Konkan Railway: तिरुवनंतपुरम – मदार होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 06013 / 06014) अशी ही सेवा राहणार आहे.

गाडी क्र. 06013 तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन साप्ताहिक विशेष ४ मार्च २०२६ आणि ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ७:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११:०० वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. 06014 मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ७ मार्च २०२६ आणि १४ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री ९:४० वाजता मदार जंक्शन येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी रात्री १२:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.

ही विशेष गाडी कोल्लम, कायमकुलम, मावेलिकरा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिशूर, शोरनूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू, उडुपी, मुरुडेश्वर, कुमटा, करवार, मडगाव, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पनवेल, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, चित्तौडगड, भिलवाडा, बिजैनगर आणि अजमेर या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

या गाडीमध्ये एकूण २२ डबे असतील. त्यात २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर/डी डबे समाविष्ट आहेत.

Facebook Comments Box

महाराष्ट्रातील दोन ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर्स’ ना केंद्र सरकारची मंजुरी.

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्र सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH-48) वर सातारा आणि कोल्हापूर भागात दोन उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) बांधण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी एकूण २५८.९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली असून, त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत मोदी सरकारच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

या मंजुरीमुळे सातारा जिल्ह्यातील उंब्रज परिसरात सहा-लेनचा उन्नत मार्ग आणि कोल्हापूर भागात आठ-लेनचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान होईल. विशेषतः पावसाळ्यात पंचगंगा नदी परिसरात येणाऱ्या पूरामुळे होणारी वाहतूक अडचण कायमची दूर होईल. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या एकूण पायाभूत सुविधा विकासाला नवीन गती मिळेल.

हे प्रकल्प NH-48 या दिल्ली-चेन्नईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गाचा भाग आहेत, ज्यामुळे मुंबई, पुणे, बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये कोल्हापूरजवळील पंचगंगा नदीवरील ३.५७८ किलोमीटर लांबीच्या सहा-लेन उन्नत फ्लायओवरसाठी ९१३.७० कोटी रुपयांची स्वतंत्र मंजुरी देण्यात आली होती. सदर २५८.९९ कोटींची तरतूद ही अतिरिक्त किंवा पूरक असण्याची शक्यता आहे, ज्यात स्थानिक उन्नत भाग आणि संबंधित सुविधांचा समावेश असू शकतो.

रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकासमार्ग वेगाने पुढे सरकत आहे. पायाभूत सुविधांच्या या निर्णयांमुळे राज्याच्या समग्र प्रगतीला चालना मिळेल. NHAI मार्फत लवकरच या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

 

Facebook Comments Box

Konkan Railway Updates 02/03/26: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! होळीसाठी मुंबई – मडगाव मार्गावर धावणार विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई–मडगाव मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई CSMT – मडगाव – मुंबई CSMT विशेष (द्विसाप्ताहिक)

गाडी क्रमांक ०१०४९ मुंबई CSMT–मडगाव विशेष ही ३ मार्च २०२६ (मंगळवार) आणि ६ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी मुंबई CSMT येथून पहाटे ००:३० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

परतीची ०१०५० मडगाव–मुंबई CSMT विशेष ही ३ व ६ मार्च रोजी मडगावहून १६:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.

या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी या स्थानकांवर थांबा असेल.

या गाडीची रचना एकूण २० डबे असून त्यात ३ टियर एसी (इकॉनॉमी) – १८ डबे आणि जनरेटर कार – २ डबे असतील.


लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष

गाडी क्रमांक ०१०४७ लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव विशेष ही ७ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री २२:१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

परतीची ०१०४८ मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ही ८ मार्च २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी १८:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी येथे थांबा असेल.

या गाडीची रचना २२ डबे अशी असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ६, स्लीपर – ९, जनरल – ४, जनरेटर कार – १ आणि एसएलआर – १ डबा असेल.

