सरकारद्वारे रास्त दराने दिले जाणारे रेशनकार्ड वरील धान्य घेणारी व्यक्ती खरोखर गरजू आहे का, त्याचे उपन्न त्या कसोटी मध्ये बसत आहे का नाही ह्याची पडताळणी पुढच्या महिन्यात होणार आहे. उत्पन्न वाढलेल्या धारकाचे रेशनवरील धान्य ह्या पडताळणीनंतर बंद करण्यात येणार आहे.
कमी उत्त्पन्न गटामध्ये मोडत असलेली गरीब जनता उपाशी राहू नये म्हणून सरकराद्वारे गरीब कुटुंबाना स्वस्त दरात रेशन दिले जाते. मात्र काही लोकांचे उत्पन्न वाढले तरी त्यांचे ह्या सुविधेमध्ये नाव असल्याने त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. काही लोक हेच धान्य त्यांना मिळालेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विकून ह्या सुविधेचा गैरवापर करत आहेत. काही लोक तर चक्क जनावरांना हे धान्य खायला घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
ह्या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व प्रत्येक रेशनधारकांची धान्य निरीक्षकांमार्फत पडताळणी होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. खोट्या माहितीद्वारे कमी उत्पन्न दाखवून जर कोणी ह्या सुविधेचा दुरुपयोग केला असेल तर त्यांच्याकडून मागील धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
IMD Alert | मतदानाच्या दिवशी हे मतदारसंघ 'तापणार', कोणती काळजी घ्याल?
महाराष्ट्र
पालघर येथील बेंचरेस्ट रायफल शुटींग स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद; ४०० हून जास्त खेळाडूंची उपस्थिती.
महाराष्ट्र
कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करावी या मागणीसाठी अखंड ...
महाराष्ट्र