Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
ज्ञान आणि मनोरंजन Archives - Kokanai

Category Archives: ज्ञान आणि मनोरंजन

कोकणासारखे वागून बघावे….

   Follow us on        

कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई वडिलाच्या घरात राहतो, फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.

नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी, मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका, मुले तिथे एकाच चुलीवर, दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. भावा भावात कितीही भांडणे असले तरी, या दहा दिवसात एकत्र राहणे, एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा तिथला कडक नियम आहे.

असे गणपतीमुळे एकत्र आल्याने, कधी कधी जुने भावांतील वाद एकत्र आल्याने मिटले जातात. नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे मनाई असते, नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.

कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं. आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, भजने, दशावतार, शक्ती तुरा नाच, नमन भारुड,कथा इत्यादी रात्री कार्यक्रम उत्साहात करतात. आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात.

गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पाऊलांची दाटी, दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं, गुण्या गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं. पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या, मी करते असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा गावात, घरा-घरात पहायला मिळते. योग्य वेळी, योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, हे सर्व कोकणाच्या बाहेर प्रेम, माया संपत चालली आहे.

एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही. एका आई वडिलाची मुले पण द्वेष, मत्सर वाढत चाललाय. त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे. दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे. आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसलेत तुमच्या काडी लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात.

संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत. काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी, जमीनीसाठी भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा, नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथे सुद्धा जागा मिळणार नाही.

कोकणासारखे वागून बघावे, कोकणात एकाही शेतकऱ्यांने आजपर्यंत आत्महत्या केली नाही. तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी. कोकण बाहेर दहा एकरवाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही व रात्री मुड बनला की, घेतला फास.

साधेपण जपावा, कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून घरी दरवर्षी कोकणा प्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा. गौराई बसवतात तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करतात, तसे आपल्याच बहिणीला वडे आदी सागोती नाही जमले तर, कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहीजे,

जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वास एकत्र पाहून आनंदीत होईल,

ही भोळी अपेक्षा जरी असले तरी, प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावांचे बहिणींचे, भावा भावांचे एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील, यात तिळमात्र शंका नाही.

साभार – माहिती सेवा ग्रुप

Loading

हायड्रोजनवर धावणारी पहिली ट्रेन लवकरच भारतीय रुळांवर

   Follow us on        
Bhartiy Railway News: हरित Green हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीसाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या मिशनचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे यावर्षी आपली पहिली हायड्रोजन ट्रेन रुळावर आणणार असल्याची माहिती भारतीय रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या वर्षी सुरू करण्यात येणार असून सन २०४७ पर्यंत संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या सुमारे ५० गाड्या सुरू करण्याची भारतीय रेल्वे मंत्रालयाची योजना असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य अनिल कुमार खंडेलवाल यांनी दिली आहे.
हायड्रोजन ट्रेनचे फायदे 
पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषणरहित रेल्वे यंत्रणा उभारण्याच्या दिशेने देशाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हायड्रोजन ट्रेन ट्रेनमधून होणारे ध्वनिप्रदूषणही अतिशय कमी आहे. हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेमुळे कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनात कित्येक टनांनी घट होणार आहे. तसेच या ट्रेनमुळे दरवर्षी कित्येक लाख लिटर डिझेलची बचत होणार आहे. हायड्रोजन इंधनावरील रेल्वे जाळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे.
हायड्रोजनवर धावणारी जगातील पहिली ट्रेन सुरु करण्याचा मान जर्मनीला जातो. २०१८ साली ही ट्रेन जर्मनीने चालू केली होती. त्यावेळी चालविण्यात आलेल्या हायड्रोजन ट्रेनचा वेग १४० प्रति किलोमीटर एवढा होता. त्यानंतर चीन, जर्मनी, जपान, तैवान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांनी अशा प्रकारच्या ट्रेन आपल्या देशात चालू केल्या आहेत.

Loading

Brain Test: हा पासवर्ड तुम्ही शोधू शकता का?

   Follow us on        

Puzzle Time: आपल्या मेंदूसाठी व्यायाम. तुम्हाला फक्त हा तीन आकडी पासवर्ड शोधायचा आहे. तुमच्या मदतीला हींट देण्यात आल्या आहेत.

 

1) 6 8 2 – यातील एक नंबर बरोबर आहे आणि योग्य जागेवर आहे.

 

2) 6 1 4 – यातील एक नंबर बरोबर आहे मात्र चुकीच्या जागेवर आहे.

