Sindhudurg Airport : ऐन हंगामात नियमित सेवा देता येत नसतील तर…..

यश सावंत | सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्याच आठवड्यात दिली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरून गेल्याचे दिसत आहे. आज दिनांक ०१ सप्टेंबर असूनही अजूनही येथे नियमित सेवा चालू झाली नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवस चिपी विमानतळावर विमानच उतरले नाही. 

विमानाची बूकिंग सेवा उपलब्ध करून देणार्‍या क्लीअर ट्रीप तसेच मेक माय ट्रीप या वेबसाईटवर तपासले असता मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान एक दोन दिवस आड करून विमान फेरी असल्याचे चित्र दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या जवळील तारखांचे विमान भाडे दहा हजाराच्या वर गेले आहे. त्यामुळे यंदा विमानाने गावी जाण्याचा बेतात असणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला आहे.

 

.. तर सिंधुदुर्ग विमानतळाचा उपयोग काय?

गणेश चतुर्थी आणि इतर हंगामाच्या दिवसांत सुद्धा अशा अनियमित फेर्‍या असतील तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विमान सेवेचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  विमानसेवेच्या तिकीट बूकिंग साठी Dynamic Pricing Strategy चा अवलंब करण्यात येत असतो. तरीपण मुंबई ते गोवा विमानसेवा तिकीट भाडे सर्व चार्जेस पकडून साधारणपणे 1800 ते 2000 रुपये एवढे आहे. हंगाम असल्याने एवढे भाडे देवून कोकणात गावी जाण्यासाठी किती तरी कोकणवासिय उत्सुक आहेत. प्रवासी असूनही विमानसेवा अनियमित असल्याने प्रशासनाला हंगामाचा फायदा घेणे जमत नसल्याचे दिसत आहे. येथील राजकिय पक्ष पण यामध्ये लक्ष घालताना दिसत नाही आहेत. अनियमित सेवेमुळे पर्यटकांनी सुद्धा या सेवेकडे पाठ फिरवली आहे. असेच चित्र राहिले तर एक दिवस हे विमानतळ बंद होईल असे बोलले तर नवल वाटायला  नको.

 

Loading

Facebook Comments Box

वैभववाडी स्थानकात गाडयांना थांबा देणे ‘रेल्वे बोर्ड’ च्या अधिकार कक्षेत; कोकण रेल्वेने हात झटकले

Konkan Railway News: वैभववाडी स्थानकात तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी- मडगाव एक्सप्रेस या गाडयांना थांबा देण्याबाबत कोकण विकास समितीने केलेल्या निवेदनाला रेल्वे प्रशासनाकडून उत्तर आले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL ने ही मागणी रेल्वे बोर्डच्या कक्षेत येत आहे असे सांगून आपले हात झटकले आहेत. 
वैभववाडी स्थानकात सध्या ५ नियमित गाडयांना थांबा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गणपती/होळी/दिवाळी विशेष गाडयांना येथे थांबा देण्यात येत आहे. यंदाही गणेशोत्सव विशेष गाडयांना वैभववाडी या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या स्थानकावर अधिक गाडयांना थांबे द्यावेत कि नाही याबाबत रेल्वे बोर्ड ठरवणार आहे अशा शब्दात या निवेदनास उत्तर देण्यात आले आहे. 
वैभववाडी स्थानकावर वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन या स्थानकावर गाडी क्रमांक २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक ११०९९/१११०० एलटीटी- मडगाव  एक्सप्रेस या गाडयांना थांबा देण्याबाबत कोकण विकास समितीने २३/०६/२०२३ रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याना  एक निवेदन सादर केले होते. या निवेदनात मागील १० वर्षात रेल्वेला येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे आकडे अधोरेखित करून येथे या दोन गाडयांना थांबा दिल्यास प्रवासीसंख्या वाढून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने येथे थांबा मजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती. 
 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त धावणार गणपती स्पेशल “मोदी एक्सप्रेस”

