Mumbai Local: ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या भांडणात एकाचा खून

   Follow us on        

Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये शुल्लक कारणाने झालेल्या भांडणांमुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घाटकोपर येथे घडली. 15 नोव्हेंबर रोजी घाटकोपर (Ghatkopar) स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या भांडणात एका मुलाने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहवालानुसार, टिटवाळ्यातील या 16 वर्षीय मुलाने 35 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. खुनाच्या एक दिवस अगोदर मयत अंकुश भालेराव आणि त्याच्या साथीदारांचा ट्रेनमध्ये प्रवास करताना या मुलासोबत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी हा मुलगा चाकू घेऊन गेला आणि त्याने कामावर जात असलेल्या भालेराव यांच्यावर हल्ला केला.

गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अखेर स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढला आणि खुनाच्या दोन दिवसांनंतर टिटवाळा येथून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्ला बैथा (25) याला गोवंडी येथून अटक केली. त्याने आपल्या भावाला चाकू लपवण्यात आणि पकडण्यापासून वाचवण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत दोघेही टिटवाळा येथील रहिवासी आहेत. 14 नोव्हेंबरला ट्रेनमधील चौथ्या सीटवरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. बेनाली गावातील रहिवासी भालेराव आणि त्यांच्या इतर दोन मित्रांनी भांडणाच्या वेळी या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर मुलाने भालेराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी टिटवाळ्याहून ट्रेनमध्ये चढला आणि घाटकोपर स्टेशनवर उतरला. तो भालेराव येण्याची वाट पाहू लागला.

सकाळी दहाच्या सुमारास भालेराव खाली उतरले आणि ते आपल्या कामावर जाऊ लागले. त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने पोलिसांना आरोपीने दिलेल्या धमकीबद्दल सांगितले. ट्रेनमध्ये जेव्हा भांडण झाले होते तेव्हा भालेराव यांनी आरोपीचा फोटो काढला होता.

Loading

Facebook Comments Box

२२ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-सप्तमी – 18:10:46 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 17:10:47 पर्यंत
  • करण-भाव – 18:10:46 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-ब्रह्म – 11:33:00 पर्यंत
  • वार-शुक्रवार
  • सूर्योदय- 06:52
  • सूर्यास्त- 17:57
  • चन्द्र-राशि-कर्क – 17:10:47 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:12:59
  • चंद्रास्त- 12:37:59
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १९४३: लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.
  • १९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
  • १९५०: आजच्या दिवशी अमेरिकेतील रिचमंड हिल्स येथे भीषण रेल्वे दुर्घटनेत ७९ लोक मृत्यमुखी पडले होते.
  • १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन
  • १९६५: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.
  • १९६८: आजच्याच दिवशी मद्रास राज्याचे नामकरण तामिळनाडू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत पारित करण्यात आला होता.
  • १९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.
  • १९७५: जुआन कार्लोस आजच्याच दिवशी स्पेन ह्या देशाचे राजा म्हणून नियुक्त झाले होते.
  • १९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.
  • १९८९: आजच्याच दिवशी मंगळ, शुक्र, शनि, युरेनस, नेपच्यून व चंद्र हे सर्व एका सम रेषेत आले होते.
  • १९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू
  • १९९७: नायजेरियात ’मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार
  • २००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
  • २००६: भारतासह विश्वातील अन्य सहा देशांनी सूर्यासारखी उर्जा निर्मिती करणाऱ्या पहिल्या फ्युजन रिएक्टरची स्थापना करण्यासाठी पेरीस येथील बैठकीत ऐतेहासिक करार केला होता.
  • २०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२)
  • १८६४: भारताची प्रथम महिला चिकित्सक रुक्माबाई यांचा जन्म झाला होता.
  • १८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)
  • १८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्‍मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६)
  • १८८२: प्रसिध्द भारतीय उद्योजक वालचंद हिराचंद जन्म झाला होता.
  • १८८५: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१)
  • १८९०: चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)
  • १८९९: भारतीय स्वतंत्रता सेनानी शहीद लक्ष्मण नायक यांचा जन्म झाला होता.
  • १९०९: द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)
  • १९१३: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)
  • १९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)
  • १९१६: भारतीय स्वतंत्रता सेनानी शांती घोष यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.
  • १९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)
  • १९३९: मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री.
  • १९४३: बिली जीन किंग – अमेरिकन लॉनटेनिस पटू
  • १९६७: बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू
  • १९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.
  • १९७०: मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार
  • १९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८१: स्वतंत्रता सेनानी अहमदुल्लाह यांचा मृत्यू झाला होता.
  • १९०२: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)
  • १९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (जन्म: ? ? १८८७)
  • १९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.
  • १९५७: पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
  • १९६३: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४)
  • १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या (जन्म: २९ मे १९१७)
  • १९८०: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
  • २०००: डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक (जन्म: ६ आक्टोबर १९१२?)
  • २००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.
  • २००८: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
  • २०१२: पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)
  • २०१६: प्रसिध्द भोजपुरी व हिंदी भाषेचे साहित्यकार विवेकी राय यांचे निधन झाले होते.
  • २०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

