Category Archives: अपघात

Mumbai | अमरावती एक्सप्रेसला आग; प्रवाशी सुरक्षित

   Follow us on        

Amaravati Express Fire: मुबंईत दोन वेळा लोकल रुळावरून घसरल्याची घटना ताजी असताना दादर स्टेशनवर आज अजून एक दुघटना घडली आहे. अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागल्याने ही बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावीत एक्स्प्रेसच्या बी ९ च्या कोचमधून धूर दिसल्यानंतर ही घटना समोर आली. आग किरकोळ असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु आगीच्या घटनेमुळे स्टेशनवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीची माहिती मिळताच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेतून उतरून आग विझवली

 

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अपघात: मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; तीन प्रवाशांचा मृत्यू

   Follow us on        
माणगाव दि. ०७ एप्रिल: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे रिक्षा आणि शिवशाही बसचा आज भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक वृत्तानुसार, ठाण्याहून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावजवळ आली असता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेत रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून बसचेही मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळ असलेल्या मानगाव येथील मानस हॉटेलजवळ हा अपघात झाला.
दत्तात्रय वरांडेकर, प्रवीण मालसुरे आणि अन्य एक  प्रवासी अशी रिक्षात प्रवास करताना झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या तिघांची नावे आहेत. पोलीस सध्या अपघाताच्या घटनास्थळाचा तपास करत आहेत. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाल्यामुळे धडकेची तीव्रता स्पष्ट होत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपस करत आहेत.

Mumbai Goa Highway | हळवल फाट्यावर कारला अपघात; तिघेजण जखमी

Accident News : आज मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर कार अपघात झाला. या अपघातात ३ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात  दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणारी कार (एमएच १४ एफ एस ९८५१) ही कार दुपारी १२: ३० वा. च्या सुमारास महामार्ग सोडून दोन तीन पलटी खात महामार्गालगतच्या जागेत जाऊन थांबली.या अपघातात तीन जणांना दुखापती झाल्या असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बापू खरात व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

VIDEO: शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर पहिल्या अपघाताची नोंद; अपघाताचा विडिओ समोर

उरण : शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर रविवारी दुपारी ३ वाजता पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आठवड्याभरात पहिला अपघात झाला आहे. हे वाहन उरणच्या चिर्लेकडून मुंबईकडे जात असताना हा किरकोळ अपघात झाला आहे. पुलावर उरणच्या दिशेने १२ किलोमीटर अंतरावर एका वाहनाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाच्या मधल्या दुभाजकाला धडक दिली. हे वाहन एक महिला चालवीत होती. वाहनात एक पुरुष आणि एक लहान मूल होते. यावेळी तातडीने अपघात स्थळी मदत पोहचविण्यात आली आहे.
या अपघातात वाहन चालक महिला किरकोळ जखमी झाली असून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नेले आहे. त्याचप्रमाणे अपघातस्थळी अग्निशमन दलाचे जवानही उपस्थित होते. “रविवारी दुपारी अटलसेतुवर किरकोळ अपघात झाला आहे. चिर्लेच्या दिशेने हे वाहन मुंबईला जात असताना हा अपघात झाला”, अशी माहिती माहिती न्हावा शेवा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली.

देवगड: एसटीवरचा ताबा सुटून अपघात; चालक ठार, तिघेजण जखमी

मुणगे : आचऱ्याहून देवगडला (Devgad) जाणाऱ्या बसचे चाक मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली. या अपघातात (Bus Accident) चालक बापू लक्ष्मण काळे (वय ५४, रा. तळेरे) गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात काल (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर (ता. देवगड) येथे झाला. यात वाहकासह दोन प्रवासीही जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी : आचरा-खुडीमार्गे देवगड बस घेऊन दुपारी चालक बापू काळे निघाले होते. बस दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली.

मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, मंगेश पालव यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या चालकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडून बाहेर काढले. अपघातात चालक काळे यांच्यासह वाहक राजेंद्र मनोहर जाधव व प्रवासी रुही दीनानाथ पडवळ (वय २१) व मिताली प्रवीण मुणगेकर (१९, दोघे रा. कुडोपी) जखमी झाले.

कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डबे घसरले; वाहतूक विस्कळीत

ठाणे : मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ एका पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरून अपघात झाला आहे.  ही घटना आज रविवार, 10 डिसेंबर संध्याकाळी 6:31 च्या सुमारास घडली आहे. 
“कल्याण स्टेशन रोड एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) आणि इगतपुरी स्टेशन रेल्वे एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) मागवण्यात आले आणि अपघातस्थळी हलवण्यात आले,” असे मध्य रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले. अधिक माहितीची प्रतीक्षा करण्यात येत आहे.  

मालवण: सागरी महामार्गावर दोन कार धडकल्या; ५ जण जखमी

मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ-वेंगुर्ले सागरी महामार्गावरकाल सायंकाळी चारच्या सुमारास दोन मोटारींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले.या अपघातात दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असून या अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्या सर्व जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ-माड्याचीवाडी येथील काहीजण मोटारीने (एम. एच- ४३ एन- ७०५०) मालवणात लग्न समारंभासाठी आले होते. समारंभ आटोपून सायंकाळी ते पुन्हा कुडाळच्या दिशेने निघाल्यावर कुंभारमाठ-वेंगुर्ले सागरी महामार्गावर मोटार आली असता समोरून वेंगुर्लेहून श्रावणच्या दिशेन येत असलेली मोटार (एम. एच. ०२ डीएस ११०६) यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात घडला. या अपघातात दशरथ धोंडू तेली (वय ५५) व चंद्रशेखर मधुसूदन परब (५८ दोघे रा. माड्याचीवाडी, कुडाळ) हे तर दुसऱ्या गाडीतील सुनीता महेश पवार (५८), सिद्धेश महेश पवार (३३), सचिन गणपत पवार (३६, सर्व रा. श्रावण) हे तिघे असे एकूण पाचजण जखमी झाले आहेत,

धक्कादायक! पाच विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाले! चार मुलींचा समावेश

देवगड : सिंधुदुर्गातील देवगड येथे सहलीला आलेल्या पुण्यातील सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडलीय. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून एकजण असून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे येथील संकल्प सैनिक अॅकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. यातील काहीजण समुद्रात आनंद लुटण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.

बुडालेल्यांपैकी चार जणांचे मृत सापडले आहेत. प्रेरणा डोंगरे,अंकिता गालटे,अनिषा पडवळ,पायल बनसोडे अशी मृतांची नावे आहेत. याच्याबरोबर अजून दोनजण बुडाले आहेत, त्यातील आकाश तुपे नावाच्या पर्यटकाला वाचवण्यात आलंय. तर राम डिचवलकर हे अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

देवगड : ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात

देवगड : देवगड आगाराची वरेरी देवगड या दुपारच्या एसटी प्रवासी फेरीला दुपारी दोनच्या सुमाराला तळवडे खडवी येथे तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी नजीकच्या मांगरावर अडकली अपघातात तळेबाजार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. या एसटी प्रवासी फेरीचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. देवगड आगराची वरेरी तळवडे मार्गे देवगडकडे परतीच्या प्रवासाला येत असताना हा अपघात घडला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या प्रवासी फेरीत सुमारे १५ विद्यार्थी अन्य १ प्रवास करीत होते त्यापैकी तीन विद्यार्थीनीना किरकोळ दुखापत झाली. आहे. 

 

 

मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे अपघात; १ ठार, २ जण जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलावर कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजन बाबल्या डांगे (40, रा. हातखंबा, रत्नागिरी ) हा लाद्याची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोच्या हौद्यात बसलेला होता. या अपघातामुळे त्याच्या अंगावर लाद्या पडून त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.या अपघातामुळे वाहतूक खोळंबली असून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search