्थांकडून प्रतिनियुक्तीवरून आले आहेत तर ईडीचेही स्वतःचे संवर्ग आहेत. सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी ईडी केडरसाठी नियुक्त केले जातात, हे अधिकारी फक्त विभागीय कर्मचारी आहेत जे ईडीची सेवा देतात. एईओंना पदानुक्रमाच्या विविध स्तरांवर बढती दिली जाते आणि ते या लहान विभागाचे कणा आहेत. परदेशी विनिमय नियमन 1947 अन्वये विनिमय नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनाची पूर्तता करण्यासाठी, आर्थिक कार्य विभागात, जेव्हा १ मे 195 6 रोजी या संचालनालयाची उत्पत्ती झाली तेव्हा 1957 मध्ये या युनिटचे नाव ‘अंमलबजावणी संचालनालय’ म्हणून बदलण्यात आले. संजय कुमार मिश्रा, माजी आयकर आयुक्त, नवी दिल्ली यांची भारत सरकारच्या सचिव पदावर ईडी चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
उद्देश भारत सरकारच्या दोन प्रमुख कायद्यांची अंमलबजावणी करणे हा अंमलबजावणी संचालनालयाचा प्रमुख उद्देश आहे. हे दोन कायदे आहेत “परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम १९९९” व “अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध, २००२”.ईडीची (अंमलबजावणी संचालनालय) अधिकृत वेबसाइट त्याच्या इतर उद्दीष्टांची नावे सूचीबद्ध करते जी प्रामुख्याने भारतातील सावकारी रोखण्यासाठी संबंधित आहेत. खरं तर ही एक तपास यंत्रणा आहे म्हणून सार्वजनिक डोमेनवर संपूर्ण माहिती पुरवणे ही जीओआयच्या नियमांच्या विरुद्ध आहे
संघटना
अंमलबजावणी संचालनालयाचे काम नवी दिल्ली येथील मुख्यालयातून चालते. अंमलबजावणी निर्देशक मुख्यालयाचे तसेच संचालनालयाचे प्रमुख आहेत.संचालनालयाची मुंबई, कोलकाता, दिल्ली, चंडीगढ, चेन्नई, अहमदाबाद, बंगळूर, लखनौ, कोचीन, हैदराबाद येथे क्षेत्रीय कार्यालय आहेत जिथे विशेष निर्देशक अंमलबजावणी प्रमुख आहेत. याशिवाय इंदूर, आग्रा, श्रीनगर, जयपूर, वाराणसी, कालिकत, हैदराबाद, गुवाहाटी, पणजी येथे उप क्षेत्रीय कार्यालय आहेत जिथे उप निर्देशक अंमलबजावणी प्रमुख आहेत.
विशेष न्यायालये
पीएमएलएच्या कलम ४ अन्वये दंडनीय गुन्ह्याच्या चाचणीसाठी, केंद्र सरकार (हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून) एक किंवा अधिक सत्र न्यायालय विशेष न्यायालये म्हणून नियुक्त करते. कोर्टाला “पीएमएलए कोर्ट” देखील म्हणतात. पीएमएलए कोर्टाने मंजूर केलेल्या कोणत्याही आदेशाविरुद्ध कोणतेही अपील थेट उच्च न्यायालयात दाखल केले जाऊ शकते
ईडीचे कार्य आणि अधिकार
फेमा, १९९९ च्या तरतुदींचे उल्लंघन झाले असल्यास अशा प्रकरणांचा शोध घेणे
हवाला सारखे फॉरेन एक्स्चेंज रॅकेट, निर्यात उत्पन्न वसुली, परकीय चलन परत न करणे किंवा इतर कोणत्याही मार्गाने फेमा-१९९९ च्या तरतुदींचे उल्लंघन झाले असल्यास अशा प्रकरणांची चौकशी करण्याचा अधिकार ईडीला आहे.
पूर्वीच्या फेरा (FERA), १९७३ किंवा आत्ताच्या फेमा (FEMA), १९९९ कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाले असल्यास, अशा खटल्यांचा न्यायनिवाडा करणे.
खटल्याच्या कार्यवाही नंतर घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दंड वसूल करणे.
फेरा (FERA), १९७३ अंतर्गत, खटल्यांची प्रकरणे हाताळणे, त्यांची फिर्याद स्वीकारणे आणि त्यांचा न्यायनिवाडा करणे.
संवर्धन परकीय विनिमय व तस्करी प्रतिबंधक कायद्यानव्ये (COFEPOSA) अंतर्गत खटल्याची प्रक्रिया आणि त्यातील प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कार्यवाही करणे.
पीएमएलएच्या कायद्यानुसार गुन्हेगार असल्येल्या व्यक्तीविरोधात खटला भरणे, त्याला अटक करणे, तपास करणे, सर्व्हेक्षण करणे, आणि जप्ती करण्याचे अधिकार (ED) ला आहेत.
मुंबई : ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ग्लोबल कोकण आयोजित स्वराज्य भूमी कोकण यात्रे साठी त्यांना निमंत्रित केले.
ह्या भेटीत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या कोकणातील महान नररत्नांच्या गावांना भेट देणारी ”ग्लोबल कोकण यात्रा 2023” ची माहिती दिली. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे उपस्थित होते. तसेच आमदार भरतशेठ गोगावले,आमदार प्रकाशजी सुर्वे यावेळी उपस्थित होते. या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी कोकण विकासासंदर्भात चर्चा केली.
माननीय मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली भविष्यात कोकण विकासाला विशेषतः पर्यटन ,मत्स्य उद्योग, हापूस आंबा…. आणि पायाभूत सुविधा याला प्रचंड गती मिळेल असा विश्वास आपणास आहे असे संजयजी ह्या भेटीनंतर म्हणाले.