 

3) 2 0 6 – यातील दोन नंबर बरोबर आहेत मात्र चुकीच्या जागेवर आहेत.

 

4) 7 3 8 – यातील एकही नंबर बरोबर नाही आहे.

 

5) 7 8 0 यातील एक नंबर बरोबर आहे मात्र तो चुकीच्या ठिकाणी आहे.

 

चला मग, लावा डोके…. आणि हो आपले उत्तर कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की पोस्ट करा..

Loading

कोकण रेल्वेत चित्रित झालेला ‘नवरा माझा नवसाचा-२’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

   Follow us on        
Navra Maza Navsacha-2 Release Date:  सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा-२ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटरसिकांना एक खुशखबर आहे. या चित्रपटाची रिलीझ होण्याची तारीख जाहीर झाली आहे. येत्या २० सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सचिन पिळगावकर यांनी दिली आहे.
१९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला तुफान यश मिळाले होते. या चित्रपटाचे ९०% चित्रीकरण एसटी बस मध्येच झाले होते. मात्र नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचे छायाचित्रण कोकण रेल्वे मध्ये झाले आहे. या चित्रपटात अजून एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नाही तर तो  आता टीसी झाला आहे. अशोक सराफ यांचा नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील पहिला लूक समोर आला असून यामध्ये ते कंडक्टर ऐवजी तिकीट चेकरच्या भूमिकेत दिसत आहेत.
कोकण रेल्वे आणि कोकणकर यांचे एक अनोखे नाते असल्याने हा चित्रपट कोकणकरांच्या पसंदीस उतरणार हे नक्की.

 

Loading

Konkan Railway | NSG1 की NSG2? जाणून घ्या तुमचे स्थानक भारतीय रेल्वे स्थानकांच्या कोणत्या श्रेणीत मोडते ..

   Follow us on        
Categorization of Railway Stations:भारतातील रेल्वे स्थानकांच्या वर्गीकरणासाठीच्या निकषांमध्ये नोव्हेंबर, 2017सुधारणा करण्यात आली आहे. नवीन वर्गीकरणानुसार, स्थानकांच्या वर्गीकरणासाठी त्या स्थानकावरील आणि प्रवाशांची संख्या आणि एकूण कमाई या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या आहेत.
त्यानुसार भारतातील स्थानकांची 3 गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहेत.
१) नॉन उपनगरीय (NSG)
२) उपनगरीय (SG)
३) हॉल्ट (HG).
पुढे या गटांना अनुक्रमे 1-6, 1-3 आणि 1-3 या श्रेणींमध्ये विभागण्यात येते. ही वर्गवारी खालील कसोटीच्या आधारे करण्यात येते.
नॉन उपनगरीय स्थानके NSG
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या 
NSG 1 500 कोटीपेक्षा जास्त 2 कोटींहून अधिक
NSG 2 100 ते 500 कोटी 1 ते 2 कोटी
NSG 3 20 ते 100 कोटी 50 लाख ते 1 कोटी
NSG 4 10 ते 20 कोटी 20 लाख ते 50 लाख
NSG 5 1 ते 10 कोटी 10 लाख ते 20 लाख
NSG 6 1 कोटी पेक्षा कमी 10 लाख पेक्षा कमी
उपनगरीय स्थानके  SG
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या
SG 1 25 कोटीपेक्षा जास्त 3 कोटींहून अधिक
SG 2 10 ते 25 कोटी 1 ते 3 कोटी
SG 3 10  कोटी पेक्षा कमी 1 कोटी पेक्षा कमी
हॉल्ट  स्थानके   HG  
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या 
HG 1 50 लाखपेक्षा जास्त  3 लाखपेक्षा जास्त 
HG 2 5 लाख ते 50 लाख 1 लाख ते 3 लाख
HG 3 5 लाख पेक्षा कमी  1 लाख पेक्षा कमी 
कोकण रेल्वे मार्गावरील स्थानके कोणत्या श्रेणीत मोडतात?
२०२२-२३ च्या वार्षिक उत्पन्नानुसार केलेल्या वर्गीकरणानुसार कोकण रेल्वे मार्गावरील कोणत्याही स्थानकाचा समावेश NSG1 या श्रेणीत समावेश होत नाही. तर फक्त मडगाव या स्थानकाचा NSG2 या श्रेणीत समावेश होतो. इतर स्थानकाचा तपशील खालीलप्रमाणे

NSG2 (१ स्थानक)

मडगाव जं.

