- पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग.
- जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.
- टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
Category Archives: नोकरी

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2023: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांच्या 334 जागांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर झाली आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती पदाचे नाव/ पदानुसार जागा:
1) आरोग्य पर्यवेक्षक- 01
2) आरोग्य सेवक (पुरूष)- 55
3) आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला)- 121
4) औषध निर्माण अधिकारी- 11
5) कंत्राटी ग्रामसेवक- 45
6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)- 29
7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 02
8) कनिष्ठ लेखा अधिकारी- 02
9) कनिष्ठ सहाय्यक लेखा- 04
10) मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका- 02
11) पशुधन पर्यवेक्षक- 18
12) प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 02
13) तारतंत्री- 01
14) वरिष्ठ सहाय्यक- 04
15) वरिष्ठ सहाय्यक लेखा- 07
16) विस्तार अधिकारी (कृषि)- 03
17) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)- 27
अर्ज कसा कराल? शैक्षणिकदृष्टीने पात्र उमेदवारांनी दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिकृत वेबसाईट zpsindhudurg.maharashtra.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन शासनाने केले आहे.
जाहिरात
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/सिंधुदुर्ग-जिल्हा-जिल्हापरिषद-भरती-2023.pdf” title=”सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हापरिषद भरती 2023″]जाहिरातीची पीडीएफ फाईल येथे डाऊनलोड करा 👇🏻
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. आज दिनांक 31 जानेवारीपासून ऑनलाईन पध्दतीने हे अर्ज स्विकारले जातील. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2023 आहे.
परीक्षेकरिता अर्जप्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटला क्लिक करून उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा
https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/
परीक्षाशुल्क
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत आहे
प्रवेशपत्र डाऊनलोड
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 प्रवेशपत्र दिनांक १५/०२/२०२३ पासून डाउनलोड करू शकता
वेळापत्रक
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 Exam दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)
परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्त्वाचे
- अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्य राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी.
- स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा. - ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल.
- ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
जाहिरात
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/01/TAIT-EXAM-2023Notification.pdf” title=”TAIT EXAM 2023Notification”]सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील तरुण पिढीसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील तरुणांना रोजगार देण्यासाठी ‘ॲडमिशन’, ‘व्हॅरेनियम क्लाउड’ आणि ‘सिक्योर क्रेडेंशियल्स’ या कंपन्यांनी संयुक्तरित्या गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल. या रोजगार मेळाव्यात ‘आजच मुलाखत; आजच निवड’ या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी मिळेल. तसेच यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल.
या रोजगार मेळाव्यात पुणे, गोवा आणि कोल्हापूर येथील खालील कंपन्या सहभागी होणार आहेत.
एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सामील झाल्या आहेत.
(हेही वाचा >पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजूगर बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा)
या मेळाव्यात बॅक ऑफिस, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मेकॅनिक्स, डाटा ऑपरेटर, सेल्स एक्सिक्युटीव्ह, आयटी, एज्युकेशन, टेक्निशियन, हॉटेल सर्व्हिसेस या क्षेत्रात नोकरीच्या ससंधी उपलब्ध होतील. त्यामुळे सिंधुदुर्गातील अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचा एक शासन निर्णय जाहीर झाला आहे.

Mumbai :राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.
श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.
संपूर्ण जिल्हावार भरली जाणारी पदसंख्या पाहण्यासाठी खालील फाईल ओपन करून शासननिर्णय पहावा.
तलाठी भरती (नवनिर्मीत पदासह).Pdf
Block "ad1" not found

MAHAGENCO RECRUITMENT NEWS : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही. परिणामी खुल्या प्रवर्गाच्या २३९ जागांसाठी सर्व देशभरातून अर्ज येतील आणि राज्याच्या युवकांना मर्यादित संधी मिळेल. एकीकडं राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याने युवांना आधीच नोकऱ्या नाहीत, अशा स्थितीत राज्याच्या हक्काच्या भरती प्रक्रियेत तरी किमान राज्यातील युवांना न्याय मिळायला हवा.
त्यामुळं शासनाने या परीक्षेसाठी अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य करण्याबाबत महाजेनकोस निर्देश द्यावेत, अशी विनंती राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे केली आहे.
मुंबई: पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्यासाठी नोव्हेंबर मध्ये होणारी भरती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे.
हि पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले होते. ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले होते. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.
सदर भरती प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे अशा आशयाचे एक माहितीपत्रक पोलीस महासंचालकांच्या वतीने काढण्यात आलेले आहे.
Related : महाराष्ट्र पोलीस दलातील १४,९५६ रिक्त पदांसाठी भरती…पहा जिल्ह्यानुसार पदांची संख्या
j
Block "ad1" not found









