



गोवा: गोवेकरांना कुंभमेळ्यात सहभागी होता यावे यासाठी गोवा सरकारने विशेष रेल्वेसेवेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा या योजनेअंतर्गत ही घोषणा करण्यात आली असून समाजकल्याणमंत्री सुभाष देसाई यांनी मडगावहून प्रयागराजला जाण्यासाठी तीन रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती माध्यमांना दिली.
पहिली ट्रेन
6 फेब्रुवारी : मडगाववरून सकाळी 8 वाजता सुटणार
10 फेब्रुवारी : प्रयागराजवरून संध्याकाळी 4:30 वाजता सुटणार
दुसरी ट्रेन
13 फेब्रुवारी : मडगाववरून संध्याकाळी 4:40 वाजता सुटणार
18 फेब्रुवारी : प्रयागराजवरून सकाळी 11:50 वाजता सुटणार
तिसरी ट्रेन
21 फेब्रुवारी : मडगाववरून रात्री 7:40 वाजता सुटणार
26 फेब्रुवारी : प्रयागराजवरून सकाळी 10.30 वाजता सुटणार
या ट्रेनला थिवी आणि करमाळी अशा दोन ठिकाणी थांबा आहे.
विशेष सेवा फक्त गोव्यातील नागरिकांना
या गाड्या गोवा सरकारने फक्त गोव्यातील नागरिकांसाठी चालविल्या असून या गाड्यांचे आरक्षण रेल्वे तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असणार नाही. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या निकषानुसार भाविकांना या गाड्यांचे तिकीट मिळेल, अशी माहिती गोवा सरकारने दिली आहे. तिकीट बूकिंग साठी भाविकांनी 0832-2232257 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे या गाड्या जरी कोकण रेल्वे मार्गे जात असल्या तरीही महाराष्ट्रातील भाविकांना या गाडीचा फायदा होणार नाही.