   Follow us on        

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. (पोस्टल मतांचा समावेश वगळता). मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारत निवडणूक आयोगाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले आहे. यानुसार अनेक उपक्रम राबविण्यात आले, ज्यांची काटेकोर अंमलबजावणी राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी दिसून आली.

मतदार यादी पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत दुसरी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण मोहीम राबविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादी सतत अद्ययावत करत असताना या पुनरिक्षणामुळे 40 लाख नवीन मतदारांची भर पडली, ज्यामध्ये 18-19 वयोगटातील मतदारांचे प्रमाण 50% पेक्षा जास्त होते. तृतीयपंथीय, विशेषत: असुरक्षित आदिवासी जमाती समूह (PVTGs) आणि दिव्यांग मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करण्यावर विशेष लक्ष दिले गेले.

मतदारांना सुविधा मिळाव्यात यासाठी मतदान केंद्रांवर विशेष भर देण्यात आला. मतदान केंद्रांचे पुनर्रचना, गटातील केंद्रीकरण कमी करणे, तात्पुरत्या ठिकाणांवरून कायमस्वरूपी इमारतींमध्ये मतदान केंद्र हलविणे, गरजेनुसार नवीन मतदान केंद्र स्थापन करणे, तसेच उंच इमारतींमध्ये, गृहसंकुलांमध्ये आणि झोपडपट्टीत मतदान केंद्र उभारणे यासारखे उपक्रम राबविण्यात आले.

मतदान केंद्रातील मतदारांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या उद्देशाने मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करुन नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आली. 5800 हून अधिक ठिकाणी गटातील केंद्रीकरण कमी करण्यात आले; 1100 हून अधिक मतदान केंद्र उंच इमारती आणि गृहसंकुलांमध्ये उभारण्यात आली; तर 200 हून अधिक मतदान केंद्र झोपडपट्ट्यांमध्ये स्थापन करण्यात आली.

प्रत्येक मतदाराला आपले मतदान केंद्र ओळखणे सोपे जावे यासाठी ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ मोहिम राबविण्यात आली. तसेच, जवळजवळ सर्व मतदारांना मतदार माहिती चिठ्ठया वितरित करण्यात आल्या. मुंबईत, एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्र असल्यास त्यांना वेगळ्या रंगाच्या कोड देण्यात आला, आणि हा रंग कोड मतदार माहिती चिठ्ठीतही छापण्यात आले, ज्यामुळे मतदारांना आपले मतदान केंद्र ओळखणे सुलभ झाले.

प्रत्येक मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा जसे पिण्याचे पाणी, रॅम्प, रांगेत बसण्याची सोय, पार्किंग सुविधा आदींवर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष दिले. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांनी या सुविधा पुरविण्यात यश मिळवले, ज्याचे सर्व मतदारांनी राज्यभर कौतुक केले.

मतदारांसोबत योग्य वर्तन ठेवण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत एका वेळी एका व्यक्तीला मतदान केंद्रात सोडण्याच्या नियमाऐवजी, या वेळी एकाच वेळी चार व्यक्तींना प्रवेश देण्यात आला. मतदार ओळख, शाई लावणे आणि मतदान हे तीनही टप्पे एकाच वेळी विविध मतदारांकरिता पूर्ण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक (NSS) व एन.सी.सी. कॅडेट्सनी (NCC) रांगा व वाहतूक व्यवस्थापनात मदत केली, तसेच वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींनाही सहाय्य केले.

