आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 27:18:47 पर्यंत
- नक्षत्र-शतभिष – 13:41:12 पर्यंत
- करण-किन्स्तुघ्ना – 16:49:30 पर्यंत, भाव – 27:18:47 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-सिद्ध – 20:07:11 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:01
- सूर्यास्त- 18:42
- चन्द्र-राशि-कुंभ – 29:58:41 पर्यंत
- चंद्रोदय- 07:09:00
- चंद्रास्त- 19:11:00
- ऋतु- वसंत
- राष्ट्रीय विज्ञान दिन
- रेअर डिसीज डे (28 किंवा 29 फेब्रुवारी)
- 1922: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1928: डॉ. सी. व्ही. रमन यांच्या भौतिकशास्त्रातील शोधाला रमन इफेक्ट असे नाव देण्यात आले. हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- 1935: शास्त्रज्ञ वॉलेस कॅरोथर्स यांनी नायलॉनचा शोध लावला.
- 1940: बास्केटबॉल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर प्रसारित झाला.
- 1959: डिस्कव्हरर 1, एक अमेरिकन गुप्तचर उपग्रह जो ध्रुवीय कक्षेत पोहोचण्याचा पहिला उद्देश होता, त्याचे प्रक्षेपण करण्यात आले परंतु कक्षा गाठण्यात अपयश आले.
- 1990: एसटीएस-36 वर स्पेस शटल अटलांटिसचे प्रक्षेपण झाले.
- 2024: भारताचे पंतप्रधान मोदी यांनी भारतातील दुसऱ्या अंतराळ स्पेसपोर्टचे ‘कुलशेखरपट्टिनम’ उद्घाटन केले.
- 1873: ‘सर जॉन सायमन’ – सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1954)
- 1897: ‘डॉ. शंकर दामोदर पेंडसे’ – मराठी ग्रंथकार यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1974)
- 1901: ‘लिनस कार्ल पॉलिंग’ – रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1994)
- 1927: ‘कृष्णकांत’ – भारताचे 10 वे उपराष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 2002)
- 1929: ‘रंगास्वामी श्रीनिवासन’ – भारतीय-अमेरिकन संशोधन यांचा जन्म.
- 1942: ‘ब्रायन जोन्स’ – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1969)
- 1944: ‘रवींद्र जैन’ – पद्मश्री पुरस्कार प्राप्त, भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑक्टोबर 2015)
- 1947: ‘दिग्विजय सिंग’ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1948: ‘बिनेंश्वर ब्रह्मा’ – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑगस्ट 2000)
- 1948: ‘विदुषी पद्मा तळवलकर’ – ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका यांचा जन्म.
- 1951: ‘करसन घावरी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1572: ‘उदयसिंग II’ – मेवाड देशाचे राजा यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1522)
- 1926: ‘गोविंद त्र्यंबक दरेकर’ – स्वातंत्र्यशाहीर यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1874)
- 1936: ‘कमला नेहरू’ – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1899)
- 1963: ‘डॉ. राजेन्द्र प्रसाद’ – भारताचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 3 डिसेंबर 1884)
- 1966: ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 3 ऑगस्ट 1898)
- 1967: ‘हेन्री लूस’ – टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 3 एप्रिल 1898)
- 1995: ‘कॄष्ण गंगाधर दिक्षीत’ – कथा, संवाद व गीतलेखक यांचे निधन. (जन्म: 12 एप्रिल 1914)
- 1998: ‘राजा गोसावी’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1925)
- 1999: ‘भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी’ – औध संस्थानचे राजे यांचे निधन.




Megablock on Central Railway: मुंबई सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या कामासाठी मध्यरेल्वे या स्थानकावर या आठवड्यात एक ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून सुटणार्या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्यांचा समावेश असून याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.
आरंभ स्थानकांमध्ये बदल करण्यात आलेल्या गाड्या
दिनांक ०१ मार्च रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून या स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु जाणार आहे.
दिनांक ०२ मार्च रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२२२९ मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्या दादरवरून या स्थानकावरील नियोजित वेळेत आपला प्रवास सुरु करणार आहेत. तर गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल स्थानकावरून पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु करणार आहे.
अंतिम स्थानकांत बदल करण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास दिनांक २६ फेब्रुवारी ते ०१ मार्च दरम्यान दादरला तर गाडी क्रमांक १२१३४ मंगलोर मुंबई एक्सप्रेस या गाडीचा प्रवास ठाण्याला संपविण्यात येणार आहे.