Facebook Comments Box

Mumbai Local: गोंधळलेल्या प्रवाशांचा आधारवड: दादरचा स्थानकावरील ‘चालता-फिरता इंडिकेटर’

   Follow us on        
मुंबई: मुंबईच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण स्वतःच्या नादात असताना, दादर रेल्वे स्थानकावर एक अशी व्यक्ती पाहायला मिळते जी केवळ परोपकारासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करत आहे. नरेंद्र पाटील असे या अवलियाचे नाव असून, प्रवाशांमध्ये ते ‘चालता-फिरता इंडिकेटर’ म्हणून लोकप्रिय झाले आहेत.
निस्वार्थ सेवेचा अनोखा प्रवास
दादरमधील फूल मार्केटसमोरील नवीन रेल्वे पुलावर अनेकदा प्रवाशांचा गोंधळ उडतो. पुलावर पुरेशा फलकांचा (इंडिकेटर) अभाव असल्याने, गाडी नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल हे शोधणे प्रवाशांसाठी कसरतीचे ठरते. हीच अडचण ओळखून नरेंद्र पाटील गेल्या चार वर्षांपासून येथे विनामूल्य मार्गदर्शन करत आहेत.
नरेंद्र पाटील हे स्वतः एका खासगी कंपनीत नोकरीला असूनही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रवाशांसाठी आपला वेळ देतात. दररोज सकाळी ९:३० ते ११:३० या दोन तासांच्या वेळेत ते दादर स्थानकावरील फूल मार्केटजवळील नवीन रेल्वे पुलावर उपस्थित असतात. या ठिकाणी इंडिकेटर्सचा अभाव असल्याने गोंधळणाऱ्या प्रवाशांना ते प्लॅटफॉर्म क्रमांक, रेल्वेचे वेळापत्रक आणि योग्य मार्गांविषयी अचूक मार्गदर्शन करतात. दोन तास ही निस्वार्थ सेवा दिल्यानंतर, ते दुपारी १२ वाजता आपल्या नियमित कामावर रुजू होतात.
“नवीन पूल झाल्यानंतर अनेक प्रवासी, विशेषतः ग्रामीण भागातून परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी गोंधळून जायचे. त्यांना वेळेत योग्य गाडी मिळावी, हाच माझा यामागचा उद्देश आहे.”
— नरेंद्र पाटील
सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण
सकाळी दोन तास प्रवाशांना मदत केल्यानंतर पाटील दुपारी १२ वाजता आपल्या कामावर रुजू होतात. रेल्वे प्रशासनाचा कर्मचारी नसतानाही, केवळ प्रवाशांचा त्रास कमी व्हावा या भावनेतून ते ही सेवा देत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होत असून, सोशल मीडियावरही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची ‘लेट लतीफी’ संपेना! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

   Follow us on        

ठाणे: कोकणातील लाडक्या ‘शिमगा’ म्हणजेच होळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदा अत्यंत खडतर ठरला. रविवारी सकाळी मुंबई सीएसएमटी स्थानकातून सुटणारी तेजस एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावल्यामुळे मुंबई, ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी रखडपट्टी झाली. सकाळी ५:४० वाजता सुटणारी ही गाडी प्रत्यक्षात दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी सुटली.

रेल्वे प्रशासनाकडून गाडी उशिरा असल्याची पूर्वसूचना वेळेवर न मिळाल्याने, अनेक प्रवासी पहाटेच स्थानकावर पोहोचले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, मात्र तिथे स्वच्छतागृहे किंवा विश्रांतीगृहांची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

​या विलंबाबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती वेळेत देण्यात आली नाही. सुरुवातीला गाडी १०:५० ला सुटेल असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात तिला सात तास उशीर झाला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे हा उशीर झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.

तेजस, जनशताब्दी आणि मांडवी यांसारख्या गाड्यांना होणारा उशीर आता नित्याचीच बाब झाली असून, सण-उत्सवाच्या काळात रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने अक्षरशः ‘शिमगा’ केला. एका दिवसाच्या या खोळंब्याचा परिणाम परतीच्या प्रवासावरही होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोकणातील रेल्वे समस्यांकडे राज्य सरकारनेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. अलीकडेच बोट सेवेचा शुभारंभ करताना कोकणाच्या विकासाचा उल्लेख झाला असला, तरी रेल्वे प्रवासातील अडचणींचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला सुधारणा करण्यास भाग पाडावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Facebook Comments Box

कोकण–कोल्हापूर कनेक्टिव्हिटीला बूस्ट! एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन नवे घाट मार्ग प्रस्तावित

   Follow us on        

वारणानगर: कोल्हापूर जिल्हा, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील दळणवळण तसेच पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी तीन नवीन घाट रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. हे नवीन मार्ग कोल्हापूरला थेट कोकणाशी जोडणार असून, यामुळे दोन्ही विभागांच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे.