मुंबई ही राज्याचे राजधानी शहर असल्याने, तसेच जागतिक स्तरावर मोठे व महत्त्वाचे शहरी केंद्र असल्याने, लोकसभा निवडणुकीत दिसलेल्या काही आव्हानांचा अभ्यास करून आणि सध्याच्या प्रशासकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर, निवडणूक आयोगाने मुंबई शहर व उपनगर या दोन्ही जिल्ह्यांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याशिवाय, अतिरिक्त महापालिका आयुक्तांना सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आणि प्रत्येक अधिकाऱ्याला एका संसदीय मतदारसंघाची (सहा विधानसभा मतदारसंघ) जबाबदारी देण्यात आली. उपक्रम यशस्वी झाला व त्याचा फायदाही लगेच दिसून आलेला आहे.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी महसूल, पोलीस आणि इतर निवडणुकीशी संबंधित विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आव्हाने हाताळताना क्षेत्रीय यंत्रणा नेहमीच सतर्क राहिली.

मतमोजणी व्यवस्था

288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी केंद्रे आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 01 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 02 मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत.

23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. या प्रक्रियेदरम्यान, पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8:00 वाजता सुरू होईल, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल.

मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबत व्यापक प्रसिद्धी दिली आहे. निवडणूक लढविणारा उमेदवार/राजकीय पक्षांना मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स उघडण्यात येतील व ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल. तीन- स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे.

सध्याच्या निवडणुकीत प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एनआयसी (NIC) च्या मदतीने फॉर्म 12 आणि 12-डी त्वरित हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली. मंजूर फॉर्मसाठी रिकाम्या पोस्टल मतपत्रिकांची देवाण-घेवाण तसेच मतदान केलेल्या मतपत्रिकांच्या विनिमयासाठी जिल्हा, विभागीय, आणि राज्य स्तरावर समन्वय केंद्रे कार्यरत करण्यात आली. 85+ वयाच्या 68,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि 12,000 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींनी गृह मतदानाचा लाभ घेतला. 36,000 हून अधिक अत्यावश्यक सेवा मतदारांनी पोस्टल मतपत्रिकांद्वारे मतदान केले आणि 4,66,823 पोस्टल मतपत्रिका निवडणूक कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या.

सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 288 मतमोजणी केंद्रांवर 1732 टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि 592 टेबल्स इटीपीबीएमएस (ETPBMS) स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारण्यात आले आहेत.

मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सतत माध्यमांसमोर माहिती सादर करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे आकडेवारी व घडामोडी ऑनलाइन व पारंपरिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे.

Loading

Facebook Comments Box

महत्वाचे: दहावी – बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

SSC & HSC Exam Schedule: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १० वी आणि १२ बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत असून पहिले सत्र सकाळी ११:०० ते दुपारी २:०० आणि दुसरे सत्र दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी २०२५ मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या २३ ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागविल्या होत्या. प्राप्त सूचनांवर विचार करून राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे आता दिसून येत आहे.
बारावी लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
बारावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025
दहावी लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025
दहावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
सीबीएसई परिक्षांचे वेळापत्रक जाहीर
सीबीएसईने आपली वेबसाईट cbse.gov.in वर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२५ चे वेळापत्रक जारी केले आहे. वेळपत्रकानुसार, दोन्ही परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु होतील. दहावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. तर १२ वीचा १५ फेब्रुवारीला एंटरप्रेन्योरशिपची परीक्षा असेल, तसेच १७ फेब्रुवारीला फिजिकल एज्युकेशनची परीक्षा असेल. तर ४ एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल.

