गोव्यात भारतीय बनावटीचे मद्य आणि बिअरचे दर वाढणार

गोवा वार्ता : अबकारी खात्याने भारतीय बनावटीचे मद्य आणि बियरवरील उत्पादन शुल्क, इतर फी आणि लेबल रेकॉर्डिंग फीमधील बदल अधिसूचित केले आहेत. त्यात भारतीय बनावटीचे मद्य, विदेशी मद्य आणि बियरच्या कमाल किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे 750 मिलीपेक्षा कमी क्षमतेच्या बॉटलवरील शुल्क वाढण्याची शक्यता आहे.

कमाल किरकोळ किंमत व्हॅल्यूमची गणना करण्याच्या हेतूने भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी दारू, वाईन आणि इतर देशी दारू उत्पादन शुल्क आणि लेबल रेकॉर्डिंग 60 मिली, 90 मिली, 180 मिली, 375 मिली यांचे शुल्क 750 मिलीप्रमाणे समतुल्य असेल.

भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी मद्य, 200 मिली, 250 मिली, आणि 275 मिली यांचे 275 मिलीच्या सममूल्य असेल. 325 मिली, 330 मिली, 500 मिली आणि 650 मिलीपेक्षा जास्त बियरचे मूल्य शुल्क 650 मिलीप्रमाणे आकारले जाईल.

 

Facebook Comments Box

एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल त्याला विरोध करायलाच हवा- अजित पवार, विरोधी पक्षनेते

मुंबई – बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध हा तीव्र वळण घेत आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. विकासाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असण्याचे कारण नाही मात्र विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाविषयी मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल किंवा भावी पिढी बरबाद होणार असेल तर जरूर त्या गोष्टीला विरोध करायला हवा परंतु त्यातून फायदा होणार असेल तर त्या दृष्टीकोनातूनही विचार केला पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.

Facebook Comments Box

प्रस्तावित संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहराबाहेरून?

सावंतवाडी – प्रस्तावित संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार कि नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांनी लिहिलेल्या एका पत्राला सावंतवाडी नगरपरिषदेने दिलेल्या उत्तरामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी सावंतवाडी मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला एक पत्र लिहिले होते. या पत्रात संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातील ज्या रिंग रोड मधून जाणार होता त्या रिंग रोड बाबत काय ठराव झाला याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी याबाबत कोणताही ठराव झाला नाही असे उत्तर दिले आहे. त्यामुळे हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
संकेश्‍वर ते बांदा हा नवा महामार्ग होऊ घातला आहे. हा महामार्ग चौपदरी असुन जवळपास दोन हजार कोटी रुपये यावर खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून जवळ जवळ 45 ते 60 मिटर रुंदीचा व 108 मीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला आणि सागरामाला या दोन्ही योजनेमध्ये या महामार्गाला स्थान मिळाल्याने याचे काम तातडीने सुरू होणार आहे. मात्र हा मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार, की बावळाटमार्गे बांद्याला जोडणार? हा नवा पेच निर्माण झाला होता .  बावळाटमार्गे बांदा, असा मार्ग झाल्यास 10 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. शिवाय तांत्रिक अडचणीही कमी होतील. त्यामुळे बावळाटमार्गेच हा मार्ग नेण्याच्या हालचाली चालू होत्या. मात्र विरोध झाल्याने केंद्राने हा मार्ग आंबोली – माडखोल – सावंतवाडी – इन्सुलि मार्गे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. हा मार्ग सावंतवाडी शहरात रिंग रोड मार्गे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दोन ते तीन वर्षे उलटली तरी सावंतवाडी नगरपरिषदेत याबाबत साधा ठराव पास झाला नसल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहराच्या बाहेरून जातो. रेल्वेमार्ग सुमारे आठ किलोमीटर दूर अंतरावरून नेण्यात आला आहे. येथे विकासासाठी पूर्ण वाव असुनही सावंतवाडी शहर विकासाच्या दृष्टीने मागे पडत आहे. त्यामुळे निदान प्रस्तावित संकेश्वर-बांदा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जावा अशी मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली आहे.
Facebook Comments Box

कोकण रेल्वेमार्गावर ”मधु दंडवते” प्रवासी गाडी सुरु करावी; प्रवासी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी : कोकण रेल्वेमार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करून त्याचे नामकरण ”मधु दंडवते” करण्यात यावे अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना-मुंबई यांनी महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
वसई नायगाव नालासोपारा विरार ते डहाणू रोड या भागात  कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात आहेत. या विभागातील लोकांना कोकण रेल्वेसाठी दादर किंवा सीएसएमटी स्टेशनला जावे लागते व खूप त्रासही सहन करावा लागतो. कोकण रेल्वे मार्गावर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या जलदगतीच्या रेल्वेगाड्या बऱ्याच आहेत. पण या गाड्या कोकणातील काही मोजक्याच स्थानकावर थांबतात. तसेच आरक्षण कोटाही कमी असल्याने त्याचा फायदा येथील कोकणवासीयांना होत नाही.. म्हणून फक्त कोकणवासीयांसाठी वसई ते सावंतवाडी पर्यंत कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने ही स्लो पॅसेंजर रेल्वे सुरू करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. संघटनेच्या या मागणीची रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.
ही मागणी पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वेकडे मागील काही वर्षापासून केली जात आहे. वसई हे टर्मिनल नसल्याने ह्या रेल्वेची पुर्तता पश्चिम रेल्वेच्या बांद्रा, मुंबई सेंट्रल किंवा अहमदाबाद टर्मिनल वरून करावी. वसईरोड स्टेशनला काही बोगी आरक्षित असाव्यात,तसेच ही रेल्वे नेहमीसाठी व पनवेल ते सावंतवाडी दरम्याने सर्व स्थानकांवर थांबणारी स्लो रेल्वे असावी जेणेकरून कोकणातील सर्व प्रवाशांना याचा फायदा होईल. मागील ५ वर्षे वसई वलसाड किंवा अहमदाबाद वरून सावंतवाडीपर्यंत पॅसेंजर मागत आहोत ती मिळत नाही,
ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे अशी खंत संघटनेनं व्यक्त केली आहे. तरी कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व लोकप्रतिनिधी यांनी या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा व ह्या रेल्वेची पुर्तता करण्यासाठी लवकरात लवकर रेल्वे बोर्डाकडे याची मागणी करावी अशी विनंती अध्यक्ष शांताराम नाईक, सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
गाडीला मधु दंडवते यांचे नाव 
 कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मधु दंडवते यांच्याकडे जाते. त्यामुळेच त्यांच्या नावाने एखादी रेल्वे एक्सप्रेस चालू करावी असा पाठपुरावा चालू आहे. ही नवीन गाडी चालू करून त्यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. 
Facebook Comments Box

श्रीलंकेच्या पिन्नावाला अभयारण्यासारखे कोकणात उभारले जाणार हत्तींसाठी अभयारण्य; शिंदे सरकारचे एका दगडात दोन पक्षी….

दोडामार्ग – कोकणात हत्तींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी सरकारने एक नवीन कल्पना अमलात आणण्याचे ठरवले आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्हा सीमेवर हत्तींचे अभयारण्य उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही कल्पना वास्तवात आणल्यास हे अभयारण्य देशातील केरळ मधील कुट्टूर आणि उत्तरप्रदेश येथील हत्ती संवर्धन केंद्रानंतर हत्तीं साठी तिसरा उपक्रम ठरणार आहे..

श्रीलंकेतील पिन्नावाला अभयारण्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या कोकणी मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत जंगली हत्तीना हक्काचं घर देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. या अभयारण्या मूळे एक नाही तर दोन फायदे होणार आहेत. शेतकर्‍यांना हत्तींच्या उपद्रवापासून मुक्ती मिळणार आहे. दुसरे म्हणजे या अभयारण्यामूळे कोकणातील पर्यटनास हातभार लागणार आहे. 