या संदर्भात आमदार कोरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रस्तावित कामांना लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.

प्रस्तावित नवीन घाट रस्ते खालीलप्रमाणे आहेत:

१. पावनखिंड ते देवडे-भोवडे मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे यांना जोडणारा नवीन घाट मार्ग तयार करणे.

२. अणुस्कुरा ते भांबेड मार्ग: शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा-गावडवाडी (कोल्हापूर जिल्हा हद्द) ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-धनगरवाडी या दोन जिल्ह्यांना जोडणारा घाट रस्ता बांधणे.

३. वाशी-पडसाळी ते काजिर्डा मार्ग: पन्हाळा तालुक्यातील वाशी-पडसाळी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिर्डा यांना जोडणाऱ्या नवीन घाट रस्त्याचे काम करणे.

या बैठकीप्रसंगी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मान्यवरांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारीदेखील या चर्चेत सहभागी झाले होते.

थोडक्यात सांगायचे तर: या तीनही नवीन घाट रस्त्यांच्या कामांमुळे कोल्हापूर आणि कोकणातील अंतर कमी होणार असून, दुर्गम भागातील दळणवळणाची समस्या सुटण्यास मदत होईल. विशेषतः विशाळगड आणि पावनखिंड परिसरातील ऐतिहासिक पर्यटनाला यामुळे मोठी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Facebook Comments Box

Video: मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवेचा शुभारंभ! पहिली बोट कोकणच्या दिशेने रवाना

   Follow us on        

मुंबई: मुंबई ते कोकणातील विजयदुर्ग दरम्यान M2M फेरीज ची रो-रो (Ro-Ro) सेवा आज, १ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथे सकाळी ८ वाजता मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा  उद्घाटन सोहळा पार पडला.

रो-पॅक्स सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्गचा प्रवास रस्त्याने १०-१२ तासांऐवजी केवळ ५ ते ७ तासांत पूर्ण होऊ शकतो. ही सेवा शिमगा (होळी) सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली असून, कोकणवासीयांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाली आहे. M2M Princess ही उच्च गतीची फेरी वापरली जात असून, यात प्रवासींसह दुचाकी आणि चारचाकी वाहनेही नेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

उद्घाटन फेरीच्या पहिल्याच दिवशी बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक प्रवासी या नव्या समुद्री मार्गाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. ही सेवा कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही १६ दिवसांच्या पायलट टप्प्यातील सेवा असून, भविष्यात नियमित आणि विस्तारित स्वरूपात चालवली जाणार आहे.

 

 

 

Facebook Comments Box

रेल्वे ट्रॅफिक ब्लॉक: उन्हाळी सुट्टीत रेल्वेने गोव्याला जायचा बेत असेल तर ही बातमी वाचाच!

   Follow us on        

हुबळी: दक्षिण पश्चिम रेल्वेच्या घाट विभागात असलेल्या कॅसलरॉक आणि कुलेम स्थानकांदरम्यान ‘बीसीएम’ (BCM) कामासाठी दररोज ५ तासांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २८ एप्रिल २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत सकाळी ११:०० ते दुपारी १६:०० वाजेपर्यंत असेल.

उन्हाळी सुट्ट्यांच्या पर्यटनाला फटका

हा ब्लॉक नेमका उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या हंगामात घेण्यात येत असल्याने, उन्हाळ्यात गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आणि नियमित प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक गाड्या वास्को-द-गामा (गोवा) पर्यंत न जाता हुबळीलाच थांबणार असल्याने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.

या ब्लॉक मुळे वास्को-द-गामा आणि हुबळी दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे.

१. हुबळीपर्यंतच धावणाऱ्या गाड्या (Short Termination)

खालील गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकाऐवजी हुबळी (Hubballi) स्थानकावर थांबतील आणि तेथूनच परतीच्या प्रवासाला निघतील. म्हणजेच हुबळी ते वास्को-द-गामा दरम्यान या गाड्या रद्द राहतील:

शालिमार – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१८०४७): २५ एप्रिल ते ४ जून दरम्यानच्या ठराविक तारखांना ही गाडी हुबळीपर्यंतच धावेल.

तिरुपती/हैदराबाद – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७४१९/१७०२१): ३० एप्रिल ते ४ जून दरम्यान (दर गुरुवारी) हुबळीपर्यंत धावेल.