दिनांक ०१ मार्च रोजी गाडी क्रमांक २०११२ मडगाव -सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०१०४ मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस-या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्दशी – 08:57:29 पर्यंत, अमावस्या – 30:16:57 पर्यंत
- नक्षत्र-धनिष्ठा – 15:44:35 पर्यंत
- करण-शकुन – 08:57:29 पर्यंत, चतुष्पाद – 19:39:59 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शिव – 23:40:27 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07. 01
- सूर्यास्त- 18:42
- चन्द्र-राशि-कुंभ
- चंद्रोदय- चंद्रोदय नाही
- चंद्रास्त- 18:10:00
- ऋतु- वसंत
- मराठी भाषा गौरव दिन
- 1594: हेन्री चौथा फ्रान्सचा राजा झाला.
- 1844: डोमिनिकन रिपब्लिकला हैतीपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1900: ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
- 1940: मार्टिन कामेन आणि सॅम रुबेन यांनी कार्बन-14 चा शोध लावला.
- 1967: डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- 2001: चांदीपूर तळावर जमिनीपासून आकाशापर्यंत अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या स्वदेशी विकसित आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
- 1912: ‘विष्णू वामन शिरवाडकर’ – ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला
- 1912: ‘विष्णू वामन शिरवाडकर’ – ‘कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी यांचा जन्म(मृत्यू: 10 मार्च 1999)
- 1925: ‘शोइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 14 फेब्रुवारी 2023)
- 1926: ‘ज्योत्स्ना देवधर’ – मराठी व हिन्दी लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2013)
- 1932: ‘एलिझाबेथ टेलर’ – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 मार्च 2011)
- 1986: ‘संदीप सिंग’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
- 1892: ‘लुई वूत्तोन’ – फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1821)
- 1894: ‘कार्ल श्मिट’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 जून 1822)
- 1987: ‘अदि मर्झबान’ – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक यांचे निधन.
- 1931: ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांनी प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: 23 जुलै 1906)
- 1956: ‘गणेश वासुदेव मावळणकर’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1888)
- 1987: ‘अदि मर्झबान’ – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि संपादक यांचे निधन.
- 1997: ‘श्यामलाल बाबू राय’ – गीतकार यांचे निधन.
- 2010: ‘नानाजी देशमुख’ – भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
- 2012: ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1929)




चिपळूण : पुणे येथून चिपळूणला येत असताना कुंभार्ली घाटातील काळकडा येथील अवघड वळणावरून कार 500 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रविवारी रात्री घडली. मात्र मंगळवारी दुपारी मोबाईल लोकेशनमुळे हा अपघात उघडकीस आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की विश्वजित जगदीश खेडेकर (40) आपल्या मातोश्री सुरेखा जगदीश खेडेकर (70) आणि आपल्या पत्नी समवेत रविवारी चिपळूणला काही कामानिम्मीत निघाले. वाटेत विश्वजितने आपल्या पत्नीला सातारा येथे माहेरी सोडून तो आईला घेऊन चिपळूणकडे निघाला. वाटेत रात्री पाटणजवळ जेवणही केले. विश्वजितच्या पत्नीने या दोघांनाही वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्वजितचा मोबाईल बंद होता, तर सासू सुरेखा यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती. शेवटी त्यांच्या पत्नीने जिथे ते जाणार होते तेथे फोन करून विचारणा केली. मात्र तिकडे कुणी पोहोचले नसल्याचे समजले.
वाटेत काही तरी विपरीत घडले असावे असा संशय त्यांना आला आणि त्यांनी पोलिसांची मदत मागितली. पोलिसानी दोघांचेही मोबाईल लोकेशन तपासले असता ते कुंभार्ली घाटात आढळून आले. त्यानंतर पोलीस, ग्रामस्थांसमवेत घाटात येऊ पाहणी सुरू केली. याचवेळी काळाकडा येथून कार घसरत गेल्याचे दिसून आल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 500 फूट दरीत कार सापडली. त्यामध्ये दोघेही मृतावस्थेत आढळले. रात्री क्रेनच्या माध्यमातून दोन्ही मृतदेहांसह कार दरीतून बाहेर काढण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमानेंसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




वाडा: तरूण मंडळ उचाट आयोजित दिवंगत आधार स्तंभांच्या स्मरणार्थ ३८वा क्रीडा महोत्सव – समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५, सर्व पदाधिकारी, सभासद तसेच ग्रामस्थ यांच्या उत्तम आयोजन, नियोजनामुळे यशस्वीपणे पार पडली.