श्रीलंकेतील पिन्नावाला हत्ती अभयारण्य

श्रीलंकेत १९७५ साली Department of Wildlife Conservation अंतर्गत ‘The Pinnawala Elephant Orphanage’ ची स्थापना झाली. हत्तींना नीट खाद्य मिळावं, त्यांची काळजी घेतली जावी यासाठी हा हत्तींचा अनाथाश्रम उभारला गेला. त्यासाठी नदीकाठी २५ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली. जवळपास १०० हून अधिक हत्ती तिथे राहतात. तिथे हत्तींचे प्रजनन (breeding) देखील केले जाते. अभयारण्याच्या स्थापनेपासून २०१५ पर्यंत ७० नव्या हत्तींचा जन्म झाला. काहींना जंगलात सोडलं तर काहींना खासगी मालकांकडे. परंतु त्यांची नीट काळजी घेतली जाते की नाही याचं tracking एकदम काटेकोरपणे ते करतात. म्हणजेच काय तर असलेले हत्ती वाचवले, जगवले, वाढवले आणि एक ‘रोल मॉडेल’ तयार झाले! जगातील सर्वात जास्त हत्ती एका ठिकाणी असलेलं हे पिन्नावाला गाव. असं क्वचितच होतं की पर्यटक श्रीलंकेला जातात आणि तिथे जात नाही. पर्यटक हमखास तिथे भेट देतातच. आणि तेही तिकिट काढून भेट देतात. आपल्याला हत्तींना अंघोळ घालता येते. त्यांना जेवण देता येतं. त्यावर मनसोक्त फिरता येतं. आणि या सगळ्यासाठी थोडे बहुत पैसे घेतले जातात. त्या पैशातून तेथील देखभाल केली जाते. पर्यावरण जपत, प्राण्यांची काळजी घेत एक अगळं वेगळं पर्यटन ‘रोल मॉडेल’ श्रीलंकेने उभं केलंय.

Facebook Comments Box

बारसू रिफायनरी पाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही येणार एक मोठा प्रकल्प

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग – बारसू रिफायनरी विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. रिफायनरी मुळे कोकणाचा विकास नाही तर विनाश होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने स्थानिक जनतेला विश्वासात न घेता कोकणात नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादले जात आहेत अशी सरकारवर टीका होत आहे.

बारसू रिफायनरीचा वाद चालू असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर एका नव्या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी १२,५०० एकर भूसंपादन करणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेऊन जमीन, शिल्लक जमीन आणि भूसंपादन प्रक्रिया ठरवण्यात येणार आहे. 

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

 

   

 

Block "ad1" not found

Facebook Comments Box

मडगाव-हापा-मडगाव एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच

संग्रहित फोटो

Konkan Railway News – सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या  हापा – मडगाव एक्सप्रेस गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबा वाढवण्यात आला आहे. 

हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या 22908 Hapa – Madgaon Express या गाडीला दि. 26 एप्रिल रोजीच्या फेरीसाठी तर परतीच्या फेरीसाठी 22907 Madgaon Jn. – Hapa Express या गाडीला दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.

 

Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत शिवशाही बसला अपघात; १ ठार, २२ जखमी.

Mumbai Goa Highway News :महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल आगारातून महाडला जात असलेली MH 09 EM 9282 या क्रमांकाची एसी शिवशाही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. हा अपघात आज दुपारी कर्नाळा खिंडीत झाला. अपघातात 1 प्रवासी ठार तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते.

या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलीस आणि पनवेल तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या 22 जणांना जवळच्या पनवेल उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातात ठार झालेल्या प्रवाशाची ओळख अजून पटली नाही आहे. 

Facebook Comments Box

धक्कादायक! रिफायनरीसाठी बारसूची जागा ठाकरे सरकारनेच सुचविली होती..

रत्नागिरी – एकीकडे सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये बारसू रिफायनरी प्रकल्पावरून जुंपली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बारसूची जागा केंद्र सरकारला लिहिलेल्या एका पत्राद्वारे सुचवली असल्याचे समोर आले आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. 12 जानेवारी 2022 रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं. या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं होतं की ही जागा ओसाड आहे. 

यामुळे आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहताना बारसूमधील लोकांना विश्वासात घेतलं होतं का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वेमार्गावर धावणार अजून एक समर स्पेशल ट्रेन; एकूण ४ फेऱ्या

Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने एक लांब पल्ल्याची वीकली समर स्पेशल गाडी चालविणार आहे.

Train No. 06055 / 06056 Tambaram – Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):

Train No. 06055 /Tambaram – Jodhpur Jn. Superfast Special (Weekly):
दिनांक २७/०४/२०२३ आणि ०४/०५/२०२३ गुरुवारी ही गाडी ताम्बरम स्थानकावरुन दुपारी ०२:०० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता जोधपूर या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 06056 /Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):
दिनांक ३०/०४/२०२३ आणि ०७/०५/२०२३ रविवारी ही गाडी जोधपूर स्थानकावरुन संध्याकाळी १७:३० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:१५ वाजता ताम्बरम या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा,चिपळूण, रत्नागिरी, मडगाव
डब्यांची संरचना
टू टायर एसी – 01 + थ्री टायर एसी – 08  + सेकंड  स्लीपर – 05 + जनरल – 06  + एसएलआर – 01 + जेनेरेटर व्हॅन   असे मिळून एकूण 22LHB  डबे
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search