Modi Express : आ. नितेश राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईस्थित कणकवली विधानसभा मतदारसंघातील चाकरमानी गणेशभक्तांसाठी खुशखबर दिली असून गणेशचतुर्थीसाठी स्पेशल मोदी एक्सप्रेस ची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे..
दिनांक १७ सप्टेंबर रोजी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून “मोदी एक्सप्रेस” याच दिवशी सोडून तिला स्पेशल बनवण्यात येत आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता ही गाडी दादरच्या ८ नंबर प्लॅटफॉर्म वरून सोडण्यात येणार आहे. या गाडीची बुकिंग दिनांक ०५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत होणार असून ज्यांना सीट बुक करायची आहे त्यांनी या कालावधी दरम्यान कणकवली मतदारसंघाच्या मुंबईस्थित मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी या चित्रफितीत केले आहे. या प्रवासादरम्यान प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांची दरवर्षीप्रमाणे  जेवण आणि पाण्याची सोय करण्यात अली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
 

Loading

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाची मागणी

सिंधुदुर्ग :प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे.त्यामुळे अशा मूर्ती बनवणे, त्यांची आयात करणे आणि साठवणूक करणे यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण उपाख्य बापू सावंत, संचालक अरुण पालकर, विलास मळगावकर आदींनी हे निवेदन दिले आहे. पूर्वीपासून श्री गणेमूर्ती मातीच्या बनवल्या जात असत; परंतु गेल्या ८ ते १० वर्षांपासून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती जिल्ह्यात आयात केल्या जात आहेत. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विसर्जनानंतर त्या बरेच महिने भग्नावस्थेत दिसतात. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. 

Loading

Facebook Comments Box

Konkan Tourism: सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला

सिंधुदुर्ग : या महिन्यात मालवणला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांच्या अग्रस्थानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. समुद्र किनारा ते किल्ला वाहतुक होडी सेवा उद्यापासून चालू होणार आहे. 

पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. 

दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

१ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. त्यामुळे सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

‘नेरुळ’ च्या जागी ‘नेरूल’; ”सुधारणा न केल्यास…” मराठी एकीकरण समितीचा रेल्वेला इशारा

ठाणे : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यात अनेक मराठी शहरांच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर सरकारी कार्यालयात, कागदोपत्री आणि सार्वजनिक ठिकाणांच्या दर्शक फलकांवर ही चुकीची नावे वापरून तीच कायम करण्यात आल्याचे प्रकारही घडत आहेत. 

रेल्वे प्रशासना सुद्धा या गोष्टीत मागे नाही आहे. रेल्वेमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा जास्त भरणा असल्याने रेल्वेत असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. 

ठाणे ते पनवेल लोकल रेल्वे प्रशासनाने असाच एक प्रकार केल्याचा  नेरुळ या स्थानकाच्या नावाच्या बाबतीत घडला आहे. या स्थानकाचे नाव ‘नेरूळ’ असताना ते वेळापत्रक दर्शिकेत चुकीच्या पद्धतीने म्हणजे ‘नेरूल’ असे दाखविण्यात आले आहे.

याविरोधात मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे. नेरूळ गंतव्य स्थानकाच्या नावाचा अचूक मराठी देवनागरी लिपीत वापर करण्यात यावा.विहीत मुदतीत बदल न केल्यास पीजी पोर्टलवर तक्रार नोंद करण्यात येईल. असा इशारा या समितीने दिला आहे 

Loading

Facebook Comments Box

उद्या कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; मत्स्यगंधा एक्स्प्रेससह एका गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम

रत्नागिरी :  कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटक मध्ये कुमठा ते कुंदापुरा सेक्शन दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 10 मिनिटे ते 4 वाजून 10 मिनिटे असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या  मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक 31 ऑगस्ट रोजी सुटणारी गाडी क्र. 16333 – वेरावल – तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस रोहा ते कुमठा दरम्यान सुमारे तीन तास उशिराने धावणार आहे.
2) दिनांक 1 सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी क्र. 12620 मंगलूरु सेंट्रल – लोकमान्य टिळक मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरतकल ते कुंदापुरा दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे  

Loading

Facebook Comments Box

तळकोकणात मुंबई-गोवा महामार्गावर साकारले गेले आधुनिक दर्जाचे सिनेमागृह; येत्या शुक्रवारी उदघाटन

