अभिमानास्पद! सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला ‘जी आय’ मानांकन प्राप्त

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १० एप्रिल : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जीआय मानांकन  Geographical Indication (GI)  दिले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला संरक्षण प्राप्त झाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला महत्व येणार आहे.

सावंतवाडीच्या राजघराण्याने हे मानांकन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. लाकडी खेळणी आणि सावंतवाडी लॅकर्स वेअर संस्थेच्या गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने नेहमीच संरक्षण दिले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या संदर्भात संस्थानचे बाळराजे आणि युवराज लखमराजे भोसले आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.

जी. आय. मानांकन म्हणजे काय?

हे एक मानांकन आहे. हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो.

जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू/पदार्थ/उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवा व्दितीय असल्याची पावती आहे.थोडक्यात कुठल्याही वस्तूला जीआय मानांकन मिळण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष असतात. एक म्हणजे ती वस्तू एका विशिष्ट भौगोलिक भागात एका विशिष्ट पद्धतीने बनविली गेली असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या वस्तूचा विशिष्ट दर्जा किंवा गुण हा ती त्या भागात बनल्यामुळे असला पाहिजे. तर आणि तरच त्या वस्तूला जी आय मानांकन दिला जातो. आणि जीआय हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे. विशेषत: शेतीमाल असेल तर (आंबे, द्राक्षे, चिकू, तांदूळ इ.) किंवा हाताने बनविली जाणारी वस्तू किंवा पदार्थ असेल तर (हातमागावर विणली जाणारी वस्त्रे, हाताने बनविली जाणारी खेळणी किंवा इतर वस्तू). कारण शेतात उगवणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात त्या त्या भागातली माती, हवामान, पर्जन्यमान यांसारख्या गोष्टींमुळे. तर हाताने बनविल्या जाणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात तिथल्या कारागिरांचा अनुभव, परंपरागत कौशल्ये, पिढीजात कला यांसारख्या गोष्टींमुळे. आणि म्हणूनच अशा काही गोष्टींबाबत त्या कुठे बनल्या हे फार महत्त्वाचे असते. आणि आपण कित्येकदा पाहतो की त्या जागेनुसार त्या वस्तूचा भाव आणि दर्जा ठरत असतो.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक; २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

   Follow us on        

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत आरवली रोड ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) Train no. 12617 Ernakulam – H. Nijamuddin Express 

या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज.  – रत्नागिरी विभागादरम्यान 1 तास 45  मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

2) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express

या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव  ज. – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणार्‍या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे

Loading

Facebook Comments Box

कोकणच्या मातीचा गंध असलेली, सावंतवाडीच्या सुपुत्राने बनवलेली वेबसीरीज ‘संभ्रम’ बुधवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ट्रेलर येथे पहा

S. R. Y. Production प्रस्तुत, निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकट आणि दिग्दर्शक कारिवडे गावच्या सागर गोसावी यांच्या संकल्पनेतून 'संभ्रम' ही रहस्यमय कथा साकारली आहे. ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते. प्रेक्षकांच्या मनातही भ्रम निर्माण होतो.

   Follow us on        
सावंतवाडी, ता. ८ : तालुक्यातील कारिवडे-गोसावीवाडी येथील सागर गोसावी या युवकाने दिग्दर्शित केलेल्या सात भागांची ‘संभ्रम’ ही मराठी वेबसीरीज बुधवारी (ता.१०) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणार आहे. आज  त्याच्या पोस्टरचे अनावरण आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गरीब आणि ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित बनवलेल्या या वेबसीरीजमध्ये प्रेम प्रकरणातून मित्रांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होते, हे दाखविल्याचे निर्माता आनंद मेस्त्री आणि दिग्दर्शक सागर गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सावंतवाडी आणि परिसरात सिरीजचे शूटिंग झाले. चार साडेचार लाख रुपये खर्च करुन हा प्रयत्न केला आहे. यात स्थानिक कलाकारांनी काम केले आहे. वेब सिरीजमध्ये सुरुवातीच्या भागापासून निर्माण झालेला गुंता, संभ्रम शेवटच्या भागांमध्ये उघड होतो. त्यामुळे सर्वच्या सर्व भाग निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. परंतु, नव्याने काहीतरी करण्याच्या उमेदीने आणि या भागातील निसर्ग आणि कलाकार जगासमोर यावेत यादृष्टीने काम करत आहोत. आम्हाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. ही प्राथमिक सुरुवात आहे. भविष्यात यापेक्षा अधिक चांगले करू. असे यावेळी चित्रपट निर्माते सागर गोसावी यावेळी म्हणालेत.
 यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, रवी जाधव, कलाकार गायत्री रामशिंदे, राम निपाणीकर, सुहास रुके आदी उपस्थित होते.
Watch Trailer Here 👇🏻