स्पर्धेत सहभागी २२ संघानी आपल्या बहारदार खेळाचे प्रदर्शन करून क्रीडा रसिकांची मने जिंकली. उपांत्य फेरीत वाघजाई कोळकेवाडी संघाने प्रतिस्पर्धी कळकवणे क्रीडा मंडळास पराभुत करून तर केदारनाथ कोयनावेळे संघाने प्रतिस्पर्धी कादवड क्रीडा मंडळास पराभुत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात केदारनाथ संघाने उत्तम बचाव करत मध्यंतरापर्यत ५ गुणांची आघाडी घेत सामन्यात रंगत आणली. दुसऱ्या सत्रात पवन मोरे, ओमकार कदम, निखिल, किरण, विपुल यांच्या बहारदार खेळाने आघाडी १० गुणांनी वाढविण्यात केदारनाथ संघ यशस्वी झाला. वाघजाई कोळकेवाडी संघाच्या आदित्य शिंदे व श्रीपाद कुंभार यांनी यशस्वी सुपर टॅकल करत सामन्यात पुन्हा रंगत आणली पण अंतिम सामन्यात चढाईपटु आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात कमी पडल्याने वाघजाई संघाला उपविजेपदावर समाधान मानावे लागले तर केदारनाथ संघाने चढाई व सर्वोत्तम बचावाचा जोरावर समाजस्तरीय स्पर्धेतील सलग दुसऱ्या अंतिम विजेतेपदाला गवसणी घातली.
केदारनाथच्या ओमकार कदम सुरेख सुंदर अष्टपैलु खेळाचे प्रदशर्न करीत सर्वोत्तम खेळाडु तर वाघजाईच्या साईराज कुंभार सर्वोत्तम चढाईपटु व प्रोस्टार आदित्य शिंदे सर्वोत्तम पक्कडपटू होण्याचा मान पटकावला. जय भवानी क्रीडा मंडळ टेरव या संघास शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रीय खेळाडू सुशील ब्रीद, रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, ठाणे शहर रा. काँ. (शरद पवार गट) अरविंदराव मोरे, संयोजक कोकण पदवीधर प्रकोष्ठ भाजपा सचिनराव मोरे, दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अरुणराव शिंदे, उचाट शिक्षण संस्था अध्यक्ष प्रभाकरराव मोरे, अशोक बुवा मोरे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 11:11:31 पर्यंत
- नक्षत्र-श्रवण – 17:24:25 पर्यंत
- करण-वणिज – 11:11:31 पर्यंत, विष्टि – 22:08:21 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-परिघ – 26:57:09 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 07:02
- सूर्यास्त- 18:41
- चन्द्र-राशि-मकर – 28:36:00 पर्यंत
- चंद्रोदय- 30:22:59
- चंद्रास्त- 16:33:00
- ऋतु- वसंत
- थर्मस बॉटल दिवस
- 1411: अहमदाबाद स्थापना दिवस
- 1909: लंडनमधील पॅलेस थिएटरमध्ये सर्वसामान्यांना दाखवण्यात आलेला ‘किनेमाकलर’ हा पहिला यशस्वी रंगीत चित्रपट आहे.
- 1945: दुसरे महायुद्ध: अमेरिकन सैन्याने जपानी लोकांकडून फिलीपिन्स बेट कोरेगिडोर परत मिळवले.
- 1966: अपोलो कार्यक्रम: AS-201 चे प्रक्षेपण, सॅटर्न आयबी रॉकेटचे पहिले उड्डाण.
- 1976: व्ही. एस. खांडेकर यांना त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- 1984: भारतीय उपग्रह ‘इनसॅट-1-ई’ राष्ट्राला समर्पित करण्यात आला.
- 1998: परळी-वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्पाने एकाच दिवसात 14.709 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करून (भारतात आणि त्यावेळी) वीज निर्मितीचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
- 1874: ‘सूरसिंह तख्तसिंह गोहिल’ – प्रसिद्ध गुजराथी कवी यांचा जन्म.
