पुणे, दि. ११ एप्रिल: मुलांच्या परीक्षा संपल्या की वेध लागते ते गावी जायचे. शहरातील भयंकर उकाडा सहन करण्यापेक्षा सुट्टी घेऊन ती गावीच खर्च करावी अशी जवळपास सर्वच चाकरमान्यांची इच्छा. यासाठी त्याची तीन चार महिनेच प्लॅनिंग चालू होते. त्यात गावी जाण्यासाठी रेल्वे आरक्षण करणे हे प्राधान्याने येतेच. मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नियमित गाड्यांची तिकिटे मिळणे खूपच अवघड होते. अशा वेळी रेल्वेच चाकरमान्यांच्या मदतीला धावून येते. काही विशेष गाड्या सोडून किंवा आहे त्या गाड्यांच्या फेर्या वाढवून प्रवाशांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
याचाच एक भाग म्हणुन प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एका विशेष गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते पुणे दरम्यान चालविण्यात येणार्या 01165/01166 गाडीच्या फेर्या वाढविण्यात येणार आहे. सध्या ही गाडी आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येते. मात्र दिनांक 18 एप्रिल ते 14 जून या कालावधीत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण 18 अतिरिक्त फेर्या होणार आहेत.
दिनांक 18 एप्रिलपासून नागपूर (01165) येथून दर गुरुवारी तर दिनांक 19 एप्रिल पासून दर शुक्रवारी पुणे(01166) येथून हा अतिरिक्त फेर्या सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
२) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११२९/०११३०
Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर अजून २ गाड्या; एकूण ३२ फेऱ्या – Kokanai
सविस्तर वृत्त 👇🏻https://t.co/I1b7zf3xfS#konkanrailway #KonkanNews pic.twitter.com/fLVRF9LsAE
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) April 11, 2024
गोवा पर्यटन :गोवा म्हंटले तर डोळ्यासमोर येतात येथील सागरी किनारे, जुनी मंदिरे आणि देशातील ईतर भागांपेक्षा येथे निर्माण झालेली एक वेगळी संस्कृती. या गोष्टींमुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र याव्यतिरिक्त गोव्यात अजून काही गोष्टी आहेत ज्यामुळे येथील पर्यटनात भर पडत आहे.
उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज Usgalimal Rock Engravings म्हणजे गोव्याच्या हिरव्यागार जंगलात एक लपलेले रत्न जणूच जे प्राचीन भूतकाळातील रहस्ये उलगडत आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस मुसळधार पावसाने कुशावती नदीच्या उत्तरेकडील किनारी भागाच्या जमिनीचा वरील स्तर मोकळा होऊन लॅटराइट-स्टोन ग्राउंडच्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या शंभर कातळशिल्पांचा शोध लागला. ही कातळशिल्पे जवळ जवळ 20,000 ते 30,000 जुनी असल्याचे बोलले जाते. या कातळशिल्पांच्या अभ्यासाअंती प्राचीन काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. अशी ही दगडावर कोरलेली रहस्यमय कातळशिल्पे केवळ आपल्या पूर्वजांच्या कलात्मक क्षमतेचाच पुरावा नाही तर त्या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलकही देतात. तुमचा जर गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा बेत असेल तर ही तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात हे स्थळ समाविष्ट करायला विसरू नका.
उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज 20,000 वर्षे जुनी आहेत आणि भारतातील सर्वात जुनी रॉक कला आहे, जी प्रागैतिहासिक काळापासून आहे. ते प्राणी, मानव, चिन्हे आणि नमुने दर्शवितात, बहुधा सुरुवातीच्या शिकारी-संकलक समुदायांनी तयार केले होते. ज्याचा उपयोग विधी आणि कथाकथनासाठी केला गेला असण्याची शक्यता आहे. साइटचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखक थेमिस्टोक्ल्स डिसिल्व्हा यांच्या म्हणण्यानुसार, कोरीव काम करण्यासाठी दगडी अवजारांचा वापर करण्यात आला होता. कोरीव काम समुदायासाठी महत्त्वपूर्ण होते, जे त्यांचे जग आणि त्यांच्या सभोवतालचे ज्ञान प्रतिबिंबित करते. दगड आणि खडकांवर अनुभवांची नोंद करण्याची ही प्रथा पूर्व-साक्षर काळात मानवी पूर्वजांमध्ये प्रचलित होती.हे कोरीवकाम ज्यांनी निर्माण केले त्या लोकांच्या सांस्कृतिक पद्धती, श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाबद्दल ते प्रकट करतात. प्रत्येक कोरीवकाम दीर्घकाळ गेलेल्या युगाची झलक देते, जे आम्हाला आमच्या पूर्वजांच्या जीवनावर आणि त्यांच्या नैसर्गिक जगाशी असलेल्या खोल संबंधांवर विचार करण्यास भाग पाडत आहे. डिसिल्व्हा यांनी एका वैज्ञानिक पेपरच्या स्वरूपात केलेल्या दस्तऐवजीकरणानुसार, उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज हे कोरलेल्या प्रतिमांचे वर्गीकरण आहे ज्यात साप, बैल, कुत्रे, शेळ्या, हरीण, मोर, गरुड, मासे आणि पृथ्वी माता यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. मानवी आकृत्या प्रामुख्याने पूर्वेकडे वसलेल्या आहेत. अनेक लहान प्राणी, मुख्यतः कॅप्रिड्स, खडकाळ प्लॅटफॉर्मवर विखुरलेले आहेत.
