Category Archives: महाराष्ट्र

संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप…

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल आहे.

हेही वाचा >Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र आपल्या ट्विटटर हँडलवरून ट्विट केले आहे. आपली सुरक्षा हटवण्यात आल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत यांनी काय लिहिलं आहे पत्रात?

 

Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

नवी दिल्ली :भारतीय संसदेतील शिवसेना पक्षाचं कार्यालय आता एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आलं आहे. खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे गटनेते आहेत. शेवाळे यांनी केंद्रीय सचिवालयाला यासंदर्भातील पत्र दिलं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्वाळा केल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयावर एकनाथ शिंदे गटाचा ताबा मिळावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. त्यानुसार, राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने आज संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात आज एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी प्रवेश घेतला.

काल महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ताबा मिळवला. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी प्रवेश केला.

पक्षचिन्हासाठी नीलेश राणेंनी उद्धव ठाकरे गटाला दिला उपहासात्मक सल्ला ..

मुंबई : निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालात पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे गटाला निलेश राणे यांनी एक उपहासात्मक नवीन चिन्ह सुचवले आहे.

परिस्थिती पाहता आता उद्धव ठाकरे गटाला ‘फावडे’ हे चिन्ह योग्य राहील अशी ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर केली आहे.

उद्धव ठाकरे 25 वर्षे मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे होती मग मराठी माणसाची टक्केवारी 20% पेक्षा खाली का? मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? उद्धव ठाकरे तुम्हाला मराठी माणसाबद्दल बोलायचा अधिकारच नाही. असेही ते अजून एका ट्विट मध्ये म्हणाले आहेत. 

ब्रेकिंग – ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला!

Breaking News :केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने ज्या बहुमतावर शिंदे हेच खरे शिवसेनेचे नेते आणि त्यांच्याच गटाला धनुष्यबाण दिले आहे ती आकडेवारी पुढीलप्रमाणे 

 

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्ग; घोडे नेमके अडले कुठे?

सिंधुदुर्ग | मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वे जोडणारा प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मागील दहा वर्षांपासून रखडला आहे.  या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली असून त्याचा समावेश 2011-12 च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला होता. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही सादर केला होता. प्रस्तावित  सर्वेक्षणानुसार कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग व्यवहार्य असल्याची नोंद आहे.  मात्र त्यावर अद्याप कोणतेही काम झालेले नाही. हा रेल्वे मार्ग झाल्यास हा 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे.
काय आहेत अडथळे?
या मार्गाचे काम कठीण असले तरी कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यास वेळ लागणार नाही. कारण असे कठीण कामे कोकण रेल्वे मंडळाने या आधी केली आहेत. पण हा  प्रकल्प कोकण रेल्वेकडे न देता मध्य रेल्वेमार्फत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.  सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे निधीचा. या मार्गास रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य शासनाकडून निधी मंजूर होत नाही आहे.२०१७ च्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३४३८.४९ कोटी एवढा आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के निधी रेल्वे मंत्रालय आणि उर्वरित महाराष्ट्र सरकार देणार आहे. २०१६ च्या अर्थसंकल्पातील  २५० कोटीची तरतूद वगळता अजूनपर्यंत कोणतीही तरतूद त्या पुढच्या अर्थसंकल्पात केली गेली नाही आहे.  निधीअभावी फक्त सर्वेक्षण वगळता कोणतेही काम चालू झाले नाही आहे. या मार्गाकरिता  683 हेक्टर भूसंपादन गरजेचे आहे, पण अजूनपर्यंत काहीच भूसंपादन झाले नाही आहे. २०१८ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कामास गती देण्याचा प्रयत्न केला गेला होता. २०२२ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण त्यानंतर काहीच प्रगती झाली नाही. मिळाल्या फक्त पुढच्या तारखा!
या रेल्वेमार्गाचा फायदा 
कोल्हापूर आणि कोकणातील उद्योग, व्यापार वाढीच्यादृष्टीने हा रेल्वेमार्ग उपयुक्त आहे. 107 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या या तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. कोल्हापुरातील शेती व इतर पूरक उत्पादने बाय रोड पाठवायची ठरवल्यास प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. येथील कंटेनरना न्हावाशेवा बंदरामध्ये चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्याचे भाडे भरावे लागते. मात्र हाच माल जयगडच्या बंदरापर्यंत रेल्वेने पोहचवला तर तो लवकर पाठवता येऊ शकेल. त्याचबरोबर या बंदराचा दुहेरी फायदाही होऊ शकतो. या बंदरावर कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लँटमध्ये १५ टक्के कोळसा वापरता येऊ शकतो. तसेच येथील इंडस्ट्रिजसाठीही हा कोळसा मिळू शकेल. सध्या कोल्हापुरात आणण्यात येणारा कोळसा ट्रक वाहतुकीने कारखान्यांपर्यंत आणणे प्रचंड खर्चिक आहे. रेल्वेचा हा नवीन मार्ग सुरु झाल्यास आयात व निर्यात व्यवसायासाठी मोठा फायदा होऊ शकतो. कमी खर्चामध्ये ही वाहतूक होऊ शकते.

एससीईआरटीतर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी प्रश्नपेढी उपलब्ध

पुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी QUESTION BANK प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रश्नपेढीचा वापर करून विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतील.

संकेतस्थळावर गेल्यावर्षीचीच प्रश्नपेढी?

गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे २५ टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेचा अंदाज येण्यासाठी एससीईआरटीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत एससीईआरटीच्या संकेतस्थळावर गेल्यावर्षीचीच प्रश्नपेढी दिसत होती. त्यामुळे यंदा प्रश्नपेढी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी-पालकांसमोर निर्माण झाला होता.

एससीईआरटीने यंदा दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के अभ्यासक्रमावरील विषयनिहाय प्रश्नपेढी तयार केल्या आहेत. त्यामुळे, या प्रश्नपेढ्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येणार आहे. प्रश्नपेढी https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा

दिल्ली : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.

अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.

कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? 

दरम्यान, रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे. 

 

‘वंदे भारत’ मुळे एका दिवसात शिर्डी यात्रा शक्य

मुंबई : या आठवडय़ात सुरू होणार्‍या मुंबई ते शिर्डी 22223/Mumbai CSMT – Sainagar Shirdi Vande Bharat Express या वंदे भारत गाडीमुळे भाविकांना शिर्डीला जाण्याचा जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. 

एका दिवसात शिर्डी यात्रा शक्य

मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस आनंदाची पर्वणी राहणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी दरम्यान सकाळी धावणार आहे. मुंबई येथून ही ट्रेन सकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी (6:15 AM) शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे. आणि दुपारी 12:10 वाजता ही ट्रेन शिर्डी या ठिकाणी पोहोचेल.तसेच शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन सायंकाळच्या वेळेला धावणार आहे. सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी (5:25 PM) ही ट्रेन शिर्डी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. रात्री अकरा वाजून 18 मिनिटांनी (11:18 PM)ही ट्रेन मुंबई या ठिकाणी पोहोचेल. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस ही ट्रेन धावणार आहे.

 

मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे तिकिटाचे दर

मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी 800 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1660 रुपये असे दर तर नाशिक ते मुंबईसाठी अनुक्रमे 550 आणि 1250 रुपये तिकीट दर आहेत. 

थांबे 

ही गाडी फक्त काही मोजक्या स्थानकावर थांबणार आहे. दादर, ठाणे, नाशिक हे या गाडीचे थांबे आहेत. 

खाद्यपदार्थांचे पर्याय 

सकाळच्या न्याहारीसाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय आहेत

जेवणासाठी अस्सल झुणका, शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय आहेत. यांसह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. 

सायंकाळच्या न्याहारीमध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबिर वडी, भरड धान्यांचे थालिपीठ, मिश्र धान्यांचे भडंग, साबुदाणा वडा असे पर्याय आहेत. यासाठीचे पैसे प्रवाशांना भरावे लागणार आहेत, असे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले.

 

 

आंबोलीत घातपाताची विचित्र घटना… मृतदेहाची विल्हेवाट लावताना एकाचा मृत्यू

 

सिंधुदुर्ग : एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोलीत आलेल्या व्यक्तिचा त्या मृतदेहासोबत दरीत पडून मृत्यू झाल्याची खळबळ माजवणारी घटना घडली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की कराड येथील एका विट व्यावसायिकाने एका व्यक्तीला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला  व्यावसायिकाने एका मित्राच्या मदतीने मारहाण केली. या मारहाणी दरम्यान त्या व्यक्तिचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो व्यावसायिक आणि त्याचा मित्राने सरळ आंबोली गाठली आणि मृतदेह एका खोल दरीत टाकायचे ठरवले. पण तो मृतदेह दरीत टाकताना त्या व्यावसायिकाचा पाय घसरला आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  व्यावसायिकचा मित्र आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्ही मृतदेह पण सापडले आहेत. मारहाणी दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमूळे न होता हार्ट अ‍ॅटॅक मुळे झाला असल्याचेही त्याने सांगितले. नेमकी घटना काय आहे ह्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. 

तब्बल ५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर TAIT ची घोषणा.. आजपासून अर्ज स्विकृती

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. आज दिनांक 31 जानेवारीपासून ऑनलाईन पध्दतीने हे अर्ज स्विकारले जातील. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2023 आहे.

परीक्षेकरिता अर्जप्रक्रिया 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटला क्लिक करून उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा

https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/

परीक्षाशुल्क 

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत आहे

प्रवेशपत्र डाऊनलोड 

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 प्रवेशपत्र दिनांक १५/०२/२०२३ पासून डाउनलोड करू शकता

वेळापत्रक 

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 Exam दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)

परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महत्त्वाचे 

  • अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्य राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी.
  • स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
    सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
  • ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल.
  • ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

जाहिरात

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/01/TAIT-EXAM-2023Notification.pdf” title=”TAIT EXAM 2023Notification”]

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search