Konkan Railway: ट्रेनची साखळी खेचून मोबाईल उचलणे पडले महागात; प्रवाशावर गुन्हा दाखल

कोकण रेल्वेवर दिवाणखवटीआणि कळंबणी बुद्रुक दरम्यान घडली घटना

   Follow us on        

मुंबई: ट्रेनमधून पडलेला आपला मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी धोक्याची साखळी (Alarm Chain) खेचणे एका प्रवाशाला चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने या गैरवापराबद्दल संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३/१०/२०२५ रोजी १२६१८ ह. निजामुद्दीन – एरणाकुलम मंगला एक्स्प्रेसमध्ये दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकांदरम्यान घडली. प्रवाशाचा मोबाईल फोन खिडकीतून खाली रुळावर पडला. मोबाईल उचलण्याच्या उद्देशाने त्याने ट्रेनची अलार्म चेन (ACP) खेचली, ज्यामुळे ट्रेन तातडीने थांबली. त्यानंतर तो प्रवासी खाली उतरून रुळावरून फोन घेऊन परत आला.

गुन्हा दाखल

ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेल्या टीटीई श्री पी. एम. कृष्णन आणि श्री अजित जाधव यांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली.. त्यांच्या अहवालाच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी भारतीय रेल्वे अधिनियम, १८८९ च्या कलम १४१ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हे कलम धोक्याची साखळीचा अयोग्य वापर केल्यास दंडनीय कारवाईची तरतूद करते.

कोकण रेल्वेचे आवाहन:

साखळीचा गैरवापर केल्यामुळे रेल्वेच्या वेळेवर आणि सुरळीत संचालनात मोठा अडथळा निर्माण होतो, तसेच इतर प्रवाशांना विनाकारण त्रास होतो. कोकण रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी केवळ वैद्यकीय किंवा गंभीर आपत्कालीन परिस्थितीतच अलार्म चेनचा वापर करावा. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

 

 

Facebook Comments Box

कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस तातडीने पूर्ण करा

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आमदार संजय पोतनीसांना साकडे; तुतारी एक्स्प्रेसच्या धर्तीवर आणखी गाड्या सुरू करण्याची विनंती.

   Follow us on        

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी च्या मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांनी कलिना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी बेस्ट (BEST) अध्यक्ष श्री संजय पोतनीस साहेब यांची भेट घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. संघटनेने आमदार साहेबांना दिलेल्या निवेदनात, तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी येथे प्रस्तावित रेल्वे टर्मिनस कोकणच्या विकासासाठी आणि हजारो कोकणी चाकरमान्यांच्या सोयीसाठी कसे आवश्यक आहे, हे पटवून दिले. आमदार पोतनीस यांनी या मागणीवर सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही दिली आहे.

मागील १० वर्षांपासून टर्मिनस रखडले

सावंतवाडी स्थानकावर रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी झाले होते. सावंतवाडी हे तळकोकणातील महत्त्वाचे आणि पर्यटन, शिक्षण, व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण शहर आहे. या ठिकाणी टर्मिनस झाल्यास इथून सोडलेल्या गाड्या कोकणातील इतर स्थानकांवर देखील थांबतील आणि कोकणाला मुंबई, पुणे तसेच देशाच्या इतर भागांशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. मात्र, राजकीय अनास्था आणि निधीअभावी हा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रखडल्यामुळे दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसच्या धर्तीवर अजून गाड्या सुरू करण्यावर मर्यादा येत आहेत, असे संघटनेने निवेदनात स्पष्ट केले आहे.

प्रवाशांच्या हितासाठी संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

सावंतवाडी स्टेशनचा टर्मिनस म्हणून विकास

२०१५ मध्ये पायाभरणी झालेल्या टर्मिनस प्रकल्पाचा निधीअभावी रखडलेला दुसरा टप्पा तातडीने पूर्ण करावा. तसेच अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत येथे नवीन प्लॅटफॉर्म, शेल्टर शेड, पाणी, आसन व्यवस्था, पादचारी पुलाचा विस्तार आणि योग्य प्रकाश व्यवस्था करावी.

नवीन रेल्वेगाडी सुरू करावी

तुतारी एक्स्प्रेसच्या धर्तीवर दादर ते सावंतवाडी दरम्यान अजून एक नवी रेल्वेगाडी सुरू करावी.

सीएसएमटी-मंगलोर एक्स्प्रेसला थांबा:

१२१३३/३४ सीएसएमटी मुंबई-मंगलोर-सीएसएमटी मुंबई या गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात यावा.

