मुंबई:
कोकण आणि दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे (Permanent Augmentation of Coaches) जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार असून, त्यांना आरक्षणासाठी जादा जागा उपलब्ध होणार आहेत.
कोणत्या गाड्यांमध्ये आणि कधीपासून होणार बदल?
१. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव जंक्शन – एक्सप्रेस (गाडी क्र. ११0९९ / १११००)
बदल: या गाडीत एक ‘३ टियर एसी’ (3 Tier AC) डबा वाढवण्यात आला आहे. यामुळे आता गाडीमधील एकूण डब्यांची संख्या २२ वरून २३ झाली आहे.
कधीपासून लागू?
गाडी क्र. ११0९९ (LTT ते मडगाव) – १७ जुलै २०२६ पासून.
गाडी क्र. १११०० (मडगाव ते LTT) – १८ जुलै २०२६ पासून.
२. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – करमळी – एक्सप्रेस (गाडी क्र. २२११५ / २२११६)
बदल: या गाडीत देखील एक ‘३ टियर एसी’ (3 Tier AC) डबा वाढवून एकूण डब्यांची संख्या २२ वरून २३ करण्यात आली आहे.
कधीपासून लागू?
गाडी क्र. २२११५ (LTT ते करमळी) – २३ जुलै २०२६ पासून.
गाडी क्र. २२११६ (करमळी ते LTT) – २३ जुलै २०२६ पासून.
३. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – एरनाकुलम जंक्शन – दुरंतो एक्सप्रेस (गाडी क्र. १२२२३ / १२२२४)
बदल: या अतिवेगवान गाडीत एक ‘२ टियर एसी’ (2 Tier AC) आणि एक ‘३ टियर एसी’ (3 Tier AC) असे एकूण २ अतिरिक्त डबे वाढवण्यात आले आहेत. यामुळे गाडीची एकूण डब्यांची क्षमता २२ वरून थेट २४ झाली आहे.
कधीपासून लागू?
गाडी क्र. १२२२३ (LTT ते एरनाकुलम) – १८ जुलै २०२६ पासून.
गाडी क्र. १२२२४ (एरनाकुलम ते LTT) – १९ जुलै २०२६ पासून.
प्रवाशांनी या गाड्यांच्या सुधारित वेळेसाठी आणि थांब्यांच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी. तसेच कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी ‘KR Mirror App’ डाऊनलोड करावे, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


