![]()
नागपूर: आताची मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे. . तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोणाला कोणतं खातं?
देवेंद्र फडणवीस – गृह
अजित पवार – अर्थ
एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गणेश नाईक – वन मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा
पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
दादा भुसे – शालेय शिक्षण
गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
संजय राठोड – मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार
अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण
अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
माणिकराव कोकाटे – कृषी
दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
संजय सावकारे – कापड
संजय शिरसाट – सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक – वाहतूक
भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
आकाश फुंडकर – कामगार
बाबासाहेब पाटील – सहकार
प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers )
माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
योगेश कदम – गृहराज्य शहर
पंकज भोयर – गृहनिर्माण
![]()
मुंबई : ऑस्कर २०२५ सोहळा पुढील वर्षी थाटामाटात संपन्न होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत इथल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या ‘अनुजा’ या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. ‘लाइव्ह-अॅक्शन’ शॉर्ट फिल्ममध्ये ‘अनुजा’ १८० शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे.
‘अनुजा’ची निर्मिती सुचित्रा मटाई यांची असून गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. एडम.जे.ग्रेव्स लिखित, दिग्दर्शित या लघुपटामध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट सारख्या कलाकारांनी अभिनय केला आहे.
‘अनुजा’ची कथा एका भारतीय मुलीवर आधारित असून इंडो-अमेरिकन प्रोडक्शन अंतर्गत त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ऑस्करच्या लघुपट श्रेणीत ‘अनुजा’ लघुपटाला स्थान मिळाल्याबद्दल अभिनेते नागेश भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे.
याबद्दल बोलताना नागेश भोसले सांगतात की, ‘ऑस्कर सारख्या मानाच्या सोहळ्यात आपला लघुपट असणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बालमजुरी सारखा सामाजिक प्रश्न या लघुपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडला असून एका उत्तम टीमचा भाग होता आल्याचा आनंद निश्चित आहे’.
९७ व्या ऑस्कर पुरस्कार-२०२५ च्या पुरस्कारासाठीची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये विजेते घोषित केले जातील. त्यात ‘वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करणारा ‘अनुजा’ लघुपट बाजी मारतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
![]()
आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – 12:24:12 पर्यंत
- नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 30:14:55 पर्यंत
- करण-वणिज – 12:24:12 पर्यंत, विष्टि – 25:25:30 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-प्रीति – 18:21:47 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 07:09
- सूर्यास्त- 18:05
- चन्द्र-राशि-सिंह
- चंद्रोदय- 23:44:00
- चंद्रास्त- 11:43:59
- ऋतु- हेमंत
- १८९८: पियरे आणि मेरी क्यूरी यांनी रेडियम चा शोध लावला.
- १९०५: स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
- १९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
- १९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
- १९५२: सोवियत संघाचा लेनिन शांती पुरस्कार मिळवणारे सैफुद्दीन किचलू पहिले भारतीय बनले.
- १९६५: दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
- १९७१: कर्ट वाल्डहाइम संयुक्त राष्ट्र संघाचे चौथे सरचिटणीस बनले.
- १९७५: मेडागास्कर या देशाने संविधान लागू केले.
- १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९९८: नेपाल चे प्रधानमंत्री गिरिजा प्रसाद कोइराला यांनी राजीनामा दिला.
- २०१२: आजच्या दिवशी गंगनम स्टाइल हे कोरियन गाण्याला यु ट्यूब वर १ अब्ज लोकांनी पाहिले.
- १८०४: बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्य़ू: १९ एप्रिल १८८१)
- १८२४: जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म: ११ एप्रिल १७५५)
- १८९१: श्रमिक आंदोलनाचे सूत्रधार प्रणेता ठाकुर प्यारेलाल सिंह यांचा जन्म.
- १९०३: भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक (मृत्य़ू: २ नोव्हेंबर १९९०)१९९७ : निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली.
- १९१८: कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (मृत्य़ू: १४ जून २००७)
- १९२१: पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश
- १९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)
- १९४२: हू जिंताओ – चीनचे राष्ट्राध्यक्ष
- १९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.
- १९५४: ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
- १९५९: कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष
- १९५९: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (मृत्य़ू: २१ सप्टेंबर १९९८)
- १९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.
- १९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
- १९७२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म.
- १९७४: “रॅमन मॅग्सेसे पुरस्कार” विजेते संजीव चतुर्वेदी यांचा जन्म.
- १९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)
- १९८१: छत्तीसगड चे सामाजिक क्रांती चे नेते सुंदरलाल शर्मा यांचा जन्म.
