सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची आज महत्त्वाची बैठक सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदीर, सावंतवाडी येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकातील समस्या, अपूर्ण अवस्थेत असलेले सावंतवाडी टर्मिनस, प्रवाश्यांच्या समस्या आदी विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी अध्यक्ष/सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.
पळस्पे ते इंदापुर डीसेबंर २०२४ अखेरपर्यंत शक्य नाही पुलाचे कामही बंद
रायगड प्रतिनीधी:-गणेश नवगरे: महाराष्ट्र राज्यातिल लोकसभा निडणुकीपुर्वी मुबंई गोवा राष्ट्रिय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत २०२४ पर्यंत पुर्ण हो़ईल व महामार्गाचे काम हे युध्दपातळीवर सुरू असल्याचे आश्वासने कोकणातील सर्व पक्षाच्या नेते मंडळीनीं आपल्या भाषणशैलीतुन जनतेला दिली होती.माञ सध्या सुरू असेले महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असुन या संदर्भमार्गावरील अनेक पुलांची कामे अध्याप अपुर्णच आहेत या महामार्गवरील कामे पुर्ण होण्यास कमीत कमी तीन ते चार वर्ष लागण्याची शक्यता दिसुन येत आहे.
मुबंई गोवा महामार्गावरील वडखळ पर्यंतचे काम पुर्ण झाले आहे: माञ नागेठणे, कोलाड, पुई,माणगाव येथील प्रमुख पुलांचें काम अर्धवट आहे. पळस्पे ते इंदापुर हा तब्बल ८४ किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता.याचे दोन टप्प्यात विभाजन केल्यानतंर पळस्पे ते कासू पर्यंत काम होत आले आहे. माञ त्या नतंर काम पुर्ण ठप्प झाले आहे.
माणगाव बायपासचे काम न केल्याने ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामादरम्यान १०० वॉर्डन्स लावण्यासदंर्भात राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.त्याच्या पुढच्या रसत्याचे काम हे एल एन टीकडे असुन बहुतांश काम पुर्ण झाले आहे.
मुबंई गोवा महामार्गाचे काम हे २०१० पासुन संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम होण्यासाठी कोकणकरांच्या जनआक्रोष समितीने माणगाव येथेआमरणऊपोषण केले होते याची दख़्खल प्रशासनानी घेतली होती,तसेत माणगाव येथे प्रशासकिय कार्यालयाला पञ देऊन दिंडीही काढण्यात आली होती.विषेश बाब म्हणजे स्वता बांधकाम मंञी रविंद्र चव्हाण यांनी तब्बल ५ वेळा पहाणी दौराही केला होता त्याच बरोबर कोकणकरांना दिलासा देण्यासाठी निवडणुकी पूर्वी स्वता मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनीही माणगाव पर्यंत पहाणी केली होती. जनआक्रोष या महामार्गाबाबत सतत पाठपुरावा करत असुन मिळतात फक्त खोट्या डेडलाईन ञस्त कोकणकर पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असुन पुढिल नियोजना बाबत सद्या जनआक्रोषची चर्चा सुरू आहे.या बाबत जनआक्रोष कडुन वारंवार सांगण्यात
येत आहे कि रोज आपघात होत आहेत परंतु अपघात ग्रस्तांना शासनाची कुठलिही मदत त्या परीवाराला मिळत नाही. दळवणालाही मोठा फटका बसतआहे. सुरूवातिला मुबंई गोवा महामार्ग हा ‘बिओटी तत्वावर बांधला जाणार होता; माञ प्रधानमंञी नरेद्रं मोदी हे पंतप्रधान झाल्यानतंर या महामार्गासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन दिला आहे परंतु दोन चार ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मंञ्यानी अनेकदा खंत व्यक्त केली आहे.
“इंदापुरपर्यंत महामार्ग मार्च महीण्यापर्यंत पुर्ण होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील ८४ किलोमिटर मार्गावरील १० किलोमिटरचे काम शिल्लक आहे हे काम प्रगतीपथावर आहे आमटेम,नागोठणे,कोलाड, पुई, आणि पुढे इंदापूर येथिल काही कामच्या टप्प्याचा समावेश आहे. महामार्गासाठी निधीही पुरेसा उपलब्ध आहे.”
