Category Archives: नोकरी

Indian Railway: वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचारण

   Follow us on        
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेला सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणांवर खूप ताण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित Retired कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे.
६५ वर्षांखालील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक आणि ट्रॅक पुरुष यासारख्या भूमिकांसाठी अर्ज करू शकतात. मुदतवाढीच्या पर्यायासह नियुक्त्या दोन वर्षांसाठी राहतील. सर्व रेल्वे झोनचे महाव्यवस्थापक या सेवानिवृत्तांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती Fitness आणि गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या रेटिंगच्या आधारे नियुक्त करू शकतील अशा सूचना देण्यात आल्या  आहेत.
रेल्वेत सध्या सुपरवायजर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत भरती झाली नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी व नव्याने तरुण कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुनर्नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांना निवृत्त होताना असलेले वेतन दिले जाणार आहे मात्र त्यातून त्यांचे मूळ पेन्शन वजा केले जाईल. त्यांना प्रवासासाठी आणि अधिकृत टूरसाठी प्रवास भत्ते देखील मिळतील परंतु अतिरिक्त लाभ किंवा पगार वाढीसाठी ते पात्र नसतील.
वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागात Zones एकूण २५००० कर्मचारी भरती करण्याचे उद्दिष्ट आहे.

Loading

कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ( KRCL ) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता + प्रकल्प अभियंता (निविदा आणि प्रस्ताव), CAD/ड्राफ्ट्समन आणि सहाय्यक अभियंता/कंत्राटी या पदांसाठी उमेदवार भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार दिलेल्या पदांसाठी 11 रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. निवडलेल्या उमेदवारांना पदांनुसार रु.35400 ते रु.56100 पर्यंत मासिक मानधन मिळणार आहे. तसेच अर्ज करण्याची उच्च वयोमर्यादा ही पदांनुसार ४५ वर्षांपर्यंत आहे

कोकण रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, लागू उमेदवारांची निवड समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल . पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीसाठी थेट उपस्थित राहू शकतात.ही नियुक्ती 01-वर्षाच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. मुलाखतीच्या ठिकाणी सर्व संबंधित कागदपत्रे आणि रीतसर भरलेला अर्ज सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

पदांनुसार रिक्त जागा खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:

किमान /कमाल वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि ईतर सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात वाचा 👇🏻

KRCL-Recruitment-2024.pdf

 

Loading

मुलांनो ही संधी दवडू नका; रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि रेल्वे संरक्षण विशेष दल (RPSF) मध्ये 4660 पदांसाठी भरती.

   Follow us on        
रेल्वे भरती :रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि रेल्वे संरक्षण विशेष दल (RPSF) ने कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर (SI) या 4660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे..
पदांची संख्या – 
कॉन्स्टेबल: 4208
सब-इन्स्पेक्टर: 452
शैक्षणिक पात्रता – 
कॉन्स्टेबल: 10वी उत्तीर्ण
सब-इन्स्पेक्टर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
वय मर्यादा – 
कॉन्स्टेबल: 18 ते 28 वर्षे – इतर नियमानुसार सूट, सब-इन्स्पेक्टर: 20 ते 28 वर्षे – इतर नियमानुसार सूट
अर्ज शुल्क – 
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस: ₹500 एससी, एसटी, महिला आणि एक्स-सरव्हिसमन: ₹250
अर्ज प्रक्रिया – 
उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावे लागतील. ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी 15 एप्रिल 2024 ते 14 मे 2024
निवड प्रक्रिया – 
अर्जांची निवड शारीरिक चाचणी (PET), शारीरिक मापन चाचणी (PMT) आणि लेखी परीक्षा या आधारे केली जाईल.
शारीरिक चाचणी (PET)
धावणे, लांब, उंच उडी (पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगळ्या निकष)
लेखी परीक्षा
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असेल.
प्रश्न मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील.
अधिकृत संकेतस्थळ: 
जाहिरात:
Apply Link :
15 एप्रिल 2024 (आज) पासून सुरु होईल.
ही बातमी अधिका अधिक शेअर करून आपल्या मराठी मुलांना एक संधी उपलब्ध करून द्या

Loading

युनियन बँकेत 600 हून अधिक पदांसाठी बंपर भरती; अर्ज कसा कराल?

