Category Archives: गोवा वार्ता

दसरा दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी नक्की वाचा; हॉटेल रूम्स टंचाईमुळे होऊ शकते गैरसोय

गोवा वार्ता: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गोव्यात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास 17000 लोक गोव्यात येणार आहेत. यात सुमारे 12000 खेळाडूंचांच समावेश आहे. याशिवाय प्रशिक्षक, टेक्निकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्य आणि व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.त्यासाठी राज्यातील 100 हून अधिक हॉटेल्स स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे बूक करण्यात आली आहेत. त्यामुळे गोव्यात रूम्सची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एकीकडे नॅशनल स्पर्धा सुरू झालेली असताना गोव्यात पर्यटन हंगामालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांचा ओघ देखील गोव्याकडे सुरू आहे. तसेच ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 
या कारणाने आता जर गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकवेळ आपल्या बजेट चा विचार करून तसा प्लॅन करा. हॉटेल रूमच्या जास्त मागणीमुळे त्यांचे भाव वाढून तुमची ट्रिप महागडी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Loading

Video : मुंबई एलटीटी – मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये उंदरांचा सुळसुळाट

Mice in Train’s Pantry: मुंबई-गोवा ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पॅन्ट्रीमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ उंदीर खात असल्याचा व्हिडीओ एका रेल्वे प्रवाशाने शूट केला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानेतर रेल्वेतील कॅटरिंग सेवांची स्वच्छता आणि सुरक्षिततेचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रविवारी एलटीटी-मडगाव ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. मध्य रेल्वेने देखील या व्हिडीओची पुष्टी केली आहे. मात्र, ट्रेनमधील खानपान सेवा हाताळणाऱ्या आयआरसीटीसीच्या एजन्सीने मध्य रेल्वेवर ठपका ठेवत लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला येथील रेल्वे यार्डमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याचा आरोप केला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली. पण, रेल्वे डब्यांमध्ये आणि रेल्वे यार्डमध्ये उंदीर नियंत्रणाचे उपाय नियमितपणे केले जातात, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

 

 

 

Loading

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार

Kokan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिलेत. दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच चालविण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.

कर्नाटकच्या किनारपट्टीवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसल्याचे कटील यांनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. मंगळुरु आणि गोवा दरम्यानच्या किनारपट्टीचा भाग देशाच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण आहे. हा प्रदेश निसर्गसौंदर्य, समृद्ध वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखला जातो. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर या भागात कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही कटील यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळुरू रेल्वे क्षेत्राचा दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर रेल्वे विभागाच्या प्रशासकीय आणि प्रादेशिक अधिकारक्षेत्रात समावेश करण्याची विनंती खासदार कटील यांनी वैष्णव याना केली होती. मंगळुरू रेल्वे क्षेत्राला दक्षिण रेल्वेने सावत्र वागणूक दिल्याने त्याचा पुरेसा विकास झालेला नाही, असेही कटील म्हणाले.

ही वंदे भारत एक्सप्रेस चालू झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा विस्तार होणार आहे. तसेच ही एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे. यापूर्वी मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात आली आहे.

Loading

अबब! गोव्यात सापडला तब्बल दीड फुट लांब आणि सव्वा किलो वजनाचा बांगडा

गोवा वार्ता : स्वस्तात मस्त आणि मुबलक मिळणारा बांगडा मत्स्यखवय्ये कोकणकरांच्या ताटाची चव वाढवत असतो. बांगडा सहसा १५ ते 20 सेंटिमीटर लांबीचा असतो. मात्र कर्लीसारखा हातभर लांबलचक बांगडाही असू शकतो, असे सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. कारवारजवळील समुद्रात तब्बल दीड फुटांपेक्षा (४८ सेंटीमीटर) लांब आणि १२ सेंटीमीटर रुंद बांगडा सापडला आहे.

कारवारजवळील समुद्रात भला मोठा बांगडा सापडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कारण या बांगड्याची लांबी तब्बल ४८ सेंटीमीटर, आणि रुंदी पाहिली तर १२ सेंटीमीटर एवढी आहे. म्हणजे याचे वजन साधारणपणे १ किलो २३० ग्रॅम एवढे आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा बांगडा सापडणे ही पहिलीच घटना आहे.

हा बांगडा मच्छीमार युवा नेते विनायक हरीकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर तो पुढील अभ्यासासाठी समुद्री जीवशास्त्र पीजी सेंटरकडे पाठवण्यात आला आहे. जेणेकरून जिज्ञासूंना हा बांगडा आता पाहता येणार आहे. सेंट्रल मरीन फिशरी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या दुर्मिळ बांगड्याची पाहणी केली.

