Bhartiy Railway News: हरित Green हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीसाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या मिशनचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे यावर्षी आपली पहिली हायड्रोजन ट्रेन रुळावर आणणार असल्याची माहिती भारतीय रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या वर्षी सुरू करण्यात येणार असून सन २०४७ पर्यंत संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या सुमारे ५० गाड्या सुरू करण्याची भारतीय रेल्वे मंत्रालयाची योजना असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य अनिल कुमार खंडेलवाल यांनी दिली आहे.
हायड्रोजन ट्रेनचे फायदे
पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषणरहित रेल्वे यंत्रणा उभारण्याच्या दिशेने देशाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हायड्रोजन ट्रेन ट्रेनमधून होणारे ध्वनिप्रदूषणही अतिशय कमी आहे. हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेमुळे कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनात कित्येक टनांनी घट होणार आहे. तसेच या ट्रेनमुळे दरवर्षी कित्येक लाख लिटर डिझेलची बचत होणार आहे. हायड्रोजन इंधनावरील रेल्वे जाळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे.
हायड्रोजनवर धावणारी जगातील पहिली ट्रेन सुरु करण्याचा मान जर्मनीला जातो. २०१८ साली ही ट्रेन जर्मनीने चालू केली होती. त्यावेळी चालविण्यात आलेल्या हायड्रोजन ट्रेनचा वेग १४० प्रति किलोमीटर एवढा होता. त्यानंतर चीन, जर्मनी, जपान, तैवान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांनी अशा प्रकारच्या ट्रेन आपल्या देशात चालू केल्या आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad