काही वेळा एखाद्या अनोळखी गावी जायचा योग, स्वतःचे वाहन नसल्यास गाव खेड्याच्या भागात एसटी हे परवडणारे वाहतुकीचे साधन उपलब्ध असते. मात्र कित्येकदा आपल्याला त्या गावात जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक माहिती नसते, त्यामुळे मोठी गैरसोय होते. मात्र आता ही गैरसोय दूर होणार आहे. रेल्वेप्रमाणे एसटीचेही वेळापत्रक मोबाइल अँप्लिकेशनद्वारे चेक करता येणार आहे.
पियुष चौधरी यांनी एक मोबाइल अँप्लिकेशन बनवले आहे. या अँप्लिकेशनद्वारे वापरकर्त्यांना एसटी बसेसचे वेळापत्रक पाहता येणार आहे. हे अँप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वर उप्लब्ध करण्यात आले आहे. मात्र अजूनही त्यात काही सुधारणा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत १७२ बस स्थानकांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात भविष्यात वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेळापत्रकात बसेसच्या थांब्याचीही माहिती सामील करण्यात येणार आहे.
या अँप्लिकेशन मध्ये बस आगारांचे, मध्यवर्ती कार्यालय, वर्कशॉप, विभागीय कार्यालय आणि मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेचे संपर्क क्रमांक मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
खालील लिंकवर क्लिक वर करून हे अँप्लिकेशन डाउनलोड करता येईल.
ST Bus Time Table Maharashtra – Apps on Google Play

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये सर्वात कमी 45.60% एवढे मतदान झाले आहे.
देशात आज निवडणूकीच्या तिसर्या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.
टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे.
Ad -
मुंबई :उद्या दिनांक ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील भागातील निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने IMD महाराष्ट्रात ज्या भागात मतदान होणार आहे त्या भागातील हवामान अंदाज जाहीर केले आहेत.
IMD ने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर, वाडा, सांगली, सातारा आणि हातकंगाले या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअस ही पातळी ओलांडणार आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकण भागात तापमान ३४ ते ३६ डिग्री सेल्सिअस च्या घरात राहणार आहे. कोल्हापूर जिल्हय़ात अधिकतम तापमान ३९ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
कोणती काळजी घ्याल?
शक्यतो सकाळी मतदानासाठी बाहेर पडावे. मतदान केंद्रावर गर्दी असल्यास उन्हातही मोठी रांग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडताना हातात छत्री घेऊनच बाहेर पडावे. सोबत पाण्याची मोठी बाटली घेऊन निघा. वेळोवेळी पाणी पीत रहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. शक्य असेल तर ORS, लिंबू सरबत अशी घरगुती पेय सोबत घेतल्यास फायद्याचं ठरेल. हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं. तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर हयगय न करता मतदानकेंद्रातील कर्मचाऱ्याकडून मदत मिळवा.
HSC and SSC result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 6 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात देण्यात आली आहे.
उत्तर पत्रिका तपासण्याचे काम जोरात चालू असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकालाची नेमकी तारीख जाहीर करणार असून बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 06 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात.
दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.
Content Protected! Please Share it instead.