- १९८५: मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)
- १९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)
- १९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)
- १८२४: जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म: ११ एप्रिल १७५५)
- १९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
- १९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)
- १९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)
- १९९७: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)
- १९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)
- २००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)
- २००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९४०
- २०११: प्रसिद्ध न्यूक्लियर फिजिसिस्ट पी.के.अयंगर यांचे निधन.
![]()
![]()
आजचे पंचांग
- तिथि-पंचमी – 10:51:43 पर्यंत
- नक्षत्र-माघ – 27:48:00 पर्यंत
- करण-तैतुल – 10:51:43 पर्यंत, गर – 23:32:33 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-विश्कुम्भ – 18:10:46 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:09
- सूर्यास्त- 18:04
- चन्द्र-राशि-सिंह
- चंद्रोदय- 22:53:59
- चंद्रास्त- 11:09:00
- ऋतु- हेमंत
- मानवी ऐक्यभाव दिन.
- १८७६: ला राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे लिखाण बकिमचंद्र चटर्जी यांनी पूर्ण केले.
- १९२४: हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
- १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
- १९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
- १९४६: ला महात्मा गांधी एक महिन्यासाठी श्रीरामपूर येथे थांबले होते.
- १९५५: ला भारतीय गोल्फ संघटनेचे गठन करण्यात आले.
- १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
- १९८५: ला तिरुपती बालाजी येथील भगवान वेंकटेश्वर च्या मूर्तीला २.५ करोड रुपयांचे मुकुट चढविल्या गेले.
- १९८८: ला भारताच्या लोकसभेमध्ये मतदानाचे वयवर्ष २१ वरून १८ करण्यासाठी नवीन कायदा मंजूर झाला.
- १९९१: ला पॉल कीटिंग हे ऑस्ट्रेलिया चे नवीन प्रधानमंत्री बनले.
- १९९३: ला भारत आणि सोवियत संघामध्ये ब्रुसेल्स येथे सहकार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
- १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
- १९९९: पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.
- २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर
- १८६८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)
- १८९०: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक (१९५९) विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ’इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. (मृत्यू: २७ मार्च १९६७)
- १९०१: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १६ जानेवारी १९६७)
- १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०००)
- १९१७: नाट्यगृहांमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शांता गांधी यांचा जन्म.
- १९२७: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचा जन्म
- १९३६: प्रसिद्ध साहित्यकार रॉबिन शॉ यांचा जन्म.
- १९४०: यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री (१९६७)
- १९४२: राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
- १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै २०१०)
- १९६०: उत्तराखंड चे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा जन्म.
- १९७०: हिंदी चित्रपट अभिनेता सोहेल खान यांचा जन्म.
- १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९३)
- १७३१: छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा (जन्म: ४ मे १६४९)
- १९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन. (जन्म: १२ मे १८६३)
- १९३३: विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले. (जन्म: २२ मे १८७१)
- १९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)
- १९८१: भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार कानू रॉय यांचे निधन.
- १९९३: वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार (जन्म: ????)
- १९९६: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्नामुळे लागला. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ – ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.))
- १९९६: दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)
- १९९८: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
- २००१: सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)
- २००९: महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक अरुण कांबळे यांचे निधन.
- २०१०: नलिनी जयवंत – अभिनेत्री (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)
- २०१०: सुभाष भेंडे – लेखक (जन्म: १४ आक्टोबर १९३६)
- २०१०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांचे निधन.
![]()
आजचे पंचांग
- तिथि- चतुर्थी – 10:05:36 पर्यंत
- नक्षत्र- आश्लेषा – 26:00:34 पर्यंत
- करण- बालव – 10:05:36 पर्यंत, कौलव – 22:22:33 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग- वैधृति – 18:33:19 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07:08
- सूर्यास्त- 18:04
- चन्द्र राशि- कर्क – 26:00:34 पर्यंत
- चंद्रोदय- 22:02:00
- चंद्रास्त- 10:31:00
- ऋतु- हेमंत
![]()
Mumbai Boat Collapse Incident : मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेण्यांकडे निघालेली निलकमल बोट खोल समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडलीय. नौदलाच्या स्पीड बोटीने नीलकमल बोटीला थेट धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. बोटीत एकूण 100 हून अधिक पर्यटक प्रवास करत होतो. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर 101 जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय. या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाकडून तातडीनं बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. मृतांमध्ये तीन नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असून इतर 10 जण नीलकमल बोटीतील प्रवासी असल्याचं समजते. तर मृतांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून प्रवाशांनी भरगच्च भरलेली बोट एलिफंटाला निघाली होती. बोट एलिफंटाच्या दिशेनं जात असताना भारतीय नौदलाची एक स्पीड बोट समुद्रात सुसाट फेऱ्या मारत होती. ही बोट समुद्रातून वेगाने जात असताना पुन्हा यु टर्न घेऊन मागच्या दिशेने आली. त्याचदरम्यान समुद्रात प्रवास करत असलेल्या या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली आणि हे भयानक दृष्य कॅमेरात कैद झाले.
