
Ganpati Special Trains : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर गणेशोत्सव दरम्यान अजून 52 विशेष फेर्या चालवण्याचा निर्णय मध्यरेल्वेने घेतला आहे. या आधी सोडलेल्या 156 विशेष गाड्या पकडून एकूण विशेष गाड्यांची संख्या आता 208 झाली आहे.
1)दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी(एकूण 36 फेऱ्या)
01155 मेमू दिवा इथून 13.09.2023 ते 19.09.2023 आणि 22.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत दररोज 19.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 01.25 वाजता चिपळूणला पोहोचेल.
01156 मेमू चिपळूण इथून 14.09.2023 ते 20.09.2023 आणि 23.09.2023 ते 03.10.2023 पर्यंत दररोज 13.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता दिवा इथं पोहोचेल.
या गाडीचे थांबे
थांबे: पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.

2) मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – एकूण 16 फेर्या
01165 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.09.2023, 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 22.09.2023, 23.09.2023, 23.09.2023, आणि 23.09.2023 -22.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन 17.20 वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
01166 स्पेशल मंगळुरु जंक्शन 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 19.09.2023, 23.09.2023, 24.09.2023,30.09.2023 आणि 01.10.2023 ला 13.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा , मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर
डब्यांची रचना
1 AC-2 टियर, 2 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन.

विशेष गाड्यांसाठी बुकिंग दिनांक 03.07.2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे.



















Mumbai Goa Vande Bharat Express