Loading

Facebook Comments Box

अपघात: मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; तीन प्रवाशांचा मृत्यू

   Follow us on        
माणगाव दि. ०७ एप्रिल: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे रिक्षा आणि शिवशाही बसचा आज भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक वृत्तानुसार, ठाण्याहून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावजवळ आली असता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेत रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळ असलेल्या मानगाव येथील मानस हॉटेलजवळ हा अपघात झाला.
दत्तात्रय वरांडेकर, प्रवीण मालसुरे आणि अन्य एक  प्रवासी अशी रिक्षात प्रवास करताना झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस सध्या अपघाताच्या घटनास्थळाचा तपास करत आहेत. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाल्यामुळे धडकेची तीव्रता स्पष्ट होत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपस करत आहेत.

Loading

Facebook Comments Box

सावंतवाडी टर्मिनसला उघड पाठिंबा देणार तोच आमचा उमेदवार- सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना

लोकसभा निवडणुकीचा जो उमेदवार प्रवासी संघटनेच्या मागण्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

   Follow us on        
सावंतवाडी दि. ०७ एप्रिल: कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत, टर्मिनस व्हावे, टर्मिनस ला प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशा प्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी लोकसभा निवडणुकीतील जो उमेदवार जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल. आतापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुतोंडी भुमिका मांडली आहे यापुढे तशी भूमिका चालणार नाही असा इशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व सचिव मिहीर मठकर यांनी दिला आहे.
आता लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनस ला उघड पाठिंबा देणार्‍या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं, जाहीरनाम्यात रेल्वे स्थानक टर्मिनस विषय घ्यावा. टर्मिनस साठी आंदोलन छेडले गेले, टर्मिनस भूमिपूजन झाले आणि नऊ वर्ष रखडले आहे. टर्मिनस ला विरोध आणि बाजू घेणारे आज एकत्र आहेत. रेल्वेमंत्री यांना भेटल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आश्वासन दिले होते. मात्र प्रवाशांची गैरसोय होत आहे याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे..
कोणतीही निवडणूक असली तर कोकणातून राजकारणी लोकांना चाकरमान्यांची आठवण येते. मग काय गावातून फोनवर फोन जातात कि तुझे नाव येथील वोटिंग लिस्ट वर आहे, मतदानाला येऊन आम्हाला सहकार्य कर. मात्र त्याच चाकरमान्यांच्या कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या खडतर प्रवासाशी राजकारणी लोकांना देणे घेणे नाही. अशा वेळी निवडणुकीतच आपल्या मागण्या पूर्ण करण्याची संधी चाकरमान्यांनी सोडू नये,

Loading

Facebook Comments Box

Konkan Tourism | येथे समुद्र अंधारात चमकतो, कोकणातील ‘या’ बीचला भेट देऊन अनुभवा निसर्गाचा अविष्कार

   Follow us on        

Konkan Tourism:भारतामध्ये असे अनेक समुद्रकिनारे आहेत जिथे तुम्ही बायोल्युमिनेसेन्सच्या विस्मयकारक घटनेचे साक्षीदार होऊ शकता, जिथे बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टनच्या उपस्थितीमुळे समुद्र अंधारात चमकताना दिसतो. भारतामध्ये असे चमकणारे एकूण पाच समुद्र किनारे आहेत. कोकण पर्यटनासाठी गौरवाची बाब म्हणजे सिंधुदुर्गातील मालवणचा समुद्र किनारा या चमकणाऱ्या समुद्र किनाऱ्यामध्ये येतो.

