विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत व्हीप असा दावा करत लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना काल दिनांक 18/07/2022 रोजी एक विनंतीवजा पत्र लिहून पाठवले आहे
दुसऱ्या कुठल्याही गटाला अशी मान्यता न देण्याचं आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे.
तसेच कोणी असा प्रयत्न केल्यास तातडीने कळवण्याचं आणि आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय न घेण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे समजते.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे.
अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची होती. धार येथून ही बस अंमळनेरकडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही पण त्याआधी मुंबईतील लोकल ट्रेनचे जे प्रश्न आहेत ते सोडवा. मुंबईची लाईफ लाइन समजली जाणारी मुंबई लोकलट्रेनची अवस्था खूप केविलवाणी आहे त्याकडे आधी लक्ष द्या, तिकडे निधी पुरवा असे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहे.
शासनाकडील निधी मुंबई लोकल ट्रेन, प्लॅटफॉर्म, स्टेशने आणि शौचालये सुधारण्यासाठी वापरण्यात यावा अशी मी मागणी करत आहे. सामान्य मुंबईकर तुमच्या कडे बुलेट ट्रेन ची मागणी करत नाही आहे. मग जे आधी मागत आहेत ते आधी जनतेला द्या असे त्या पुढे म्हणाल्या.
मुंबईमधून बर्याच गोष्टी दुसर्या राज्यात नेण्याचा प्रयत्न केला जात आहेत असे त्या म्हणाल्या आणि ह्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सरकार इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या विचारात आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतह्या बद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बैठकीनंतर व्हॅट कपातीबाबत हि घोषणा करण्याची शक्यता आहे.
जर हि कपात झाली तर पेट्रोल आणि डिझेल कमीत कमी 5 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साहजिकच सर्व माहिती आपल्याला त्या घोषणेनंतरच समजेल.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी शिवसेनेत अजूनपर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या १५ आमदारांना एक विशेष पत्र पाठवले आहे. खरतर हे आभारदर्शी भावनिक पत्र आहे. कोणत्याही धमक्यांना न घाबरता किंवा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शिवसेनेसोबत राहून तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे पाईक आहेत हे दाखवून दिले आहे. तुमच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटला आणि शिवसेनेचे बळ वाढले आहे असे ते या पत्रामध्ये म्हणाले आहेत.
*शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना *आमदार श्री रवींद्र वायकर साहेब* यांना दिलेले पत्र.. pic.twitter.com/4hPy4b3P6x
जिल्ह्यात सद्या पावसाचा रेड अलर्ट असल्याच्या पार्श्वभूमीवर पालक सचिव श्रीमती नायर-सिंह यांनी आज सर्व विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती.
सर्व यंत्रणांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन आहे आणि जिवितहानी होणार नाही ही आपली जबाबदारी आहे असे त्या म्हणाल्या.
दरड प्रवण भागात विशेष खबरदारी घ्या. साधन सामग्री, त्यांची सुस्थिती, त्यांचे इंधन याची चोख व्यवस्था करा. सद्यस्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक संस्थांची यादी संपर्कासाठी तयार ठेवा. असे त्या पुढे म्हणाल्या.
प्रत्येक जिल्ह्यात NDRF ची पथके तयार ठेवली आहेत. मागील वर्षाच्या पुरामुळे झालेली जिवितहानी ह्या वर्षी होऊ नये ह्याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहेत. जिथे डोंगर खचण्याचा धोका आहे तिथून नागरिकांना हलवण्यात येत आहे. नद्या आणि धरणांच्या पातळीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीने धोका पातळी ओलांडल्यावर त्या परिसरातील नागरिकांना सावध करण्यात येत आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो वारकरी येतात. ह्या वारकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आज समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात येणार्या भाविकांच्या गाड्यांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी जाणार्या भाविकांना जशी टोल मुक्ती भेटते तशीच सुविधा आता पंढरपुरात वारीला येणार्या वारकर्यांना मिळणार आहे. आषाढी वारीसाठी राज्यातूनच नाही तर पूर्ण देशातून भाविक येतात. या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी जसे भाविक गाडी नंबर आणि नावनोंदणी करून स्टिकर घेतात तसेच वारकर्यांना घ्यावा लागणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना गटनेता पदी अजय चौधरी यांची नियुक्ती अवैध असून एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी कायम राहतील अशा निर्णयाचे पत्र काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र विधान मंडळाने पाठवला आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणुन नियुक्ती करण्यात आलेले सुनील प्रभूंची नियुक्ती पण रद्द करून भरत गोगावले यांना त्याजागी कायम करण्यात आले आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिंदे गटातील आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. ह्या निर्णयाविरुद्ध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी आक्षेप घेतला होता आणि तसे पत्र विधिमंडळाला २२ जून रोजी पाठवले होते.
एकीकडे नेमकी खरी शिवसेना कोणती हा वाद चालू असताना हा एक शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. आता एकनाथ शिंदे गटाचे व्हीप आदित्य ठाकरेसह शिवसेनेच्या १६ आमदारांना मानावे लागेल. तसे न केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला असेल.
या निर्णयाबद्दल बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ह्या निर्णयाविरुद्ध आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत असे ते म्हणाले.
कोकण किनारपट्टीवर पुढील ५ दिवसांत मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस होणार आहे असे IMD (भारतीय हवामान खाते) ने जाहीर केले आहे.
ऑरेंज अलर्ट४ जुलै रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.५ जुलै रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.६ जुलै रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट३ जुलै ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.४ आणि ५ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.६ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर.
मुंबई – आज विधानसभेच्या अध्यक्ष्यपदी बहुमताने भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.
नार्वेकर ते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.
राहुल नार्वेकर यांचा अल्प परिचय आणि राजकीय कारकीर्द.
जन्म – ११ फेब्रुवारी १९७७
जन्मठिकाण – मुंबई
शिक्षण – B COM , LLB
ज्ञात भाषा – मराठी, हिंदी आणि इंग्रजी
कुटुंब – पत्नी आणि एक मुलगी.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत
राहुल नार्वेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
नार्वेकर हे एक वकील सुद्धा आहेत.
राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत.
आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे खास मित्र होते.
राजकीय कारकीर्द
राहुल नार्वेकरांनी राजकारणाची सुरुवात शिवसेनेतूनच केली. १५ वर्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेत काम केलं.
नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला,राष्ट्रवादीकडून २०१४ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली. पण शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून त्यांचा पराभव झाला.
नंतर ३ वर्षे ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे सदस्य राहिले.
२०१९ च्या निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
२०१९ साली ते भाजपच्या तिकिटावर कुलाबा मतदारसंघातून आमदार बनले.