Union Bank of India Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची संधी आली आहे. युनिअन  बँक ऑफ इंडिया ने नुकतीच कर्मचारी भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे . ही भरती प्रक्रिया 606 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची  सुरवातीची तारीख 03 फेब्रुवारी  2024 तर शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक –  03/02/2024
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक – 23/02/2024
एकूण जागा – 606 
पद –  स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officers)
निवड प्रक्रिया  :  ऑनलाइन परीक्षा + गट चर्चा + अर्ज स्क्रिनिंग किंवा वैयक्तिक मुलाखत
जाहिरात वाचण्यासाठी लिंक – https://www.unionbankofindia.co.in/pdf/notification-02-02-24.pdf
अर्ज करण्यासाठी लिंक –  https://ibpsonline.ibps.in/ubisojan24/
अधिकृत संकेतस्थळ –  www.unionbankofindia.co.in

Loading

भारतीय रेल्वे मंडळात ५६९६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचे २ दिवस बाकी

 RRB Bharti 2024: भारतीय रेल्वे मंडळने असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदांसाठी ५६९६ जागांसाठी भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यासंबंधी जाहिरात सुध्दा प्रसिदध करण्यात आली आहे.  योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी  २०२४ आहे. 
  • अर्ज करण्याचे माध्यम -ऑनलाइन
  • एकूण पदसंख्या – ५६९६ पदे
  • संस्था – भारतीय रेल्वे मंडळ
  • नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
  • शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२४
  • जाहिरात दिनांक – जानेवारी २०२४
  • भरती प्रकार – सरकारी
  • निवड मध्यम (Selection Process) –
  • अधिकृत वेबसाईट www.indianrailways.gov.इन
  • पद- असिस्टंट लोको पायलट (ALP)
  • पदसंख्या – ५६९६
  • शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria: – असिस्टंट लोको पायलट (ALP): १० वी उत्तीर्ण आणि ITI.
  • वेतन/ पगार/ Pay Scale: -असिस्टंट लोको पायलट (ALP): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
  • वय मर्यादा/ Age Limit: या तारखेप्रमाणे: 2024 रोजी.
  • कमीत कमी: १८ वर्ष.
  • जास्तीत जास्त: ३० वर्ष.
  • वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

 

भरतीची जाहिरात

Loading

तळ कोकणातील पहिल्या बीपीओ सेंटरचे सावंतवाडीत उद्घाटन

सावंतवाडी: व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत झाले. तळकोकणातील हे पहिले पहिल्या बी पी ओ सेंटर ठरले आहे.
सावंतवाडी मध्ये स्थापन झालेल्या व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कंपनीच्या माध्यमातून दोनशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली गेली असून अजून तरुण तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोकणवासियांसाठी काहीतरी करावं ही व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे साबळे यांची इच्छा होती. या उद्देशानेच त्यांनी मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभा करण्याचा मानस तयार केला होता. या त्यांच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थानं यश मिळालं आहे. कोकणात अनेक तरुणांना यापुढ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागतंय.
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड ही भारतीय डिजिटल तंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी आहे. सावंतवाडी मधील जिमखाना मैदाना शेजारील भव्य इमारतीमध्ये व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनीचे ऑफिस आहे. सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेले बीपीओ सेंटर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेले पहिल बिपिओ सेंटर ठरलं आहे. सिक्युअर क्रेडेनशियल ,स्ट्रायकर, एफ एस आणि arrise च्या वाढत्या क्लाइंटबेससह डेटा एन्ट्री अकाउंटिं,बॅकग्राऊंड वेरिफिकेशन, डेट रिकवरी यासारख्या सेवांचा समावेश सावंतवाडीतल्या बीपीओ सेंटर मध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून बहुउपयोगी फिजिटल पायाभूत सुविधांचा आणि त्याच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनी ने सिंधुदुर्ग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात एक उत्तुंग असं पाऊल टाकलं आहे. ग्राहकांसाठी व्हरेनियम क्लाऊड लिमिटेडने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड प्रधान कार्यालया च्या उदघाटन सोहळ्यास मॕनेजिंग डायरेक्टर -मा.हर्षवर्धन साबळे , हायड्रा ओपरेशन हेड -अनुष्का लोध, टेक्निकल कन्सलटंट- मुकुंदन राघवन, सावंतवाडी हेड-विनायक जाधव, अॕडमीन -संदिप नाटलेकर, प्रोजेक्ट इंजिनियर -लक्ष्मण नाईक, सतीश पाटणकर, साहील नाईक,ओंकार सावंत व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Loading