Loading

Facebook Comments Box

Mumbai Local: खुशखबर! मुंबई उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात नवीन लोकल गाड्यांचा समावेश

Mumbai Local: मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक खुशखबर देण्यात आली आहे.पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. तर,मध्य रेल्वेला एक सामान्य लोकल मिळाली आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन मिळाल्या आहेत. या दोन लोकलमुळं नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे.
मंगळवारी रात्री विरार यार्डात नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. आठवडाभर या लोकलची टेस्टिंग होणार आहे. त्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. या नव्या लोकलमुळं पश्चिम रेल्वेच्या  10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होणार आहे.मात्र ही गाडी जलद किंवा धिम्या मार्गावर चालवण्याचा निर्णय अद्याप झाला  नाहीये. सध्या पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण 1406 फेऱ्या धावतात. मात्र यात आणखी वाढ झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेवरही नवीन लोकल
पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवरही एक लोकल मिळाली आहे. मध्य रेल्वेला सामान्य लोकल मिळाली आहे. चौथा कॉरिडॉर असलेल्या बेलापूर-उरण मार्गिकेवर सुरू असलेल्या जुन्या लोकलच्या जागेवर धावणार आहे. 12 डब्यांची ही लोकल आहे. सध्या बेलापूर-उरण विभागात तीन रेट्रोफिटेड लोकल गाड्यांचा वापर केला जातो. या तीन लोकलपैकी एक गाडी बदलून त्या जागी नवी लोकल चालवली जाणार आहे.

Loading

Facebook Comments Box

कोकणातलो ह्यो उच्चशिक्षित चेहरो, आमका विधानपरिषदेत होयो!

“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी, उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावाचे नामनिर्देशन व शिक्कामोर्तब करण्यासाठी ६७३ पानांचा प्रस्ताव सादर.

   Follow us on        

मुंबई: कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपूत्र, प्रशासकीय स्वराज्य घडविण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण व्हावे यासाठी शैक्षणिक चळवळ राबवून अविरतपणे ज्ञानदान करणारे, प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा व्याख्याते, उच्चविद्याविभूषित, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांची *समाजसेवा, कला व शिक्षण या क्षेत्रात* उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी *“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने, श्री. सचिन यशवंत रेडकर, अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे यांनी राज्यपाल कार्यालयास दिनांक १९/११/२०२४ रोजी निवेदनासोबत शोधप्रबंध स्वरूपातील दस्तावेजांप्रमाणे भाग I, II, III, IV स्वरूपात ६७३ पानांचा प्रस्ताव सादर केला.* या प्रस्तावासोबत महाराष्ट्र व कोकणातील सर्वच घटकातील इच्छुक सामाजिक संस्था/मंडळांनी राज्यपालांना संबोधित केलेले शिफारस सह पाठिंबा पत्र सुद्धा संलग्न केले आहेत अशी माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेतील कलम 171 (5) खंड (3) च्या उपखंड (ई) अंतर्गत राज्यपालांनी नामनिर्देशित केले जाणारे सदस्य खालीलप्रमाणे अशा बाबींच्या संदर्भात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल, म्हणजे: साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा असे नमूद आहे. कार्यकारी प्रमुख या नात्याने माननीय राज्यपाल आपल्या स्वविवेकाधीन (डिस्क्रेशनरी) अधिकारांचा वापर करून, सदर प्रस्तावातील संलग्न दस्तावेजांचे अवलोकन करून याबाबतीत योग्य निर्णय घेऊन, कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. त्याचप्रमाणे या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारमधील इच्छुक पक्ष सुद्धा आपल्या माध्यमातून, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, उच्चशिक्षित व्यक्तिच्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा व विधानपरिषदेत सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी नवीन मंत्रिमंडळात नक्कीच चर्चेद्वारे शिफारस करून नामनिर्देशन यादीत नाव समाविष्ट करतील असा आम्हाला व समस्त कोकणवासियांना, हितचिंतकांना एक मतदार व सुजाण नागरिक स्वरूपात आत्मविश्वास आहे, उच्चशिक्षित तरूण व्यक्तींनी विधानपरिषदेत येणे व सत्ताधारी पक्षांनी अशा व्यक्तींना संधी देणे ही लोकशाही च्या अनुषंगाने काळाची गरज आहे, तरच समाजात आमुलाग्र बदल घडू शकतील असे मत “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर यांनी व्यक्त केले.