कोकणी चाकरमान्यांची मोठी सोय

सध्या धावणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी या गाड्या गोव्यातील मडगावपर्यंत धावतात, त्यामुळे तिकिटांचा मोठा कोटा गोव्यातील स्थानकांना मिळतो. गोव्यात पर्यटकांचा भरणा अधिक असल्याने कोकणी चाकरमान्यांना तिकीट मिळणे हा एक जटिल प्रश्न बनला आहे. केवळ सावंतवाडीपर्यंत धावणाऱ्या गाड्या सुरू झाल्यास, सर्व तिकीट कोटा कोकणी जनतेला मिळेल आणि गणेशोत्सव, होळी, उन्हाळी सुट्ट्यांसारख्या सणासुदीच्या काळात हजारो चाकरमान्यांची सोय होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.

यावेळी संघटनेतर्फे संदीप गुरव, केशव पांचाळ, विलास मोहिते, बाळा मोरे आदी सदस्य उपस्थित होते.

Facebook Comments Box

१९ जणांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू

मुंबई – पवईतील आर.ए. स्टुडिओजवळ गुरुवारी रात्री एका तरुणाने १७ अल्पवयीन मुले व दोन प्रौढ असे १९ जणांना ओलीस ठेवले. रोहित आर्या (वय अंदाजे ३०) असे या तरुणाचे नाव असून, “माझी शाळा सुंदर शाळा” योजनेअंतर्गत थकलेली दोन कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही, या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते.


पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास चर्चा केल्यानंतर रोहितने पोलिसांवर हल्ला केला. प्रतिहल्ल्यात तो गंभीर जखमी झाला व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सर्व १९ ओलीस सुखरूप सोडले गेले.


रोहितने यापूर्वी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण केले होते. केसरकर यांनी “रोहितची थकबाकी पूर्ण दिली होती; तो मानसिक तणावात होता,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र कुटुंबीयांचा दावा आहे की रक्कम अद्याप बाकी आहे.


पोलिसांनी ओलीस ठेवणे व हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, थकबाकीच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे.

Facebook Comments Box

एक्सप्रेस गाड्यांच्या संगमेश्वर रोड येथील थांब्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांशी बोलणार; खासदार नारायण राणे यांचे आश्वासन

   Follow us on        देवरूख: बुधवार दिनांक २९ ऑक्टोबर देवरूख येथे पार पडलेल्या खासदारांच्या जनता दरबारात संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय अग्रक्रमाने मांडण्यासाठी सकाळी लवकरच निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, सहकारी अशोक मुंडेकर , समन्वयक रुपेश मनोहर कदम लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय येथे उपस्थित होते.

संगमेश्वर स्थानकात दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या बघता ९ अतिरिक्त गाडयांना थांबा मिळावा म्हणून कोंकण रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वर जनतेच्या वतीने निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपने मागणी  केली होती त्यावेळी  कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मागणी केलेल्या ९ गाड्यांपैकी जामनगर, पोरबंदर व मडगाव एक्सप्रेस या तीन गाडयांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबे देण्यास सर्व बाबी अनुकूल असून तसा प्रस्ताव आम्ही केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवतो असे सांगितले आणि  तसा प्रस्ताव पाठवला.

या बैठकीला स्थानिक आमदार श्री शेखर निकम सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा आपली शिफारस त्यांच्या  पत्राद्वारे केली होती. 

थांबे मंजूरी हा विषय केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याला स्थानिक खासदारांची शिफारस असणे क्रमप्राप्त असून त्यांचे रेल्वे मंत्र्यांना शिफारस पत्र लागेल असे कोंकण रेल्वे प्रशासनाने संगितले. त्याप्रमाणे मे २०२५ मध्ये खासदार श्री नारायण राणे यांना भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडण्यात आला आणि त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आपले शिफारस पत्र सुद्धा दिले आणि पुढील दोन दिवसात मी रेल्वे मंत्र्यांना भेटून  मंजूरी घेतो असे आश्वासनही दिले परंतू या गोष्टीला आज सहा महिने उलटले तरी या गाड्यांच्या थांब्याना मंजूरी मिळालेली नाही त्यामुळे काल खासदारांच्या देवरुख येथे झालेल्या जनता दरबारात पुन्हा हा प्रश्न त्यांच्यासामोर मांडून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी संघटनेच्या वतीने केली गेली. 

यावेळी उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले, “माझे मित्र असलेले केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे मागणी करून मी थांबे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो.”

परंतु थांबे मंजूर करुन घेण्यासाठी कधी कधी वजनदार व्यक्तींचा एक शब्दही कामी येतो याचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यात आजूबाजूच्या जिल्ह्यात मंजूर झालेले थांबे बघता लक्षात  येते. विशेष  म्हणजे हे कोकणातील थांबे जिल्हयाबाहेरील नेत्यांनी  रेल्वे मंत्र्यांकडे आपले वजन वापरुन तातडीने मंजूर  करून घेतले मग आपल्या खासदारांच्या शिफारशीला रेल्वे बोर्ड पहात नाही कां? असा सवाल विचारला जात आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: दिवा–चिपळूण मेमू सेवा कायमस्वरूपी झाल्याची बातमी खोटी; रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण

   Follow us on    

 

 

दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित किंवा कायमस्वरूपी मान्यता मिळाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर आणि काही वृत्तवाहिन्यांमध्ये पसरवल्या जात आहेत. मात्र, या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रेल्वेच्या अधिकृत माहितीपत्रकात  म्हटले आहे की, “सध्या दिवा–चिपळूण मेमू सेवेला नियमित करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवीन कायमस्वरूपी किंवा नियमित गाड्यांबाबत कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती अधिकृत माध्यमांतून देण्यात येईल.”