NSG3 (७ स्थानके)  

चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, उडुपी

NSG4 (२ स्थानके) 

सावंतवाडी रोड, कारवार

NSG5 (२२ स्थानके)  

माणगाव, वीर, खेड, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, पेर्नेम, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, कुंदापुरा, बारकुर, मुल्की, सुरथकल

NSG6 (३३ स्थानके) 

कोलाड, इंदापूर, गोरेगाव रोड, सपे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाण खवटी, अंजनी, कामठे, कडवई, उक्षी, भोके, निवासर, वेरावली, खारेपाटण, नांदगाव रोड, झाराप, मदुरे, वेर्ना, माजोर्डा जं., बल्ली, कानाकोना, लोलिम, अस्नोती, हार्वर्ड, मानकी, शिरूर, बिजूर, सेनापुरा, इन्नांजे, पाडुबिद्री, नंदीकूर, ठाकूर

HG1 (१ स्थानक)

बाइंदूर मुकांबिका रोड

HG2 (२ स्थानके)

सौंदल,  सुरावली

HG3 (१ स्थानक)

चित्रपूर

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

आंबा कशाने खराब होतो?

   Follow us on        

Causes mango to rot : हापूस आंब्याची आवक वाढल्याने आता दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. सहाजिकच मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी होताना दिसत आहे. मात्र त्याच बरोबर आंबा खराब निघण्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत.

ग्राहक बोलताना एक तक्रार सांगतात ती अशी – मागच्या वर्षी आम्ही अमुक कडून 5 डझन ची हिरव्या आंब्यांची पेटी घेतली होती,आम्ही 6-7 दिवसांनी जेव्हा आंबा पिकल्याचा वास यायला लागला तेव्हा पेटी उघडून बघितली तर बरेचसे आंबे देठा कडून नसलेलं होते, काळे पडले होते इत्यादी इत्यादी, हे सांगताना कुठेतरी त्यांच्या मनात असते कि त्या आंबा विक्रेत्यांनी फसवले आहे.परंतु या मध्ये कस्टमर चें अज्ञान आणि आंबे विक्रेत्यांनी न दिलेल्या सूचनामुळे आंबा वाया जातो. आंबा खराब निघाला की विक्रेत्याने फसवणूक केली आहे असा सूर निघतो. पण कित्येकदा विक्रेत्याची चूक नसते, तो चांगलाच आंबा देतो मात्र आपल्या चुकीमुळे आपणच तो खराब करतो. थोडीशी काळजी घेतली तर आंबा खराब होणार नाही.

आंबा खरेदी करून घरी आणल्यानंतर आंब्याचा बॉक्स लगेच उघडून हवेशीर आणि सावलीच्या जागेत ठेवा. शक्य झाल्यास घरात आंब्याची अढी लावा जेणेकरून आंबा तुमच्या डोळ्यादेखत राहिल आणि आंबा जास्त पिकून सडणार नाही किंवा देठा पाशी काळा पडणार नाही.

बर्‍याच लोकांचा असा गैरसमज आहे कि आंबा पिकण्यासाठी उष्णता लागते, म्हणून पेटी 5-6 दिवस उघडली जातं नाही आणि मग आंब्याचा कोळसा होऊन जातो. आंबा पिकण्यासाठी 30-35डिग्री तापमान पुरेसे असते..तसेच खेळती हवा याची आवश्यकता असते. पेटीतून खूप दिवस ना काढल्याने पेटीचता आतील तापमान वाढून आंबा हिरव्याचा पिवळा ना होता किंवा किंचित पिवळा होऊन तो काळा पडायला लागतो म्हणजेच नासतो, आणि आपल्या मराठी म्हणी प्रमाणे एक सडका नासका आंबा आजूबाजूच्या आंब्यांना नसवतो. त्यामुळे जेव्हा आंबा आणाल तेव्हा पेटी किंवा बॉक्स उघडून आंब्याची अढी टेबल किंवा बेड किंवा कुठेही अश्या ठिकाणी लावा ( खाली न्यूज पेपर पसरून )म्हणजे तुमचा आंबा नसणार नाही आणि नुकसान टळेल.

Loading

कोकणच्या मातीचा गंध असलेली, सावंतवाडीच्या सुपुत्राने बनवलेली वेबसीरीज ‘संभ्रम’ बुधवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ट्रेलर येथे पहा

S. R. Y. Production प्रस्तुत, निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकट आणि दिग्दर्शक कारिवडे गावच्या सागर गोसावी यांच्या संकल्पनेतून 'संभ्रम' ही रहस्यमय कथा साकारली आहे. ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते. प्रेक्षकांच्या मनातही भ्रम निर्माण होतो.