Loading

फक्त १५१५ रुपयांमध्ये मुंबई ते गोवा विमानप्रवास; विमान कंपनीची स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ऑफर

Spice jet Offer: स्वातंत्र्य दिनानिमित्त Spice Jet या विमान कंपनीने स्वस्तात विमान तिकीट बुकिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत तुमचाही विमानाने प्रवास करण्याचा विचार असेल, तर स्पाइसजेटच्या या ऑफरचा तुम्ही देखील फायदा घेऊ शकता.
स्पाइसजेटच्या या ऑफरअंतर्गत तुम्ही 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत तिकीट बुक करू शकता. एवढेच नव्हे तर फक्त 15 रूपये जास्त देऊन तुम्ही आवडीची सीट देखील बुक करू शकता.
स्पाईसजेटने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी फक्त रु.1515 मध्ये हवाई प्रवासाचे तिकीट बुक करू शकतात. या तिकिटाच्या रकमेत सर्व कर समाविष्ट आहेत. तसेच, फक्त 15 रुपयांमध्ये आवडती सीट देखील प्रवाशाला निवडता येणार आहे. यासोबतच प्रवाशाला 2000 रुपयांचे तिकीट व्हाउचर देखील मिळणार आहे.
या तिकीट बुकिंग अंतर्गत तुम्ही 15 ऑगस्ट 2023 ते 30 मार्च 2024 पर्यंत प्रवास करू शकता. म्हणजेच या ऑफरअंतर्गत मार्चपर्यंतच्या प्रवासासाठी तुम्हाला तिकीट बुक करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकीट दिले जाणार आहे. असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ही ऑफर जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने Spice Jet (www.spicejet.com) च्या अधिकृत बुकिंग पोर्टलवर चेक केले असता दिनांक 20 ऑगस्ट रोजीची मुंबई ते मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट MOPA या शहरांदरम्यानचे विमानभाडे 1515 असल्याचे दिसून आले.

Loading

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ सोहळा संपन्न; एक्सप्रेस मुंबईसाठी रवाना..

Mumbai Goa Vande Bharat Express :मुंबई-गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 जून) हिरवा झेंडा दाखवला. भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी अकरा वाजता मोदींनी मुंबई-गोवासह इतर चार वंदे भारत एक्सप्रेसला गाड्यांचा शुभारंभ केला.

गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सकाळी अकरा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. उद्घाटन होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ट्रेनचे स्वागत करण्यात आले. मडगाव स्थानकावर यावेळी उत्साही वातावरण होते.

यावेळी मडगाव रेल्वे स्थानकावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (गोवा राज्य), मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(गोवा राज्य), केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (गोवा राज्य), पर्यटनमंत्री रोहन खंवटे(गोवा राज्य), महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, गोवा राज्याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, अधिकारी उपस्थित होते.

Loading

Goa News : अंकलिपीत औरंगजेबचा उल्लेख केल्याने खळबळ….

गोवा | राज्यात मुघल बादशाह औरंगजेबचे स्टेटस मोबाईल वर ठेल्यामुळे वातावरण तापले असताना गोवा राज्यात एक याच नावासंबंधी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोव्याच्या कोंकणी भाषेच्या एका अंकलिपीत प्रकाशकाने औरंगजेब नावाचा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या अंकलिपीत ‘औ’ या मुळाक्षरा समोर औरंगजेबचा उल्लेख केला गेला आहे. या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण होऊन प्रकाशक अडचणीत येणार आहे. मुलांना शिकवताना आपले आदर्श कोण आणि शत्रू कोण याचा फरक समजत नसल्याचे या प्रकारातून दिसत आहे.  
गोवा राज्य शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले कि हा प्रकार धक्कादायक असून ही अंकलिपी ज्या प्रकाशकाने छापली आहे त्या प्रकाशकाचा आम्ही घेत असून 
त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.  

Loading

Mumbai Goa Vande Bharat : रेल्वे प्रशासनातर्फे उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर

Mumbai-Goa Vande Bharat : सर्व कोकणवासीयांना उत्सुकता लागून राहिलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस च्या उद्घाटनाची  नवीन तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवारी दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले जाणार आहे. 
“आमच्याकडे या आधीच आठ डब्यांचा नवा कोरा रेक चेन्नई वरून आला आहे. उद्घाटनाची सर्व तयारी झाली असून शनिवार दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करतील. या प्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत गाडी सर्वात जलद गाडी ठरणार आहे. हे अंतर कापण्यास तिला फक्त ७ तास लागणार आहेत. या गाडीचे वेळापत्रक आणि थांबे लवकरच जाहीर होणार असून दिनांक ५ जूनपासून ही गाडी या मार्गावर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे.” असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. 
या आधी २९ मे रोजी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखविला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. दिनांक २८ मे रोजी नवा कोरा रेक मडगाव स्थानकावर दाखल झालाही होता, मात्र काही कारणाने ही तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र आता पुढे आलेली नवीन तारीख रेल्वेतर्फे पाळली जाईल अशी आशा आहे. 

