आग्रा: प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अशीही क्लृप्ती. कॉलनीचे नाव बदलून चक्क ‘नरक नगरी’
वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने आग्रा येथील रहिवाशांनी निषेधासाठी एक आगळी वेगळी आणि जरा हटके शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क आपल्या परिसराचे नाव बदलून नवीन नाव ठेवले आहे. ही नवीन नावे पण अशी आहेत की ती वाचून सरकारला पण लाज वाटावी.
काय आहेत ही नवीन नावे?
नरक पुरी
किचड नगर
दुर्गंधी शील
नाला सरोवर कॉलनी
बदबू विहार
जागोजागी घाणीचे साम्राज्य, खड्डेमय रस्ते अशा प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा आयडिया आपल्या परिसरात पण करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटते?
Uttar Pradesh | Residents of various colonies in Agra renamed their colonies as 'Narak Puri', Keechad Nagar', Ghinona Nagar, Nala Sarovar' in order to protest against various issues including bad conditions of roads, waterlogging pic.twitter.com/CrEZiu3gkV
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 10, 2022

Vision Abroad

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती येत असल्याने शिवप्रेमी संतापले आहेत. सर्च इंजिन असलेल्या गुगलवर कान्होजी आंग्रे असं सर्च केल्यावर त्यांचे वर्णन ‘Pirate’ म्हणजे ‘समुद्री डाकू’ असं येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. कान्होजी आंग्रे यांनी स्वराज्यावर परकीयांनी केलेली आक्रमण परतावून लावलीत. त्यासोबत कित्येक मोहिमा फत्ते केल्या, या मातब्बर स्वराज्यरक्षकाबाबत गुगलवर सर्च केल्यावर चुकीची माहिती आल्यावर तळपायाची आग मस्तकात जाणं साहजिकच आहे.
स्वराज्य उभारणी त्यानंतर स्वराज्याच्या रक्षणासाठी कित्येकदा आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या सरदाराविषयी गुगल ‘पायरेट’ म्हणून दाखवत आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू असून शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.
GOOGLE मॅनॅजमेन्ट ला त्यांची चूक दाखवून सुधारवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फीडबॅक गेले पाहिजेत. त्यासाठी खालील स्टेप द्वारे तुमचा फीडबॅक पाठवा.
1. गुगल वर ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा !
2. नावा पुढे दिसणारे तीन डॉट वर क्लीक करून ‘send feedback’ क्लिक करा !
3. नवीन window open झाल्यावर तिथे ‘incorrect’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’ असे लिहून सेंड करा ! लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा !
1. गुगल वर 'कान्होजी आंग्रे' सर्च करा !
2. नावा पुढे दिसणारे तीन डॉट वर क्लीक करून 'send feedback' क्लिक करा !
3. नवीन window open झाल्यावर तिथे 'incorrect' वर क्लिक करून 'फीडबॅक' मध्ये 'Maratha Navy Admiral'
असे लिहून सेंड करा !
लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा ! 🙏🚩 pic.twitter.com/WgM1yHT7ft— Dr prashant bhamare (@dr_prashantsb) October 9, 2022

Vision Abroad


Vision Abroad

मुंबई :अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेकडून वाघ किंवा वाघाचा चेहरा हे चिन्ह निशाणी म्हणून निवडणूक आयोगाकडे मागण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणं हे चिन्ह फ्रिज केलं अंधेरीच्या पोट निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे.
वाघ ह्या चिन्हासाठी शिवसेना का आग्रही?
धनुष्यबाण हे जरी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असले तरी वाघाचा चेहरा आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक जाहिरातीत, बॅनर वर राहिला आहे. त्यामुळे हे चिन्ह शिवसेनेचे नवीन निवडणूक चिन्ह झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो.
निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नाही
निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नसल्याची माहिती मिळत आहे. निवडणुक आयोगाकडे हत्ती किंवा सिंह ही चिन्हे उपलब्ध आहे, त्यामुळे शिवसेनेला वाघ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