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, प्रेस नोट्स किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरूनच माहिती घ्यावी.

दरम्यान, कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मेमू सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असून, अनेक प्रवाशांनी तिला नियमित करण्याची मागणी केली आहे. मात्र, रेल्वेने या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात भरती; जाहिरात प्रसिद्ध

   Follow us on    

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखाली २०२४–२०२५ या वर्षाकरिता खालीलप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई – ७६ पदे

चालक पोलीस शिपाई – ९ पदे

उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ अशी आहे.

भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती आणि अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी:

http://policerecruitment2025.mahait.org

http://www.sindhudurgpolice.co.in

http://www.mahapolice.gov.in

ही माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्ध केली आहे.

 

Facebook Comments Box

गणपतीपुळे समुद्रात पोहताना पुण्याचा तरुण बुडाला

   Follow us on    

 

 

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात पोहत असताना खोल पाण्यात ओढला गेल्याने पुण्यातील १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल शिवाजी वाघमारे असे या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मालगुंड येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडला.

जयगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल वाघमारे (वय १८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) हा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला. पोहत असतानाच अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बेशुद्ध झाला.

त्याच्या शोधासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. अखेर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला.

स्थानिकांनी तातडीने त्याला वादळ-खांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

Facebook Comments Box

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता “छत्रपती संभाजीनगर”

   Follow us on    

 

 

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील “औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे बदलून “छत्रपती संभाजीनगर” असे करण्यात आले आहे. या बदलास केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून स्थानकाचा नवीन कोड CPSN असा असणार आहे.

आता पुढे “औरंगाबाद” ऐवजी सर्व रेल्वे फलक, आरक्षण तिकीट प्रणाली आणि घोषणांमध्ये “छत्रपती संभाजीनगर” हे नाव वापरले जाईल. रेल्वे प्रवाशांना आणि नागरिकांना याबाबत दक्षिण मध्य रेल्वेकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे ऐतिहासिक शहराच्या नावात बदल करत “छत्रपती संभाजीनगर” हे नाव अधिकृतपणे भारतीय रेल्वेच्या नोंदीत समाविष्ट झाले आहे.

Facebook Comments Box

Railway Accident : रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू

No block ID is set

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील सुरत-भुसावळ मार्गावर पाळधी येथील स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर धोकादायक पद्धतीने ‘रील’ (Reel) बनवण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन समवयस्क तरुणांचा धावत्या रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (१८) आणि हर्षवर्धन महेंद्र ननवरे (१८) (दोन्ही रा. महात्मा फुले नगर, पाळधी, जि. जळगाव) अशी आहेत.

रविवारी सुट्टी असल्याने हे दोघे पाळधी स्थानकापासून जवळच असलेल्या पथराड गावाकडील गेटजवळ सकाळी ११ च्या सुमारास रेल्वे मार्गावर उभे राहून रील बनवत होते. त्याच वेळी धरणगावच्या दिशेकडून जळगावकडे जाणारी ‘अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस’ आली.

प्रशांत आणि हर्षवर्धन यांनी कानावर हेडफोन लावलेले असल्याने, रेल्वे रुळांजवळ आलेल्या या वेगातल्या गाडीकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते. यामुळे रेल्वे अगदी जवळ आल्यानंतर त्यांना जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे पाळधी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धोकादायक ठिकाणी रील बनवण्याच्या फॅडमुळे तरुणांचे जीव जात असल्याच्या घटना पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.

 

 

Facebook Comments Box

‘ओंकार’ ने रोखला मुंबई गोवा महामार्ग; दीड तास वाहतूक ठप्प

   Follow us on    

 

 
बांदा: मागील काही दिवसांपासून बांदा, माडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हैदोस माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने थेट रस्त्यावर ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. त्यानंतर हत्तीने इन्सुलीच्या भरवस्तीतील कुडवडेव व सावंतटेंब परिसरात आश्रय घेतला.

शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओंकार महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हत्ती काही काळ रस्त्यावर फिरत राहिला. वाहनांच्या हॉर्नकडे दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली.

वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हत्तीला परत जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले; मात्र हत्तीने महामार्ग ओलांडत इन्सुलि गावात प्रवेश केला. गेल्या पंधरा दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात धैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून लोकांमध्ये भीतीची सावट पसरले आहे.

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search