सिंधुदुर्ग:सावंतवाडी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय उदय पारळे यांच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे आराध्य सिनेमा नावाचे आधुनिक दर्जाचे सिनेमागृह साकारण्यात आले आहे. प्रकल्पात एकाच ठिकाणी सिनेमा पाहण्यासोबत हॉटेल, थिएटर आणि ओपन लॉनचा आनंद घेता येणार आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यासह बांदा, शिरोडा या महत्त्वाच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला लागून झाराप झिरो पॉईंट येथे बांधकाम व्यवसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी स्मिता पारळे यांनी हा प्रकल्प उभारला आहे. आराध्य सिनेमा सोबतच याठिकाणी दर्जेदार असा सुसज्ज हॉल, हॉटेल, राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना जेवणासह राहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. 
येत्या शुक्रवारी १ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आराध्य सिनेमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या रेणु गावसकर व सावंतवाडीचे उद्योजक शैलेश पै यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुळात सावंतवाडी, वेंगुर्ला व कुडाळ तालुक्याचा विचार करता दर्जेदार अश्या सिनेमा थिएटरची कमतरता श्री. पारळे यांनी ओळखून येथील जनतेसाठी ते उपलब्ध करुन दिले आहे. याठिकाणी नवनवीन सिनेमा उपलब्ध करुन देण्यात येणार असून अन्य आवश्यकत्या सर्व सोयी सुद्धा ठेवण्यात येणार.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका गाडीला गणेशोत्सवादरम्यान अतिरिक्त डबा

Konkan Railway News :प्रवाशांच्या सोयीसाठी गणेशोत्सवा दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका एक्स्प्रेसला अतिरिक्‍त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार 

22475/22476 हिस्सार – कोईमतूर – हिस्सार वीकली एक्सप्रेस या गाडीला एक टू टियर एसी Two Tier AC कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

गाडी क्रमांक 22475 हिस्सार – कोईमतूर दर बुधवारी धावणारी ही गाडी दिनांक 06 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत या अतिरिक्त डब्यासहित धावणार आहे. 

गाडी क्रमांक 22476 कोईमतूर-हिस्सार दर शनिवारी धावणारी ही गाडी दिनांक 09 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत या अतिरिक्त डब्यासहित धावणार आहे. 

या सोयीमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पोरबंदर-कोचुवेली-पोरबंदर एक्सप्रेसला उद्यासाठी अतिरिक्त स्लीपर कोच.

गाडी क्रमांक 20910 पोरबंदर-कोचुवेली या एक्सप्रेसला उद्या दिनांक 31 ऑगस्ट रोजी तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 20909 कोचुवेली – पोरबंदर या एक्सप्रेसला उद्या दिनांक 03 सप्टेंबर रोजी एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्यात येणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

अबब! गोव्यात सापडला तब्बल दीड फुट लांब आणि सव्वा किलो वजनाचा बांगडा

गोवा वार्ता : स्वस्तात मस्त आणि मुबलक मिळणारा बांगडा मत्स्यखवय्ये कोकणकरांच्या ताटाची चव वाढवत असतो. बांगडा सहसा १५ ते 20 सेंटिमीटर लांबीचा असतो. मात्र कर्लीसारखा हातभर लांबलचक बांगडाही असू शकतो, असे सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. कारवारजवळील समुद्रात तब्बल दीड फुटांपेक्षा (४८ सेंटीमीटर) लांब आणि १२ सेंटीमीटर रुंद बांगडा सापडला आहे.

कारवारजवळील समुद्रात भला मोठा बांगडा सापडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कारण या बांगड्याची लांबी तब्बल ४८ सेंटीमीटर, आणि रुंदी पाहिली तर १२ सेंटीमीटर एवढी आहे. म्हणजे याचे वजन साधारणपणे १ किलो २३० ग्रॅम एवढे आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा बांगडा सापडणे ही पहिलीच घटना आहे.

हा बांगडा मच्छीमार युवा नेते विनायक हरीकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर तो पुढील अभ्यासासाठी समुद्री जीवशास्त्र पीजी सेंटरकडे पाठवण्यात आला आहे. जेणेकरून जिज्ञासूंना हा बांगडा आता पाहता येणार आहे. सेंट्रल मरीन फिशरी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या दुर्मिळ बांगड्याची पाहणी केली.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search