Loading

Facebook Comments Box

सामान्य प्रवाशांना दिलासा! नोव्हेंबर अखेरपर्यंत जनरल डब्यांतून १ लाख प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेची तजवीज

Indian Raiwlays: रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्य जनतेची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेऊन रेल्वेने काही निर्णय घेऊन त्यांची अंबलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे.  त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत विविध गाड्यांमध्ये साधारण श्रेणीचे (GS) सुमारे 600 नवीन अतिरिक्त डबे जोडले आहेत. हे सर्व डबे नियमित गाड्यांमध्ये जोडण्यात आले आहेत. तर नोव्हेंबर 2024 अखेपर्यंत , सुमारे 370 नियमित गाड्यांमध्ये GS श्रेणीचे असे एक हजाराहून अधिक डबे जोडले जातील असे भारतीय रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
रेल्वेच्या ताफ्यात हे नवीन GS डबे जोडल्यामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. याशिवाय येत्या दोन वर्षांत रेल्वेच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नॉन-एसी क्लासचे डबे समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे बोर्डाने सामान्य वर्गातील रेल्वे प्रवाशांसाठी नवीन सुविधांची सविस्तर माहिती दिली आहे. भारतीय रेल्वे बोर्डचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रचार) श्री दिलीप कुमार म्हणाले की, सामान्य वर्गातील प्रवासी हे रेल्वेच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहेत. भारतीय रेल्वे सर्व श्रेणीतील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी विविध दिशेने काम करत आहे. याअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत एकूण 1000 नवीन GS डबे गाड्यांना जोडले जातील. तसेच, हे नव्याने बांधलेले डबे 370 नियमित गाड्यांमध्ये जोडण्यात आले आहेत. दररोज हजारो अतिरिक्त प्रवासी याचा लाभ घेत आहेत. या डब्यांच्या समावेशामुळे दररोज सुमारे एक लाख अतिरिक्त प्रवाशांना फायदा होणार आहे.
कार्यकारी संचालक (I&P) म्हणाले की, सामान्य वर्गातील प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन नवीन GS कोच बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत अशा 10 हजारांहून अधिक नॉन-एसी जनरल क्लासचे जीएस डबे रेल्वेच्या ताफ्यात जोडले जातील. यातील सहा हजारांहून अधिक जीएस कोच असतील, तर उर्वरित डबे स्लीपर क्लासचे असतील. एवढ्या मोठ्या संख्येने नॉन एसी डब्यांच्या समावेशामुळे सामान्य वर्गातील सुमारे आठ लाख अतिरिक्त प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करू शकतील. हे सर्व नव्याने बांधलेले नॉन एसी कोच एलएचबी प्रकारचे असतील. प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर बनवण्यासोबतच तो सुरक्षित आणि जलद होण्यासही मदत होईल. पारंपारिक ICF रेल्वे कोचच्या तुलनेत, हे नवीन LHB डबे तुलनेने हलके आणि मजबूत आहेत. अपघात झाल्यास या डब्यांचे नुकसानही अत्यल्प असेल.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील निला यांनी सांगितले की, CR 42 गाड्यांमध्ये अतिरिक्त 90 GS कोच जोडण्यासाठी सज्ज आहे ज्यामुळे दररोज 90,000 हून अधिक प्रवाशांना फायदा होईल. प्रवाशांची वाढती मागणी पाहता यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा फरक पडेल.

Loading

Facebook Comments Box

Viral Video: रेल्वे पूल उपलब्ध असताना प्रवाशांचा जीवाशी खेळ

Viral Video: रेल्वे प्रशासन अपुऱ्या सोयी देते त्यामुळे अपघात होत असतात असे आरोप सर्रासपणे प्रशासनावर होताना दिसतात. मात्र ज्या सोयी दिल्या आहेत तिचा पूर्णपणे वापर न करता जुन्या सवयींमुळे एखादा अपघात झाला तर दोष कुणाचा?
सध्या सोशल मीडियावर एक विडिओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडताना दिसत आहेत. रुळावर एक गाडी उभी आहे तिच्या खालून मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून रूळ ओलांडले जात आहे. हे खरोखर खुप धोकादायक आहे. रुळावर उभी असलेली गाडी कधीही चालू होऊ शकते आणि येथे मोठा अपघात होऊ शकतो.
जेथून रूळ ओलांडला जात आहे त्याच्या अगदी जवळच दोन्ही बाजुंना जाण्यासाठी एक पूल आहे. तरीपण प्रवासी त्याचा वापर न करता धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडत आहेत. हा विडिओ दक्षिणेकडील राज्यातील एका स्थानकावरील आहे. मात्र अशीच परिस्थिती देशातील अनेक स्थानकांवर दिसून येते. फक्त जरासा त्रास आणि वेळ वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.