![]()
आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 10:08:36 पर्यंत
- नक्षत्र-पुष्य – 24:59:05 पर्यंत
- करण-विष्टि – 10:08:36 पर्यंत, भाव – 22:00:59 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-इंद्रा – 19:33:04 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 07:07
- सूर्यास्त- 18:03
- चन्द्र-राशि-कर्क
- चंद्रोदय- 21:04:59
- चंद्रास्त- 09:46:59
- ऋतु- हेमंत
- International Migrants Day
- अल्पसंख्याक हक्क दिन
- १२७१: कुबलई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश सुरू केले.
- १७७७: अमेरिकेत पहिले थँक्सगिव्हिंग साजरे करण्यात आले.
- १७८७: न्यू जर्सी हा अमेरिकेचे संविधान स्वीकार करणारा तिसरा देश बनला.
- १८३३: रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले
- १९१६: पहिल्या विश्व युद्धात वेरदून ला झालेल्या लढाई मध्ये फ्रांस ने जर्मनी ला हरविले.
- १९३५: श्रीलंकेत ’लंका सम समाज पार्टी’ची स्थापना
- १९४५: उरुग्वे हा देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य बनला.
- १९५६: जपान ने संयुक्त राष्ट्र संघाचे सदसत्व स्वीकारले.
- १९५८: जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.
- १९६९: इंग्लंड ने मृत्यू दंडाची शिक्षा समाप्त केली.
- १९७८: डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
- १९८८: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने इंग्लंड ला ८ विकेट ने हरवून लगातार तिसरा वर्ल्ड कप स्वतःच्या नावावर केला.
- १९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
- २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
- २००७: जपान ने इंटरसेप्टर मिसाइल ची चाचणी केली.
- २००८: ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल चे यशस्वी रित्या प्रक्षेपण.
- २०१४: वजनाने सगळ्यात भारी रॉकेट जीएसएलवी मार्क-३ चे यशस्वी प्रक्षेपण.
- २०१६: इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.
- २०१६: भारतीय ज्युनिअर हॉकी टीम ने बेल्जियम ला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.
- २०१७: राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने ३० पैकी २९ सुवर्ण पदक जिंकले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १६२०: हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (मृत्यू: २० जून १६६८)
- १७५६: छत्तीसगढ चे सुप्रसिद्ध संत गुरु घासीदास यांचा जन्म.
- १८५६: सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)
- १८८७: भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (मृत्यू: १० जुलै १९७१)
- १८७८: जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च १९५३)
- १८९०: ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक (मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)
- १९२४: देशाचे १९ वे मुख्य न्यायाधीश एंगेल्गुप्पे सीतामा वेंकटारामिया यांचा जन्म.
- १९५५: विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
- १९६१: माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचा जन्म.
- १९६३: ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता
- १९७१: बरखा दत्त – पत्रकार
- १९७१: अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू
- १९९२: भारताचे कबड्डी खेळाडू काशिलिंग अडके यांचा जन्म.
- १८२९: जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (जन्म: १ ऑगस्ट १७४४)
- १९२०: प्रसिद्ध चित्रकार सदानंद बकरे यांचे निधन.
- १९७१: भारतीय निबंधकार पदुमलाल पुन्नालाल बक्षी यांचे निधन.
- १९७३: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९०८)
- १९८०: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (जन्म: २० फेब्रुवारी १९०४)
- १९८०: लोकसभेचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचे निधन.
- १९९३: राजा बारगीर – चित्रपट१९६३ : दिग्दर्शक. ’सुखाचे सोबती’ (१९५८), ’ बोलकी बाहुली’ (१९६१), ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’ (१९६७), ’मानाचा मुजरा’ (१९६९), ’करावं तसं भरावं’ (१९७५), ’दीड शहाणे’ (१९७९), ’ठकास महाठक’ (१९८४), ’गडबड घोटाळा’ (१९८६), ’तुझी माझी जमली जोडी’ (१९९०) अशा सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. (जन्म: ? ? ????)
- १९९५: कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार (जन्म: ? ? ????)
- २०००: मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
- २००४: विजय हजारे – क्रिकेटपटू (जन्म: ११ मार्च १९१५)
- २०११: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लाव हेवल यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९३६)
![]()
![]()