सिकंदराबाद – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७०३९): २९ एप्रिल ते ५ जून दरम्यान हुबळीपर्यंत धावेल.

जसिडिह – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७३२२): २७ एप्रिल ते १ जून दरम्यान हुबळीपर्यंत धावेल.

 

२. हुबळीवरून सुटणाऱ्या गाड्या (Partial Cancellation)

परतीच्या प्रवासात खालील गाड्या वास्को-द-गामा ऐवजी हुबळी स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेनुसार सुटतील:

वास्को-द-गामा – शालिमार एक्सप्रेस (१८०४८): २८ एप्रिल ते ७ जून.

वास्को-द-गामा – तिरुपती/हैदराबाद एक्सप्रेस (१७४२०/१७०२२): १ मे ते ५ जून.

वास्को-द-गामा – सिकंदराबाद एक्सप्रेस (१७०४०): ३० एप्रिल ते ६ जून.

वास्को-द-गामा – जसिडिह एक्सप्रेस (१७३२१): १ मे ते ५ जून.

 

३. गाड्यांच्या मार्गात बदल (Diversion)

काही लांब पल्ल्याच्या गाड्या घाट विभागातील काम टाळण्यासाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत:

गाडी क्रमांक व नाव वळवलेला मार्ग रद्द केलेले थांबे
११०९७ पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस पुणे – पनवेल – रोहा – मडगाव
सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, लोंढा इ.
११०९८ एर्नाकुलम – पुणे एक्सप्रेस मडगाव – रोहा – पनवेल – पुणे
मडगाव ते पुणे दरम्यानचे सर्व मुख्य थांबे
१७३१५ वास्को – वेलंकन्नी एक्सप्रेस मडगाव – मंगळुरू – शोरानूर – इरोड
हुबळी, दावणगेरे, तुमकुर, बेंगळुरू, सालेम इ.
१७३१६ वेलंकन्नी – वास्को एक्सप्रेस इरोड – शोरानूर – मंगळुरू – मडगाव
सालेम, बेंगळुरू, हुबळी, धारवाड, लोंढा इ.
Facebook Comments Box

दहावी बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या केंद्रांवर कारवाई; १०७ परीक्षा केंद्रांवर कायमस्वरूपी बंदी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. राज्यातील तब्बल १०७ परीक्षा केंद्रांना गैरप्रकार आणि अनियमिततेच्या आरोपाखाली ‘काळ्या यादीत’ (Blacklist) टाकण्यात आले आहे. या केंद्रांवर पेपर फुटी, सामूहिक कॉपी आणि बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने ही कारवाई केली असून, आता या केंद्रांवर पुढील बोर्ड परीक्षा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

​शिक्षण विभागाने यावर्षी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) देखरेख, भरारी पथके आणि काही ठिकाणी ड्रोन सर्व्हिलन्सचाही वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच एका केंद्रावर एआय (AI) टूल्सचा वापर करून विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय दक्षता समित्या आणि विशेष भरारी पथकांद्वारे परीक्षेच्या पारदर्शकतेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. राज्य सरकारने स्पष्ट ताकीद दिली आहे की, परीक्षेच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी किंवा गैरप्रकार आढळल्यास ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

Facebook Comments Box

मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ!

   Follow us on        

मुंबई: प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर-मडगाव, दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या सहा विशेष गाड्यांच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ १ मार्च २०२६ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू असेल.

​विशेष म्हणजे, या गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

​या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये झाली वाढ:

​नागपूर – मडगाव विशेष (०११३९): ही गाडी आता दर बुधवार आणि शनिवारी धावेल.

​मडगाव – नागपूर विशेष (०११४०): ही गाडी आता दर गुरुवार आणि रविवारी धावेल.

​दादर – गोरखपूर विशेष (०१०२७): ही गाडी आठवड्यातून चार दिवस म्हणजे दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल.

​गोरखपूर – दादर विशेष (०१०२८): ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल.

​दादर – बलिया विशेष (०१०२५): ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल.

​बलिया – दादर विशेष (०१०२६): ही गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल.

​प्रवाशांसाठी सूचना:

​रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांच्या माहितीसाठी enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES (National Train Enquiry System) अ‍ॅपचा वापर करावा. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्या किंवा इतर सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search