Category Archives: गणेश चतुर्थी २०२३

चाकरमान्यांची चिंता वाढवणारी बातमी; ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची घोषणा

मुंबई : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. जसजसा चतुर्थी सण जवळ येत आहे तसतसा उत्साह वाढत चालला आहे. मात्र चाकरमान्यांची चिंता वाढवणारी  बातमी समोर आली  आहे. ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. 
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली असली तरी त्यामध्ये अजून चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर (ST Worker Protest) जाणार आहेत. येत्या 11 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर हा संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 
राज्य सरकारने नुकताच एक जीआर काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांनाही 42 टक्के महागाई भत्ता मिळावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. तसेच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने 11 सप्टेंबरपासून संप करण्यात येणार आहे. 
राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन (ST Worker Protest) करण्यात येणार असल्याचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीनं काढण्यात आलं आहे. 

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून साहित्य वाटपासाठी २५० भजनी मंडळाची निवड…. यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य पुरविणे या जि. प. च्या योजनेची काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात याची सोडत काढण्यात आली. या सोडतीत तालुक्यातील गावांचे गट पाडून प्रत्येक गटातून चार मंडळाची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील भजनी मंडळांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भजनी मंडळांना साहित्य पुरविणे ही योजना सुरू केली आहे. एक पखवाज, एक चकी आणि पाच टाळ असे साहित्य प्रत्येक निवड झालेल्या भजनी मंडळाला दिले जाणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली दरम्यान, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी घ्यावा, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जि. प. कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत जि. प. कडे ३२०६ अर्ज प्राप्त झाले होते. एवढ्या मंडळांना साहित्य देणे शक्य नसल्याने विभागवार लकी ड्रॉ पद्धतीने मंडळांची निवड केली गेली.या लकी ड्रॉ पद्धतीत निवडलेल्या २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे.

 

 

 

Loading

Ratnagiri: बस वाहतूकदारांकडून चाकरमान्यांची होणारी लूट थांबणार; मुंबई-पुण्यासाठी खाजगी बस वाहतुकीचे दरपत्रक जाहीर

रत्नागिरी: हंगामात खाजगी बस वाहतूकदारनकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. मुंबई-पुण्यासाठीच्या खाजगी बसेसचे दरपत्रक ठरवून देण्यात आले असुन बस वाहतूकदारांना या दरांच्या  ५०% जास्त भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. या दरांपेक्षा जर कोणी बस व्यावसायिक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने मुंबई,ठाणे आणि पुण्यासाठीच्या बसेसच्या भाड्याचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहे. या दरापेक्षा अधिक दर एखादा वाहतूकदार आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर  नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. तक्रार नोंदविताना वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.

Loading

सावंतवाडी: मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांसाठी मोफत ‘चहापान’

सावंतवाडी :मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान असलेल्या  झाराप  येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातून येणार्‍या गणेशभक्त व वाहन चालकांकरता मोफत चहा, पाणी व बिस्कीट स्टॉलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज दिली. 

गणेशभक्तांसाठी हा स्टॉल गणपतीपर्यंत चालू राहणार आहे. आज या स्टॉलची पाहणी करून, उपस्थितांकडून स्टॉलच्या व्यवस्थेची माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री रविन्द्र चव्हाण हे आज मुंबई गोवा पाहणी दौर्‍यावर होते. मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. यामुळेच लवकरच ही सिंगल लेन कोकणवासीयांच्या सेवेत खुली होईल. यामुळेच जो प्रवास करायला पूर्वी १२ तास लागत होते, ते अंतर आता जवळपास ८ तासातच गाठता येईल. असं असलं तरीही कोकणवासीयांनी या रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. ओव्हरटेकिंग आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असलेले इतर प्रकार करू नयेत असे त्यांनी कोकणवासीयांना आवाहन केले आहे. 

 

 

 

Loading

Mumbai Goa Highway | गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतुक पोलिसांची विशेष बैठक

नवी मुंबई : गणेशोत्सव काळात कोंकणातील गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नवीमुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

19 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून चाकरमाने कोकणात मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. 16 व 17 रोजी शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात या बैठकीत आले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे 

तसेच राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

Loading

रत्नागिरी : प्रशासनाकडून रिक्षा प्रवास वाहतुकीचे दरपत्रक जाहीर; ‘या’ दरांपेक्षा अधिक दर आकारला गेल्यास…..

रत्नागिरी: हंगामात खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षांचे दरपत्रक ठरवून दिले असून ते प्रसिद्ध केले आहे. या दरांपेक्षा जर कोणी रिक्षाचालक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने रिक्षाचे मिटरने आणि शेअर-ए-रिक्षा तत्त्वावर चालविण्यात येणार्‍या रिक्षांचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहेत. या दरापेक्षा अधिक दर एखादा रिक्षाचालक आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर क्रमांकावर नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

Loading

Mumbai Goa Highway :गणेशभक्तांच्या स्वागतासाठी २४ स्वागत कक्ष सज्ज

Mumbai Goa Highway :रत्नागिरी व रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गाने कोकणात येणार्‍या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४ ठिकाणी, तर रायगड जिल्ह्यात १० ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष सज्ज केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून गणेशभक्त कोकणातील आपल्या गावी येण्यासाठी सुरवात होईल. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १० लाख चाकरमानी दाखल होतील, असा अंदाज जिल्हा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी पोलिस चौकी सज्ज असणार आहेत. रत्नागिरी जिल्हा आढावा घेणारी बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ३९ ऑगस्टला घेतली. जिल्ह्यात एकूण १४ ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष व्यवस्था करण्यात येणार आहे.

कशेडी घाटापासून खारेपाटणपर्यंत तसेच आंबाघाट येथे ही व्यवस्था असणार आहे. रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन करताना गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्याकरिता दहा ठिकाणी चौक्या सज्ज असणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली. खारपाडा पोलिस चौकी, पेण वाहतूक चौकी, वडखळ वाहतूक चौकी, वाकण वाहतूक चौकी, कोलाडनाका वाहतूक चौकी, माणगांव वाहतूक चौकी, लोणेरे वाहतूक चौकी,नातेखिंड महाड चौकी, पोलादपूर वाहतूक चौकी, पाली वाहतूक चौकी या सगळ्या ठिकाणी वाहतूक स्वागतकक्ष सुरू करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव स्वागतासाठी वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी बुधवारी (ता. ६) आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी हे तीन तालुके हे महामार्ग कक्षेत येतात.

क्रेन, रुग्णवाहिकेची सुविधा

गणेशोत्सव काळात भक्तांसाठी महामार्गावर असलेल्या सर्व स्वागत कक्षाच्या ठिकाणी वायरलेस सेट, क्रेन, रुग्णवाहिका या सुविधा सज्ज असणार आहेत, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

Loading

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो-रो सेवा स्थगित ठेवा

रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
मुंबई: गणेशचतुर्थीला कोकणात रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी दिनांक १५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतूक आणि रो रो सेवा स्थगित ठेवावी असे साकडे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांशिवाय अजूनपर्यंत ३१२ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे स्थगित ठेवल्यास अजून गाड्या चालविण्यात येऊ शकतात. असे त्यांनी या निवेदनात म्हंटले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर ताण येणार आहे. या कालावधीत मालवाहतूक आणि रो रो सेवा चालविल्यास रेल्वेमार्गावर गाड्यांचा खोळंबा होणार आहे. अनेक गाड्या सिंग्नल साठी थांबवाव्या लागणार असून त्याचा त्रास प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि रो रो सेवा या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search