



वाचकांचे व्यासपीठ: सावंतवाडीहून दिव्याला आलेली गाडी सकाळपर्यंत स्लाइडिंगला उभी करून ठेवण्यात येते. तसे न करता हीच गाडी पुन्हा रात्री दहा वाजता सावंतवाडी करता सोडण्यात यावी.
दुसर्या बाजूने दिव्याहून सकाळी मडगावसाठी निघालेली गाडी रात्रभर मडगाव स्थानकावर उभी करून ठेवण्यात येते. तीच गाडी रात्री मुंबईसाठी सोडल्यास दोन्ही बाजूने रात्रीची सेवा उपलब्ध होईल. रेल्वे प्रशासनाने याबद्दल तांत्रिक बाबींचा विचार करावा आणि रात्रीची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पनवेल स्थानकावरील राखीव जनरल डबे पूर्ववत करावेत
मुंबई उपनगरातील शेवटचे रेल्वे स्टेशन पनवेल असून प्रवाशांची वर्दळ असणारे शेवटचे स्थानक आहे. या स्टेशन वरती पनवेल, उलवा, उरण ,अलिबाग, पेण , मानखुर्द ,गोवंडी, चेंबूर कोपरखैरणे, वाशी, बेलापूर नवी मुंबई परिसरातील लोक शेवटची कोकण कन्या किंवा तुतारी गाडी पकडून कोकणात जाण्यासाठी येतात. पूर्वी येथे कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेस ईत्यादी गाड्यांचा एक जनरल डबा राखीव असायचा, मात्र ती सोय बंद केल्याने येथील प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
कोकणातील आमदार खासदारांनी यात लक्ष घालून तो डबा पूर्ववत पनवेलला सुरू करावा जेणेकरून उपनगरातील व शेवटचे जंक्शन स्टेशन असलेले पनवेल रेल्वे स्टेशनला स्वतंत्र जनरल डबा उपलब्ध होईल.
सावंतवाडी-दिवा या गाडीचा रेक पुन्हा रात्रौ दिवा-सावंतवाडी ला लावून नवीन गाडी सुरू करावी ही मागणी अगदी योग्य आहे . ही गाडी रात्रौ १० वाजतासोडल्यास कोंकणकन्या व तुतारी यावरील लोड कमी होण्यास मदत करील तसेच पूर्वीची दादर-रत्नागिरी ही दादर-चिपळूण अशी ठेवून रात्रौ ११ चिपळूणला ठेवल्यास चिपळूणची गर्दी वरील तीन्ही गाड्यांना रहाणार नाही. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा व चिपळूणपर्यंत सर्व स्थानकांवर उभी करावी. तीच गाडी सायं ४ वाजता चिपळूणहून सोडल्यास ९ पर्यंत दादरला पोहोचेल.