- 1887: ‘बी. एन. राऊ’ – भारतीय नागरी सेवक आणि कायदेतज्ज्ञ यांचा जन्म.
- 1908: ‘लीला मुजुमदार’ – भारतीय लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 2007)
- 1922: ‘मनमोहन कृष्ण’ – अभिनेता यांचा जन्म.(मृत्यू: 3 नोव्हेंबर 1990)
- 1937: ‘मनमोहन देसाई’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 1 मार्च 1994)
- 1957: ‘शक्तिकांत दास’ – निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांचा जन्म
- 1994: ‘बजरंग पुनिया’ – भारतीय पुरुष कुस्तीगीर यांचा जन्म
- 1877: ‘मेजर थॉमस कॅन्डी’ – कोशकार व शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1804)
- 1886: ‘नर्मदाशंकर दवे’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 24 ऑगस्ट 1833)
- 1887: ‘आनंदी गोपाळ जोशी’ – भारतीय डॉक्टर यांचा जन्म. (जन्म: 15 मार्च 1865)
- 1903: ‘रिचर्ड जॉर्डन’ – गटलिंगगटलिंग गन चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 12 सप्टेंबर 1818)
- 1937: ‘एल. के. अनंतकृष्ण अय्यर’ – मानववंशशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1862)
- 1966: ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ – यांचे निधन. (जन्म: 28 मे 1883)
- 1994: ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते यांचे निधन. (जन्म: 4 मार्च 1906)
- 2003: ‘राम वाईरकर’ – व्यंगचित्रकार यांचे निधन.
- 2004: ‘शंकरराव चव्हाण’ – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1920)
- 2005: ‘जेफ रस्किन’ – अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉश चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1943)
- 2010: ‘चंडीकादास अमृतराव देशमुख’ – समाजसुधारक व संघप्रचारक यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन
प्रवाशांसाठी गैरसोयीचे
फलाटाची कमी लांबी
दिवा स्थानकासाठी ५ डबे राखीव असावेत
आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 12:50:44 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 18:32:04 पर्यंत
- करण-तैतुल – 12:50:44 पर्यंत, गर – 24:05:58 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-व्यतापता – 08:14:38 पर्यंत, वरियान – 29:50:33 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:03
- सूर्यास्त- 18:41
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 29:41:59
- चंद्रास्त- 16:04:59
- ऋतु- वसंत
- 1510: पोर्तुगीज सरदार आल्फोन्सो आल्बुकर्क याने पणजीचा किल्ला जिंकला.
- 1818: लेफ्टनंट कर्नल डिफेनने चाकणचा किल्ला उद्ध्वस्त केला. ब्रिटिशांनी दख्खनचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी सह्याद्रीतील बहुतेक किल्ले उद्ध्वस्त केले.
- 1935: मुंबई-नागपूर-जमशेदपूर मार्गावर फॉक्स मॉथ विमानाने हवाई टपाल सेवा सुरू केली.
- 1945: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू जहाजांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
- 1945: दुसरे महायुद्ध – तुर्कीने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले.
- 1968: मोहम्मद हिदायतुल्ला यांनी भारताचे 11 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1988: पहिल्या भारतीय बनावटीच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
- 1884: ‘रविशंकर व्यास’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.
- 1940: ‘विनायक कोंडदेव ओक’ – बालवाङ्मयकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1914)
- 1943: ‘जॉर्ज हॅरिसन’ – बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 नोव्हेंबर 2001)
- 1948: ‘डॅनी डेंग्झोप्पा’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- 1974: ‘दिव्या भारती’ – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1993)
- 1778: ‘जोस डे सान मार्टिन’ – पेरू देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 ऑगस्ट 1850)
- 1981: ‘शाहिद कपूर’ – चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- 1599: ‘संत एकनाथ’ – यांचे निधन.
- 1964: ‘शांता आपटे’ – चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.
- 1978: ‘डॉ. प. ल. वैद्य’ – प्राच्यविद्यासंशोधक यांचे निधन. (जन्म: 29 जून 1891)
- 1980: ‘गिरजाबाई महादेव केळकर’ – लेखिका व नाटककार यांचे निधन.
- 1999: ‘ग्लेन सीबोर्ग’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 19 एप्रिल 1912)
- 2001: ‘सर डोनाल्ड ब्रॅडमन’ – ऑस्ट्रेलियन फलंदाज यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1908)
- 2016: ‘भवरलाल जैन’ – भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1937)