   Follow us on        
सावंतवाडी, ता. ८ : तालुक्यातील कारिवडे-गोसावीवाडी येथील सागर गोसावी या युवकाने दिग्दर्शित केलेल्या सात भागांची ‘संभ्रम’ ही मराठी वेबसीरीज बुधवारी (ता.१०) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणार आहे. आज  त्याच्या पोस्टरचे अनावरण आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गरीब आणि ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित बनवलेल्या या वेबसीरीजमध्ये प्रेम प्रकरणातून मित्रांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होते, हे दाखविल्याचे निर्माता आनंद मेस्त्री आणि दिग्दर्शक सागर गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सावंतवाडी आणि परिसरात सिरीजचे शूटिंग झाले. चार साडेचार लाख रुपये खर्च करुन हा प्रयत्न केला आहे. यात स्थानिक कलाकारांनी काम केले आहे. वेब सिरीजमध्ये सुरुवातीच्या भागापासून निर्माण झालेला गुंता, संभ्रम शेवटच्या भागांमध्ये उघड होतो. त्यामुळे सर्वच्या सर्व भाग निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. परंतु, नव्याने काहीतरी करण्याच्या उमेदीने आणि या भागातील निसर्ग आणि कलाकार जगासमोर यावेत यादृष्टीने काम करत आहोत. आम्हाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. ही प्राथमिक सुरुवात आहे. भविष्यात यापेक्षा अधिक चांगले करू. असे यावेळी चित्रपट निर्माते सागर गोसावी यावेळी म्हणालेत.
 यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, रवी जाधव, कलाकार गायत्री रामशिंदे, राम निपाणीकर, सुहास रुके आदी उपस्थित होते.
Watch Trailer Here 👇🏻

Loading

“दिनांक, दूरदर्शन, वेतन……….” स्वा. सावरकरांनी मराठी भाषेला दिलेत शेकडो शब्द; यादी येथे वाचा

   Follow us on        
Savarkar Contribution’s for Marathi Language : स्वात्रंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्याचे देश प्रेम, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गोष्टी आताच्या प्रेक्षकवर्गाला चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  या शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट जी अनेकांना माहितीही नसेल ती  म्हणजे त्यांचे मराठी प्रेम आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले शेकडो शब्द.
सावरकरांनी दिलेले हे शब्द त्यांच्याकडून मरठी भाषेला दिलेलं एक गिफ्ट्च आहे..
कारण मराठी भाषेची व्याप्ती ही वेळीच वाढविणे खूप गरजेचे आहे हे सावरकरांनी आधीच ओळखले होते..त्यामुळे रोजच्या वापरात असे काही शब्द होते की जे उर्दू,हिंदी याची सरमिसळ असणारे शब्द होते.. त्यामुळे मराठी भाषेचे सौंदर्य खुलवायचे असेल तर त्या भाषेला साजेशी अशी शब्दरचना असायला हवी ही सावरकरांची इचछा होती.
सर्वसामान्य माणसाच्या संवादाचे माध्यम असणारी आपली ही सुंदर भाषा जर त्याच शैलीत बोलल्या गेली नाही तर त्याचे सौंदर्य हे खुलत नाही असे सावरकरांचे म्हणणे होते..अनेक इंग्रजी शब्द आपण आजही मराठी भाषेत वापरतो हे सावरकरांना मान्य नव्हतं.. आणि त्यातूनच त्यांनी अशी काही मराठी शब्दरचना केली की जी आजही आपण वापरतो..
  • दिनांक (तारीख)
  • क्रमांक (नंबर)
  • बोलपट (टॉकी)
  • नेपथ्य
  • वेशभूषा (कॉश्च्युम)
  • दिग्दर्शक (डायरेक्टर)
  • चित्रपट (सिनेमा)
  • मध्यंतर (इन्टर्व्हल)
  • उपस्थित (हजर)
  • प्रतिवृत्त (रिपोर्ट)
  • नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
  • महापालिका (कॉर्पोरेशन)
  • महापौर (मेयर)
  • पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
  • विश्वस्त (ट्रस्टी)
  • त्वर्य/त्वरित (अर्जंट)
  • गणसंख्या (कोरम)
  • स्तंभ ( कॉलम)
  • मूल्य (किंमत)
  • शुल्क (फी)
  • हुतात्मा (शहीद)
  • निर्बंध (कायदा)
  • शिरगणती ( खानेसुमारी)
  • विशेषांक (खास अंक)
  • सार्वमत (प्लेबिसाइट)
  • झरणी (फाऊन्टनपेन)
  • नभोवाणी (रेडिओ)
  • दूरदर्शन (टेलिव्हिजन)
  • दूरध्वनी (टेलिफोन)
  • ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
  • विधिमंडळ ( असेम्ब्ली)
  • अर्थसंकल्प (बजेट)
  • क्रीडांगण (ग्राउंड)
  • प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
  • मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
  • प्राध्यापक (प्रोफेसर)
  • परीक्षक (एक्झामिनर)
  • शस्त्रसंधी (सिसफायर)
  • टपाल (पोस्ट)
  • तारण (मॉर्गेज)
  • संचलन (परेड)
  • गतिमान
  • नेतृत्व (लिडरशीप)
  • सेवानिवृत्त (रिटायर)
  • वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