Vision Abroad

सिंधुदुर्ग :अार्थिकगैरव्यवहाराप्रकरणी सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने चौकशी केली आहे.एसीबीने तब्बल अर्धा तास चौकशी केली, यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत दिली आहे.वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत.
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाई यांच्या मालमत्तेविषयी चौकशी केली. कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात ही चौकशी झाली. यावेळी एसीबीने वैभव नाईक यांना 2002 ते 2022 या कालावधीतील उत्पन्नाची चौकशी केली. तसेच नाईक यांना उत्पन्नाचा तपशील देण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे.रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाकडून ही चौकशी करण्यात आली. यानंतर एसीबीने 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थितराहण्यासंदर्भात नोटीस दिली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांची नजर आता कोकणाकडे वळल्याचे दिसत आहे
[block id=”ad1″
नाशिक : नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. या बसने पेट घेतल्यामुळे एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडलीये. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहेय
मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या 12 जणांमध्ये एका चिमुरड्याचाही समावेश आहे.
अग्निशमक दलाकडून बसला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि बस जळून खाक झाली. बसमध्ये आणखी काही प्रवाशी असण्याची भीती आहे.
मुंबई :राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. हाच परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज 8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
8/10, 1 am night: Mod to intense spells will continue at most places over Mumbai Thane NM, Palghar & parts of N Raigad for next 3,4 hrs as seen from latest radar observation.
It been raining since morning and many places, it has already crossed over 100 mm rainfall till now.
TC pic.twitter.com/OzJoj7F7Xb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022

Vision Abroad

Indian Railways : भारतीय रेल्वेने देशभरातील 130 मेल-एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट ( superfast train) दर्जा देऊन सर्व श्रेणीच्या भाड्यात वाढ केली आहे. कोंकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणारी कोंकणकन्या एक्सप्रेस चा समावेश सुपरफास्ट एक्सप्रेस च्या दर्जात केल्याने त्याचेही प्रवासी भाडे वाढणार आहे. नवीन भाडेवाडीनुसार एसी-1 आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या गाड्यांच्या प्रवाशी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
किती भाडेवाढ झाली ?
एसी-1 साठी 75 रुपये,
एसी-2, 3 चेअर कारमध्ये 45 रुपये
स्लीपर क्लासमध्ये 30 रुपये भाडे
आता पीएनआर (सहा प्रवाशांसाठी) रेल्वे तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना एसी-1 मध्ये 450 रुपये, एसी-2 मध्ये 270 रुपये, 3 आणि स्लीपर कोचमध्ये (sleeper coach) 180 रुपये अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे.
रेल्वे नियमांनुसार तशी ५६ किलोमीटर पेक्षा जास्त वेग असलेल्या गाडयांना सुपरफास्ट एक्सप्रेस चा दर्जा दिला जातो.
Related :कोकणकन्या एक्सप्रेस आता होणार सुपरफास्ट, कमी वेळात जास्त अंतर कापणार

Vision Abroad

मुंबई :भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड (Meden Pharmaceutical) या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपमुळे आतापर्यंत गांबिया नावाच्या देशात 66 कोवळ्या जिवांच्या मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या या कफ सिरप बद्दल पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय.
या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सिरपचं वितरण गांबियासोबत इतरही अनेक देशात झालेलं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण चार सिरप बाबत जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केला आहे.
कोणती आहेत ही सिरप
प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती.
संशयास्पद चार सिरपमुळे पोटदुखी, उलट्या होणं, लघवीला न होणं, डोकेदुखी, कीडनीचे विकार बळावणं, अशी लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे या सर्व उत्पादनांची तातडीने सखोल चौकशी आणि तपास केला जाईल. तोपर्यंत हे सर्व कफ सिरप असुरक्षित मानले जातील, असं WHO ने म्हटलं आहे.
Vision Abroad