Loading

OYO पर्यटन सर्व्हे; उन्हाळी पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्यांना व पर्वतीय प्रदेशांना पर्यटकांची पसंती

पर्यटन | उन्हाळी पर्यटनासाठी देशभरातील पर्यटकांनी पहिली पसंती गोवा आणि मनाली या ठिकाणांना दिल्याचे समोर आले आहे. OYO Summer Vacation index 2023 नुसार ही माहिती समोर आली आहे.

हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी ऑनलाईन बुकिंग सेवा देणाऱ्या ओयो या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

OYO ने आपल्या अॅप द्वारे हे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 15,000 लोकांना प्रश्न विचारण्यात आले. ओयोच्या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी एकूण 92 टक्के लोक देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करत आहेत.

या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, लोकांचे प्राधान्य 1 ते 3 दिवसांच्या मुक्कामासह लहान सहलींना आहे. तसेच पर्यटन स्थळ कोणते आहे, हे देखील पर्यटकांसाठी खूप महत्वाचे असते.

या सर्व्हेक्षणात पर्यटकांनी पर्वतीय प्रदेशांना पर्यटनासाठी सर्वाधिक 30 टक्के पसंती दर्शवली आहे. तर त्या खालोखाल समुद्रकिनाऱ्यांना 26 टक्के मते मिळाली आहेत. ओयोने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

ओयोने म्हटले आहे की, “भारताचे आवडते माउंटन डेस्टिनेशन मनाली आहे, त्यानंतर काश्मीर, मॅक्लॉड गंज, उटी आणि कूर्ग आहेत. तर समुद्रकिनाऱ्यांसाठी गोवा हा भारतीयांसाठी पसंतीचा मुख्य पर्याय आहे. एकूण 50 टक्के लोक गोव्यात प्रवास करू इच्छितात.

7 मे ते 14 मे 2023 या काळात हे संशोधन झाले आहे. त्यात म्हटले आहे की, “गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्सच्या मागणीत 20 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानंतर अंदमान निकोबार, केरळ, पाँडेचेरी आणि गोकर्णचा समावेश आहे.”

Loading

गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीची ‘पुष्पा स्टाईल’; मुंबई – गोवा महामार्गाच्या तपासणी नाक्यावर २२ लाखांची दारू जप्त

गोवा – गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत २२ लाख रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या बद्दल सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी उशिरा पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ बीएल ९८८४) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कागदपत्रे तपासताना वैयक्तिक चौकशीवेळी चालक गांगरला. ते पाहून ट्रकची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरवून अधिकारी बाहेर आले. तेवढ्यात चालकाने तेथून पळ काढला.

या ट्रकची तपासणी करताना या ट्रक च्या पाठीमागील हौद्यात सिमेंटचे ब्लॉक आढळून आलेत. या कारवाईत पेडणे अबकारी निरीक्षक कमलेश माजीक, विभूती शेट्ये यांच्यासह विनोद सांगडेकर, नितेश नाईक, दिनकर गवस, रामचंद्र आचार्य, रामनाथ गावस, सत्यवान नाईक, नितेश मळेवाडकर, विठोबा नाईक, स्वप्नेश नाईक, चालक दीपक परुळेकर यांनी सहभाग घेतला.

सिमेंट लाद्यांखाली  दारूचे बॉक्स

ट्रकच्या बाहेरील भागात सिमेंट काँक्रीटच्या लाद्या रचून ठेवल्या होत्या. अबकारी कर्मचाऱ्यांनी त्या खाली उतरवल्या असता त्यात दारूचे लपवलेले बॉक्स आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कर्मचाऱ्यांनी कळविले.सर्व बॉक्सचा पंचनामा करून ट्र्क ताब्यात घेतला यात आँरेंज ,ग्रीन ॲपल,रॉयल ब्ल्यू ,किंग फिशर बीअर , डारवेज व्हीस्की, बाँम्बे कस्क या प्रकारचे बॉक्स मिळाले. सदर गाडी फोंड्याहून मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search