Loading

Facebook Comments Box

२१ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-षष्ठी – 17:05:53 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 15:36:12 पर्यंत
  • करण-वणिज – 17:05:53 पर्यंत, विष्टि – 29:32:15 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-शुक्ल – 12:00:19 पर्यंत
  • वार-गुरूवार
  • सूर्योदय-06:52
  • सूर्यास्त- 17:57
  • चन्द्र राशि-कर्क
  • चंद्रोदय- 23:18:59
  • चंद्रास्त-11:56:59
  • ऋतु-हेमंत
जागतिक दिवस:
  • महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन
  • सेना दिवस (बांगला देश)
  • सेना दिवस (ग्रीस)
  • World Television Day
महत्त्वाच्या घटना:
  • १८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
  • १९०६: चीन ने आजच्याच दिवशी १९०६ साली अफिम च्या व्यापारावर बंदी घातली होती.
  • १९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.
  • १९४२: राजा नेने दिग्दर्शित ’दहा वाजता’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
  • १९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
  • १९५६: एकमताने आजच्याच दिवशी प्रस्ताव पारित करून शिक्षक दिनाला मान्यता देण्यात आली होती.
  • १९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
  • १९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
  • १९६३: केरळ येथील थुंबा या प्रक्षेपण केंद्रावरून आजच्याच दिवशी अग्निबाण सोडून भारतीय अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.
  • १९७१: बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.
  • १९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
  • १९८६: मध्य आफ्रिकी गणराज्याने आजच्याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता.
  • २००२: आजच्याच दिवशी जफर उल्ला खान जमाली हे पाकिस्तान चे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले होते.
  • २००५: आजच्याच दिवशी श्रीलंका या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून रत्नसिरी विक्रमनायके यांना नियुक्त करण्यात आले होते.
  • २००७: तत्कालीन पेप्सिको कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई यांना अमेरिका भारत व्यापार परिषद मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
  • २००८: आजच्याच दिवशी भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जागतिक महामंदीच्या परिस्थितीत भारत ८ टक्के इतका विकास दर गाठेल असा विश्वास व्यक्त केला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६९४: व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८)
  • १८७२: प्रसिध्द राजस्थानी कवी व स्वंतत्रता सेनानी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)
  • १९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.
  • १९१६: परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैनिक यदुनाथ सिंह यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता.
  • १९२६: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)
  • १९२७: शं. ना. नवरे – लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)
  • १९३३: हिंदी भाषेचे प्रमुख कथाकार ज्ञान रंजन यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.
  • १९४१: गुजरात राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता.
  • १९८७: ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५१७: सिकंदर शाह लोधी याचे आजच्या दिवशी निधन झाले.
  • १९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.
  • १९२१: राजनीती चे ज्ञाते व स्वतंत्रता सेनानी अविनाशलिंगम चेट्टीयार यांचे आजच्या दिवशी निधन झाले.
  • १९६३: चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (जन्म: १९ जानेवारी १८९२)
  • १९७०: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)
  • १९९६: डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)
  • १९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.
  • २०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक; ‘या’ गाड्यांच्या वेळापत्रकांवर होणार परिणाम

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वेवरील कारवार- हारवाड विभागादरम्यान पायाभूत बांधकामासाठी २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. कारवार – हारवाड विभागादरम्यान भुयारी पुलाचे बांधकाम करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान आणि १ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते दुपारी ४.३० दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
२१ नोव्हेंबरच्या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक ०९००५७ उधना – मंगळुरू रेल्वेगाडी आणि १ डिसेंबरच्या ब्लाॅकमुळे गाडी क्रमांक ११०९७ पुणे – एर्नाकुलम एक्स्प्रेस मडगाव – कारवार स्थानकादरम्यान सुमारे २ तास थांबवण्यात येणार आहे. तर, २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०६६०१ मडगाव – मंगळुरू रेल्वेगाडी मडगाववरून दुपारी २.१० वाजता सुटण्याऐवजी दुपारी ३.१० वाजता सुटेल. त्यामुळे या रेल्वेगाडीला एक तास विलंब होईल.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search