-श्री यशवंत घोटकर-प्रकल्प संचालक,राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण
केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी पार्लमेंट्री बोर्डासमोर सादर केल्याचीही माहिती आहे. 14 डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची, तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sleeper Vande Bharat : चेअर कार वंदे भारत ट्रेन सध्या देशभरात लोकप्रिय होत आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे. स्लीपर वंदे भारतच्या मदतीने प्रवाशांना झोपून आरामात लांबचा प्रवास करता येणार आहे. शुक्रवारी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लोकांची प्रतीक्षा संपली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून तो ट्रॅकवर चाचणीसाठी तयार आहे. या ट्रेनची चाचणीही लवकरच सुरू होऊ शकते.
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोणत्या तारखेपासून धावणार हे रेल्वेने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी पुढील वर्षी जानेवारीत धावणारी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन व्हर्जनमध्ये चालवली जाऊ शकते आणि ही ट्रेन पहिली स्लीपर व्हर्जन ट्रेन असेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्लीपर वंदे भारतबाबत अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे.
यापूर्वी २ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ या चेअर कारबाबत सांगितले होते की, सध्या अशा १३६ गाड्या धावत आहेत. यापैकी १६ वंदे भारत एक्स्प्रेस सेवा तामिळनाडू राज्यातील स्थानकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. दिल्ली ते बनारस दरम्यान सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन धावत असून ती ७७१ किमी चे अंतर पार करते. राज्यसभेत अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या नियोजित वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक सुविधा आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहेत.
स्लीपर वंदे भारत ट्रेनचे फीचर्स –
1- ट्रेनमध्ये कवच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
2- ही ट्रेन EN-45545 HL3 अग्निसुरक्षा मानकांनुसार असेल.
3-क्रॅशवर्थी आणि जर्क-फ्री सेमी परमानेंट कपलर आणि अँटी क्लाइंबर.
4- EN मानकांच्या अनुरूप कारबॉडीचे क्रॅशवर्थी डिजाइन.
5- ऊर्जा दक्षतेसाठी अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम.
6- इमरजन्सी स्थितीत प्रवासी आणि ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट दरम्यान संवादासाठी आपातकालीन टॉक-बॅक यूनिट.
7- ट्रेनमध्ये सेंट्रली कंट्रोल्ड ऑटोमैटिक प्लग दरवाजे आणि रुंद गँगवे.
8-वरच्या बर्थवर चढण्यासाठी चांगल्या डिजाइनच्या शिड्या.
9- प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एसी, सॅलून लायटिंग आदि सुविधा. यासोबतच आरसे व आकर्षक इंटेरिअर या ट्रेनमध्ये असणार आहे.
Shaktipeeth Expressway Updates:वर्धा जिल्ह्यापासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला जनता पूर्ण पाठिंबा देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी नंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन सुरू करून पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हा द्रुतगती मार्ग ज्या 12 जिल्ह्यांतून जातो, त्यापैकी केवळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातच विरोध आहे, ज्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल आणि या महामार्गाचे काम लवकरच सुरू केले जाईल असे ते म्हणालेत.
11 जिल्हय़ातून जाणार्या सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गाला शेतकर्यांनी विरोध केला होता. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यामुळे मोठा फटकाही बसला होता. त्यामुळ सावधानता म्हणुन विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे भेटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास हालचाली झाल्या आहेत.
शक्तीपीठ एक्स्प्रेसमध्ये 802 किमी लांबीमध्ये 26 इंटरचेंज असतील.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलवसुली बंद केल्याचा निर्णय ताजा असतानाच मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’वरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्याने टोलमुक्तीचा फटका ‘अटल सेतू’ला बसल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. ॲाक्टोबर महिन्यात अटल सेतूवरुन सात लाख सात हजार १०४ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद झाली. ही संख्या नोव्हेंबर महिन्यात सहा लाख ६९ हजार ९२ पर्यत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोलमाफी हे कारण यामागे असू शकते का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात अटल सेतूवरुन हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक घटली आहे.
मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – न्हावाशेवा असा २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर जेमतेम १२ ते १५ मिनिटांत कापणे यामुळे शक्य झाले. नवी मुंबईच्या दक्षिणेकडील उलवे, उरण, द्रोणागिरी, जासई, पनवेल, गव्हाण यासारख्या उपनगरांमधील रहिवाशांसाठी मुंबई या सेतूमुळे जवळ आल्याने येथील प्रवासी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अटल सेतूला मिळेल असे दावेही केले जात होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा सेतू सुरु करताना एका बाजूस प्रवासासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि नियमित कामानिमित्त मुंबईत येजा करणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. तशा प्रतिक्रियाही या उपनगरांमध्ये उमटल्या. असे असले तरी पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू सोयीचा ठरल्याचे चित्र आहे. असे असले तरी अजूनही नजिकच्या महिन्यांमध्ये या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दहा लाखांच्या पलिकडे पोहोचलेली नाही. राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेताच अटल सेतूवरील प्रवाशी वाहनांची संख्या आणखी कमी झाली असून यामध्ये हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.
EPFO Updates: केंद्र सरकार आता भविष्य निर्वाह निधीशी (EPFO) संबंधित व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सरकारचा EPFO ३.० उपक्रमांतर्गत EPFO सदस्यांसाठी सेवा वाढविण्याचा उद्देश आहे. रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय कामगार मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये योगदान वाढविण्याचा आणि डेबिट कार्डसारखे एटीएम (ATM card) कार्ड जारी करण्याबाबत विचार करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात थेट ‘एटीएम’मधून पैसे काढता येतील. ही योजना मे-जून २०२५ पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.
सध्या EPF सदस्याला पीएफचे पैसे काढण्यासाठी ७ ते १० दिवस वाट पाहावी लागते. हा वेळ पीएफचे सर्व पैसे काढण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे EPFO ला सादर केल्यानंतर लागतो. यात अधिक वेळ वाया जातो.
सध्या पगारदार कर्मचारी दर महिन्याला त्यांच्या कमाईच्या १२ टक्के रक्कम त्यांच्या EPF खात्यासाठी योगदान देतात. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) वितरीत केली जाते. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात ०.५० टक्के योगदानदेखील देतो.
मुंबई: शिवशाही बसच्या वाढत्या अपघात घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच वाढलेल्या शिवशाही बसच्या अपघातांमुळे शवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान, शिवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या अफवांना एसटी महामंडळाने स्पष्ट नकार दिला आहे. एसटी महामंडळाने या चर्चांना मूळ नसल्याचं सांगत प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.एसटी महामंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, शिवशाही बस सेवा प्रवाशांच्या सोईसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवशाही बस या राज्यभर प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून, ती वेळेवर सेवा आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखली जाते.
महामंडळाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये. अपघातांमुळे आलेल्या आव्हानांना सामोरं जात असतानाही महामंडळाने बस सेवेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात असून, वाहनांची नियमित तपासणी केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या अधिकृत ‘एक्स’ माध्यमातून महामंडळाने या बद्दल खुलासा केला आहे. एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही (वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही. असे या पोस्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे.
खुलासा..
एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही(वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही.
RATNAGIRI: मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी १५ दिवस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असून हे काम करत असताना येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.
Maharashtra Assembly Election:महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. पक्षाकडून तब्बल १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतरदेखील एकही जागा जिंकता न आल्याने मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मतांचा टक्का अवघ्या १.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण २.२५ टक्के इतके होते.
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्षापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकूण १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उत्तरविण्यात आल्याने पक्षासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. गेल्या निवडणुकीत एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनाही कल्याण ग्रामीण
मतदारसंघामधून यंदा पराभवाचा फटका बसला.
मनसेच्या मतांचा टक्का घसरला
मनसेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ५.७१ टक्के मते मिळाली होती. सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हा टक्का ३.१५ टक्क्यांवर घसरला. सन २०१९च्या निवडणुकीत हाच टक्का अवघा २.२५ टक्के राहिला. यंदा त्यात आणखी घट झाली असून मनसेचा जनाधार आता अवघ्या १.५५ टक्के इतका तुटपुंजा आहे.