कोकण रेल्वेत विविध पदांच्या ३२ जागांसाठी भरती; पुर्ण माहिती येथे वाचा

Konkan Railway Recruitment 2023 :  कोकण रेल्वेतील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ‘वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी’ ya पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीकरिता हजर राहू शकतात. या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीची तारखा डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ महिन्यातील आहेत. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

पदाचे नाव – वरिष्ठ डिझाईन अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/निरीक्षण, रचना अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, आराखडा, उप. महाव्यवस्थापक (वित्त), सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखा व्यवस्थापक, विभाग अधिकारी.

वयोमर्यादा – ३५ ते ५५ वर्षादरम्यान

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

एकूण पदसंख्या – या भरती अंतर्गत एकून ३२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.

मुलाखतीची तारीख – १४, १८, २०, २२, २६, २८, ३० डिसेंबर २०२३ आणि ०१, ०४, ०५, ०८ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट –

https://konkanrailway.com/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1NJMLNX7IBMDNuWxxqw09MNiyQ-PhWieS/view

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामधील रिक्त पदांसाठी भरती; ‘असा’ करा अर्ज

नोकरी :सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

⇒ पदाचे नाव : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल.

⇒ एकूण रिक्त पदे: 62 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग.

⇒ वेतन/ मानधन: रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.

⇒ वयोमर्यादा: १८ – ३८ वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 4 डिसेंबर 2023.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023.

⇒ अर्ज करण्याची लिंक 👇🏻

https://bombayhighcourt.nic.in

जाहिरात 👇🏻

Loading

कोकण रेल्वेमध्ये १९० जागांसाठी भरती; ‘असा’ करा अर्ज

मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव –
पदवीधर अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
एकूण रिक्त पदे – १९०
शैक्षणिक पात्रता –
  • पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग.
  • जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ EWS – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक.
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात अवश्य पाहा.

Loading

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर! अर्ज कसा कराल?

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2023: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांच्या 334 जागांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर झाली आहे.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती पदाचे नाव/ पदानुसार जागा:

1) आरोग्य पर्यवेक्षक- 01

2) आरोग्य सेवक (पुरूष)- 55

3) आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला)- 121

4) औषध निर्माण अधिकारी- 11

5) कंत्राटी ग्रामसेवक- 45

6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)- 29

7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 02

8) कनिष्ठ लेखा अधिकारी- 02

9) कनिष्ठ सहाय्यक लेखा- 04

10) मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका- 02

11) पशुधन पर्यवेक्षक- 18

12) प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 02

13) तारतंत्री- 01

14) वरिष्ठ सहाय्यक- 04

15) वरिष्ठ सहाय्यक लेखा- 07

16) विस्तार अधिकारी (कृषि)- 03

17) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)- 27

अर्ज कसा कराल? शैक्षणिकदृष्टीने पात्र उमेदवारांनी दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिकृत वेबसाईट zpsindhudurg.maharashtra.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन शासनाने केले आहे.

जाहिरात

सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हापरिषद भरती 2023

जाहिरातीची पीडीएफ फाईल येथे डाऊनलोड करा 👇🏻

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search