कशी भेट द्याल?
पत्ता: 44CM+86P, Rivona VP, Goa 403704
वेळ: 24 तास उघडे
विशेष सुचना:कोरीव कामांची तोडफोड आणि इतर हानीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात नाही. तथापि, त्यांचे अन्वेषण करण्यास उत्सुक असलेले अभ्यागत स्थानिक पुरातत्व अधिकारी किंवा हेरिटेज संस्थांद्वारे मार्गदर्शित टूरची व्यवस्था करू शकतात. हे टूर सामान्यत: अभ्यागतांना विशिष्ट साइटवर घेऊन जातात जेथे ते प्रशिक्षित तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खडकातील कोरीवकाम पाहू शकतात जे त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी देतात.
सावंतवाडी, दि. १० एप्रिल : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जीआय मानांकन Geographical Indication (GI) दिले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला संरक्षण प्राप्त झाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला महत्व येणार आहे.
सावंतवाडीच्या राजघराण्याने हे मानांकन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. लाकडी खेळणी आणि सावंतवाडी लॅकर्स वेअर संस्थेच्या गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने नेहमीच संरक्षण दिले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या संदर्भात संस्थानचे बाळराजे आणि युवराज लखमराजे भोसले आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.
जी. आय. मानांकन म्हणजे काय?
हे एक मानांकन आहे. हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो.
जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू/पदार्थ/उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवा व्दितीय असल्याची पावती आहे.थोडक्यात कुठल्याही वस्तूला जीआय मानांकन मिळण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष असतात. एक म्हणजे ती वस्तू एका विशिष्ट भौगोलिक भागात एका विशिष्ट पद्धतीने बनविली गेली असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या वस्तूचा विशिष्ट दर्जा किंवा गुण हा ती त्या भागात बनल्यामुळे असला पाहिजे. तर आणि तरच त्या वस्तूला जी आय मानांकन दिला जातो. आणि जीआय हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे. विशेषत: शेतीमाल असेल तर (आंबे, द्राक्षे, चिकू, तांदूळ इ.) किंवा हाताने बनविली जाणारी वस्तू किंवा पदार्थ असेल तर (हातमागावर विणली जाणारी वस्त्रे, हाताने बनविली जाणारी खेळणी किंवा इतर वस्तू). कारण शेतात उगवणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात त्या त्या भागातली माती, हवामान, पर्जन्यमान यांसारख्या गोष्टींमुळे. तर हाताने बनविल्या जाणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात तिथल्या कारागिरांचा अनुभव, परंपरागत कौशल्ये, पिढीजात कला यांसारख्या गोष्टींमुळे. आणि म्हणूनच अशा काही गोष्टींबाबत त्या कुठे बनल्या हे फार महत्त्वाचे असते. आणि आपण कित्येकदा पाहतो की त्या जागेनुसार त्या वस्तूचा भाव आणि दर्जा ठरत असतो.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत आरवली रोड ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) Train no. 12617 Ernakulam – H. Nijamuddin Express
या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज. – रत्नागिरी विभागादरम्यान 1 तास 45 मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.
2) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express
या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज. – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणार्या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे
S. R. Y. Production प्रस्तुत, निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकट आणि दिग्दर्शक कारिवडे गावच्या सागर गोसावी यांच्या संकल्पनेतून 'संभ्रम' ही रहस्यमय कथा साकारली आहे. ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते. प्रेक्षकांच्या मनातही भ्रम निर्माण होतो.
लोकसभा निवडणुकीचा जो उमेदवार प्रवासी संघटनेच्या मागण्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.