Continue reading

Loading

Facebook Comments Box

लांजा | रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; मंगळसूत्र असलेली पर्स पोलिसांकडे सुपूर्त

लांजा: लांजा येथील रिक्षा व्यावसायिक रोहिदास उर्फ बाबा राणे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. लांजा बसस्थानक परिसरात सापडलेले मंगळसूत्र असलेली छोटी पर्स प्रामाणिकपणे लांजा पोलिस ठाण्यात जमा केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.
लांजा बसस्थानक परिसरात ४ एप्रिलला सायंकाळी रिक्षास्टॅण्डजवळ त्यांना सोन्याचे एक सिंगल सर असलेले मंगळसूत्र असलेली छोटी पर्स सापडली होती. रिक्षा व्यावसायिक रोहिदास राणे यांनी हे सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स लांजा पोलिसांच्या ताब्यात दिली. लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
पोलिसांचे आवाहन
ज्या कोणाचे हे मंगळसूत्र हरवले असेल त्यांनी लांजा पोलिस ठाण्याशी संपर्क करून ओळख पटवून घेऊन जावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी केले आहे.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर धावणार मध्यरेल्वेची समर स्पेशल ट्रेन, एकूण २४ फेऱ्या; आरक्षण ‘या’ तारखेपासून

   Follow us on        
Konkan Railway News: उन्हाळी हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेतून मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर एक लांब पल्ल्याची विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण २४ फेऱ्या होणार आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे
01463/01464 एलटीटी-कोचुवेली साप्ताहिक विशेष (एकूण 24फेऱ्या)
01463 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 11.04.2024 ते 27.06.2024 पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून संध्याकाळी 4:00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 08:45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 साप्ताहिक विशेष 13.04.2024 ते 29.06.2024 पर्यंत दर शनिवारी कोचुवेली  येथून दुपारी  4:20  वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी रात्री  09.50 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर, त्रिसूर, कोट्टानम, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम आणि कोल्लम जं.
डब्यांची रचना: 1 फर्स्ट एसी, 1 फर्स्ट एसी कम थ्री टियर एसी , 2 टियर एसी , 6 थ्री टियर एसी, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 8 जनरल सेकंड क्लास डबे.
आरक्षण: उन्हाळी विशेष गाड्यांसाठी  विशेष शुल्कावर बुकिंग 08.04.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल अशी मध्य रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

Loading

Facebook Comments Box

सावंतवाडी | सरसकट बंदुका जमा करण्याच्या आदेशावर शेतकरी नाराज

   Follow us on        
सावंतवाडी :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेती संरक्षण बंदूक जमा करण्यासाठी आदेश काढल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बंदुका सरसकट जमा करण्याबाबतचे आदेश शिथिल करण्याची मागणी नेमळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते,  सध्या उष्णतेतही वाढ झाली आहे. जंगलात पाणीसाठा नसल्याने वन्य प्राणी लोकवस्तीमध्ये घुसत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेती संरक्षण बंदूक गरजेची आहे. मात्र, निवडणूक विभागाने शेतकऱ्यांच्या बंदुका जमा करून करून घेण्याचे आदेश पारित केले आहेत, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात माणूस जखमी किंवा मृत्यू झाला तर त्याबाबतची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे.
वन्य प्राणी त्रास देत असतील तर हवेत गोळीबार करून शेतकरी आत्मसंरक्षण करतात आणि प्राण्यांना पळवून लावतात हे परंपरेप्रमाणे अनेक वर्ष होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बंदुकांच्या बाबत पोलिस स्थानकामध्ये गुन्हे दाखल असतील किंवा तक्रारी असतील त्या बंदुका पोलिसांनी जप्त कराव्यात. मात्र, कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बंदुका सरसकट जमा करण्याबाबतचे आदेश शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात शेती संरक्षक परवानधारक शेतकरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway News:या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षंहीच्या उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक  विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष प्रवासी भाड्यावर:
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक  ०७/०४ /२०२४  ते ०५/०६/२०२४ पर्यंत दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक  ०८/०४/२०२४ ते ०६/०६/२०२४ पर्यंत गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search