T20 WorldCup: भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत. टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत 19 जूनपासून सुपर-8 सामने खेळवले जाणार आहेत.
प्रत्येक संघ सुपर-8 फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळेल. आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व संघांनी 3-3 सामने खेळल्यानंतर, दोन्ही गटात जे संघ टॉप-2 मध्ये असतील ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर 29 जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अंतिम विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.
ग्रुप-1 : अफगाणिस्तान,भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश
सुपर-8 मधील भारताचे सामने
20 जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
22 जून- भारत विरुद्ध बांगलादेश
24 जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
सुपर-8 मधील ऑस्ट्रेलियाचे सामने
20 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
22 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान
24 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
सुपर-8 मधील बांग्लादेशचे सामने
20 जून- बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया
22 जून- बांगलादेश विरुद्ध भारत
24 जून- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
सुपर-8 मधील अफगाणिस्तानचे सामने
20 जून- अफगाणिस्तान विरुद्ध भारत
22 जून- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
24 जून- अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश
ग्रुप-2 : युएसए(अमेरिका),इंग्लंड,दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज
सुपर-8 मध्ये यूएसएचे सामने-
19 जून – यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका
21 जून- यूएसए विरुद्ध वेस्ट इंडिज
23 जून- यूएसए विरुद्ध इंग्लंड
सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचे सामने
19 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
21 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध यूएसए
23 जून- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका
सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचे सामने
19 जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध यूएसए
21 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
23 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज
सुपर-8 मधील इंग्लंडचे सामने
19 जून- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज
21 जून- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
23 जून- इंग्लंड विरुद्ध यूएसए
Kanchenjunga Express accident: पश्चिम बंगालमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने सोमवारी रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे गंभीर नुकसान झाले.
पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजता रेल्वेचा अपघात झाला आहे. कांचनगंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.
बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका
Follow us onमुंबई :काल रविवार दिनांक १६ जून रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक श्री. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडली. या बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका करण्यात आल्या. त्याचप्रमाणे समितीच्या पुढील कार्यक्रमाचा आराखडा ठरविण्यात आला. येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत प्रयत्न करण्याबाबत चर्चाही यावेळी करण्यात आली. याव्यतिरिक्त पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
१. श्री. यशवंत जड्यार यांच्याऐवजी श्री. अक्षय महापदी यांची सचिव पदावर निवड करण्यात आली.
२. ॲड. योगिता सावंत यांची उपाध्यक्ष पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
३. श्री. अभिजित धुरत यांची विशेष मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.
४. नवनियुक्त सचिव अक्षय महापदी यांना संघटनेचा पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.
५. तसेच या सभेस उपस्थित नवीन संघटनांना या समितीमध्ये प्रवेश देण्याबाबत संमती देण्यात आली.
६. श्री. प्रमोद वासुदेव सावंत यांची सल्लागार पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
७. तसेच खजिनदार कु. मिहीर मठकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला व त्याच पदावर त्यांना कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.
८. १४ जानेवारी, २०२४ जन्मशताब्दी कार्यक्रमाचा जमाखर्च ताळेबंद मंजूर करण्यात आले व उर्वरित रक्कम श्री. राजाराम कुंडेकर यांच्याकडे ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
९. तसेच येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत त्वरित पत्रव्यवहार करण्यात यावा.
१०. तसेच परब मराठा समाज यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानत ही सभा संपन्न झाली.
या सभेला ॲड. योगिता सावंत, श्री. श्रीकांत विठ्ठल सावंत, श्री. शांताराम शंकर नाईक, श्री.सुनिल सीताराम उतेकर, श्री. दीपक चव्हाण,श्री. विशाल तळावडेकर, श्री. अक्षय मधुकर महापदी, श्री. राजू सुदाम कांबळे, श्री. तानाजी बा. परब, श्री. रमेश सावंत, श्री. राजाराम बा. कुंडेकर, श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, श्री. अभिषेक अनंत शिंदे, श्री. प्रमोद वासुदेव सावंत, श्री. आशिष अशोक सावंत, श्री. मनोज परशुराम सावंत, श्री. सुधीर लवू वेंगुर्लेकर, श्री. सागर कृष्णा तळवडेकर, श्री. संजय धर्माजी सावंत, श्री. अभिजित धुरत हे प्रतिनिधी उपस्थित होते.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावरती जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याची केली मागणी : श्री.यशवंत जडयार
परतीच्या प्रवासात चतुर्थी पुर्वी ३ दिवस सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवून सर्व सुपरफास्ट एक्सप्रेसना कोकणात जादा थांबे मिळावेत
मुंबई: दरवर्षी गणेश उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात चार महिन्यापूर्वी कोकणात जाणार्या नेहमीच्या सर्व ट्रेनचे पहिल्या दोन मिनिटांमध्येच बुकिंग फुल झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे अनेक चाकरमनी नवीन रेल्वेबुकिंग च्या प्रतीक्षेत आहेत, म्हणूनच कोकणाला गणपतीसाठी साधारणता जादा ८०० फेऱ्यांची आवश्यकता आहे,गणेश चतुर्थी शनिवार दि.७ सप्टेंबर २०२४ रोजी असल्याने ३० ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रत्येक दिवसाला किमान १५ अप आणि १५ डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात तर दरम्यानच्या काळात कोकण रेल्वे वरील कंटेनर वाहतूक ( मालगाडया ) पूर्णतः बंद करावी.
यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी,दादर,कुर्ला,ठाणे,दिवा, कल्याण व पनवेल येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,वांद्रे,वसई,वलसाड,उधना,अहमदाबाद,सुरत येथून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी,कुडाळ,सावंतवाडी,पेडणे, थिमिव,करमळी,मडगाव दरम्यान आरक्षित जादा गणपती स्पेशल रेल्वे चालवाव्यात.तर गर्दी कमी करण्यासाठी डहाणू ते पनवेल, पनवेल ते खेड,वसई ते चिपळूण,दिवा ते चिपळूण,दादर ते रत्नागिरी व पनवेल ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित मेमू रेल्वे चालवाव्यात.11003/04 तुतारी एक्सप्रेस २४ कोचची चालवावी किंवा दादर ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित डब्बलडेकर चालवाव्यात.
शनिवार दि.७ सप्टेबर ला चतुर्थी असल्याने ४ / ५ आणि ६ सप्टे.ला मुंबईतून कोकणाच्या दिशेने जास्त जादा रेल्वे सोडाव्यात,तर सिंगल ट्रकवर क्रासिंगला वेळ लागत असल्याने मुंबई ते मडूरा दरम्याने चाकरमन्यांचा प्रवास साधारण १८ ते २० तासाचा होतो म्हणून याच ३ दिवसामध्ये परतीच्या प्रवासातील सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात.तसेच नियमित सर्व सुपारफास्ट एक्सप्रेसना गणपतीच्या कालावधीमध्ये रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जादाचे थांबे दयावेत.तर गुरूवार दि.१२ सप्टे.ला गौरी गणपती विसर्जन असल्याने १३/१४ आणि १५ सप्टे.ला प्रत्येक दिवसाला कोकणातून मुंबईच्या दिशेने जास्त जादा रेल्वे सोडव्यात.
या निवेदनाच्या प्रती रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णव साहेब,जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे,जनरल मॅनेजर मध्य रेल्वे,रत्नागिरी व सिंधुदुर्गचे खासदार मा.श्री.नारायण राणे साहेब,माझी रेल्वेमंत्री मा.श्री.सुरेश प्रभू साहेब,पालघर चे खासदार मा.डॉ.हेमंत सावरा साहेब,रायगडचे खासदार मा.श्री. सुनील तटकरे साहेब व बोरिवली चे खासदार मा.श्री.पियुष गोयल साहेब यांना दिल्या असून या निवेदन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री.शांताराम नाईक व प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी पाठवलेले आहे.
मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील ४८३ गावांतील दरडींची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे कुणाला हानी पोहचणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे.
डझनभर जिल्हयातील ४८३ गावांवर धोकादायक दरडींचे संकट आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात खालापूर, कर्जत, महाड, म्हसळा, पनवेल, पोलादपूर या तालु्क्यातील सर्वाधिक १५७ गावांचा समावेश असून त्याखालोखाल रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यातील १३८ तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यातील ९३ गावांना धोकादायक दरडींपासूनच्या आपत्तीचा धोका आहे.
साताऱ्यात जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई या तालुक्यातील ८८, कोल्हापूरमधील भुदरगड, चंदगड, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील ५८, नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यील ८ , सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वैभववाडी या दोन तालुक्यातील १६,नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, सुगरणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५ गावांना पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे.
पावसाळ्यात राज्यातील काही जिल्ह्यात विशेषत: कोकण, मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागात दरडी कोसण्याच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.