Loading

IFFI 2023: इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्सची यादी प्रसिद्ध; मराठी सिनेमाला स्‍थान नाही

Iffi Goa 2023: गोवा चित्रपट महोत्सवात या वर्षी भारतीय पॅनोरमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्सची यादी सोमवारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) प्रसिद्ध केली.

इंडियन पॅनोरमा श्रेणी अंतर्गत निवडलेले हे 45 चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोवा चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांची निवड 12 तज्ज्ञांच्या ज्युरीने केली होती. ज्युरींना फीचर फिल्म श्रेणीसाठी एकूण 408 चित्रपटांकडून अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 25 चित्रपट निवडले गेले आहेत. मात्र  मुख्य विभागात एकही मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आलेला नाही.

निवडले गेलेल्या चित्रपटांची नावे आणि दिग्दर्शक खालीलप्रमाणे:

  • आरारीरारू – कन्नड – संदीप कुमार वी
  • आट्टम – मल्याळम – आनंद एकर्षि
  • अर्धांगिनी – बंगाली – कौशिक गांगुली
  • डीप फ्रिज – बंगाली – अर्जुन दत्ता
  • ढाई आखर – हिंदी – प्रवीण अरोड़ा
  • इरट्टा – मल्याळम- रोहित एम जी कृष्णन
  • कादल एनबातु पोतु उदमाई – तमिळ- जयप्रकाश राधाकृष्णन
  • काथल – मल्याळम- जेओ बेबी
  • कांतारा – कन्नड – ऋषभ शेट्टी
  • मलिकाप्पुरम – मल्याळम- विष्णु शशि शंकर
  • मंडली – हिंदी – राकेश चतुर्वेदी ओम
  • नीला नीरा सूरियां  – तमिळ- संयुक्ता विजयन
  • न्ना थान केस कोडू – मल्याळम- गणेश राज
  • रबींद्र काब्य रहस्य – बंगाली – सयांतन घोषाल
  • सना – हिंदी – सुधांशु सरियाद
  • वैक्सीन वार – हिंदी – विवेक अग्निहोत्री
  • वध – हिंदी – जसपाल सिंह संधू
  • विदुथलाई पार्ट 1- तमिळ- वेट्री मारन
  • 2018 एवरीवन इज ए हीरो – मल्याळम – जे ए जोसफ
  • गुलमोहर – हिंदी – राहुल वी चिट्टेला
  • पोन्नियिन सेल्वन पार्ट – तमिळ- मणिरत्नम
  • सिर्फ एक बंदा काफी है – हिंदी – अपूर्व सिंह कर्की
  • द केरल स्टोरी – हिंदी – सुदीप्तो सेन

Loading

“हॅव अ बोरिंग बर्थडे.. वीरू” सचिनच्या विरूला वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा…

मुंबई :आज माजी भारतीय क्रिकेटवीर वीरेंद्र सेहवाग याचा वाढदिवस. या निमित्ताने वीरेंद्र सेहवाग अर्थात वीरू ला सर्व त्याच्या चाहत्यांनी विविध माध्यमातून शुभेच्छाच पाऊस पाडला आहे. मात्र विरुचा क्रिकेट पार्टनर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंट वर विरूला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पोस्ट केले की 

“जेव्हा मी त्याला हळू खेळ आणि क्रीजवर राहण्यास सांगितले त्यावर तो म्हणाला, “ठीक आहे” आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रहार करून चौकार मारला. माझ्या सल्ल्याचा अगदी विरुद्ध वागायला आवडणाऱ्या माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध वागतो म्हणून मी त्याला मी म्हणणार आहे……हॅव अ बोरिंग बर्थडे,वीरू”

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search